क्रोएशियाला फिरायला जात आहोत, यातच सगळं आलं. लोकप्रिय हॉलिडे डेस्टिनेशन जसे फ्रांस, स्पेन किंवा इटली; यांपेक्षा वेगळं काही तरी असलेला हा देश; क्रोएशिया खूप काही ऑफर करतो. नितळ पाणी, प्रसन्न हवामान, अपार नैसर्गिक सौंदर्य, डोळ्यांना सुखावणारे निसर्गरम्य दृश्य आणि तिथले खाद्यपदार्थ आणि वाईनला विसरून कसं बरं चालेल?
क्रोएशियाला फिरायला जाताना सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे क्रोएशियन व्हिसा मिळवणे. चला तर बघुयात क्रोएशियन व्हिसा साठी अर्ज कसा करायचा, पात्रता निकष कोणते आहेत, आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत, फीज किती असेल आणि इतर माहिती.
होय, क्रोएशियाला जाण्याआधी भारतीयांकडे व्हिसा असणे गरजेचे आहे. क्रोएशियाने शेंगेन झोन जानेवारी 2023 मध्ये जॉईन केला. येथील व्हिसाच्या रिक्वायरमेंट्स उर्वरित झोन प्रमाणेच आहेत. म्हणजेच, भारतीयांना क्रोएशिया भेटीसाठी शेंगेन व्हिसासाठी अर्ज करावा लागतो.
नाही, क्रोएशियामध्ये येणाऱ्या भारतीय पासपोर्ट धारकांसाठी ई-व्हिसा किंवा व्हिसा ऑन अराइव्हलची सुविधा उपलब्ध नाही.
जानेवारी 2023 मध्ये जेव्हा क्रोएशिया शेंगेन भागामध्ये जोडला गेल्या नंतर, भारतीयांसाठी क्रोएशियाला भेट देण्यासाठीच्या रिक्वायरमेंट्स शेंगेनच्या इतर शहरांप्रमाणेच ठेवण्यात आल्या. तुम्हाला केवळ शेंगेन व्हिसासाठी अर्ज करायचा आहे आणि त्यावरच तुम्ही क्रोएशियाला भेट देऊ शकता. तुम्ही क्रोएशिया/शेंगेन झोनला जास्तीत जास्त 90 दिवसांकरता भेट देऊ शकता.
शेंगेन व्हिसासाठी अर्ज करण्याकरता तुम्ही भारतातील क्रोएशियन एम्बसीला भेट देऊ शकता.
हे सर्व करत असताना, तुमच्या ट्रीप दरम्यान अनपेक्षित अडचणींपासून स्वतःला सुरक्षित करणे ही महत्त्वाचे ठरते. जर तुम्ही फ्लाईट डीले झाली, तुमचे सामान किंवा पासपोर्ट गहाळ झाला, तर ट्रॅव्हल इन्शुरन्स सारखा सुरक्षा पर्याय तुमच्या मदतीला हजर राहू शकतो.
क्रोएशियन व्हिसा साठी अर्ज करताना, सुरळीत अर्ज प्रक्रियेसाठी तुम्ही खालील निकष व्यवस्थित तपासून घेणे गरजेचे आहे. तुमचा प्रवास सुरु होण्याच्या 6 ,महीने आधी तुम्ही व्हिसासाठीचा अर्ज जमा करणे अपेक्षित आहे.
€30,000 पर्यंतचे मेडिकल कव्हरेज देणारा ट्रॅव्हल इन्शुरन्स बंधनकारक आहे.
भेटीचे कारण आणि कालावधी दोन्ही गोष्टी स्पष्ट केलेल्या असाव्यात.
हे निकष जर तुम्ही पूर्ण केलेत, शेंगेन व्हिसासाठी अर्ज करणे आणि क्रोएशियाला भेट देणे सोपे होऊन जाईल.
क्रोएशिया शेंगेन व्हिसासाठी अर्ज करताना, तुम्हाला खालील सर्व कागदपत्रांची आवश्यकता असेल:
योग्यरित्या भरलेला अर्जाचा फॉर्म
दोन एकसारखे, 35X45मिमी साईजचे सध्याचे रंगीत फोटो. यामध्ये तुमचा 70-80% चेहरा दिसेल असे सुनिश्चित करा.
तुमच्या ठरलेल्या ट्रीपच्या तारखेपासून पुढे कमीत कमी 3 महिन्यांची वैधता असलेला पासपोर्ट आणि ज्यामध्ये किमान दोन तरी कोरे कागद असावेत. तुमच्याकडे जर जुना वैधता संपलेला किंवा रद्द झालेला कोणता पासपोर्ट असेल तर तो ही सोबत ठेवावा.
ट्रॅव्हल आणि तिथे राहण्याच्या रिझर्वेशनचे पुरावे
कमीत कमी €30,000 इतके मेडिकल कव्हरेज असलेला ट्रॅव्हल इन्शुरन्स
तुम्हाला सहाय्यक असलेल्या पर्याप्त आर्थिक स्थितीचे पुरावे; म्हणजेच मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट.
