Third-party premium has changed from 1st June. Renew now
रेनो कार इन्शुरन्स प्लॅन
1899 साली स्थापन झालेली रेनो ग्रुप ही फ्रेंच बहुराष्ट्रीय ऑटोमोबाइल उत्पादक कंपनी आहे. अलीकडच्या काळात ही कंपनी प्रामुख्याने कार आणि व्हॅनची निर्मिती करते. मात्र, ही कंपनी ट्रक्स, टँक्स, ट्रॅक्टर्स, एअरक्राफ्टचे इंजिन आणि ऑटोरेल वाहने तयार करत असे. 2016 पर्यंत, उत्पादनाच्या प्रमाणात ती जगातील नवव्या क्रमांकाची सर्वात मोठी वाहन निर्माता बनली.
याशिवाय रेनॉच्या कारने रॅलींग, फॉर्म्युला वन आणि फॉर्म्युला ई सारख्या मोटरस्पोर्ट इव्हेंट्समध्ये सक्रिय सहभाग घेतला. डिसेंबर 2019 मध्ये जगभरात 2,73,000 पेक्षा जास्त इलेक्ट्रिक वाहनांची विक्री करण्यासाठी कंपनी ओळखली जाते.
रेनो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या बहुराष्ट्रीय कंपनीची पूर्ण मालकीची उपकंपनी ऑक्टोबर 2005 मध्ये स्थापन झाली. या कंपनीकडे सध्या भारतीय खरेदीदारांसाठी चार रेनो कार मॉडेल्स आहेत. चेन्नईमध्ये निर्मिती करणाऱ्या या कंपनीची क्षमता वर्षाला 4,80,000 रेनो कार तयार करण्याची आहे.
2020 पर्यंत, या फ्रेंच वाहन निर्मात्याच्या भारतीय उपकंपनीने संपूर्ण भारतात रेनॉल्ट कारच्या 89,000 हून अधिक युनिट्सची विक्री केली. त्यामुळे भारतीय वाहनचालकांमध्ये या ब्रँडच्या कार मॉडेल्सना मागणी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जर आपल्याकडे रेनो कार असेल तर आपण रेनो कार इन्शुरन्स मिळविण्याचा किंवा रिनिव करण्याचा विचार केला पाहिजे. जेव्हा आपल्या कारला अपघात किंवा इतर दुर्दैवी परिस्थितीमुळे डॅमेज होते तेव्हा कार इन्शुरन्स पॉलिसी उपयुक्त ठरते. रेनो कारसाठी वैध इन्शुरन्स नसल्यास, आपल्याला आपल्या खिशातून अवाजवी दुरुस्ती कॉस्ट सहन करावी लागेल.
याव्यतिरिक्त, मोटर व्हेइकल अॅक्ट, 1988 मध्ये भरमसाठ दंड टाळण्यासाठी कमीतकमी थर्ड पार्टी इन्शुरन्स प्लॅन बाळगणे मॅनडेटरी आहे. त्यामुळे रेनोसाठी कार इन्शुरन्स घेऊन तुम्ही आर्थिक तसेच कायदेशीर लायबिलिटी कमी करू शकता.
आपल्या गरजा लक्षात घेता, अनेक इन्शुरन्स कंपन्या थर्ड पार्टी आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह रेनो कार इन्शुरन्स ऑनलाइन देतात. थर्ड पार्टी इन्शुरन्स पॉलिसीत केवळ थर्ड-पार्टीच्या डॅमेजचा समावेश आहे, तर; कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स थर्ड पार्टीसह स्वतःच्या कारच्या डॅमेजचा समावेश करते. याशिवाय, इन्शुरर आपल्या इन्शुरन्स प्लॅन्सवर इतर अनेक सेवा फायदे देतात. जास्तीत जास्त फायद्यांसह येणारी पॉलिसी निवडण्यापूर्वी आपण इन्शुरन्स पॉलिसींची तुलना करू शकता.
सहज पणे निर्णय घेण्यासाठी, आपण परवडणारी रेनो कार इन्शुरन्स प्राइज, अॅड-ऑन फायदे, सिमलेस क्लेम प्रोसेस आणि इतर फायद्यांमुळे डिजिट इन्शुरन्सचा विचार करू शकता.
