टाटा हॅरियर इन्शुरन्स
6000+ Cashless
Network Garages
Zero Paperwork
Required
24*7 Claims
Support
I agree to the Terms & Conditions
6000+ Cashless
Network Garages
Zero Paperwork
Required
24*7 Claims
Support
I agree to the Terms & Conditions
भारतीय ऑटोमेकर टाटा मोटर्सने जानेवारी 2019 मध्ये 5-सीटर कॉम्पॅक्ट क्रॉसओव्हर एसयूव्ही, टाटा हॅरियर, बाजारात आणली. लॉंच केल्यापासून या कारमध्ये अनेक वेळा अपडेट्स करण्यात आले. नोव्हेंबर 2020 मध्ये या कारमध्ये लेटेस्ट फीचर अपडेट करून मिल्ट्री-स्टाईल विजुअल्स सह हॅरियर कॅमो एडिशन लॉंच करण्यात आली.
2021 मध्ये या कार मधल्या फीचर्स मुळे कंपनीने हजारो युनिट्स विकल्या. तरी, इतर कार्स प्रमाणे, टाटा हॅरियरला देखील अपघातामुळे जोखीम आणि नुकसान होण्याची शक्यता आहेच. त्यामुळे, जर तुम्ही ही कार चालवत असाल किंवा ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही टाटा हॅरियर इन्शुरन्स खरेदी करायला हवा.
एक परिपूर्ण इन्शुरन्स पॉलिसी अनपेक्षित प्रसंगांमुळे तुमच्या कारच्या झालेल्या नुकसानाच्या रिपेअरिंगचा खर्च कव्हर करते. इन्शुरन्स प्लॅन खरेदी करण्याचा विचार नक्की व्हायला हवा कारण यामुळे तुमच्या आर्थिक आणि कायदेशीर लायबिलिटीज कमी होतात.
यासंबंधी, तुम्ही आकर्षक डील्स मिळवण्यासाठी डिजीट सारख्या इन्शुररचा विचार नक्की करू शकता.
डिजीटच्या ऑफर्स जाणून घेण्यासाठी पुढे वाचा.
आम्ही आमच्या ग्राहकांना व्हीआयपींसारखी वागणूक देतो, जाणून घ्या कसे…
अपघातामुळे झालेले तुमच्या स्वतःच्या कारचे नुकसान |
×
|
✔
|
आगीमुळे झालेले तुमच्या स्वतःच्या कारचे नुकसान |
×
|
✔
|
नैसर्गिक आपत्तिमुळे झालेले तुमच्या स्वतःच्या कारचे नुकसान |
×
|
✔
|
थर्ड पार्टीच्या गाडीला झालेले नुकसान |
✔
|
✔
|
थर्ड पार्टीच्या मालमत्तेला झालेले नुकसान |
✔
|
✔
|
पर्सनल एक्सिडेंट कव्हर |
✔
|
✔
|
थर्ड पार्टी व्यक्तिला झालेली इजा/मृत्यू |
✔
|
✔
|
तुमची कार चोरीला गेल्यास |
×
|
✔
|
डोअस्टेप पिक-अप एंड ड्रॉप |
×
|
✔
|
तुमचा आयडीव्ही कस्टमाइज करा |
×
|
✔
|
कस्टमाइज्ड एड-ऑन्स सह एक्स्ट्रा प्रोटेक्शन |
×
|
✔
|
कॉम्प्रीहेन्सिव्ह आणि थर्ड पार्टी इन्शुरन्स मधला फरक याबद्दल आणखीन जाणून घ्या
एकदा तुम्ही आमचा कार इन्शुरन्स प्लॅन विकत घेतला किंवा रिन्यू केलंत की तुम्ही निश्चिंत होऊ शकता, कारण आमच्याकडे 3 सोप्या स्टेप्स मध्ये पूर्ण पणे डिजिटल अशी क्लेम प्रोसेस आहे.
फक्त 1800-258-5956 या नंबर वर कॉल करा. कोताही फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही.
सेल्फ इन्स्पेक्शन साठी तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवर लिंक मिळवा. तुमच्या मोबाईलवरून एका गाईडेड स्टेप बाय स्टेप प्रोसेस ने तुमच्या गाडीचे झालेले नुकसान एका व्हिडीओ द्वारे शूट करा.
आमच्या गॅरेज नेटवर्क मधून रीएम्बर्समेंट किं वा कॅशलेस यापैकी रिपेअर साठी तुम्हाला जो पर्याय निवडायचा आहे तो निवडा.
तुमची इन्शुरन्स कंपनी बदलताना तुमच्या मनात हा प्रश्न सर्वात पहिले यायला हवा. तुमचे अभिनंदन, तुम्ही हे करता आहात.
