फोर्ड एंडेव्हर इन्शुरन्स

Get Instant Policy in Minutes*

Third-party premium has changed from 1st June. Renew now

फोर्ड एंडेव्हर इन्शुरन्स खरेदी करा किंवा रिनिव करा

भारतातील ऑफ-रोड क्रूझर फोर्ड एंडेव्हरला खूप पसंती देतात. या कारमध्ये ऐसपैस जागा, स्वयंचलित पॉवरट्रेन आहे जी साहसी ट्रॅकवर अतुलनीय ड्रायव्हिंग अनुभव प्रदान करते. नवीन एंडेव्हर प्रगत सेन्सर टेक्नॉलजीसह डिझाइन केले गेले आहे जे कारला आपल्या गरजेनुसार आपल्या मनातील गोष्टी ओळखणारे बनवते. तसेच, नवीनतम टेरेन मॅनेजमेंट सिस्टम ट्रकशन आणि स्थिरता वाढवते आणि आपल्याला कोणत्याही पृष्ठभागाला सहजतेने हाताळण्यास मदत करते.

जर आपण फोर्ड एंडेव्हर खरेदी करण्याचा किंवा ड्राइव्ह करण्याचा विचार करत असाल तर आपले वाहन कायदेशीर राहण्यासाठी आपल्याला फोर्ड एंडेव्हर इन्शुरन्स घ्यावा लागेल. तसे न केल्यास आपल्याला मोठ्या प्रमाणात दंड भरावा लागू शकतो.

मात्र, भारतात कार इन्शुरन्स विकणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. अशा विस्तृत पर्यायांपैकी, योग्य इन्शुरन्स कंपनी निवडणे अवघड असू शकते. म्हणूनच, आपण अशा सर्व कार इन्शुरन्स कंपन्यांची वैशिष्ट्ये आणि फायदे काळजीपूर्वक अभ्यासून योग्य निर्णय घेतला पाहिजे.

फोर्ड एंडेव्हर इन्शुरन्स प्राइज

रजिस्ट्रेशनची तारीख प्रीमियम (केवळ ओन डॅमेज ओन्ली पॉलिसीसाठी)
जून-2021 25,413
जून-2020 22,236
जून-2019 20,421

**अस्वीकरण - प्रीमियम कॅलक्युलेशन फोर्ड एंडेव्हर 3.2 टायटॅनियम प्लस 4x4 (एटी) डिझेल 3198.0 साठी केले जाते. जीएसटी समाविष्ट नाही.

शहर - बंगळुरू, वाहन रजिस्ट्रेशन महिना - जून, एनसीबी - 0%, नो अॅड-ऑन, पॉलिसीची मुदत संपलेली नाही आणि आयडीव्ही - सर्वात कमी उपलब्ध. प्रीमियमचे कॅलक्युलेशन मार्च-2022 मध्ये केले जाते. कृपया वरील आपल्या वाहनाचा डिटेल्स प्रविष्ट करून अंतिम प्रीमियम तपासा.

फोर्ड एंडेव्हर कार इन्शुरन्समध्ये काय कवर्ड आहे

डिजिटचा फोर्ड एंडेव्हर कार इन्शुरन्स का खरेदी करावा?

फोर्ड एंडेव्हरसाठी कार इन्शुरन्स प्लॅन्स

थर्ड पार्टी कॉम्प्रिहेन्सिव्ह

अपघातामुळे स्वताच्या कारचे डॅमेज/नुकसान

×

आग लागल्यास स्वताच्या कारचे डॅमेज/नुकसान

×

नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी स्वताच्या कारचे डॅमेज/ नुकसान

×

थर्ड पार्टी वाहनाचे डॅमेज

×

थर्ड पार्टी मालमत्तेचे डॅमेज

×

पर्सनल एक्सीडेंट इन्शुरन्स

×

थर्ड-पार्टीच्या व्यक्तीची जखम / मृत्यू

×

आपल्या कारची चोरी

×

डोअरस्टेप पीक-अप आणि ड्रॉप

×

आपला आयडीव्ही(IDV) कस्टमाइज करा

×

कस्टमाइज्ड अॅड-ऑनसह अतिरिक्त संरक्षण

×
Get Quote Get Quote

कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि थर्ड पार्टी इन्शुरन्समधील डीफ्रंसबद्दल अधिक जाणून घ्या

क्लेम कसा फाइल करावा?

आपण आमची कार इन्शुरन्स योजना खरेदी किंवा रिनिवल केल्यानंतर, आपण तणावमुक्त राहता कारण आमच्याकडे 3-स्टेप्स, पूर्णपणे डिजिटल क्लेम्स प्रोसेस आहे!

स्टेप 1

फक्त 1800-258-5956 वर कॉल करा. फॉर्म भरायची गरज नाही.

