हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटर

फायदे तपासा आणि २ मिनिटांत त्वरित प्रीमियम ऑनलाइन मिळवा

हेल्थ इन्शुरन्स कॅल्क्युलेटरबद्दल सर्व स्पष्ट केले आहे

इंडिया टुडेमध्ये नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, २०१८-१९ मध्ये भारतात सरासरी किरकोळ आरोग्य सेवा महागाई ७.१४% इतकी होती. महागाईमध्ये आधीच्या वर्षांच्या तुलनेत ४.३९% पेक्षा जास्त वाढ झाली आहे ज्यामुळे आरोग्य सेवा उत्पादनांच्या किमतीमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. (१)

या परिस्थितीत, हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी आता केवळ खबरदारी म्हणून केलेले काम न राहता सक्षम वैद्यकीय सुविधा मिळवताना मोठे आर्थिक नुकसान टाळण्यासाठीची आवश्यक गोष्ट बनली आहे.

आता, तुम्ही पॉलिसी घेत आहात असे गृहीत धरले तर त्याबद्दल तुम्हाला सगळ्यात आधी काय माहिती असणे आवश्यक आहे ?

प्रीमियम पेमेंट नक्कीच माहित असायला हवे!

तुम्ही तुमचा हेल्थ इन्शुरन्स हप्ता कसा मोजू शकता, त्यावर परिणाम करणारे घटक आणि आपण ते कसे कमी करू शकता याबद्दल तपशीलवार स्पष्टीकरण खाली दिले आहे !

हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटर म्हणजे काय?

तंत्रज्ञानाच्या आगमनानंतर बहुतेक इन्शुरन्स कंपन्यांनीही आपले कामकाज ऑनलाइन चालू केले आहे. त्यानंतर त्यांनी विविध उपयुक्त ऑनलाइन साधने सादर केली आहेत ज्यामुळे पॉलिसीधारकांसाठी सगळ्या गोष्टी लक्षणीयरित्या सोप्या होतात!

हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटर हे असेच एक साधन आहे जे आपल्याला आपली इन्शुरन्स प्रीमियम रक्कम चटकन मोजण्यास मदत करते!

प्रीमियमची रक्कम मोजणे हे एक त्रासदायक काम असू शकते, बहुतेक लोक त्यांच्या इन्शुरन्स कंपनीने सुचविलेल्या रकमेसह पुढे जातात. मात्र ऑनलाइन कॅल्क्युलेटरच्या मदतीने काही आवश्यक माहिती भरून  काही मिनिटांत प्रीमियमची रक्कम मोजली जाऊ शकते

आपण हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम ऑनलाइन का कॅल्क्युलेट करावा?

हे तुम्हाला बराच वेळ आणि संसाधने वाचविण्यास मदत करते. खरे सांगायचे तर, हे एक किचकट काम खूप सोपे करते.

इन्शुरन्स पॉलिसी कधीकधी बऱ्यापैकी गुंतागुंतीच्या आणि समजण्यास कठीण असू शकतात कारण त्या अनेक अटी आणि कलमांसह येतात. अनेकदा लोक प्रत्येक गोष्टीची विशिष्ट माहिती न घेता पुढे जातात आणि त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त पैसे देतात. प्रीमियमची रक्कम ऑनलाइन आधीच मोजणे तुम्हाला विमा योजनेसाठी तुमच्या पेमेंट दायित्वांची चांगली माहिती आहे याची खात्री करण्यास मदत करते.

शिवाय, अचूक तपशील भरून आपल्या हेल्थ इन्शुरन्स प्रीमियमची गणना करताना चुकीचा तपशील देण्याची कोणतीही शक्यता नाहीशी होते.

हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटरचे ५ फायदे

हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी प्रीमियम कॅल्क्युलेटर वापरल्याने असंख्य फायदे मिळतात. आपण आपली प्रीमियम रक्कम मोजण्यासाठी ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स कॅल्क्युलेटर वापरल्यास आपण घेऊ शकता अशा फायद्यांची यादी खालीलप्रमाणे आहे:

  • आर्थिक नियोजनाचा मार्ग सुलभ होतो -  या कॅल्क्युलेटरचा वापर करून, तुम्ही तुमची पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी तुमच्या प्रीमियम रकमेचा अचूक अंदाज घ्याल. अशा प्रकारे तुम्ही भविष्यासाठी तुमच्या आर्थिक योजना अधिक प्रभावीपणे आखू शकता.
  • प्रीमियम पेमेंट्स चुकण्याची जोखीम कमी करा - प्रीमियम रक्कम आधीच जाणून घेतल्यास भविष्यात प्रीमियम पेमेंट चुकण्याची शक्यता कमी होते. तुम्हाला परवडणारी प्रीमियम रक्कम जाणून घेतल्यानंतरच तुम्ही पॉलिसीचा लाभ घेता.
  • तुमच्या गरजेनुसार इन्शुरन्स प्लॅनचा लाभ घ्या – हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटरसह, आपण परवडणाऱ्या प्लॅनवर पोहोचेपर्यंत त्याअंतर्गत विविध मापदंडांमध्ये बदल करू शकता आणि तुमच्या कव्हरेज आवश्यकतांना सहजतेने अनुकूल करण्यास मदत करू शकता.
  • ॲड-ऑन निवडणे सोपे करते - वैद्यकीय इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटर हेल्थ इन्शुरन्स  पॉलिसीसाठी सर्व ॲड-ऑन कव्हर प्रदर्शित करते जे आपल्याला आपल्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यास मदत करू शकते. अशा प्रकारे आपण आपल्या हेल्थ इन्शुरन्स  पॉलिसीसह ॲड-ऑन कव्हरचा लाभ घेतल्यास आपण देय प्रीमियमची गणना करू शकता.
  • तुम्हाला सर्वोत्तम हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी निवडण्यास मदत करते - प्रीमियम कॅल्क्युलेटर वेगवेगळ्या इन्शुरन्स कंपन्यांच्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीजविषयी माहिती देतो आणि त्यांच्यात तुलना करण्यासाठी आपल्याला मदत करतो. यामुळे योग्य इन्शुरन्स पॉलिसी मिळविण्याची प्रक्रिया अधिक सोपी होते.

हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटरचा वापर कसा करावा?

ऑनलाइन इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटर वापरून आपला  देय प्रीमियम मोजणे खूप सोपे आहे!

आपल्याला फक्त काही स्टेप्सचे अनुसरण करणे, आपले तपशील योग्य प्रकारे भरणे आणि सगळेच आपसूक होईल! आपल्याकडे हेल्थ इन्शुरन्स संरक्षणासाठी देय प्रीमियम असेल.

उदाहरणार्थ, जर आपण डिजिट इन्शुरन्समधून हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी शोधत असाल, तर आपण आपल्या प्रीमियम पेमेंट लायबिलिटीची सहज गणना करू शकता.

हे बघा!

होय, हे इतके सोपे आहे

कोणतीही किंमत नाही, त्रास नाही - फक्त काही मिनिटे आपल्या वेळेची आणि आपल्याला हेल्थ इन्शुरन्स प्लान खरेदी करण्यासाठी आपल्याला किती रक्कम द्यावी लागेल हे कळेल!

तुमच्या हेल्थ इन्शुरन्स प्रीमियमवर परिणाम करणारे घटक काय आहेत?

आता कॅल्क्युलेटरचा वापर करून हेल्थ इन्शुरन्स प्रीमियमची रक्कम कशी मोजायची याबद्दल तुम्ही शिकला आहात, तुमच्या पेमेंट लायबिलिटीवर परिणाम करणाऱ्या घटकांवर एक नजर टाका -

१. मार्केटिंग आणि प्रशासनासाठी होणारा खर्च

इन्शुरन्स कंपन्यांना त्यांच्या उत्पादनांचे व्यवस्थापन आणि मार्केटिंगसाठी मोठा खर्च करावा लागतो. हे खर्च पॉलिसी धारकांवर लादले जातात आणि त्याचा परिणाम त्यांच्या प्रीमियम पेमेंटवर होतो.

