आपल्या प्रियजनांना गमावण्यासारखे वेदनादायक दुसरे काहीही नाही आणि त्यातही जेव्हा आपण त्यांना आवश्यक ते उपचार देऊ शकत नाही त्याहून अधिक दुर्दैवी काहीच नसते. दुःखात नेहमी आपलीच माणसं कामी येतात, बरोबर? आपण सर्वांनी हे नुसतेच ऐकले नसेल तर आयुष्यात अनेकदा अनुभवले सुद्धा असेल.
आरोग्य सुविधांच्या किमतीतील वाढ लक्षात घेता भारतातील हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा सर्वोत्तम तारणहार आहे. तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विविध प्रकारच्या इन्शुरन्स पॉलिसी उपलब्ध आहेत. भारतात उपलब्ध असलेल्या विविध प्रकारच्या हेल्थ इन्शुरन्सची माहिती करून घेऊया.
इन्डिव्हिज्युअल हेल्थ इन्शुरन्स ही एक पॉलिसी आहे जी तुम्ही तुम्हाला, तुमचा जोडीदार, मुले आणि पालकांना कव्हर करण्यासाठी खरेदी करू शकता. या प्रकारच्या इन्शुरन्स पॉलिसीमध्ये तुम्हाला झालेली दुखापत आणि आजारांशी संबंधित हॉस्पिटलायझेशन, शस्त्रक्रियेचा खर्च, खोलीचे भाडे, डेकेअर प्रक्रिया यांचा समावेश होतो.
इन्डिव्हिज्युअल हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीअंतर्गत समाविष्ट असलेल्या प्रत्येक सदस्याकडे इन्डिव्हिज्युअल सम इन्शुअर्ड (विम्याची रक्कम) असेल. उदाहरणार्थ, जर तुम्ही तुमची जोडीदार, 2 मुले आणि स्वत:ला कव्हर करणारी 3 लाखांचा सम इन्शुअर्ड असणारी इन्डिव्हिज्युअल हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेतली, तर कव्हर केलेल्या प्रत्येक व्यक्तीला रु.3 लाखांची रक्कम इन्डिव्हिज्युअल सम इन्शुअर्ड म्हणून असेल. (यानुसार प्रीमियम रक्कम सुद्धा बदलते)
18 ते 70 वयोगटातील तुमच्यासारख्या व्यक्ती हा प्लॅन खरेदी करू शकतात. इन्डिव्हिज्युअल पॉलिसी खरेदी करण्याचा सर्वोत्तम भाग म्हणजे ती प्रत्येक संरक्षित सदस्यासाठी इन्डिव्हिज्युअल सम इन्शुअर्ड लिमिट प्रदान करते.
तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी परवडणारी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी हवी असल्यास फॅमिली फ्लोटर हेल्थ इन्शुरन्स ही तुमची निवड असावी.
फॅमिली फ्लोटर हेल्थ इन्शुरन्स अंतर्गत, पॉलिसी अंतर्गत समाविष्ट असलेल्या सर्व सदस्यांसाठी सिंगल सम इन्शुअर्ड (विम्याची रक्कम) फ्लोट करते. फॅमिली फ्लोटर हेल्थ इन्शुरन्स योजना फायदेशीर आहे कारण प्रीमियम इन्डिव्हिज्युअल हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीपेक्षा तुलनेने कमी आहे. ही पॉलिसी तुम्हाला स्वतःला, तुमचा जोडीदार, मुले आणि पालकांना कव्हर करू शकते.
तुम्ही तुमच्या कुटुंबातील 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे सदस्य जोडण्याचा विचार करू नये कारण त्यांना आजार होण्याची अधिक शक्यता असते आणि त्यामुळे त्याचा प्रीमियमवर परिणाम होतो.
तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य 60 वर्षांपेक्षा कमी वयाचे असल्यास, तुम्ही फॅमिली फ्लोटर पॉलिसी खरेदी करावी.
ग्रुप हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी एकत्रितपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या गटासाठी डिझाइन केलेली आहे. त्यामुळे जर तुम्ही स्टार्ट-अप किंवा कॉर्पोरेट हाऊसचे मालक असाल तर तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांसाठी असे प्लॅन्स खरेदी करावेत. हा कर्मचाऱ्यांना दिला जाणारा एक प्रकारचा लाभ आहे. कर्मचाऱ्यांचे हित टिकवून ठेवण्याचा दर वाढवण्यासाठी कव्हर खरेदी करू शकता.