स्टेप 2

आपल्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर सेल्फ इन्स्पेक्शनची लिंक मिळवा. स्टेप बाय स्टेप प्रक्रियेद्वारे आपल्या स्मार्टफोनमधून आपल्या वाहनाचे डॅमेज शूट करा.

स्टेप 3

आमच्या गॅरेजच्या नेटवर्कद्वारे आपण निवडू इच्छित असलेल्या दुरुस्तीची पद्धत म्हणजेच रीएमबर्समेंट किंवा कॅशलेस निवडा.

डिजिट इन्शुरन्स क्लेम्स किती वेगाने सेटल केले जातात? इन्शुरन्स कंपनी बदलताना हा पहिला प्रश्न आपल्या मनात यायला हवा. आपण असा विचार करताय हे चांगले आहे! डिजिटचे क्लेम रिपोर्ट कार्ड वाचा

फोर्ड एंडेव्हर इन्शुरन्ससाठी डिजिट का निवडावा?

स्पर्धात्मक फोर्ड एंडेव्हर इन्शुरन्स किंमत शोधण्याव्यतिरिक्त, आपण आयडीव्ही, क्लेम सेटलमेंट रेशिओ, नो-क्लेम बोनस इत्यादी इतर महत्त्वपूर्ण घटक तपासण्याचा देखील विचार केला पाहिजे.

डिजिट इन्शुरन्स कंपनी त्यांच्या कार इन्शुरन्सवर अनेक अॅड-ऑन फायदे देते.

चला एक नजर टाकूया!

1. उत्पादनांची विस्तृत रेंज

आपण फोर्ड एंडेव्हर कार इन्शुरन्सच्या विस्तृत संख्येतून डिजिटवरून निवडू शकता जसे -

  • थर्ड पार्टी इन्शुरन्स

थर्ड पार्टी इन्शुरन्स अंतर्गत, डिजिट आपल्या कारमुळे एखाद्या थर्ड-पार्टी व्यक्तीला, मालमत्तेला किंवा वाहनाला अपघातात होणारे डॅमेज किंवा नुकसान कव्हर करण्यासाठी आर्थिक मदत प्रदान करेल. तसेच, या घटनेशी संबंधित सर्व खटल्यांची काळजी देखील डिजिट घेईल.

  • कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्स

डिजिटचा फोर्ड एंडेव्हरचा कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स थर्ड पार्टी डॅमेज तसेच स्वत:च्या डॅमेजविरुद्ध संपूर्ण कव्हरेज देईल. तसेच अपघातामुळे मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास पॉलिसीहोल्डर्सना पर्सनल एक्सीडेंट इन्शुरन्स मिळू शकतो.

2. अतिरिक्त फायदे

फोर्ड एंडेव्हरसाठी डिजिट कार इन्शुरन्स निवडून, आपण अनेक अतिरिक्त फायद्यांचा आनंद घेऊ शकता जसे की:

  • रोडसाइड असिसटन्स
  • कंझ्युमेबल कव्हर
  • झीरो डेप्रीसीएशन कव्हर
  • रिटर्न टू इंव्हॉईस कव्हर
  • इंजिन प्रोटेक्शन कव्हर

3. कॅशलेस गॅरेजचे विस्तृत नेटवर्क

डिजिटचे संपूर्ण भारतात सुमारे 6000+ नेटवर्क कार गॅरेज आहेत. आपण यापैकी कोणत्याही कार्यशाळेतून व्यावसायिक दुरुस्ती सेवा मिळवू शकता आणि जास्तीत जास्त सोयीसाठी कॅशलेस पेमेंट सुविधेचा फायदा घेऊ शकता.

4. सुपर-फास्ट क्लेम्स

डिजिटमध्ये क्लेम सेटलमेंट रेशिओ जास्त आहे. कंपनीने खासगी कारचे 96% क्लेम्स सेटल केले आहेत. हे वेगवान आणि सोप्या 3 स्टेप क्लेम फाइलिंग पर्यायामुळे आहे.

  • स्टेप 1 - सेल्फ इन्स्पेक्शन लिंक मिळवण्यासाठी आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरून 1800 258 5956 डायल करा
  • स्टेप 2 - सूचनांचे अनुसरण करा आणि दिलेल्या वर आपल्या कारच्या डॅमेजच्या सर्व प्रतिमा सबमिट करा.
  • स्टेप 3 - कॅशलेस किंवा रीएमबर्समेंट ही दुरुस्तीची आपल्या पसंतीची पद्धत निवडा.

