येथे काही सूट, डीडक्शन्स आणि फायदे आहेत जे 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या टॅक्सपेअर्ससाठी आर्थिक रेसपॉन्सीबिलिटीज सुलभ करू शकतात.
1. प्राथमिक सूट फायदा
टॅक्स पे करण्यासाठी इन्कमच्या कक्षेत येणाऱ्या भारतातील प्रत्येक व्यक्तीला काही प्राथमिक सवलती देण्यात आल्या आहेत.
सीनियर सिटीजन्ससाठी सरकारने 1 एप्रिल 2023 पासून लागू होणारी ही मूलभूत सूट लिमिट दोन्ही टॅक्स प्रणालीअंतर्गत ₹3 लाखांपर्यंत वाढवली आहे.
सुपर सिटिझन्सना त्यांचे इन्कम आणि वय लक्षात घेता जास्त फायदा मिळतो. त्यांच्यासाठी ही सूट एका आर्थिक वर्षात जुन्या टॅक्सप्रणालीनुसार ₹5 लाखांपर्यंत ची आहे. मात्र, नव्या प्रणालीत मूळ सूटची लिमिट ₹3 लाखांपर्यंत आहे.
सीनियर किंवा सुपर सिटीजन्स वगळता सर्वसामान्य सिटीजन्ससाठी ही सूट केवळ जुन्या टॅक्सप्रणालीनुसार ₹2,50,000/- पर्यंत आहे, ज्यामुळे त्यांना अधिक टॅक्स भरावा लागतो.
[स्त्रोत]
2. मेडिकल इन्शुरन्स अंतर्गत फायदा
सेक्शन 80D अंतर्गत सीनियर सिटीजन्सना ₹50,000 पर्यंत हेल्थ इन्शुरन्सचा हप्ता भरल्यास फायदा दिला जातो. मेडिकल इन्शुरन्स नसलेले सुपर सीनियर सिटीजनही या फायद्याचा लाभ घेऊ शकतात.
सुपर सिटिझन्ससाठी सेक्शन 80D अंतर्गत मेडिकल प्रीमियमचे पेमेंट करण्याबरोबरच त्यांच्या उपचारावर होणाऱ्या प्रत्यक्ष एक्सपेन्ससेससाठी डीडक्शन दिले जाते.
अधिक जाणून घ्या: हेल्थ इन्शुरन्स टॅक्स फायदे
[स्त्रोत]
3. इंटरेस्ट इन्कमवर विशेषाधिकार
भारतातील रहिवासी असलेल्या सीनियर सिटीजन्सना एका आर्थिक वर्षात ₹50,000 पर्यंत मिळणाऱ्या इंटरेस्टवर कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही.
इन्कम टॅक्सच्या सेक्शन 80 TTB अंतर्गत लागू होणाऱ्या या योजनेत बचत बँक खात्यात मिळणारे इंटरेस्ट, बँक खात्यातील बचत, ठेवी आणि/किंवा पोस्ट ऑफिसमधील ठेवींचा विचार केला जाईल. इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करताना सीनियर सिटीजन्सनी फॉर्म 15 H भरणे आवश्यक आहे.
तसेच सेक्शन 194A नुसार सीनियर सिटीजन्सना बँक, पोस्ट ऑफिस किंवा सहकारी बँकेकडून ₹ 50,000 पर्यंतच्या इंटरेस्ट पेमेंट्सवर जास्त टीडीएस कपातीचा फायदा मिळतो. बिगर सीनियर सिटीजन्ससाठी ही लिमिट ₹ 40,000 रुपये आहे.
[स्त्रोत 1]
[स्त्रोत 2]
4. आयटीआर (ITR) फाइलिंगपासून सूट
अर्थसंकल्प 2021 मध्ये सेक्शन 194P लागू करण्यात आले आहे, ज्याअंतर्गत 75 किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या सीनियर सिटीजन्सनी खालील निकषांची पूर्तता केल्यास त्यांना आयटीआर फाइल करण्यापासून सूट देण्यात आली आहे:
- त्यांच्या पेन्शनमधूनच त्यांना इन्कम मिळते.
- त्याच बँक खात्यात इंटरेस्ट आणि पेन्शनमधून त्यांना इन्कम मिळते.
- त्यांनी निर्दिष्ट बँकेकडे एक घोषणा फॉर्म 12BBA सादर केला आहे.
5. अॅडव्हान्स टॅक्स नाही
60 वर्षांखालील व्यक्तींचे टॅक्स लायबिलिटी एका आर्थिक वर्षात ₹10,000 किंवा त्यापेक्षा अधिक असल्यास त्यांना अॅडव्हान्स टॅक्स भरावा लागतो, तर सीनियर सिटीजन बिझिनेस किंवा व्यवसायातून इन्कम झाल्याशिवाय या ओझ्यापासून मुक्त असतात.
6. विशिष्ट रोगांच्या उपचारासाठी भत्ता
भारत सरकार वैयक्तिक टॅक्सपेअर्स आणि 60 वर्षांखालील आश्रित नातेवाईकांना मेडिकल उपचारांसाठी ₹40,000 च्या आसपास खर्च झाल्यास टॅक्स न भरण्याची परवानगी देते.
इन्कम टॅक्स अॅक्टच्या सेक्शन 80DDB नुसार अवलंबून असलेल्या सीनियर आणि सुपर सीनियर सिटीजन्सनी एका आर्थिक वर्षात विशिष्ट आजार/ क्रिटिकल इलनेसवर उपचार केल्यास ही डीडक्शन लिमिट ₹1 लाखांपर्यंत आहे.
[स्त्रोत]
7. इन्कम टॅक्स रिटर्न फायदे
सुपर सीनियर सिटिझन (80 वर्षांवरील व्यक्ती) सहज (आयटीआर 1) किंवा सुगम (आयटीआर 4) यापैकी एकाद्वारे इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करू शकतात. ते मॅन्युअली किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने हे करणे निवडू शकतात.
8. रिव्हर्स मॉर्गेज स्कीम अंतर्गत टॅक्स नाही
मासिक इन्कम मिळविण्यासाठी सीनियर सिटीजन त्यांच्या कोणत्याही निवासस्थान गहाण ठेवू शकतात. मालमत्तेची मालकी सीनियर सिटीजनकडे राहते आणि त्यासाठी त्यांना दरमहा पैसे दिले जातात. मालकाला प्रीमियममध्ये भरलेली रक्कम इन्कम टॅक्समधून मुक्त आहे.
9. पेन्शन इन्कम मधून स्टँडर्ड डीडक्शन्स
सीनियर सिटीजन्सना त्यांच्या पेन्शन इन्कमसाठी ₹50,000 स्टँडर्ड डीडक्शन देण्यात आली आहे, ज्यात फॅमिली पेन्शनर्सना ₹15,000 पर्यंत डीडक्शन्सचा फायदा घेता येईल.
तसेच, आर्थिक वर्ष 2022-23 आणि आर्थिक वर्ष 2022-23 साठी सीनियर आणि सुपर सीनियर सिटीजन्ससाठी इन्कमटॅक्स स्लॅब्स तपासू शकतात.
[स्त्रोत]