रेनो कार इन्शुरन्समध्ये काय कवर्ड आहे
काय कवर्ड नाही
आपल्या कार इन्शुरन्स पॉलिसीमध्ये काय कवर्ड नाही हे जाणून घेणे देखील तितकेच महत्वाचे आहे, जेणेकरून आपण क्लेम करताना आश्चर्य वाटणार नाही. अशाच काही परिस्थिती येथे आहेत:
थर्ड पार्टी किंवा लायबिलिटी ओनली कार पॉलिसीच्या बाबतीत, स्वत: च्या वाहनाचे डॅमेज कव्हर केले जाणार नाही.
आपण मद्यप्राशन करून किंवा वैध ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय ड्राइव्ह करत होता.
आपल्याकडे लर्नर लायसन्स आहे आणि समोरच्या पॅसेंजर सीटवर वैध ड्रायव्हिंग लायसन्स होल्डरशिवाय ड्राइव्ह करत आहात.
कोणतेही डॅमेज जे अपघाताचा थेट परिणाम नसते (उदा. अपघातानंतर, खराब झालेली कार चुकीच्या पद्धतीने चालविली गेली आणि इंजिन खराब झाले तर ते कव्हर केले जाणार नाही)
कोणत्याही कॉँट्रीब्युटरी निष्काळजीपणाचा (उदा. पुरात कार चालवल्यामुळे होणारे डॅमेज, ज्याची निर्मात्याच्या ड्रायव्हिंग मॅन्युअलनुसार शिफारस केली जात नाही) कव्हर केले जाणार नाही)
काही परिस्थिती अॅड-ऑनमध्ये कव्हर केल्या जातात. आपण ते अॅड-ऑन खरेदी केले नसल्यास, संबंधित परिस्थिती कव्हर केली जाणार नाही.
डिजिटचा रेनो कार इन्शुरन्स का खरेदी करावा?
रेनोसाठी कार इन्शुरन्स प्लॅन्स
थर्ड पार्टी | कॉम्प्रीहेन्सिव्ह |
अपघातामुळे झालेले तुमच्या स्वतःच्या कारचे नुकसान |
|
आगीमुळे झालेले तुमच्या स्वतःच्या कारचे नुकसान |
|
नैसर्गिक आपत्तिमुळे झालेले तुमच्या स्वतःच्या कारचे नुकसान |
|
थर्ड पार्टीच्या गाडीला झालेले नुकसान |
|
थर्ड पार्टीच्या मालमत्तेला झालेले नुकसान |
|
पर्सनल एक्सिडेंट कव्हर |
|
थर्ड पार्टी व्यक्तिला झालेली इजा/मृत्यू |
|
तुमची कार चोरीला गेल्यास |
|
डोअस्टेप पिक-अप एंड ड्रॉप |
|
तुमचा आयडीव्ही कस्टमाइज करा |
|
कस्टमाइज्ड एड-ऑन्स सह एक्स्ट्रा प्रोटेक्शन |
|
Get Quote | Get Quote |
कॉम्प्रीहेन्सिव्ह आणि थर्ड पार्टी इन्शुरन्स मधला फरक याबद्दल आणखीन जाणून घ्या
मी क्लेम कसा फाईल करू शकतो?
एकदा तुम्ही आमचा कार इन्शुरन्स प्लॅन विकत घेतला किंवा रिन्यू केलंत की तुम्ही निश्चिंत होऊ शकता, कारण आमच्याकडे 3 सोप्या स्टेप्स मध्ये पूर्ण पणे डिजिटल अशी क्लेम प्रोसेस आहे.
स्टेप 1
फक्त 1800-258-5956 या नंबर वर कॉल करा. कोताही फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही.
स्टेप 2
सेल्फ इन्स्पेक्शन साठी तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवर लिंक मिळवा. तुमच्या मोबाईलवऋण एका गाईडेड स्टेप बाय स्टेप प्रोसेद ने तुमच्या गाडीचे झालेले नुकसान एका व्हिडीओ द्वारे शूट करा.
स्टेप 3
आमच्या गॅरेज नेटवर्क मधून रीएम्बर्समेंट किंवा कॅशलेस यापैकी रिपेअर साठी तुम्हाला जो पर्याय निवडायचा आहे तो निवडा.