२. तुम्ही ज्या प्रकारचा प्लॅन निवडता

आपल्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीसाठी आपले प्रीमियम पेमेंट आपण कोणत्या प्रकारच्या प्लॅनचा लाभ घेण्यासाठी निवडत आहात यावर बऱ्याच प्रमाणात अवलंबून आहे.

उदाहरणार्थ, इन्डिव्ह्युजअल(वैयक्तिक) हेल्थ इन्शुरन्स प्लॅन हे फॅमिली फ्लोटर प्लॅनपेक्षा जास्त महाग आहेत आणि आपल्याला पूर्वीच्या प्लॅन्ससह प्रीमियम पेमेंट जास्त असेल.

अधिक जाणून घ्या:

३. को-पेमेंट कलमे आणि डीडक्टिबल्स

काही हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी अनिवार्य किंवा ऐच्छिक को-पेमेंट कलमे आणि डीडक्टिबल्स कलमांसह येतात. डीडक्टिबल्ससह, पॉलिसीधारकाला त्यांची इन्शुरन्स पॉलिसी सुरू होण्यापूर्वी उपचार खर्चाचा काही भाग सहन करावा लागेल.

को-पेमेंट कलमासह, आपल्याला एकूण उपचार खर्चाच्या काही टक्के भाग कव्हर करावा लागेल तर उर्वरित इन्शुरन्स प्रदात्याद्वारे कव्हर केले जाईल. परंतु को-पेमेंट आणि डीडक्टिबल्ससह, विमा पॉलिसीसाठी प्रीमियम देयक बऱ्याच प्रमाणात कमी केले जाते. अशा प्रकारे, हे काही घटक आहेत जे आपल्या पॉलिसी प्रीमियमवर परिणाम करतात.

कोपे, कोइन्शुरन्स आणि डिडक्टिबलमधील फरकाबद्दल अधिक जाणून घ्या

४. ॲड-ऑन कव्हर्स

प्रीमियमची रक्कम मोजताना आपल्याला हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटरमध्ये प्रदान करावा लागणारा एक मापदंड म्हणजे ॲड-ऑन कव्हर्स.

याचे कारण असे आहे की, जेव्हा आपण हेल्थ इन्शुरन्स प्लॅनमधून विद्यमान फायद्यांवर ॲड-ऑन कव्हर निवडता, तेव्हा पॉलिसीसाठी तुमचे प्रीमियम पेमेंट आपोआप वाढते.

५. गुंतवणूक आणि बचत

बहुतेक इन्शुरन्स कंपन्या सार्वजनिक क्षेत्रातील विविध कंपन्यांमध्ये आपली भांडवली गुंतवणूक करतात. ही गुंतवणूक आयआरडीएने नंतर काही अनुपालन समस्या नाहीत याची खात्री करण्यासाठी मांडलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करते.

इन्शुरन्स पॉलिसीसाठी आपल्याला भरावा लागणारा प्रीमियम, काही प्रमाणात, बाजार भांडवलातून विमा प्रदात्यांनी मिळवलेल्या नफ्यावर अवलंबून आहे.

६. ब्रोकरद्वारे इन्शुरन्स खरेदी करणे

जरी यामुळे तुमचे प्रीमियम पेमेंट वाढत नसले, तरी यामुळे पॉलिसीसाठी तुम्ही देय असलेली एकूण रक्कम वाढते. याचे कारण म्हणजे दलालाने दिलेल्या सेवेसाठी आकारलेल्या शुल्काची रक्कम द्यावी लागते.

७. पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या रोगांच्या कव्हरेजसाठी

जर आपण आधीपासून अस्तित्वात असलेल्या आजारांना कव्हर करण्यासाठी आरोग्य विमा पॉलिसी चा लाभ घेत असाल, तर आपल्याला सामान्यत: प्रतीक्षा कालावधी प्रदान केला जाईल, ज्यानंतर आपण पॉलिसीचे फायदे घेऊ शकता.

मात्र या प्रतीक्षा कालावधीच्या मुद्दा बाजूला ठेवण्या साठी एक मार्ग आहे – तो म्हणजे अतिरिक्त प्रीमियम रक्कम देणे. अशा प्रकारे, आपण आधीपासून अस्तित्वात असलेल्या रोग कव्हरचा लाभ घेत आहात की नाही यावर देखील आपले प्रीमियम पेमेंट अवलंबून असेल.

८. मृत्यूदर

प्रीमियम पेमेंट मृत्यूदरावर अवलंबून असते कारण कोणत्याही ग्राहकाला कोणतीही वाईट परिस्थिती उद्भवली तर विमा कंपनीला ही किंमत सहन करावी लागते.

परिणामी, प्रीमियम देयक वेगवेगळ्या वयोगटांसाठी भिन्न आहे, सामान्यत: ज्येष्ठ आणि सुपर ज्येष्ठ नागरिकांसाठी ते जास्त असते.

९. वैद्यकीय अंडररायटिंग

प्रत्येक इन्शुरन्स कंपनी वैयक्तिक पॉलिसी, ग्रुप इन्शुरन्स पॉलिसी, फॅमिली फ्लोटर पॉलिसी इत्यादी अनेक प्रकारची उत्पादने ऑफर करते.

या पॉलिसींसाठी अंडररायटिंग अशा प्रकारे केले जातात की या प्रत्येक पॉलिसीमधील जोखीम संतुलित केली जाते आणि इन्शुरन्स प्रदात्याच्या दायित्वांचे व्यवस्थापन केले जाते.

अशा प्रकारे, इन्शुरन्स पॉलिसींचा प्रीमियम देखील त्यांच्या वैद्यकीय माहितीच्या आधारे पॉलिसीधारक म्हणून व्यक्ती किती जोखमीची आहे यावर अवलंबून असते.

१०. बेस रेटिंग

हा असा घटक आहे जिथे इन्शुरन्स प्रदाते एक आधार दर निश्चित करतात जे लिंग, वय, कौटुंबिक आकार, भौगोलिक प्रदेश, त्यांचा व्यवसाय इत्यादी समान वैशिष्ट्ये असलेल्या विशिष्ट व्यक्तींना आकारले जातात.

उदाहरणार्थ, ४० ते ५० वयोगटातील व्यक्तींना २५-३५ वयोगटातील व्यक्तींपेक्षा जास्त प्रीमियम भरावा लागतो अशा प्रकारे बेस रेट निश्चित केला जातो.

हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम कसा कमी करावा?

ठीक आहे, असे काही सोपे मार्ग आहेत ज्याद्वारे आपण हे करू शकता! उदाहरणार्थ:

१. लहान वयात पपॉलिसीचा लाभ घ्या

हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीसाठी आपल्या प्रीमियम पेमेंटवर बचत करण्याचा सर्वात प्रख्यात मार्ग म्हणजे लहान वयात कव्हर निवडणे.

बहुतेक इन्शुरन्स कंपन्यांसाठी, विमा हप्ता वाढतो कारण एखादी व्यक्ती वयाने मोठी होते तेव्हा ते आजारांना जास्त बळी पडतात. म्हणूनच आपण तरुण आणि निरोगी असताना विम्याचा लाभ घेणे चांगले आहे.

तसेच, जर आपण आपल्या पालकांसाठी पॉलिसी खरेदी करत असाल, तर ते ६० वर्षे पूर्ण होण्यापूर्वी आपण तसे कराल याची खात्री करा, कारण वरिष्ठ नागरिकांसाठी हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम पेमेंट जास्त आहे.

