डिजिट इन्शुरन्स करा

सेक्शन 80C खाली इन्कम टॅक्स डीडक्शन

सेक्शन 80C खाली डीडक्शन याबद्दल सर्व काही

भारतीय संविधानानुसार भारतीय सरकार इन्कम टॅक्स अॅक्ट, 1961 मध्ये नमूद केलेल्या नियामानांतर्गत भारतात मिळवलेल्या कोणत्याही इन्कम वरती (शेती मधून मिळालेले इन्कम सोडून) टॅक्स लावू शकते.

इंडीविजुअल्स, हिंदू अनडिव्हायडेड फॅमिलीज, फिर्म्स, कंपनीज, एलएलपीज, बॉडी ऑफ इंडीविजुअल्स, असोसिएशन ऑफ पर्सन्स किंवा इतर अर्टीफिशिअल जुरिडिशिअल पर्सन यांनी मिळवलेल्या इन्कम वर हा कर लावला जातो.

या टॅक्स लायबिलिटीज कमी करण्यासाठी इन्कम टॅक्स अॅक्ट ने काही टॅक्स एक्झ्म्पशन क्लॉजेस नमूद केले आहेत ज्यामुळे नागरिक त्यांच्या इन्कम टॅक्सपेमेंट्स वर ठराविक रक्कमेची बचत करू शकतात.

इन्कम टॅक्स अॅक्ट, 1961 मधील सेक्शन 80

सेक्शन 80C मध्ये तुम्हाला अनेक प्रकारचे इंस्टृमेंट्स मिळतील ज्याद्वारे तुम्ही एकत्रितपणे योग्य प्रमाणात टॅक्स बेनिफिट्स मिळवू शकता सेक्शन 80C च्या डीडक्शन द्वारे वेगवेगळ्या स्कीम्स मधून तुम्ही (₹1,50,000 + ₹50,000) पर्यंत बचत करू शकता.

परंतु सेक्शन 80C चे डीडक्शन्स केवळ इंडीविजुअल्स किंवा हिंदू अनडिव्हायडेड फॅमिली यांनाच मिळू शकतात. हे डीडक्शन्स कंपन्या, पार्टनरशिप्स किंवा इतर कॉर्पोरेट बॉडीज साठी उपलब्ध नाहीत.

इन्कम टॅक्स अॅक्ट च्या सेक्शन 80C आणि त्याच्याशी संलग्न वेगवेगळे विभाग जसे 80CCC आणि 80CCD अंतर्गत येणारे डीडक्शन्सचे विवरण खालीलप्रमाणे आहे, ज्यामुळे तुम्ही तुमच्या टॅक्स लायबिलिटीज कमी करू शकता.

[स्रोत]

सेक्शन 80C अंतर्गत इन्कम टॅक्स डीडक्शन्स

इन्वेस्टमेंट लॉक-इन-पिरिअड रिटर्न्स
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड 15 वर्षे 7%-8%
इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम्स 3 वर्षे 12% - 15%
एम्प्लॉईज प्रॉव्हीडंट फंड रिटायरमेंट पर्यंत 8.5%
नॅशनल पेन्शन स्कीम 5 वर्षे 12% - 14%
टॅक्स सेव्हिंग फिक्स्ड डिपॉझिट्स 5 वर्षे 6.50%- 7.25%
नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकेट 5 वर्षे 7% - 8%
सुकन्या समृद्धी योजना (एसएसवाय) मुलगी 21 वर्षाची होईपर्यंत 7.60%
सीनियर सिटीजन सेव्हिंग्स स्कीम 5 वर्षे 7.40%
इन्कम टॅक्स अॅक्ट च्या या सेक्शन मधील डीडक्शन्स बद्दल खाली विस्तृत माहिती दिली आहे:

सेक्शन 80C खाली टॅक्स सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट

1. पब्लिक प्रॉव्हीडंट फंड

पब्लिक प्रॉव्हीडंट फंड किंवा पीपीएफ या गव्हरमेंट सेव्हिंग्स स्कीम्स ज्यामुळे खात्रीशीर रिटर्न्स मिळतात. पब्लिक प्रॉव्हीडंट फंड 15 वर्षात मॅच्युर होते.

