आयटीआर-3 ऑनलाइन फाइलिंग बंधनकारक आहे. या स्टेप्स प्रमाणे सूचनांचे अनुसरण करून आपण ऑनलाइन आयटीआर-3 फाइल करू शकता:
- स्टेप 1: आयटीआर-3 ऑनलाइन फाइलिंग प्रोसेस आपण इन्कम टॅक्स विभागाच्या अधिकृत ई-फाइलिंग वेब पोर्टलला भेट देऊन सुरू होते.
- स्टेप 2: तुमचा वापरकर्ता आयडी (पॅन), पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकून या पोर्टलवर लॉग इन करा. तथापि, जर आपण नवीन वापरकर्ता असाल तर आपल्याला प्रथम पोर्टलवर खाते नोंदणी करणे आवश्यक आहे.
- स्टेप 3: मेन्यूवर 'ई-फाईल' हा पर्याय निवडा आणि ड्रॉप-डाऊन मेनूमधून 'इन्कम टॅक्स रिटर्न'वर क्लिक करा.
- स्टेप 4: हे पेज तुमचे पॅन डिटेल्स ऑटो-पॉप्युलेट करते. आता, पुढे जा आणि 'असेसमेंट इयर' निवडा ज्यासाठी आपण आयटीआर फाइल करत आहात. त्यानंतर 'आयटीआर फॉर्म नंबर' निवडा आणि 'आयटीआर-3' निवडा.
- स्टेप 5: 'ओरिजिनल' म्हणून 'फाइलिंग टाइप' निवडा. आधी भरलेल्या आरिजिनल रिटर्नच्या तुलनेत सुधारित रिटर्न भरायचे असेल तर 'रीवाइस्ड रिटर्न' निवडा.
- स्टेप 6: 'सबमिशन मोड' हा पर्याय शोधा आणि 'प्रीपेअर अँड सबमिट ऑनलाइन' निवडा. आता 'कंटिन्यू' वर क्लिक करा.
- स्टेप 7: या टप्प्यावर, आपल्याला इन्कम, सूट, डीडक्शन तसेच इन्वेस्टमेंटचे डिटेल्स देणे आवश्यक आहे. त्यानंतर, टीडीएस, टीसीएस आणि / किंवा अॅडव्हान्स टॅक्सद्वारे टॅक्स पेमेंट्सचे डिटेल्स जोडा.
- स्टेप 8: सर्व डेटा काळजीपूर्वक आणि अचूकपणे भरणे लक्षात ठेवा. याव्यतिरिक्त, कोणताही डेटा गमावू नये म्हणून वेळोवेळी 'सेव्ह द ड्राफ्ट'वर क्लिक करा.
- स्टेप 9: खालीलपैकी आपला पसंतीचा व्हेरीफिकेशन पर्याय निवडा:
- झटपट ई-वेरीफिकेशन
- ई-व्हेरीफिकेशन नंतरच्या तारखेस परंतु आयटीआर-3 दाखल केल्याच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत
- सीपीसी (सेंट्रलाइज्ड प्रोसेसिंग सेंटर) कडे पोस्टाद्वारे पाठविलेल्या आयटीआर-व्ही द्वारे आणि रिटर्न दाखल केल्यानंतर 30 दिवसांच्या आत व्हेरीफिकेशन
- स्टेप 10: 'प्रीविव्ह अँड सबमिट' निवडा आणि नंतर 'सबमिट' करा.
येथे लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे 44AB अंतर्गत लेखापरीक्षण आवश्यक असलेल्या खात्यांसाठी डिजिटल स्वाक्षरीअंतर्गत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने रिटर्न्सचे व्हेरीफिकेशन करणे मॅनडेटरी आहे.
तसेच, एखाद्याला विशिष्ट सेक्शन अंतर्गत लेखापरीक्षणाचा रिपोर्ट सादर करायचा असेल तर आयटीआर दाखल करण्यापूर्वी तो इलेक्ट्रॉनिक पद्धतीने अहवाल सादर करेल. हे सेक्शन्स 115JB, 115JC, 80-IA, 80-IB, 80-IC, 80-ID, 50B, 44AB, 44DA, किंवा 10AA आहेत.
याव्यतिरिक्त, जेव्हा आपण 'आय वूड लाइक टू ई-व्हेरीफाय' हा पर्याय निवडता तेव्हा आपण खालीलपैकी कोणत्याही एका मार्गाने झटपट ई-व्हेरीफिकेशनची निवड करू शकता:
- व्हेरीफिकेशन भागावर डिजिटल स्वाक्षरी करा
- इलेक्ट्रॉनिक व्हेरिफिकेशन कोड (ईव्हीसी) द्वारे प्रोसेस प्रमाणित करा
- ओटीपी प्रविष्ट करण्यासाठी आपल्या आधार डिटेल्सचा वापर करा
- प्रीव्हॅलिडेटेड बँक किंवा डीमॅट खात्याद्वारे प्रमाणीकरण
आयटीआर-3 ऑनलाइन कसा फाइल करावा, याबाबतची सविस्तर प्रोसेस ही आहे.
तसेच या टॅक्सपेअर्सना हा फॉर्म ऑफलाइन फाइल करायचचा असेल तर त्यांच्याकडे टॅक्स रिफंडची विनंती नसावी.