5. आयडीव्ही(IDV) कस्टमायझेशन

डिजिट आपल्याला आपला आयडीव्ही कस्टमाइज करण्यास देखील अनुमती देतो. आयडीव्ही चा थेट परिणाम आपल्या कार इन्शुरन्सच्या प्रीमियमवर आणि क्लेम अमाऊंटवरही होतो. म्हणूनच, जर आपली कार चोरीला गेली किंवा गंभीरपणे डॅमेज झाले तर जास्तीत जास्त आर्थिक कव्हरेज मिळविण्यासाठी आपण आपल्या फोर्ड एंडेव्हर इन्शुरन्स प्राइजवर उच्च आयडीव्ही निवडू शकता.

6. सोपी ऑनलाइन प्रक्रिया

डिजिटसह, आपण काही मिनिटांत आपला फोर्ड एंडेव्हर इन्शुरन्स ऑनलाइन खरेदी किंवा रिनिवल करू शकता. हे आपल्याला दस्तऐवजाच्या किचकट आणि लांबलचक प्रक्रियेपासून वाचवेल. आपण अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता आणि योग्य निवडण्यासाठी पॉलिसीचे सर्व पर्याय आणि त्यांच्या प्राइजबद्दल डिटेल्स जाणून घेऊ शकता.

याव्यतिरिक्त, डिजिट आपल्याला इमर्जनसी परिस्थितीत मदत करण्यासाठी 6 महिन्यांच्या वॉरंटीसह 24×7 ग्राहक सपोर्ट आणि डोरस्टेप पिकअप, दुरुस्ती आणि ड्रॉप सुविधेची हमी देते.

फोर्ड एंडेव्हरसाठी कार इन्शुरन्स खरेदी करणे का महत्वाचे आहे?

फोर्ड एंडेव्हर ही महागडी कार आहे. त्यामुळे कार इन्शुरन्सने आपल्या या अॅसेटचे रक्षण करणे शहाणपणाचे ठरते. कार इन्शुरन्स कसा उपयुक्त ठरू शकतो ते थोडक्यात पाहूया.

  • कायदेशीर अनुपालीत: भारतीय रस्त्यांवर कार इन्शुरन्स शिवाय ड्राइव्ह करणे बेकायदेशीर आहे. कमीतकमी थर्ड पार्टी कार इन्शुरन्स घेतल्यास आपल्याला ₹2000 चा दंड आणि / किंवा 3 महिन्यांच्या तुरुंगवासा सहन करावा लागणार नाही.
  • आर्थिक लायबिलिटीझ: अपघात, चोरी, निसर्गाचे कृत्य, तोडफोड, दंगली इत्यादींमुळे आपल्या कारमध्ये नुकसान किंवा डॅमेज होऊ शकते. अशा वेळी दुरुस्तीची प्रचंड कॉस्ट इन्शुरर कडून रीएमबर्स करत येईल.
  • थर्ड-पार्टी लायबिलिटी: थर्ड-पार्टी लायबिलिटी इन्शुरन्स अपघाताच्या अशक्य प्रसंगी एखाद्याला किंवा त्यांच्या मालमत्तेचे डॅमेज / इजा होण्यास जबाबदार असल्यास आपले संरक्षण करते. अशा परिस्थितीत हा इन्शुरन्स आपले आणि आपल्या खिशाला रिकामे होण्यापासून वाचवते.
  • कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हर: कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हर नेहमीच सर्वोत्तम असते कारण ते केवळ प्रभावित पक्षासाठीच नव्हे तर आपल्यासाठी आणि आपल्या फोर्ड एंडेव्हरसाठी देखील संरक्षण कवच म्हणून कार्य करते. आग, चोरी, मानवनिर्मित/नैसर्गिक आपत्ती, तोडफोड, निसर्ग/हवामान, प्राणी इ. आपल्या नियंत्रणात नसलेल्या घटकांमुळे होणारे सर्व डॅमेज कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हरमध्ये प्रामुख्याने समाविष्ट आहे. तसेच, कव्हरेज विस्तृत करण्यासाठी अॅड-ऑन खरेदी केले जाऊ शकतात.

फोर्ड एंडेव्हर बद्दल अधिक जाणून घ्या

फुल साइज एसयूव्ही सेगमेंटमध्ये फोर्ड एंडेव्हर हा भारतीय कार खरेदीदारांसाठी नेहमीच लोकप्रिय पर्याय राहिला आहे. भारतात 2016 मध्ये लाँच झाल्यापासून या कारने सर्वांची मने जिंकली आहेत. फोर्डच्या तबेल्यातील हा मोठा पाशवी प्राणी आहे. टोयोटा फॉर्च्युनर, महिंद्रा अल्टुरस आदी मार्केटमधील इतर बड्या कारशी टक्कर देण्यासाठी या कारला नुकताच फेसलिफ्ट मिळाला आहे.

ही कार रु.28.19 ते 32.97 लाख (एक्स-शोरूम) प्राइज मध्ये येते

आपण फोर्ड एंडेव्हर का खरेदी करावे?