पब्लिक प्रॉव्हीडंट फंड मधून मिळालेले रिटर्न्सना सेक्शन 80C खाली सूट देण्यात आलीआहे. परंतु, दर वर्षी इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करताना पब्लिक प्रॉव्हीडंट फंड मधून मिळालेल्या रिटर्न्सची घोषणा करावी लागते.

2. टॅक्स सेव्हिंग्स म्युच्युअल फंड्स मधील इन्व्हेस्टमेंट

हे टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड्स इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्स स्कीम म्हणून देखील ओळखले जातात, ज्यांना 3 वर्षाचा लॉक-इन-पिरिअड आहे आणि त्यांचे हे नाव त्यांच्या इक्विटीच्या एकूण कॉरपस च्या 80% इन्व्हेस्टमेंट मुळे दिले गेले आहे..

हे इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्स स्कीम मधील रिटर्न्स ₹1 च्या लिमिट पर्यंत टॅक्स-फ्री असतात. लिमिटपेक्षा जास्त मिळत असलेल्या रिटर्न्सवर तुम्हाला 10% दराने लॉंग टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स भरावा लागेल.

3. एम्प्लॉईज प्रॉव्हीडंट फंड (इपीएफ)

एम्प्लॉईज प्रॉव्हीडंट फंड मधील एम्प्लॉईजच्या कॉंट्रिब्युशनचा भाग सेक्शन 80C मधील डीडक्शन्सच्या यादीत समाविष्ट केलेला आहे. जरी सेक्शन 80C खाली फंड मधले एम्प्लॉईज कॉंट्रिब्युशन समाविष्ट केलेला नसले तरी हे टॅक्स फ्री आहे.

एम्प्लॉईज कॉंट्रिब्युशन फंड वरील इंटरेस्ट देखील टॅक्स फ्री आहे. खालील काही परिस्थितींमध्ये यावर टॅक्स लागू शकतो:

  • तुम्ही जर तुमची एम्प्लॉईज कॉंट्रिब्युशन फंड अंतर्गत रजिस्टर्ड कंपनी मधील नोकरी सोडली तर.
  • एम्प्लॉईज कॉंट्रिब्युशन फंड अंतर्गत रजिस्टर्ड कंपनी मधून 5 वर्षाच्या आत एम्प्लॉईज कॉंट्रिब्युशन फंड मधून पैसे विड्रॉ केले तर.

4. नॅशनल पेन्शन स्कीम(एनपीएस)

सेक्शन 80C खाली एम्प्लॉई आणि एम्प्लॉयर यांच्या कॉंट्रिब्युशनला टॅक्सेशन मधून सूट देण्यात आली आहे. परंतु इथे हे लक्षात घेणे गरजेचे आहे की एम्प्लॉयरचे कॉंट्रिब्युशन हे एम्प्लॉईच्या सॅलरी आणि डिअरनेस अलाउन्सच्या 10% पेक्षा जास्त असू नये.

तसेच, एक सेल्फ एम्प्लॉईड व्यक्ती त्याच्या ग्रॉस इन्कमच्या 20% पर्यंतच्या कॉंट्रिब्युशनसाठी सेक्शन 80C खाली टॅक्स डिडक्शन क्लेम करू शकतो.

तसेच, उपलब्ध एक्झ्म्पशन लिमिट म्हणजेच ₹1,50,000 च्या वर ₹50,000 पर्यंतचे नॅशनल पेन्शन स्कीम साठी केलेले वॉलेंटरी कॉंट्रिब्युशन्स देखील एक्झ्म्प्ट आहेत. म्हणजेच, नॅशनल पेन्शन स्कीम अंतर्गत वॉलेंटरी कॉंट्रिब्युशन्स करणारे नागरिक या सेक्शन खाली ₹2 लाखांपर्यंतचे एक्झ्म्पशन मिळवू शकतात.

इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे की नॅशनल पेन्शन स्कीम द्वारे मिळणारे रिटर्न्स स्कीम मॅच्युर होईपर्यंतच एक्झ्म्प्ट केले जातात. स्कीम मॅच्युर झाल्यावर साठलेल्या रकमेच्या 60% रकमेवर टॅक्स भरावा लागतो.

