पे अॅज यू ड्राईव्ह कार इन्श्युरन्स
Get Instant Policy in Minutes*

Third-party premium has changed from 1st June. Renew now

'पे अॅज यू ड्राईव्ह (PAYD)' अॅड ऑन कव्हर

कार इन्श्युरन्सच्या प्रगत विश्वात तुमचे स्वागत आहे - जिथे तुमचे कव्हरेज आणि खर्च तुमच्या हातात असतील. घेऊन येत आहोत डिजिट कार इन्श्युरन्स पे अॅज यू ड्राईव्ह अॅड ऑन सह जर तुम्ही गाडी कमी वापरता तर कमीच पे करा!

जर गाडी कमी चालवली जात असेल तर खर्च पण कमी असायला हवा, आणि आमच्या या नवीन अप्रोचअंतर्गत जर तुम्ही तुमची गाडी 10,000 किमी पेक्षा कमी चालवली असेल तर तुम्ही तुमच्या कार इन्श्युरन्सवर 85% पर्यंतची बचत करू शकता  आता वन साईज फिट्स ऑल सारख्या पॉलिसींना करा बाय बाय आणि तुमच्या लाइफस्टाइलशी जुळवून घेणाऱ्या इन्श्युरन्सचे स्वागत करा. 😎

डिजीटचे कार इन्शुरन्स असेल तर, तुमची गाडी कमी चालवली गेली असेल तर तुम्हाला पैसे देखील कमीच भरावे लागतील!

हे कोणासाठी एकदम योग्य आहे?

पे अॅज यू ड्राईव्ह अॅड ऑन कव्हर म्हणजे काय?

जसे की नावावरून समजते, पे अॅज यू ड्राईव्ह अॅड ऑन हा असा कव्हर आहे जो, जर तुमची गाडी वर्षात 10,000किमी पेक्षा कमी चालत असेल तर तुम्ही तुमचे कार इन्श्युरन्स (कॉम्प्रिहेन्सिव्ह किंवा ओन डॅमेज इन्श्युरन्स विकत घेताना) विकत घेताना निवडू शकता. यामुळे तुम्हाला तुमच्या ओन डॅमेज प्रीमियमवर 85% पर्यंतची सूट मिळते जी तुमची कार किती किमी चालली यावर अवलंबून असते.

मूळतः (ओरिजनली) 2022 मध्ये लॉंच केलेला डिजिट इन्श्युरन्स अशा प्रकारचा फीचर ऑफर करणारा सर्वात पहिला इंश्युरर ठरला सुरुवातीला हा फीचर वर्षात 15,000 किमीपेक्षा कमी गाडी चालवणाऱ्या लोकांसाठी होता, पण आता आम्ही आणखीन पुढे जाऊन 10,000 किमीपेक्षा कमी गाडी चालवणाऱ्या लोकांना जास्तं डिस्काऊंट देऊ इच्छितो. 😎

पे अॅज यू ड्राईव्ह कसे काम करते?

जर तुम्हाला असे वाटत असेल की यासाठी तुम्हला खूप काही फॅन्सी डिक्लेरेशन द्यावे लागेल किंवा तुमचे रीडिंग चेक करण्यासाठी एखादे न्यू-जेन टेक डिवाईस विकत घ्यावे लागेल तर तुम्ही चुकताय! (तुम्हाला तर माहितच आहे की आयुष्य सोप्पं करणं हेच आमचे काम आहे, बरोबर ना?😉).

आम्ही हे डिस्काऊंट मिळवणे सोप्पे करणे हाच दृष्टीकोण ठेवला. हे तुमच्या भविष्यातील ड्राईव्हिंग बिहेविअर वरती, टेलीमॅटिक्स किंवा तुमच्या ड्राईव्हिंग स्किल्स ट्रॅक करणाऱ्या कुठल्याही अॅपवरती आधारित नसून यासाठी आम्ही एका वर्षात तुम्ही चालवलेल्या गाडीच्या अॅव्ह्रेज किलोमीटर्सचा आधार घेतो.

तुमचे ओडोमीटर रीडिंग आणि ड्राईव्हिंग बघून लगेचच ओळखता येतं की गाडी किती वर्ष जुनी आहे!

आमच्याकडून तुमची कार इन्श्युरन्स पॉलिसी विकत घेताना आम्ही तुम्हाला तुमच्या कारचा आणि ओडोमीटर रीडिंगचा एक व्हिडीओ घ्यायला सांगू (काळजी करू नका, हे अगदी सोप्पे आहे आणि अॅपमधूनच होतं)

बस इतकंच!
तुम्ही जर कमी प्रमाणात गाडी चालवत असाल तर ते आम्ही असे चेक करू 😊

तुम्ही कमी प्रमाणात गाडी चालवत असाल तर ते कसे चेक करायचे?

स्टेप 1: सगळ्यात पहिले तुम्हाला ड्राईव्हिंग सीटवर बसावे लागेल!

स्टेप 2: एका छोट्या आयताकडे पहा ज्यामध्ये सर्वसाधारणपणे पाच ते सहा आकडे असतात. बहुतेक वेळा हे स्पीडोमीटरजवळ असते. तुमची कार जर नवीन काळातली असेल तर हे डिजिटल असेल. तुमची गाडी जर जुनी किंवा कमी आधुनिक असेल, तर हे आकड्यांचा फिजिकल किंवा मेकॅनिकल सेट असेल.

आता फक्त तुम्ही या आकडेवारीची नोंद करून घ्या. हा आकडा, तुमची गाडी तिच्या संपूर्ण काळात एवढे किलोमीटर चालली, हे दर्शवतो.

स्टेप 3: आता या आकड्याला तुमची कार जितके वर्ष जुनी आहे त्या आकड्याने भाग द्या. उदाहरार्थ, तुमच्या कारचे रीडिंग साधारण 45,000 किमी झाले आणि तुमची कार 6 वर्ष जुनी आहे, तर 45,000/6 वर्ष म्हणजे 7500 किमी.  याचा अर्थ, तुमची कार वर्षाला अॅव्हरेज 7500किमी चालली.

बघा, हे इतकं सोप्पं आहे! अशाप्रकारे तुम्हला कळू शकते की तुमची गाडी किती प्रमाणात चलते आणि हे पे अॅज यू ड्राईव्ह अॅड-ऑन कार इन्श्युरन्स तुमच्यासाठी देखील योग्य आहे का! 😊

आजच तुमचे किलोमीटर रीडिंग चेक करा आणि तुम्ही पण कमी प्रमाणात गाडी चालवता का हे तपासा! 😊