रेनो बद्दल अधिक जाणून घ्या
कार विकत घेण्याचा विचार करत आहात? कमी दुरुस्ती कॉस्ट असणारी विश्वासार्ह कार शोधत आहात? जर होय, तर आपण रेनो ब्रँडचा विचार करावा. या वाहन निर्मात्याने सातत्याने उच्च दर्जाची उत्पादने सादर केली आहेत. हा ब्रँड मूळचा फ्रान्सचा असून रेनो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही रेनो एसए फ्रान्सची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे.
रेनो 2005 साली भारतात आली आणि तेव्हापासून त्यांनी कारचे काही उत्कृष्ट मॉडेल्स तयार केले आहेत. यापैकी रेनो डस्टरनेच भारतीय बाजारपेठेत आपले भक्कम अस्तित्व कोरले आहे. रेनोने भारतीय ऑटोमोबाईल मार्केट, कॉम्पॅक्ट एसयूव्ही डस्टर, मिनी व्हॅन ट्रायबर अँड लॉजी, सबकॉम्पॅक्ट कार क्विड आणि एसयूव्ही कॅप्चर सह सर्व सेगमेंट मध्ये बसणाऱ्या कार बनवल्या आहेत. रेनो कारची किंमत 2.83 लाख रुपयांपासून सुरू होते आणि टॉप लाइन-अपमधील सर्वात महागड्या कारची किंमत 12.99 लाख रुपये आहे.
सन 2012 मध्ये या ब्रँडने 23 पुरस्कार पटकावले आणि सर्वाधिक पुरस्कार मिळविण्याच्या प्रमुख क्लेम करणाऱ्यांपैकी एक बनला. 2018 मध्ये, रेनो कॅप्चरने एनडीटीव्ही कार आणि बाइक पुरस्कारांमध्ये "एनडीटीव्ही व्ह्यूअर्स चॉइस कार ऑफ द इयर 2018" जिंकला.
कितीही मजबूत गाड्या बनवल्या तरी काही दुर्दैवी घटना आपल्या गाडीचे डॅमेज करू शकतात. अशा अपघातांच्या वेळी कार इन्शुरन्सचे फायदे मिळतात. याशिवाय कार इन्शुरन्स मॅनडेटरी आहे. कार इन्शुरन्स शिवाय वाहन चालवणाऱ्याला मोठा दंड आकारण्यात येणार आहे.
रेनो कार का खरेदी करावी?
रेनो कार खरेदी करण्याची ही कारणे आहेत.
● परवडणारी : रेनो कार परवडणारी आहे. त्यांची किंमत 2.83 लाख रुपयांच्या रेंजमध्ये येते आणि टॉप मॉडेलसाठी फक्त 12.99 लाख रुपय लागतात. या बजेटमध्ये आपल्याला बोल्ड आणि दमदार कार मिळतात. रेनो कार सर्वात स्टायलिश एसयूव्ही या कॅटेगरीत धरली जाते.
● सर्व सेगमेंटसाठी मॉडेल्स: सबकॉम्पॅक्ट कार म्हणून रेनो क्विडपासून एसयूव्ही रेनो कॅप्चरपर्यंत, आपल्याला निवडण्यासाठी चांगले पर्याय मिळतात. प्रत्येक मॉडेल बजेटमध्ये बसते.
● इंधन कार्यक्षम कार: कार खरेदी करण्यापूर्वी एक महत्त्वाचा निकष विचारात घ्यावा तो म्हणजे इंधन कार्यक्षमता. रेनो कार्स डिझेल आणि पेट्रोल या दोन्ही व्हेरियंटसाठी चांगले मायलेज आकडेवारी सादर करते.
● अपीरयन्स: रेनो कार मजबूत, बोल्ड दिसते आणि बॉक्सी अपीरयन्ससह बनविलेल्या आहेत. अगदी त्यांच्या सर्वात लहान कारमध्ये एसयूव्ही डीएनए आहे. हे आपल्याला आपली पसंती परिभाषित करण्यास देखील मदत करते.