ग्रुप हेल्थ इन्शुरन्स प्लॅन कमी किमतीच्या प्रीमियमसह येतो. काही इन्शुरन्स कंपन्या इन्शुरन्सची रक्कम पुन्हा भरण्याची परवानगी देतात, ती देखील अमर्यादित वेळा, ग्रुप हेल्थ इन्शुरन्स प्लॅन तुम्हाला अपघात, आजार, गंभीर आजार, मानसिक आजार आणि मातृत्वामुळे हॉस्पिटलायझेशनसाठी कव्हर करते.
ग्रुप हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी खरेदी केल्याने तुमच्या कर्मचार्यांना केवळ कव्हरेज मिळत नाही तर तुमच्या कंपनीविषयीची सद्भावनादेखील वाढते. येथे एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा असा आहे की कर्मचारी केवळ तुमच्या कंपनीत काम करेपर्यंतच कव्हर दिले जाते.
60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या वृद्धांसाठी समर्पित केलेल्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीला सीनियर सिटीझन हेल्थ इन्शुरन्स प्लॅन म्हणतात. तुमचे आई-वडील किंवा आजी आजोबा 60 वर्षांपेक्षा जास्त असल्यास, हे कव्हर तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे.
एक सीनियर सिटीझन पॉलिसी औषधांचा खर्च, अपघात किंवा आजारामुळे हॉस्पिटलायझेशन, हॉस्पिटलायझेशनपूर्वी आणि नंतर आणि उपचारांसाठी कव्हरेज देईल. यासह, डोमिसिलरी हॉस्पिटलायझेशन आणि मानसोपचार फायदे यासारखे काही इतर फायदे देखील समाविष्ट आहेत.
काही इन्शुरन्स कंपन्या सीनियर सिटीझन हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी विकण्यापूर्वी संपूर्ण शरीर तपासणीसाठी विचारू शकतात. आजीवन नूतनीकरणासह कमाल प्रवेश वयोमर्यादा 70 वर्षे वयापर्यंत ढकलण्यात आली आहे. आणि, आपल्याला माहिती आहे की, ज्येष्ठ नागरिकांना आजार होण्याची अधिक शक्यता असते, हे प्लॅन्स इतर हेल्थ इन्शुरन्स पॉलिसींच्या तुलनेत अधिक महाग असतात.
मूलभूत हेल्थ इन्शुरन्स प्लॅनसह मॅटर्निटी कव्हर म्हणून खरेदी केले जाऊ शकते. प्रीनेटल स्टेज, डिलिव्हरी आणि पोस्ट नेटल टप्प्यात झालेला सर्व खर्च यात कव्हर केला जातो.
नवविवाहित जोडपे किंवा येत्या काही वर्षांत बाळासाठी प्लॅन करत असलेल्या कुटुंबांनी ही पॉलिसी खरेदी करावी. यात बाळाचा जन्म (वैद्यकीयदृष्ट्या आवश्यक समाप्तीसह), वंध्यत्वाचा खर्च आणि नवजात बाळाच्या पहिल्या 90 दिवसांपर्यंतचे कव्हरेज समाविष्ट आहे. मॅटर्निटी कव्हरसाठी किमान प्रतीक्षा कालावधी 2 वर्षांचा असतो.
जीवनशैलीशी निगडीत आजारांचे प्रमाण वाढत आहे. हे लक्षात घेऊन इन्शुरन्स कंपन्यांनी क्रिटीकल इलनेस कव्हर ऑफर केले आहे.मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी समर्पित, या हेल्थ प्लॅनमध्ये खालील रोगांचा समावेश आहे:
या आजारांवर उपचार घेणे ही महागडी बाब आहे. गंभीर आजार योजनेंतर्गत तुम्हाला रोगाचे निदान होताच, उपचारासाठी लागणाऱ्या वास्तविक खर्चाची पर्वा न करता तुम्हाला पूर्वनिर्धारित रक्कम दिली जाईल.