5. टॅक्स सेव्हिंग फिक्स्ड डिपॉझिट्स

5 वर्षासाठीचे टॅक्स सेव्हिंग फिक्स्ड डिपॉझिट्स, जे तुम्ही बँक किंवा पोस्ट ऑफिस मार्फत घेऊ शकता, सेक्शन 80C अंतर्गत एक्झ्मप्ट आहेत. तरी, या एफडी वरील सर्व इंटरेस्ट टॅक्सेबल आहे.

6. नॅशनल पेन्शन स्कीम (एनपीएस)

सरकारने उपलब्ध करून दिलेल्या 5 वर्ष टेन्यूअरच्या काही सेव्हिंग स्कीम्स खाली दिलेल्या आहेत: नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकेट वरील सर्व इंटरेस्ट सेक्शन 80C खाली एक्झ्मप्ट केले आहेत.

7. सुकन्या समृद्धी योजना

भारतामध्ये सरकार द्वारा उपलब्ध करून देण्यात आलेल्या स्कीम्स पैकी एक स्कीम आहे ज्यामुळे मुलींच्या शिक्षणापासून ते त्यांच्या लग्नापर्यंतच्या सर्व खर्चाला सहाय्य म्हणून उपयुक्त आहे.

10 वर्ष वयाच्या मुलीचे पालक हे खाते उघडू शकतात; हे खाते 21 वर्षानंतर मॅच्युर होते आणि या सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत मिळालेले रिटर्न्स टॅक्स फ्री आहेत.

8. सीनियर सिटीझन्स सेव्हिंग्स स्कीम

सरकारने उपलब्ध करून दिलेल्या 5 वर्ष टेन्यूअरच्या काही सेव्हिंग स्कीम्स खाली दिलेल्या आहेत: भविष्यात तुम्ही टेन्यूअर 3 वर्षाने वाढवून घेऊ शकता.

या स्कीम मधील इन्वेस्टमेंट सेक्शन 80C खाली एक्झ्मप्ट केले आहेत. तरी, या स्कीम मधून मिळालेले रिटर्न्स तुमच्या इन्कम टॅक्स स्लॅब अनुसार टॅक्सेबल आहे.

सीनियर सिटिजन हेल्थ इन्शुरन्स

या सर्व इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स व्यतिरिक्त, सेक्शन 80C चे डीडक्शन्स उपलब्ध आहेत:

9. होम लोन

हे एक्झ्म्पशन होम लोन च्या प्रिन्सिपल अमाऊंटवर दर वर्षी खाजगी किंवा भाड्याने दिलेल्या जागेसाठी उपलब्ध आहे. तरी, हे डीडक्शन क्लेम करण्यासाठी तुमच्या घरावर तुमचा 5 वर्षापेक्षा जास्त काळ ताबा असेल तरच तुम्ही ते विकू शकता.

तुमच्या जागेसाठी भरलेल्या रजिस्ट्रेशन फी आणि स्टॅम्प ड्युटीवर देखील डीडक्शन क्लेम करू शकता.

10. हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीवर प्रीमियम पेमेंट

तुमच्या स्वतःच्या किंवा तुमच्या कुटुंबाच्या लाईफ इन्शुरन्स प्रीमिअम पेमेंटवर घेतले जाऊ शकते. एकच प्रीमियम पॉलिसी असल्यास, तुम्ही ती घेतल्यापासून 2 वर्षाच्या आत बंद नाही करू शकत. एकापेक्षा जास्त पॉलिसी असतील तर टॅक्स एक्झ्म्पशन मिळवण्यासाठी कमीत कमी 2 वर्षाचे तरी प्रीमिअम भरलेले असावे.

जर तुम्ही वरील सर्व नियमांचे पालन केले नाही तर तुमचे सेक्शनचे सर्व डीडक्शन रद्द केले जातील.

युनिट लिंक्ड लाईफ इन्शुरन्स पॉलिसीसचे भरलेले प्रीमिअम देखील सेक्शन 80C च्या डीडक्शन्स साठी पत्र आहेत.

फॅमिली हेल्थ इन्शुरन्स

11. पाल्याच्या शिक्षणासाठी भरलेली शाळेची किंवा ट्युशनची फी

कोणत्याही कॉलेज, शाळा, महाविद्यालय, इथे तुमच्या पाल्याच्या शिक्षणासाठी भरलेल्या फी वर देखील या सेक्शन खाली एक्झ्म्पशन मिळते.

