एल-2 व्हिसा: अर्थ, पात्रता निकष, अर्जाची प्रक्रिया, कागदपत्र आणि आवश्यक फीज
प्रत्येक निर्वासित किंवा स्वदेशापासून लांब राहणाऱ्या व्यक्तीला परदेशामध्ये काम करत असताना त्याच्या जवळच्या व्यक्तींबरोबर राहण्याची इच्छा असतेच. एल-2 व्हिसा म्हणजे एल-1 व्हिसा धारकाला त्याच्या जवळच्या व्यक्तींना त्याच्या जवळ राहायला बोलावून हा प्रश्न सोडवण्याचा जणु एक सुवर्ण मध्य! या सदरामध्ये या व्हिसा बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे जेणेकरून अर्ज करणाऱ्यांना अर्ज करण्याआधी सर्व गोष्टीं स्पष्ट असाव्यात.
एल-2 व्हिसा म्हणजे काय?
यूएसमधील एल-2 व्हिसा हा एक नॉन-इमिग्रंट परमिट आहे ज्यामुळे एल-1 व्हिसा धारकाच्या जवळच्या पात्र व्यक्ती अमेरिकेला जाऊ शकतात.
एल-2 व्हिसासाठी कोणते पात्रता निकष आहेत?
एल-2 व्हिसा मिळवण्यासाठी तुम्हाला खालील प्रमाणे पात्रता निकष पूर्ण करावे लागतील:
- जो व्यक्ती दुसऱ्याच्या वतीने एल-2 व्हिसासाठी सर्ज करणार आहे त्याचा जोडीदार एल-1 व्हिसाचा पात्र धारक असावा.
- एल-1 व्हिसा धारकाच्या मुलांचे वय 21 वर्षापेक्षा कमी असावे आणि ती अविवाहित असावी.
एल-2 व्हिसासाठी अर्ज कसा करावा?
एल-2 व्हिसासाठी अर्ज करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:
स्टेप 1: अर्जदाराला पर्सनल आणि इतर आवश्यक माहिती सह फॉर्म डीएस-160 भरावा लागेल आणि सध्याचा फोटो अपलोड करावा लागेल. या एप्लिकेशन फॉर्मच्या डीइएसी बारकोड असलेल्या कन्फर्मेशन पेजची प्रिंट आउट काढा.
स्टेप 2: योग्य व्हिसा एप्लिकेशन फीज भरा आणि पुढील संदर्भासाठी रिसीट तुमच्याकडे ठेवा.
स्टेप 3: इंटरव्ह्यूसाठी तुमचा स्लॉट घ्या. ही प्रक्रिया 13 वर्षापेक्षा जास्त वय असेलेल्यांसाठी परंतु 79 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या व्यक्तींसाठीच वैध आहे. तुमच्या सोयीचा स्लॉट घेतल्यानंतर, अर्जदाराला एक अपॉइंटमेंट लेटर मिळेल, जे पुढील अर्ज प्रक्रियेसाठी आवश्यक असते.
एल-2 व्हिसासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
एल-2 व्हिसासाठी अर्ज करताना खालील कागदपत्र तयार ठेवा:
- व्हिसाची मुदत संपण्याच्या 6 महिन्यांपेक्षा जास्त वैधता असलेला पासपोर्ट.
- आवश्यकतेनुसार फोटो
- पेमेंट रिसीट
- अपॉइंटमेंट लेटर
- डीएस-160 चे कन्फर्मेशन पेज
- फॉर्म आय-129, फॉर्म आय-797 आणि फॉर्म आय-129एस च्या फोटोकॉपीज (एल ब्लँकेट याचिकांसाठी लागू)
- एल-1 व्हिसा धाराकाच्या पासपोर्ट आणि व्हिसाच्या फोटोकॉपीज
- एल-1 व्हिसा धारकाच्या आधीच्या आणि आत्ताच्या एम्प्लॉयरचे एम्प्लॉयमेंट लेटर
- एल-1 व्हिसा धारकाचे मुलांशी असलेले नाते सिद्ध करण्यासाठी जन्माचा दाखला आणि जोडीदाराशी असेलेले नाते सिद्ध करण्यासाठी मॅरेज सर्टिफिकेट, वेडिंग रिसीट्स, अल्बम, मॅरेज रजिस्ट्रीचे फोटोग्राफ्स ई.
- एल-1 व्हिसा धारक जर अमेरिकेत असेल तर त्यांना त्यांच्या पेस्लीप्स जमा कराव्या लागतील.
एल-2 व्हिसासाठी अर्ज करण्यासाठी किती फी भरावी लागेल?