● आरामची वैशिष्ट्ये: या ब्रँडच्या सर्व कार प्रशस्त आहेत. उच्च मॉडेल्समध्ये रियर एअर कंडिशनिंग व्हेंट, 8-वे अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, स्टीअरिंग माउंटेड ऑडिओ कंट्रोल, अॅडजस्टेबल स्टीअरिंग व्हील्स आणि बरेच काही देण्यात आले आहे.
● विश्वसनीय आणि कमी मेंटेनेंस: रेनो कार त्यांच्या कामगिरीत बऱ्यापैकी विश्वासार्ह आहेत. या ब्रँडकडून कार खरेदी करणे हा आपला सर्वोत्तम निर्णय असेल कारण त्यांचा दुरुस्ती कॉस्ट कमी आहे.
रेनो कार इन्शुरन्स खरेदी करणे का महत्वाचे आहे?
रेनो हा सर्वसामान्यांचा ब्रँड आहे कारण त्यांनी त्यांच्या कारची प्राइज परवडणारी ठेवलेली आहे. दुरुस्तीची कॉस्ट कमी असली तरी कार इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करणे फायद्याचे ठरेल. आपल्या रेनो कारसाठी इन्शुरन्स पॉलिसी का घ्यावी हे येथे आहे:
● कायदेशीर गरजांची पूर्तता : भारत सरकारने कार इन्शुरन्स मॅनडेटरी केला आहे. मोटर व्हेइकल अॅक्टनुसार इन्शुरन्स पॉलिसीशिवाय कोणत्याही व्यक्तीला कार चालविण्याची परवानगी नाही. असे करताना पकडल्यास पहिल्या गुन्ह्यासाठी रु.2000/- आणि त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी रु.4000/- दंड भरावा लागेल. इतकेच नाही तर 3 महिन्यांचा तुरुंगवास होऊ शकतो आणि वाहन चालविण्याचे लायसन्स रद्द होऊ शकते.
● स्वतःचे डॅमेज एक्सपेनसेस व्यवस्थापित करण्यास मदत करते: अपघात, आग, चोरी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे कोणतेही डॅमेज कधीकधी खूप जास्त खर्चीक असू शकते. यापैकी कोणत्याही घटनेमुळे नुकसान होऊ शकते तेव्हा कार इन्शुरन्स पॉलिसी आपल्याला दुरुस्तीची कॉस्ट वसूल करण्यास मदत करते.
● कायदेशीर लायबिलिटीझचे निराकरण करण्यास मदत करते: कार इन्शुरन्स पॉलिसी आपल्याला थर्ड-पार्टीच्या नुकसानीसाठी जबाबदार धरल्यास कायदेशीर लायबिलिटीझसाठी पे करण्यास मदत करेल. जर आपण एखाद्या थर्ड पार्टीला टक्कर दिली, ज्यामुळे शारीरिक इजा किंवा मालमत्तेचे डॅमेज झाले, तर त्यांच्या क्लेमची रक्कम कधीकधी मोठी असू शकते. अशा एक्सपेनसेसना थर्ड पार्टी लायबिलिटी पॉलिसीअंतर्गत कव्हर केले जाते.
● बेसिक कव्हरेज वाढवा: अपघात, चोरी, आग आणि नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त इतर घटकांमुळे होणारे नुकसान जसे की वस्तू आदळल्यामुळे अंडरकॅरेजचे डॅमेज, ट्रान्समिशन निकामी होणे, इंजिनमध्ये पाणी शिरणे इ. कार इन्शुरन्स पॉलिसीअंतर्गत कव्हर केले जाणार नाही. यासाठी आपल्याला अॅड-ऑन कव्हर खरेदी करावे लागतील. यासाठी अतिरिक्त खर्च येतो. झिरो डेप्रिसिएशन, रिटर्न-टू-इनव्हॉइस कव्हर आणि इतर सारख्या अॅड-ऑन कव्हरमुळे मूलभूत कव्हरेजची व्याप्ती वाढण्यास मदत होते.