टॅक्स डिडक्शनच्या मदतीने तुम्ही तुमची टॅक्सेबल इन्कम कमी करू शकता. तरी इथे हे लक्षात घायायला हवे की तुमचे डीडक्शन अमाउंट तुम्ही क्लेम केलेल्या टॅक्स डिडक्शन्सच्या प्रकाराप्रमाणे बदलते.

सेक्शन 80C व्यतिरिक्त मिळणारे टॅक्स एक्झ्म्पशन

80C शिवाय तुम्ही सेक्शन 80च्या इतर अनेक सबसेक्शन्स खाली डीडक्शन मिळवू शकता. उदाहरणार्थ-

  • सेक्शन 80D- तुमच्या स्वतःच्या, पती/पत्नीच्या, मुलांच्या, पालकांच्या हेल्थ इन्शुरन्स साठी भरलेल्या प्रीमिअम वर टॅक्स एक्झ्म्पशन मिळवू शकता. या सेक्शन अंतर्गत तुम्ही ₹25,000 पर्यंत स्वतःसाठी आणि तुमच्या पती/पत्नीसाठी, आणि आणखीन ₹25,000 तुमच्या पालकांसाठीचे डीडक्शन क्लेम करू शकता. या सेक्शन खाली ₹1लाख पर्यंत एक्झ्म्पशन मिळू शकते.
  • सेक्शन 80G- या सेक्शन मध्ये चॅरिटी आणि इतर सामाजिक कार्यांसाठी दिलेले अनुदान याचा समावेश आहे. तुम्ही कोणत्या कारणासाठी अनुदान देत आहात या अनुसार कोणत्याही अटींविना हे अनुदान एक्झ्म्पशन साठी 50% किंवा 100% पर्यंत पत्र आहेत.
  • सेक्शन 80GGC- कोणत्याही राजकीय पक्षासाठी दिलेल्या अनुदानाचा या सेक्शन मध्ये समावेश होतो. रोख रक्कम या व्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारे पेमेंट केले असता हे एक्झ्म्पशन उपलब्ध आहे.

अशाप्रकारे, वरील काही आणि इतर अनेक डीडक्शन्स द्वारे टॅक्सपेअरची लायबिलिटी एका विशिष्ट प्रमाणात कमी केली जाऊ शकते. तर, तुमचे इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्याआधी सर्वाधिक टॅक्स डिडक्शन मिळवण्यासाठी सेक्शन 80 आणि सेक्शन 80च्या सब सेक्शन्स अंतर्गत केलेल्या सर्व तरतूदी लक्षपूर्वक विचारात घ्याल याची खात्री करून घ्या.

[स्रोत 1]

[स्रोत 2]

[स्रोत 3]

सेक्शन 80C खाली टॅक्स सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट्स याबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न

जरी एम्प्लॉयर कडे पुरावे जमा न करता देखील इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करताना सेक्शन 80C खालील डीडक्शन्स क्लेम करता येतील का?

आर्थिक वर्ष संपायच्या आत तुमचे इन्व्हेस्टमेंटचे सर्व पुरावे जमा केले गेले असावेत. जेणेकरून एम्प्लॉयरला तुमची टॅक्सेबल इन्कम आणि टॅक्स डीडक्शन्स ठरवताना मदत होईल.

पण जरी तुम्ही पुरावे जमा करायचे विसरलात तरी इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्याआधी त्याच आर्थिक वर्षात केलेल्या सर्व इन्व्हेस्टमेंट्स तुम्ही क्लेम करू शकता.

जर मी सेक्शन 80C खाली टॅक्स बेनिफिट्स साठी पत्र इन्व्हेस्टमेंट्स 15 एप्रिल 2019 मध्ये केल्या असतील तर मी माझे टॅक्स डिडक्शन आधी क्लेम करू शकतो?

या परीस्थित तुम्ही तुमच्या या इन्व्हेस्टमेंटचे डीडक्शन 2019-2020 या आर्थिक वर्षात क्लेम करू शकता.

हिंदू अनडिव्हायडेड फॅमिली साठी सेक्शन 80C लागू होते का?

होय, इंडीव्हीजुअल्स किंवा एचयूएफ इन्कम टॅक्स अॅक्ट च्या 80C खालील सर्व टॅक्स बेनिफिट्सचा लाभ घेऊ शकतात.