हेल्थकेअर ही एक अशी अमूल्य ठेव आहे जी आपल्या आरोग्याचे रक्षण करते आणि आपल्याला मेडिकल इमर्जन्सीच्या काळात आर्थिक सुरक्षा प्रदान करते. आपल्या जवळच्या माणसांचे आरोग्य सर्वतोपरी असते, त्यामुळे एक भक्कम हेल्थ इन्शुरन्स प्लॅन असण्याचे महत्त्व ही अतिशयोक्ती ठरणार नाही.
यासंबंधी, फॅमिली फ्लोटर हेल्थ इन्शुरन्स कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि कॉस्ट इफेक्टिव्ह उपाय म्हणून आपली भूमिका बजावतो, ज्यामध्ये तुम्हाला एकाच पॉलिसी अंतर्गत कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी एकत्रित कव्हरेज मिळते.
फॅमिली फ्लोटर हेल्थ इन्शुरन्स एक अशा प्रकारचा हेल्थ इन्शुरन्स प्लॅन आहे जो एकाच पॉलिसी अंतर्गत कुटुंबातील सर्व सदस्यांना कव्हर देतो. कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी इंडीव्हिजुअल फॅमिली हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीज खरेदी करण्याऐवजी फॅमिली फ्लोटर पॉलिसी मध्ये एकूण इन्शुअर्ड रक्कम मिळते, जी गरज पडल्यावर कोणत्याही सदस्याद्वारे वापरली जाऊ शकते.
हा प्लॅन, एकाच प्रीमियम अंतर्गत, तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचे रक्षण करण्याचा खूपच प्रभावी आणि कॉस्ट इफेक्टिव्ह मार्ग आहे.
सोप्या भाषेतील हे व्हिडीओ एक्स्प्लेनेशन पहा:
फॅमिली फ्लोटर हेल्थ इन्शुरन्स कसे काम करते हे समजून घेण्यासाठी, खाली दिलेले एका कुटुंबाचे उदाहरण बघूया:
त्यांच्या फॅमिली फ्लोटर पॉलिसीची किंमत 10 लाख रुपये आहे.
एकदा, आर्यन आजारी पडतो आणि त्यासाठी त्याला हॉस्पिटलायझेशनची आवश्यकता असते. त्याच्या संपूर्ण उपचारासाठी 2 लाख रुपये इतका खर्च आला.
फॅमिलीचे 10 लाख रुपयांचे कव्हरेज आहे. जसे की आर्यनचा मेडिकल खर्च 2 लाख रुपये आहे, इन्शुरर हा खर्च विभागलेल्या इन्शुअर्ड रकमेतून कव्हर करतो. कुटुंबातील इतर सदस्य म्हणजेच श्री. आदित्य, सौ. रुची, रिया आणि खुद्द आर्यन देखील तशी मेडिकल गरज पडल्यास आर्यनच्या उपचारांनंतर उरलेली 8 लाखाची इन्शुअर्ड रक्कम स्वतःसाठी वापरू शकतात.
हा कव्हरेज अगदी फ्लेक्जीबल आहे आणि कोणा एकासाठी मर्यादित नाही.
कव्हरेजेस
डबल वॉलेट प्लॅन
इन्फिनिटी वॉलेट प्लॅन
वर्ल्डवाईड ट्रीटमेंट प्लॅन
महत्त्वाचे फीचर्स
आजारपण, अपघात, गंभीर आजार किंवा अगदी कोविड 19 सारख्या महामारी मुळे उद्भवलेल्या हॉस्पिटलायझेशनचा सर्व खर्च हा प्लॅन कव्हर करतो. जोपर्यंत हॉस्पिटलायझेशनचा खर्च तुमच्या इन्शुअर्ड रकमेपेक्षा जास्त होत नाही, हा प्लॅन वेगवेगळ्या हॉस्पिटलायझेशनचा खर्च कव्हर करू शकतो.