  • रस्त्यावरची त्याची उपस्थिति: भारतात लोकं कारला त्याच्या साईजवरून जज करतात. जेव्हा आपण फोर्ड एंडेव्हर ड्राइव्ह करत असाल तेव्हा आपल्याला ट्रॅफिक आपल्या कारच्या पासून दूर होताना दिसेल. ही हँडसम हल्किंग एसयूव्ही नजर वेधून घेणारी आहे. हे बुच, बोल्ड आणि जवळजवळ कवच संरक्षित दिसते. 18 इंचाचे डायमंड कट अलॉय कोणत्याही भूभागासाठी तयार आहेत. आणि अलॉय व्हील्सचा ड्युअल टोन रंग या कारला युनिक बनवतो. रस्त्यांवर राज्य करण्यासाठी ही गाडी बनवण्यात आली आहे. आपल्या जवळ एंडेव्हर सारखे वाहन असेल, तर रस्त्यावर कोणीही आपल्याशी जास्त गडबड करणार नाही.
  • इंटेरिअर: ज्या क्षणी आपण गाडीत बसून दरवाजा बंद करता, त्या क्षणी दरवाजा बंद करण्याच्या आवाजाने आपल्याला गाडीची बिल्ड क्वालिटी कळेल. डॅशबोर्ड व्यवस्थित स्टाइल केलेला आहे आणि सर्व काही अगदी सहजपणे हाताशी लागते. सीटची रचना अशा पद्धतीने करण्यात आली आहे की आपण बऱ्याच वेळ ड्राइव्ह करू शकता. कॉन्फिगर करू शकणारा केबिन मधील प्रकाश कोणाचाही मूड प्रसन्न करू शकतो.
  • पॅसेंजरसाठी आराम: पॅसेंजर रो मधील सीट्स मस्त पॅडेड आहेत. एंडेव्हरची केबिन सेगमेंटमधील स्पर्धकांपेक्षा वेगळी कशामुळे आहे? याच्या विहंगम सनरूफमुळे! यामुळे केबिन खरोखर छान आणि हवेशीर वाटते.
  • वैशिष्ट्ये: एंडेव्हरमध्ये 6 एअरबॅग, ड्रायव्हर सीट मेमरी, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आणि रियर पार्किंग कॅमेरा, जेस्चर कंट्रोल्ड हँड्स-फ्री बूट रिलीज आणि बरेच काही देण्यात आले आहे. सेगमेंटमधील ही एकमेव कार आहे जी ऑटो पार्किंग पर्यायासह येते जी एसयूव्ही ला शोधलेल्या पार्किंग स्पॉटमध्ये नेऊ शकते. या वैशिष्ट्यामुळे एवढी मोठी कार चालवणे सोपे जाते.
  • ड्राइव्ह: एंडेव्हर दोन डिझेल इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. एक 2.2 लिटरचा तर दुसरा 3.2 लिटरचा आहे. मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन दोन्ही उपलब्ध आहेत. एंडेव्हर 3.2 मध्ये सर्वोत्कृष्ट एक्सेलेरेशन आहे. इंजिन रिफाइनमेंट छान आहे, सर्व आरपीएम वर पॉवरची चांगली उपलब्धता आहे. ही गाडी धावायला एकदम तयार आणि लगेच पळायला लागेल असे वाटते.
  • ऑफरोडिंग: फोर्ड एंडेव्हर ऑफ-रोडिंगमध्ये एखाद्या मेंडया सारखे वाटते. भूप्रदेश व्यवस्थापन प्रणाली त्याला सहजपणे अडचणीतून मार्ग काढण्यास सक्षम करते.

फोर्ड एंडेव्हरचे व्हेरिएंट्स

व्हेरियंटचे नाव व्हेरियंटची प्राइज (मुंबईत, शहरांमध्ये वेगवेगळी असू शकते)
2.0 एल टायटॅनियम प्लस 4x2 एटी ₹ 33.8 लाख
एंडेव्हर 2.0 एल टायटॅनियम प्लस 4x4 एटी ₹ 35.6 लाख
एंडेव्हर 2.0 एल स्पोर्ट 4x4 एटी ₹ 36.25 लाख

भारतातील फोर्ड एंडेव्हर कार इन्शुरन्स बद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न

डिजिट थर्ड पार्टी पॉलिसीहोल्डर्ससाठी स्वतःचे कव्हर प्रदान करते का?

नाही, थर्ड पार्टी ओनली पॉलिसीच्या बाबतीत स्वतःच्या वाहनाचे डॅमेज डिजिटद्वारे कव्हर केले जाणार नाही.

डिजिट किती नो क्लेम बोनस ऑफर करते?

डिजिट क्लेम-फ्री वर्षांच्या संख्येच्या आधारे प्रीमियमवर 50% पर्यंत डिसकाऊंट देऊ शकते.