डिजीट इन्शुरन्स रिपोर्ट कार्ड वाचाटाटा हॅरियर इन्शुरन्सची किंमत, या व्यतिरिक्त इतर अनेक घटकांचा एक कार इन्शुरन्स खरेदी करताना विचार करायला हवा. तुमची निवड सोपी करण्यासाठी तुम्हाला डिजीटसारख्या इन्शुरन्स कंपनीने ऑफर केलेले फायदे नक्कीच जाणून घ्यायचे असतील. चला तर बघूया तुम्ही डिजीट इन्शुरन्स का घ्यावा:
हा इन्शुरर त्याच्या ग्राहकांसाठी खालील प्रकारचे इन्शुरन्स उपलब्ध करून देतो:
तुमच्या टाटा कारमुळे थर्ड पार्टी कार, व्यक्ती किंवा मालमत्ता याचे नुकसान होऊ शकते. अशा परिस्थितीत, थर्ड पार्टीच्या झालेल्या नुकसानाची भरपाई तुम्हाला करावी लागते. तरी, डिजीटची थर्ड पार्टी इन्शुरन्स पॉलिसी या ठिकाणी तुमच्या उपयोगी नक्की येऊ शकते कारण ही पॉलिसी थर्ड पार्टी लायबिलिटी कव्हर करते. तसेच कायदेशीर बाबींची देखील काळजी घेतली जाते. याच बरोबर, तुम्ही हा इन्शुरन्स प्लॅन खरेदी करण्याचा विचार नक्की कारण कारण मोटर वेहिकल एक्ट, 1988 अंतर्गत दंड भरावा लागू नये यासाठी हा प्लॅन असणे बंधनकारक आहे.
टाटा हॅरियर कारसाठी कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्स अंतर्गत थर्ड पार्टी तसेच तुमच्या स्वतःच्या कारच्या नुकसानासाठी देखील कव्हरेज मिळते. तुमच्या टाटा हॅरियरला अपघात, आग लागणे, चोरी, किंवा इतर दुर्घटनांदरम्यान नुकसान पोहचू शकते. अशा परिस्थितीत, रिपेअरिंगचा खर्च जास्त असू शकतो. त्यामुळे, तुम्ही डिजीटकडून टाटा हॅरियर कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करून हा खर्च कव्हर करून घेऊ शकता.
डिजीट इन्शुरन्स कंपनीने आत्तापर्यंत सर्व प्रायव्हेट कार्सपैकी 96% क्लेम्स सेटल केले आहेत. याच्या उच्च क्लेम सेटलमेंट रेशिओमुळे, तुम्ही देखील तुमच्या टाटा हॅरियर इन्शुरन्ससाठी सुपर-फास्ट क्लेम सेटलमेंटची अपेक्षा करू शकता.
डिजीटच्या टेक्नोलॉजीच्या आधारे चालणाऱ्या प्रक्रियेमुळे, तुम्ही तुमच्या टाटा हॅरियर इन्शुरन्स पॉलिसीचा क्लेम तुमच्या स्मार्टफोन मधूनच अगदी सहज फाईल करू शकता. त्याच बरोबर, याचे स्मार्टफोन एनेबल्ड सेल्फ-इन्स्पेक्शन फीचरमुळे तुम्ही अगदी कमी वेळात तुमचा क्लेम फाईल करू शकता कारण तुम्ही तुमचा मोबाईल वापरून तुमचे झालेले नुकसान स्वतःच तपासू किंवा सेल्फ-इन्स्पेक्ट करू शकता.
भारतामध्ये अनेक डिजीट नेटवर्क कार गॅरेजेस प्रोफेशनल रिपेअर सर्व्हिस ऑफर करतात. यापैकी कोणत्याही सेंटर वर तुम्ही तुमच्या टाटा कारच्या नुकसानाच्या रिपेअरिंगची कॅशलेस पद्धत निवडू शकता. या सुविधेअंतर्गत, तुम्हाला रीपेअरचा खर्च म्हणून कोणताही खर्च करायची गरज नाही कारण इन्शुरर तुमच्या वतीने परस्पर गॅरेजमध्ये पेमेंट सेटल करतो.
ग्राहक त्यांच्या स्मार्टफोनवरून टाटा हॅरियर इन्शुरन्स ऑनलाईन खरेदी करू शकतात. या सुटसुटीत प्रक्रियेमुळे ग्राहक अगदी सहज ऑनलाईन त्यांची कागदपत्रे अपलोड करून, हार्डकॉपीज जमा करण्याचे काम वाचवू शकतात.