२. डीडक्टिबल्स/को-पेमेंट निवडा

डीडक्टिबल्स आणि को-पेमेंट निवडणे आपल्याला आपल्या विमा पॉलिसीवरील प्रीमियम कमी करण्यास मदत करते. डीडक्टिबल्स आणि को-पेमेंट कलमांमध्ये आपल्याला आपल्या उपचार खर्चाचा काही भाग कव्हर करणे आवश्यक आहे, परंतु त्यानंतर ते आपल्या इन्शुरन्स पॉलिसीसाठी भरलेला प्रीमियम कमी केला जाईल याची खात्री करतात.

३. टॉप-अप प्लॅन्स निवडा

उच्च कव्हरेज रक्कम निवडणे म्हणजे जास्त प्रीमियम पेमेंट असल्याने, आपण कमी कव्हरेजसह पॉलिसी शोधू शकता.

शिवाय, उपचार घेण्यासाठी आपली आर्थिक देणी कमी राहतील याची खात्री करण्यासाठी, आपण आपल्या इन्शुरन्स प्लानवर टॉप-अप घेऊ शकता, जे बेस-सम इन्शुअर्ड संपल्यावर लागू होईल.

४. ॲड-ऑन कव्हर्स निवडताना सावध रहा

आपण आपल्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीसाठी जास्त पैसे देत नाही याची खात्री करण्यासाठी, आपली ॲड-ऑन कव्हर निवडताना सावध रहा.

आपल्याला आवश्यक नसलेल्या वस्तू निवडल्यास आपल्याला आवश्यकतेपेक्षा आपल्या इन्शुरन्स कव्हरसाठी जास्त खर्च येईल.

५. आपल्या इन्शुरन्स प्रोव्हायडरकडून थेट खरेदी करा

ब्रोकरद्वारे आपल्या इन्शुरन्स पॉलिसी घेतल्याने आपली इन्शुरन्स पॉलिसी अधिक महाग होईल. याचे कारण म्हणजे आपण त्यांच्या सेवेसाठी शुल्क भरण्यास जबाबदार असाल. हे टाळण्यासाठी आपण इन्शुरन्स पॉलिसी थेट आपल्या इन्शुरन्स प्रोव्हायडर कडून खरेदी करू शकता.

६. आपल्या झोननुसार प्लॅन निवडा

समजा आपण झोन सी शहरात राहत असाल, जिथे उपचारांचा खर्च झोन ए किंवा झोन बी शहरांपेक्षा खूपच कमी आहे. झोन सी शहरातील उपचार खर्च भागविण्यासाठी आपण आपल्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीसाठी जो प्रीमियम भरता तो इतर दोघांपेक्षा कमी असावा.

डिजिटवर आमच्याकडे दोन झोन आहेत: झोन ए (ग्रेटर हैदराबाद, दिल्ली एन.सी.आर, ग्रेटर मुंबई) आणि झोन बी (उर्वरित भारत). जर आपण झोन बी मध्ये आधारित असाल तर आपल्याला प्रीमियमवर अतिरिक्त सूट मिळते. इतकंच नाही तर आमच्याकडे झोन-आधारित को-पेमेंट नाही.

म्हणूनच, आपण आपल्या शहरात उपचार घेण्याचा विचार करीत असल्यास, आपल्या प्रीमियम पेमेंटची बचत करण्यासाठी आपण त्यानुसार प्लॅन निवडला आहे याची खात्री करा.

७. नो क्लेम बोनस पॉलिसी तपासा

पॉलिसी वर्षात क्लेम नाही? आपल्याला बोनस मिळतो- निरोगी राहण्यासाठी आणि क्लेम मुक्त राहण्यासाठी आपल्या एकूण सम इन्शुअर्ड मध्ये एक अतिरिक्त रक्कम!