अर्जदारांना $154.99 एप्लिकेशन फी भरावी लागते. त्या व्यतिरिक्त, 15 पेक्षा जास्त वयअसलेल्या नॉन-इमिग्रंट्सना $154.99 आणि 15 पेक्षा कमी वय असलेल्या व्यक्तींना $15.49 फी भरावी लागते.
एल-2 व्हिसा अर्ज प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी किती कालावधी लागू शकतो?
एल-2 व्हिसासाठी लागणारी अर्ज प्रक्रिया पूर्ण व्हायला किमान 15 दिवस ते 1 महिना इतका कालावधी लागतो. तरी, हा कलावधी एम्बसीच्या वर्कलोडवर अवलंबून असतो.
एल-2 व्हिसाचा एप्लिकेशन स्टेटस कसा चेक करावा?
एल-2 व्हिसाचा स्टेटस चेक करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:
स्टेप 1: यूएससीआयएसच्या ऑफिशियल पोर्टलला भेट द्या आणि ‘चेक युअर केस स्टेटस‘ ऑप्शन पर्यंत जा.
स्टेप 2: 13 अंकांचा रिसीट नंबर टाका आणि एप्लिकेशन स्टेटस बघण्यासाठी ‘चेक स्टेटस’ वर क्लिक करा.
एल-2 व्हिसाची वैधता आणि रिन्युअल प्रक्रिया काय आहे?
एल-2 व्हिसाची वैधता एल-1 व्हिसा इतकीच आहे. एल-2 व्हिसा धारक तोपर्यंत अमेरिकेत राहू शकतो जोपर्यंत एल-1 व्हिसा धारक तिथे राहण्यासाठी पात्र आहे.
एल-2 व्हिसाचे रिन्युअल एल-1 व्हिसाच्या रिन्युअल किंवा एक्सटेन्शन वर अवलंबून असते. एल-2 व्हिसा धारक यूएस मध्ये राहत असताना यूएस एम्बसी किंवा कॉन्सुलेट ला भेट देऊन एक्सटेन्शन किंवा रिन्युअलसाठी अर्ज करू शकतो. तरी, एल-2 व्हिसा धारकाने पहिला पर्याय निवडला, तर त्यांना काही आठवड्यांसाठी देशाबाहेर राहावे लागते.
एल-2 व्हिसा कोणकोणते फायदे देतो?
एल-2 व्हिसा धारक खालील फायद्यांचा लाभ घेऊ शकतो:
- एल-2 व्हिसा धारक अमेरिकेमध्ये इएडी किंवा एम्पप्लॉयमेंट ऑथरायझेशन डॉक्यूमेंट मिळाल्यावर फुल-टाईम जॉब करू शकतात.
- एल-1 व्हीसा धाराकाच्या अमेरिकेत राहण्याच्या कालावधीनुसार एल-1 व्हीसा अर्जदार देखील तिथे त्तेवढ्या काळासाठी राहू शकतात.
- अर्जदार स्वतःला तिथल्या काही फुल-टाईम एकॅडेमिक कोर्सेस साठी देखील एनरोल करू शकतात.
- एल-2 व्हिसा धारक प्रवासानिमित्त अमेरिकेतून बाहेर जाऊ शकतात किंवा अमरिकेत परत जाऊ शकतात.
त्यामुळे, एल-2 व्हिसा अर्जदारांना अर्ज करताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी वरील सर्व गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
एल-2 व्हिसा स्टॅम्पिंग साठी कोणकोणती कागदपत्र लागतात?
फोर आय-129ची कॉपी, मॅरेज सर्टिफिकेट किंवा लग्नाचा इतर कोणताही पुरावा, एल-1 व्हिसाची एक कॉपी आणि पासपोर्ट, आयटी रिटर्न्स, पेस्लीप्स आणि एल-1 व्हिसा धारकाचे मागील 6 वर्षांचे बँक स्टेटमेंट्स, ही काही कागदपत्र आहेत जी एल- 2 स्टॅम्पिंगसाठी अर्जदाराला जमा करावी लागतात.
एल-2 व्हिसा धारक त्यांचा व्हिसा स्टेटस इतर परमिट्स मध्ये बदलू शकतात का?
होय, एल-2 व्हिसा धारक त्यांचा व्हिसा स्टेटस बी-1, एच-1, बी-2, एच-4 (प्रायमरी व्हिसा धारकाकडे जर एच-1 स्टेटस असल्यास लागू) आणि एल-1 सारख्या इतर परमिट्स मध्ये बदलू शकतात.