जरी टाटा हॅरियर इन्शुरन्स स्वतःच्या आणि थर्ड पार्टी कारच्या नुकसानाचा खर्च कव्हर करत असला, तरी हे संपूर्ण कव्हरेज म्हणता येणार नाही. असे असताना, तुम्ही अतिरिक्त चार्जेस देऊन डिजीटच्या एड-ऑन सुविधेचा लाभ घेऊ शकता. टाटा हॅरियर इन्शुरन्सची किंमत किंचित वाढवून तुम्ही तुमच्या टाटा कारला अतिरिक्त सुरक्षाकवच देऊ शकता. कन्झ्युमेबल कव्हर, इंजिन आणि गिअर बॉक्स प्रोटेक्शन कव्हर, रिटर्न टू इन्व्हॉइस कव्हर आणि इतर अनेक या एड-ऑन्सची उदाहरणे आहेत.
तुम्ही जर इन्शुरन्स पॉलिसीच्या कालावधीत अनेक वर्ष कोणताही क्लेम केला नाहीत तर टाटा हॅरियर इन्शुरन्स रिन्युअलच्या वेळेस डिजीट तुमच्या पॉलिसी प्रीमियमवर नो क्लेम बोनस ऑफर करतो. नो क्लेम बोनस म्हणजे रिन्युअलच्या वेळेस इन्शुरन्स प्रीमियम्सवर मिळणारे डिस्काउंट होय. हा इन्शुरर तुम्हाला 50% पर्यंतचे डिस्काउंट देऊ शकते. ही टक्केवारी तुम्ही किती वर्षे क्लेम केला नाहीत यावर अवलंबून असते.
टाटा हॅरियर इन्शुरन्स रिन्युअलची किंमत तुमच्या कारच्या इन्शुअर्ड डिक्लेअर्ड व्हॅल्यूप्रमाणे बदलते. त्यामुळे, इन्शुरन्स प्लॅन विकत घेताना एक योग्य आयडीव्ही निवडणे अत्यंत महत्त्वाचे असते. तसेच, तुमची कार जर चोरीला गेली किंवा तिचे दुरुस्त न होण्यासारखे नुकसान झाले तर इन्शुरर याच व्हॅल्यूच्या आधारे परताव्याची रक्कम ठरवतो. डिजीटसारखा इन्शुरर तुम्हाला ही व्हॅल्यू कस्टमाइज करण्याची मुभा देतो जेणेकरून तुम्ही जास्तीत जास्त परतावा मिळवू शकाल.
या व्यतिरिक्त, तुमच्या टाटा हॅरियर इन्शुरन्स पॉलिसी संबंधी कोणत्याही शंका किंवा प्रश्नांच्या बाबतीत, तुम्ही डिजीटच्या फ्लेक्सिबल कस्टमर सपोर्टला संपर्क करू शकता. ही टीम तुमच्या प्रश्नांची त्वरित उत्तरे देण्यासाठी 24x7 कार्यरत असते. थोडक्यात सांगायचे झाले तर, तुम्ही अशा इन्शुरन्स प्लॅनची निवड करायला हवी जो तुम्हाला वर सांगितल्यापैकी सर्वाधिक फायदे देतो.
सर्व सुविधांनी सुसज्ज असून सुद्धा कॉम्पॅक्ट असणाऱ्या या एसयूव्हीला तुम्हाला सुरक्षित ठेवावेसे वाटणार नाही का? आम्हाला खात्री आहे की तुमचे उत्तर हो! आहे. कार इन्शुरन्स हे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण हे अपघात, चोरी यामुळे तुमच्या कारला किंवा प्रवाशांना, चालकाला झालेल्या अनपेक्षित नुकसानाचा खर्च कव्हर करते.
2019 मध्ये लॉंच केलेली, टाटा हॅरियर एक 5 सीटर कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे जी भारताच्या अग्रगण्य ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर टाटा मोटर्सने आपल्यासमोर आणली. 2018चा ऑटो एक्स्पो मध्ये जेव्हा ही कार ठेवण्यात आली तेव्हा तर या कारने प्रसिद्ध आणि विश्वस्त टाटा मोटर्सची गरिमा आणखीनच उंचावली. डिझाईन, परफॉरमन्स आणि बरेच काही, अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण अशी ही हॅरियर खूपच लक्षवेधी सिद्ध झाली. लॉंच कॅम्पेनमध्ये दाखवल्याप्रमाणे ही कार खऱ्याअर्थाने #सर्वतोपरी ठरली. हॅरियर टाटा बझार्ड स्पोर्ट सारखी देखील दिसते, यामुळेच या कारने प्रो-स्पोर्ट्स-स्टेटस देखील पटकावला कारण 2019च्या आयपीएल साठी ही कार त्यांची ऑफिशियल पार्टनर होती आणि बीसीसीआय सोबत जोडल्यानंतरचे या कारचे हे दुसरे वर्ष होते. बीसीसीआयच्या प्रत्येक मॅच मध्ये ही कार आपल्या ग्लॅमर आणि ट्रेंडी डिझाईन मध्ये झळकताना दिसत होती.