तुमच्या भेटीचे कारण स्पष्ट करणारे एक कव्हरिंग लेटर
संबंधित व्हिसासाठी भरलेल्या फीजचे पुरावे
शॉर्ट टर्म व्हिसासाठी क्रोएशिया व्हिसा (व्हिसा सी) ची किंमत €80 इतकी आहे म्हणजेच अंदाजे 7,160 रुपये. (*19 जून, 2023 रोजी असलेल्या मार्केट एक्स्चेंज रेट नुसार)
क्रोएशिया शॉर्ट स्टे व्हिसा बद्दल सविस्तर माहिती देणारा तक्ता खालील प्रमाणे आहे:
क्रोएशिया व्हिसा अर्जाचा प्रकार |
व्हिसा फी युरो मध्ये |
व्हिसा फी रुपयांमध्ये |
तरुण प्रवाशांसाठी क्रोएशिया व्हिसा |
80 |
7,160* |
मुलांसाठी क्रोएशिया व्हिसा (वय वर्ष 6-12) |
40 |
3,581* |
मुलांसाठी क्रोएशिया व्हिसा (6 वर्षाखालील) |
फुकट |
फुकट |
क्रोएशिया व्हिसासाठी अर्ज करणे ही अगदी सोपी प्रक्रिया आहे. अर्जाची प्रक्रिया सुरु करण्याआधी सर्व कागदपत्र तुमच्या बरोबर ठेवा. यामुळे तुम्हाला प्रक्रिया जलद गतीने पार पाडण्यामध्ये मदत होईल. क्रोएशिया शेंगेन व्हिसासाठी अर्ज करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलोकरा:
व्हिसा एप्लीकेशन फॉर्म डाऊनलोड करा आणि काळजीपूर्वक भरा.
आवश्यक कागदपत्र गोळा करा. तुम्ही अर्ज करत असलेल्या व्हिसा प्रकारासंबंधी नेमके कागदपत्र तुमच्याकडे आहेत हे सुनिश्चित करा आणि ही कागदपत्रं क्रोएशियन एम्बसी/कॉन्सुलेट द्वारा प्रमाणित निकषांना अनुसरून आहेत याची देखील खात्री करा.
व्हिसा एप्लीकेशन सेंटर किंवा एम्बसीची अपॉइंटमेंट घ्या.
इंटरव्ह्यू द्या आणि वरील तक्त्याप्रमाणे व्हिसा फीज भरा.
आवशयक असलेली सर्व माहिती आणि बायोमॅट्रिक्स सबमिट करा.
सगळं झाल्यावर, प्रतिनिधींकडून प्रतिक्रियेची वाट पहावी लागते.
व्हिसासाठी अर्ज करण्याआधी तुम्ही क्रोएशियन एम्बसी ऑफीसलाभेट देणे आवश्यक आहे. त्यासाठीची माहिती खालील प्रमाणे आहे
दिल्लीतील क्रोएशिया एम्बसी, भारत |
|
पत्ता | A-15 वेस्ट एंड, नवी दिल्ली 110021, भारत |
फोन | 0091 11 4166 3101 / 1 / 2 / 3 |
फॅक्स | 0091 11 4166 3100, 2411 6873 |
मुंबईतील क्रोएशिया एम्बसी, भारत | |
पत्ता | A/52, दर्शन अपार्टमेंट्स, माउंट प्लेजेंट रोड, मुंबई - 400 006, भारत |
फोन | 0091 22 23 67 84 51 |
फॅक्स | 0091 22 22 02 11 74 |
कलकत्त्यातील क्रोएशिया एम्बसी, भारत | |
पत्ता | पोद्दार कोर्ट 9वा मजला, गेट नं. 1, 18 रवींद्र सारणी, कलकत्ता – 700 001, West Bengal, India |
फोन | 0091 33 2225 0352 / 4147 |
फॅक्स | 0091 33 2225 0348 |
भारतामधून क्रोएशियासाठी ट्रॅव्हल इन्शुरन्स घेणे हा स्मार्टच नाही तर महत्त्वाचा निर्णय आहे, तसे ही शेंगेन व्हिसा रिक्वायरमेंट्सनुसार हे बंधनकारक देखील आहे.
हे तर स्पष्टच आहे की ट्रॅव्हल इन्शुरन्स तुम्हाला आपत्कालीनपरिस्थितीत सुरक्षित ठेवतो, त्याच बरोबर परदेशात असताना तुमच्या बरोबर तुमची आर्थिक बाजू सुरक्षित करणारे कागदपत्र असणे देखील महत्त्वाचे आहे.
डिजीट कडून ट्रॅव्हल इन्शुरन्स घेणे सर्वोत्तम निर्णय असेल कारण आम्ही कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन तर देतोच जस एकी शेंगेन व्हिसा रिक्वायरमेंट्स मध्ये लिहिलेले आहे, परंतु त्याच बरोबर तुम्ही तुमच्यासाठी अगदीच परवडणाऱ्या ₹225 रुपयाच्या प्रीमियम पासून सुरु होणारा परिपूर्ण अशा प्लॅनचा लाभही घेऊ शकता.
तुमच्या ट्रीपसाठी योग्य प्लॅनची निवड करण्यापूर्वी तुम्ही आमच्या कव्हरेजेस बद्दल माहिती करून घेऊ शकता.
तुमच्या ट्रॅव्हल इन्शुरन्स मध्ये कोणकोणते कव्हर्स असायला हवे याची सविस्तर यादी आम्ही खाली डेट आहोत.