हा बोनस, ज्याला क्युम्युलेटीव्ह बोनस म्हणून देखील ओळखले जाते, प्रत्येक क्लेम मुक्त वर्षासाठी बेस इन्शुरन्स रकमेच्या काही टक्के असतो.

डिजिटसह, आपल्या प्लॅनप्रमाणे, ते 10% किंवा 50% पर्यंत आहे, जास्तीत जास्त 100% पर्यंत.

त्यामुळे आपला एकूण सम इन्शुअर्ड वाढते. तथापी, आपण आपली इन्शुरन्स पॉलिसी संपल्यानंतर रीन्यू करण्यात अयशस्वी झाल्यास हा बोनस रद्द होतो.

८. फॅमिली फ्लोटर प्लॅन्स घ्या

वैयक्तिक योजनांऐवजी फॅमिली फ्लोटर योजना निवडणे, जिथे दोन किंवा अधिक लोक एका योजनेअंतर्गत समाविष्ट आहेत, आपल्याला त्याची किंमत कमी करण्यास मदत करते.

हेल्थ इन्शुरन्स टॅक्स बेनिफिट्स

आपण आयकर कायदा, १९६१ च्या कलम ८०डी अंतर्गत तरतुदींद्वारे आपल्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीवर कर बेनिफिट्स घेऊ शकता.

आपल्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीवर आपण घेऊ शकता अशा कर लाभांचे उदाहरण देणारे एक टेबल खालीलप्रमाणे आहे:

पात्रता सूट मर्यादा
सेल्फ आणि कुटुंबासाठी (जोडीदार, अवलंबून मुले) ₹ २५,००० पर्यंत
सेल्फ, कुटुंब + पालक (वयाच्या ६० वर्षांपेक्षा कमी) (₹ २५,००० + ₹२५,०००) = ₹ ५०,००० पर्यंत
सेल्फ आणि कुटुंबासाठी (जिथे सर्वात मोठा सदस्य ६० वर्षांपेक्षा कमी वयाचा आहे) + पालक (६० वर्षांपेक्षा जास्त) (₹२५,०००+₹५०,०००) = ₹७५,००० पर्यंत
सेल्फ आणि कुटुंबासाठी (सर्वात मोठा सदस्य ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचा आहे) + पालक (६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे) (₹ ५०,००० + ₹५०,०००) = ₹१,००,००० पर्यंत

अशा प्रकारे, जर आपण अजूनही हेल्थ पॉलिसी खरेदी करण्यावर विचार विनिमय करीत असाल, तर त्वरा करा! आजच खरेदी करा!

परंतु कव्हरसाठी अर्ज करण्यापूर्वी मेडिक्लेम इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटर वापरून आपली प्रीमियम रक्कम कॅल्क्युलेट करण्यास विसरू नका!

अधिक जाणून घ्या:

भारतात आयकर कसा वाचवायचा

भारतातील आयकर स्लॅब

हेल्थ इन्शुरन्स टॅक्स बेनिफिट्स

ज्येष्ठ नागरिकांसाठी टॅक्स बेनिफिट्स

हेल्थ इन्शुरन्स कॅल्क्युलेटरबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न

डीडक्टिबल्स म्हणजे काय?

डीडक्टिबल्स हा उपचार खर्चाचा एक भाग आहे जो पॉलिसी धारकाला स्वत: भरावा लागतो ज्यानंतर त्यांचे इन्शुरन्स कव्हरेज सुरू होते.

हेल्थ इन्शुरन्स प्रीमियमवर आपल्याला जी.एस.टी. भरावा लागेल का?

होय, हेल्थ इन्शुरन्सवर देय प्रीमियमवर १८% जी.एस.टी. आकारला जातो.

हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीचा प्रीमियम इन्शुरन्स प्रोव्हायडरनुसार बदलतो का?

होय, प्रीमियमची रक्कम इन्शुरन्स कंपनीप्रमाणे बदलते.