रेनो कार इन्शुरन्स प्रीमियमवर परिणाम करणारे घटक
रेनो कार इन्शुरन्स प्रीमियमवर परिणाम करणाऱ्या काही घटकांमध्ये हे समाविष्ट आहे:
● वय : कारचा आयडीव्ही काळानुसार कमी होतो आणि प्रीमियम कॅलक्युलेट करताना डेप्रिसिएशन मूल्यही लागू केले जाते. त्यामुळे कार जसजशी जुनी होईल तसतसा प्रीमियम कमी होऊ शकतो.
● भौगोलिक स्थान : शहरांमध्ये कार इन्शुरन्सचा प्रीमियम जास्त असतो. कारण मोठय़ा संख्येने मोटारींमुळे अपघात होण्याची शक्यता अधिक असते.
● इन्शुरन्स पॉलिसीचा प्रकार : कॉम्प्रिहेन्सिव्ह पॅकेज पॉलिसीसाठी स्वत:चे नुकसान आणि थर्ड पार्टी लायबिलिटी या घटकांमुळे प्रीमियम जास्त असतो. पण स्टँडअलोन थर्ड पार्टी पॉलिसीमध्ये प्रीमियम कमी असतो.
● कारचा आयडीव्ही(IDV) : आपल्या कारची इन्शुअर्ड डीक्लेअर्ड व्हॅल्यू (आयडीव्ही) थेट प्रीमियमवर परिणाम करते. उच्च आयडीव्ही साठी, प्रीमियम जास्त असेल आणि कमी आयडीव्ही साठी, प्रीमियम कमी असेल.
● सीएनजी किट बसवले असेल तर: जर आपल्या रेनो कारमध्ये अतिरिक्त सीएनजी किट बसवले असेल तर कार इन्शुरन्सच्या प्रीमियममध्ये अतिरिक्त रक्कम जोडली जाईल.
● अॅड-ऑन कव्हर्स: प्रत्येक अॅड-ऑन कव्हर अतिरिक्त प्रीमियम पेमेंटसह येते. अॅड-ऑन कव्हर निवडताना प्रीमियम वाढेल.
● नो क्लेम बोनस (एनसीबी): जर आपण संपूर्ण वर्षभर एकाही क्लेम केला नाहीत तर आपल्याला पुढच्या रिनिवलसाठी एनसीबी मिळेल.
● इंजिन क्षमता: इन्शुरन्स प्रीमियममधील थर्ड पार्टी घटक कार इंजिनच्या घन क्षमतेवर अवलंबून असतो. घन क्षमता जास्त, प्रीमियम जास्त असेल.
● व्हॉलंटरी डीडक्टीबल: जेव्हा आपण इन्शुरन्स कंपनीला पूर्णपणे कव्हर करण्याऐवजी क्लेमच्या रकमेत वर्गणी देण्याचा निर्णय घेता तेव्हा त्याला व्हॉलंटरी डीडक्टीबल म्हणतात. जास्त व्हॉलंटरी डीडक्टीबल म्हणजे कमी प्रीमियम.
अलीकडेच भारत सरकारकडून थर्ड पार्टी प्रीमियमच्या अमाऊंटमध्ये वाढ करण्यात आली होती.
रेनो कार इन्शुरन्ससाठी डिजिट का निवडावा?
● निर्दोष सेवा : डिजिट इन्शुरन्सने आपल्या ग्राहकांसाठी सर्व काही सोयीचे केले आहे. आपण सोयीस्करपणे ऑनलाइन पॉलिसी खरेदी करू शकता आणि क्लेमचे दस्तऐवज अपलोड करू शकता. पॉलिसी खरेदी करण्यापासून ते क्लेम फाइल करण्यापर्यंतचा अनुभव निर्दोष आहे.
● इन्शुरन्स पॉलिसीची निवड : डिजिट मध्ये दोन प्रकारची इन्शुरन्स पॉलिसी दिली जाते. एक म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह पॅकेज पॉलिसी जे स्वत: चे नुकसान आणि थर्ड-पार्टी लायबिलिटीसाठी पे करते. दुसरा प्रकार म्हणजे थर्ड पार्टी लायबिलिटी पॉलिसी. हे थर्ड पार्टीच्या शारीरिक इजा किंवा मालमत्तेच्या डॅमेजसाठी आपल्याला होणाऱ्या नुकसानीचे पेमेंट करते.
● पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी प्रीमियम कॅलक्युलेट करा: फक्त वेबसाइटवर जा, आपला रजिस्ट्रेशन क्रमांक किंवा कार डिटेल्स टाका आणि काही आवश्यक क्षेत्रे भरा आणि आपल्या गरजेनुसार कव्हर निवडा, झाले! आपल्या इन्शुरन्स प्रीमियमची प्राइज स्क्रीनवर दिसेल.
● कस्टमाइज करू शकणारे आयडीव्ही(IDV): डिजिट इन्शुरन्स आपल्याला इन्शुअर्ड डीक्लेअर्ड व्हॅल्यू कस्टमाइज करण्यास मदत करते. टोटल लॉसचे क्लेम झाल्यास कार इन्शुरन्स कंपनी आपल्याला जास्तीत जास्त अमाऊंट देईल. आयडीव्ही नुसार प्रीमियम बदलू शकतो.
● उच्च क्लेम सेटलमेंट रेशीओ: डिजिट इन्शुरन्स सर्व क्लेम्स अत्यंत गांभीर्याने घेतो. क्लेम सेटलमेंट रेशीओ खूप जास्त आहे.
● व्यापक अॅड-ऑन कव्हर्स ऑफर करते: वय आणि आवश्यकता लक्षात घेता, आपण अॅड-ऑन कव्हरमधून निवडू शकता. आपण रिटर्न-टू-इनव्हॉइस कव्हर खरेदी करू शकता जे आपल्याला कार चोरीला गेल्यास किंवा अपघातात पूर्णपणे डॅमेज झाल्यास कॉस्ट वसूल करण्यास मदत करेल. एखाद्या अपघातात प्रवाशांना इजा झाल्यास त्यांच्या संरक्षणासाठी आपण पॅसेंजर कव्हरचा विचार करू शकता. टायर प्रोटेक्ट कव्हर, झिरो डेप्रिसिएशन कव्हर, ब्रेकडाउन असिस्टन्स, इंजिन आणि गिअरबॉक्स प्रोटेक्शन आणि कंझ्युमेबल कव्हर यापैकी आणखी काही अॅड-ऑन आपण निवडू शकता.
● स्पर्धात्मक प्रीमियम रेट्स: डिजिट इन्शुरन्सद्वारे दिले जाणारे प्रीमियम रेट्स खूप स्पर्धात्मक आहेत. ते प्रीमियममध्ये कोणतीही छुपी कॉस्ट जोडत नाहीत. आपण निवडलेल्या कव्हरसाठी आपण पे करतो.
● सोपी आणि सोयीस्कर: ऑनलाइन खरेदी आणि क्लेम प्रोसेस व्यतिरिक्त, आपली कार दारातून नेली जाईल आणि दुरुस्तीनंतर दारात सोडली जाईल.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
मुदत संपलेल्या रेनो कार इन्शुरन्सचे रिनिवल केल्यावर मला नो क्लेम फायदे मिळतील का?
रेनो कारच्या इन्शुरन्स प्लॅनची मुदत संपून 90 दिवसांपेक्षा जास्त काळ झाला असेल तर आपल्याला जमा झालेला नो क्लेम बोनस गमवावा लागेल. त्यामुळे हे फायदे मिळवण्यासाठी आपण आपल्या पॉलिसीचे वेळेवर किंवा पॉलिसीची मुदत संपल्यानंतर 90 दिवसांच्या आत रिनिव केले पाहिजे.
रेनो कारसाठी मी माझ्या थर्ड पार्टी इन्शुरन्सवर अॅड-ऑन फायदे मिळवू शकतो का?
नाही, कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स प्लॅन्सचे पॉलिसीहोल्डर संपूर्ण संरक्षणासाठी अतिरिक्त शुल्क जोडून काही अॅड-ऑन कव्हर समाविष्ट करू शकतात.
जर मी रेनो कार इन्शुरन्स प्रदाता चेंज केला तर नो क्लेम बोनस ट्रान्सफर करता येईल का?
होय, जर आपण आपला इन्शुरन्स चेंज केला तर, जमवलेला नो क्लेम बोनस आपल्या विद्यमान इन्शुरन्स प्लॅन आणि इन्शुरन्स प्रदात्याकडे ट्रान्सफर केला जाईल.