वाढत्या मेडिकल खर्चाच्या काळात हेल्थ इन्शुरन्स नसल्यामुळे तुमच्या सेव्हिंग्स वर विपरीत परिणाम होऊ शकतो. आणि ते एकमेव कारण नक्कीच नाही कि ज्यामुळे तुम्ही हेल्थ इन्शुरन्स घ्यावा. मेडिकल इमर्जन्सी मध्ये तुमचे सेव्हिंग्स सुरक्षित ठेवणे याव्यतिरिक्त हेल्थ इन्शुरन्समुळे तुम्हाला इन्कम टॅक्स एक्ट 1961 च्या सेक्शन 80डी अंतर्गत टॅक्स बेनिफिट्स देखील मिळतात.
एक सिनिअर सिटीझन हेल्थ इन्शुरन्स प्लॅन त्याहीपुढे जाऊन तुम्हाला अनेक फायदे देतो. सिनिअर सिटीझन हेल्थ इन्शुरन्स प्लॅन मुळे तुम्हाला कोणकोणते विविध फायदे मिळू शकतात यासाठी पुढे वाचा.
एक अशी व्यक्ती जिचे वय त्या आर्थिक वर्षामध्ये 60 वर्षांपेक्षा जास्त पण 80 वर्षांपेक्षा कमी असेल, त्यावर्षाच्या टॅक्स पर्पज साठी सिनिअर सिटीझन समजली जाते. तसेच, एखादी व्यक्ती जिचे वय एका आर्थिक वर्षामध्ये 80 वर्षांपेक्षा जास्त असेल तर टी व्यक्ती त्या वर्षासाठी सुपर सिनिअर सिटीझन समजली जाते.
सेक्शन 80डी अंतर्गत सिनिअर सिटीझन्स साठी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी साठी टॅक्स बेनिफिट्स खालील प्रमाणे आहेत:
अनेक परिस्थितींमध्ये सेक्शन 80डी अंतर्गत टॅक्स डिडक्शन मिळू शकणाऱ्या वेगवेगळ्या केसेस आता आपण बघूया. सिनिअर सिटीझन्सना मिळणारे अतिरिक्त बेनिफिट्स खालील तक्त्यामध्ये दिलेले आहेत.
परिस्थिती |
सेक्शन 80डी मध्ये मिळणारे डिडक्शन |
स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी (60 वर्षांखालील सर्व सदस्य) |
₹25,000 |
स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी + पालक (60 वर्षांखालील सर्व सदस्य) |
₹25,000 + ₹25,000) = ₹50,000 |
स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी (60 वर्षांखालील सर्व सदस्य) + सिनिअर सिटीझन पालक |
₹25,000 + ₹50,000 = ₹75,000 |
स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी (60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेले सर्व वयस्कर सदस्य) + सिनिअर सिटीझन पालक |
₹50,000 + ₹50,000) = ₹1,00,000 |
सेक्शन 80डी अंतर्गत टॅक्स डिडक्शन क्लेम करण्यासाठी तुम्हाला खालील कागदपत्रे जमा करावी लागतील:
एका व्यक्तीच्या आयुष्यातील महत्त्वाची वर्ष कोणत्याही मेडिकल इमर्जन्सीमुळे त्याने आर्थिक ओझ्याखाली न घालवता सुखाने व्यतीत करावीत असे प्रत्येकालाच वाटत असते.
त्यामुळेच सिनिअर सिटीझन्सच्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीसाठी भरलेले प्रीमियम किंवा मेडिकल बिल्स सेक्शन 80डी अंतर्गत असलेल्या डिडक्शन्स साठी पात्र ठेवण्यात आली आहेत.
वर नमूद केलेल्या हेल्थ इन्शुरन्स वरील टॅक्स बेनिफिट्स व्यतिरिक्त खाली इतर अनेक केसेस आहेत जिथे तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेऊन टॅक्सची बचत देखील करु शकता.
अशा केसेस मध्ये, क्लेम केली जाणारी रक्कम खालील प्रमाणे असेल:
मेडिकल ट्रीटमेंट घेणाऱ्या व्यक्तीचे वय | टॅक्स डिडक्शनची रक्कम |
60 वर्षापेक्षा कमी | ₹40000/- किंवा वास्तविक खर्च, जे कमी असेल |
सिनिअर सिटीझन्स - 60वर्ष आणि त्यापेक्षा जास्त | ₹100000/- किंवा वास्तविक खर्च, जे कमी असेल |
सुपर सिनिअर सिटीझन्स - 80वर्ष आणि त्यापेक्षा जास्त | ₹100000/- किंवा वास्तविक खर्च, जे कमी असेल |
सिनिअर सिटीझन हेल्थ इन्शुरन्स प्लॅन न केवळ टॅक्स बेनिफिट्स ऑफर करते तर इतर अनेक बेनिफिट्स जसे संपूर्ण कव्हरेज देणे, डे-केअर एक्स्पेन्सेस, डोमीसीलरी ट्रीटमेंट एक्स्पेन्सेस कव्हर करणे, एड-ऑन्सची एक विस्तृत रेंज देखील देते ज्यामुळे न केवळ तुमच्या कष्टाच्या कमाईची बचत होते तर तुम्हाला सर्वोत्तम हेल्थकेअर पर्यंत पोहचविण्याचे काम देखील सहज करते.