कल्पना करा! फक्त एका सोप्या स्टेप मध्ये तुम्हाला दोन बेनिफिट्स मिळाले तर? आश्चर्य वाटतंय ना? हेल्थ इन्शुरन्स प्लॅन मध्ये अगदी असेच घडते; मेडिकल सरकमस्टांसेस मध्ये देखील आर्थिक सुरक्षा आणि त्याचबरोबर टॅक्स बेनिफिट्स. हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम पैड ऑफर्स: इन्कम टॅक्स अॅक्ट मधील सेक्शन 80D अंतर्गत असलेले टॅक्स बेनिफिट्स.
हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम इन्कम टॅक्स मधील सेक्शन 80D अंतर्गत ऑफर करण्यात आलेले टॅक्स बेनिफिट्स.
स्थिती |
80D अंतर्गत डिडक्शन |
स्वतः आणि कुटुंब (सर्व कुटुंबियांचे वय 60 वर्षा खाली) |
₹25,000 |
स्वतः आणि कुटुंब + आई वडील (सर्व कुटुंबियांचे वय 60 वर्षा खाली) |
₹25,000 + ₹25,000) = ₹50,000 |
स्वतः आणि कुटुंब (सर्व कुटुंबियांचे वय 60 वर्षा खाली) + सीनियर सिटिजन असलेले आईवडील |
₹25,000 + ₹50,000 = ₹75,000 |
स्वतः आणि कुटुंब (60 वर्षांवरील ज्येष्ठ सदस्यासह) + सीनियर सिटिजन असलेले आईवडील |
₹50,000 + ₹50,000) = ₹1,00,000 |
वरील सर्वाधिक लिमिट्स मध्ये प्रिव्हेंटिव्ह चेक अप साठी 5000 रुपयापर्यंतची मान्यता आहे.
सेक्शन 80D अंतर्गत 5.20 टक्के टॅक्स भरणारे, 20.8 टक्के टॅक्स भरणारे आणि 31.2 टक्के टॅक्स भरणारे क्रमशः रुपये 1,300, रुपये 5,200 आणि रुपये 7,800 पर्यंतची सर्वाधिक बचत करू शकतात. ही बचत, इन्कम टॅक्स अॅक्ट मधील सेक्शन 80D अंतर्गत तुम्ही जी काही बचत कराल, त्या व्यतिरिक्तची बचत असेल.
सिनिअर सिटीझन्स साठीचे हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम नेहमीच जास्त असतात. वयस्कर आणि जुने दीर्घकालिक आजार असलेल्या व्यक्तींसाठी मेडिकल इन्शुरन्स देण्यासाठी इन्शुरन्स कंपन्या सहज तयार नसतात.
तरी, बजेट 2018 मध्ये सिनिअर सिटीझन्स साठी, ज्यांचा मेडिकल एक्स्पेन्स जास्त आहेआणि ज्यांना जुन्या दीर्घकालिक आजारांमुळे हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेता येत नाही किंवा ज्यांना जास्त प्रीमियम भरणे शक्य नाही, अशा व्यक्तींसाठी जरा दिलासादायक तरतूदी केलेल्या आहेत.
बजेट मध्ये सेक्शन 80D अंतर्गत सिनिअर सिटीझन्स साठी करण्यात आलेल्या मेडिकल एक्स्पेन्सेस वरती डीडक्शन बाबत बदल करण्यात आले. हे डिडक्शन सिनिअर सिटीझन स्वतः किंवा ज्यांची मुले ज्यांना त्यांच्या आईवडीलांसाठी मेडिकल एक्पेन्सेस करावे लगत असतील, क्लेम करू शकतात.
याबद्दल अधिक जाणून घ्या
प्रीमियम पेमेंटची रिसीट आणि तुमच्या इन्शुरन्स पॉलिसीची कॉपी ज्यामध्ये तुमच्या कुटुंबियांची नावे, त्यांच्याशी असलेले तुमचे नाते आणी त्यांचे वय या बाबी दिलेल्या असतात, हे कागदपत्र लागतात. आईवडिलांसाठीच्या पॉलिसीसाठी प्रीमिअम पे केले असताना, प्रोपोजर ने इन्शुरन्स कंपनीकडे त्याच्या नावाने पेमेंट डीटेल्स देऊन 80Dचे सर्टिफिकेट मागून घ्यायला हवे.