ही फाइव्ह डोअर कॉम्पॅक्ट एसयूव्ही अतिशय विचारांती बनवली गेली आहे, लांबच्या प्रवासासाठी आणि शहरामध्ये चालवण्यासाठी अगदी आरामदायक, सबकॉम्पॅक्ट टाटा नेक्सॉन आणि मिड-सेगमेंट टाटा हेक्सा यांच्या मधले हे मॉडेल आहे. भारतीय ग्राहकांसाठी हिची किंमत 13.02 - 16.87लाखपर्यंत आहे, या कारने टाटा मोटर्सचे भाग्यच बदलून टाकले. लोकप्रिय आणि प्रीमियम इंटिरियर्स आणि सुपर साईड कम्फर्टमुळे ही कार प्रभावशाली ठरते. 7 उबर रंगांमध्ये आणि लँड रोव्हर च्या लेजंडरी डी8 प्लॅटफॉर्मवरून प्रेरित ऑप्टिकल मॉड्युलर एफिशियंट ग्लोबल एडव्हांस्ड अर्कीटेक्चर- असलेली ही हॅरियर जणू एक पर्वणीच आहे.
कटिंग एज क्रायोटेक 2.0 लिटर डीझेल इंजिन असलेली ही कार, खडकाळ आणि उंच भूभागांमध्ये देखील अगदी अलगदपणे चालते, या कार मध्ये इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम (ईएसपी), टेरेन रिस्पॉन्स मोड, क्रूज कन्ट्रोल आणि 6 स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशन इत्यादी वैशिष्ट्ये आहेत. एआरएआय द्वारा प्रमाणित केल्याप्रमाणे टाटा हॅरियर डीझेल 17 किमी प्रति लिटर इतके मायलेज देते. रेन सेन्सिंग वायपर्स, लॅपटॉप ट्रे सह ग्लोव्हबॉक्स, विचारपूर्वक तयार केलेल्या 28 यूटिलिटी स्पेसेस, एडजस्टेबल स्टिरिंग व्हील, पीईपीएस, इलेक्ट्रॉनिकली चालणारे आउटर मीरर्स, रिअर एसी व्हेंट्स, ऑटोमॅटिक हेडलॅम्प्स, एचव्हीएसी सह एफएटीसी, स्टोरेज सह फ्रंट अर्मेस्ट ही सर्व या कारची लक्झुरियस फीचर्स आहेत जी तुम्हाला या सेगमेंटच्या इतर कोणत्याही कार मध्ये मिळणार नाहीत.
तर, ज्यांना कोणत्याही कम्फर्टशी तडजोड न करता चंकी, मस्क्युलर आणि पावरफुल बीस्ट चालवायला आवडते अशा सर्व वयोगटाच्या ग्राहकांना ही कार आकर्षित करते. शेवटी लँड रोव्हर सारखी कार कोणाला नाही आवडणार?
टाटा हॅरियरचे व्हेरियंट्स |
किंमत (मुंबई मध्ये, शहरांप्रमाणे किंमत बदलू शकते) |
एक्सई |
₹17.39 लाख |
एक्सएम |
₹19.05 लाख |
एक्सटी |
₹20.53 लाख |
एक्सएमए एटी |
₹20.60 लाख |
एक्सटी प्लस |
₹21.49 लाख |
एक्सटी प्लस डार्क एडिशन |
₹21.84 लाख |
एक्सझेड |
₹22.14 लाख |
एक्सझेड डूअल टोन |
₹22.38 लाख |
एक्सटीए प्लस |
₹23.03 लाख |
एक्सटीए प्लस डार्क एडिशन एटी |
₹23.39 लाख |
एक्सझेड प्लस |
₹23.62 लाख |
एक्सझेडए एटी |
₹23.68 लाख |
एक्सझेड प्लस डूअल टोन |
₹23.86 लाख |
एक्सझेडए डूअल टोन एटी |
₹23.92 लाख |
एक्सझेड प्लस डार्क एडिशन |
₹23.98 लाख |
एक्सझेडए प्लस एटी |
₹25.32 लाख |
एक्सझेडए प्लस डूअल टोन एटी |
₹25.56 लाख |
एक्सझेडए प्लस डार्क एडिशन एटी |
₹25.68 लाख |