क्रिटीकल इलनेस पॉलिसी खरेदी करणे ही एक स्मार्ट मूव्ह असू शकते कारण ती तुमच्या बचतीवर कोणताही परिणाम होण्यापासून प्रतिबंधित करते. पॉलिसीमध्ये आजीवन नूतनीकरणक्षमता आहे. तुम्ही गंभीर आजार पॉलिसी घेतल्यास, आजाराचे निदान झाल्यानंतर तुम्ही 30 दिवसात आर्थिक मदत मिळवू शकता.
तुम्हाला काही आजारांचा कौटुंबिक इतिहास असल्यास ही पॉलिसी खरेदी करणे उचित ठरेल. एक रकमी रकमेव्यतिरिक्त, क्रिटीकल इलनेस पॉलिसी तुमच्या हॉस्पिटलायझेशनच्या खर्चाची परतफेड करते. तुम्ही पूरक आरोग्य तपासणीचाही लाभ घेऊ शकता.
परंतु तुम्ही हे लक्षात ठेवले पाहिजे की एकदा क्लेम दाखल केल्यावर इन्शुरन्सची रक्कम एकरकमी जारी केली जाते. इन्शुरन्सची रक्कम जारी केल्यानंतर, पॉलिसी समाप्त होते.
तुम्ही जास्त रकमेसाठी कव्हरेज शोधत असल्यास तुम्ही टॉप-अप पॉलिसी खरेदी करू शकता. असे प्लॅन्स ‘डिडक्टिबल क्लॉज’सह येतात. त्यामुळे, क्लेमच्या बाबतीत, पॉलिसीमध्ये नमूद केलेल्या मर्यादेपेक्षा अधिक पेमेंट केले जाईल.
जसे की जर तुम्ही 15 लाखांचे कव्हर घेतले असेल आणि त्यात रु. 3 लाख डिडक्टिबल असेल, तर तुम्हाला रु. 3 लाखांपर्यंतचा क्लेम सहन करावा लागेल. यापेक्षा जास्त रक्कम इन्शुरन्स कंपनीद्वारे भरली जाईल.
त्यामुळे, जर तुम्ही तुमच्या बेसिक हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीवर आणि त्याहून अधिक व्यापक कव्हर शोधत असाल, तर तुम्ही हा प्लॅन खरेदी करू शकता.
हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्स अंतर्गत, तुम्हाला इन्शुरन्स कंपनीकडून ऑफर केलेला डेली कॅश अलावन्स देखील मिळतो.
हे 30-45 दिवसांसाठी रिएम्बर्स केलेले दैनंदिन खर्च आहेत आणि हॉस्पिटलायझेशनच्या खर्चापेक्षा वेगळे आहेत.
हेल्थ इन्शुरन्स पॉलिसींची मागणी वाढल्याने इन्शुरन्स कंपन्या आणि त्यांच्या उत्पादनांची संख्या वाढली. वैद्यकीय खर्च वाढत आहेत आणि वरीलपैकी कोणतीही पॉलिसी खरेदी करणे सुज्ञपणाचे आहे.
आयुष्यात लवकरात लवकर हेल्थ इन्शुरन्स खरेदी करण्याबद्दल तुम्ही खूप वाचले आणि ऐकले असेल. लहान वयात हेल्थ प्लॅन खरेदी केल्याने त्याचे फायदे आहेत कारण तुम्ही तुमच्या आयुष्याच्या सुरुवातीच्या टप्प्यावर प्रतीक्षा कालावधीपासून मुक्त व्हाल जेव्हा विकार होण्याची शक्यता कमी असते, तुम्ही चांगली रक्कम क्युमुलेटिव्ह बोनस म्हणून मिळवू शकता आणि तुम्ही सम इन्शुअर्ड वाढवू शकता.
परंतु तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी असण्याच्या इतर महत्वाच्या बाबीदेखील माहित असणे आवश्यक आहे जसे की:
जेव्हा बाजारात अनेक हेल्थ इन्शुरन्स कंपन्या असतात, तेव्हा तुमच्या गरजेनुसार एक हेल्थ इन्शुरन्स प्लॅन निवडणे आव्हानात्मक असू शकते. परंतु तुम्ही तुमचे इन्शुरन्स उत्पादन अंतिम करण्याआधी विचारात घेण्यासाठी येथे एक चेकलिस्ट खाली दिली आहे.