कोणत्याही अपघाताशिवाय आलेल्या आजारपणातील उपचारासाठी कव्हर मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या पॉलिसीच्या पहिल्या दिवसापासून काही ठराविक काळासाठी वाट पहावी लागते. यालाच इनिशिअल वेटिंग पिरिअड असे म्हणतात.
होम हेल्थकेअर, टेली कन्सल्टेशन्स, योग आणि माइंडफुलनेस आणि इतर अनेक निवडक असे वेलनेस बेनिफिट्स तुमच्या एपवर उपलब्ध आहेत.
आम्ही तुमच्या इन्शुअर्ड रकमेच्या 100% इन्शुअर्ड बॅकअप देतो. हा इन्शुअर्ड रकमेचा बॅकअप काम कसे करतो? समजा तुमची इन्शुअर्ड रक्कम 5 लाख रुपये आहे. आणि तुम्ही 50,000 रुपयांचा क्लेम केलात. डिजीट अपोआप वॉलेट बेनिफिट लागू करतो. आता तुमच्याकडे त्या वर्षासाठी 4.5 लाख आणि शिवाय 5 लाखाची बॅकअप इन्शुअर्ड रक्कम आहे. असे असले तरी, एक क्लेम हा मूळ इन्शुअर्ड रकमेपेक्षा, म्हणजेच 5 लाखांपेक्षा जास्त असू शकत नाही.
एका पॉलिसी कालावधीत कोणताही क्लेम नाही? तुम्हाला मिळतो आहे बोनस - निरोगी आणि क्लेम-फ्री राहिल्याबद्दल तुमच्या एकूण इन्शुअर्ड रकमेमध्ये एक अतिरिक्त बोनसची भर पडणार!
वेगवेगळ्या रूम्सचे रेंटही वेगळे असते. जसे हॉटेल रूम्सचे टॅरिफ्स असतात अगदी तसेच. इन्शुअर्ड रकमेपेक्षा जोपर्यंत रूम रेंट असेल तोपर्यंत डिजीट प्लॅन्स तुम्हाला नो रूम रेंट कॅपिंगचे बेनिफिट देतो.
24 तासांपेक्षा जास्त हॉस्पिटलायझेशनसाठीचेच मेडिकल खर्च हेल्थ इन्शुरन्स कव्हर करतो. डे केअर प्रक्रिया म्हणजे टेक्नोलॉजीच्या मदतीने 24 तासांपेक्षा कमी वेळ लागणारे हॉस्पिटल मध्ये घेतलेले उपचार, जसे कॅट्रॅक्ट, डायलिसीस ई.
वर्ल्डवाईड कव्हरेज सोबत मिळवा वर्ल्डक्लास ट्रीटमेंट! जर डॉक्टरांना भारतामध्ये तुमची आरोग्य तपासणी करताना कोणत्या आजाराचे निदान झाले आणि तुम्हाला उपचार दुसऱ्या देशात घ्यायचे असतील तर आम्ही तुमच्या सेवेसाठी तिथे ही आहोत. तुम्ही सुरक्षित आहात!
तुमच्या प्लॅननुसार आम्ही तुमचे हेल्थ चेकअपचे खर्च भरतो. टेस्टच्या प्रकारांवर कोणतीही मर्यादा नाही. ईसीजी असो किंवा थायरॉइड प्रोफाईल असो. क्लेम मर्यादा बघण्यासाठी तुमचे पॉलिसी शेड्युल एकदा तपासून घ्या.
जीवाला धोका निर्माण करणारी आपत्कालीन परिस्थिती उद्भवू शकते, ज्यावेळी तुम्हाला तत्काळ हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याची गरज असू शकते. आम्ही हे समजू शकतो आणि आम्ही अशा वेळेस हॉस्पिटल मध्ये पोहचण्यासाठी वापरण्यात आलेल्या एरोप्लेन किंवा हेलिकॉप्टर सेवेचा खर्च देखील रीएम्बर्स करतो.
मान्य झालेल्या क्लेम अमाउंटचे ठराविक टक्के पॉलिसीहोल्डर भरेल अशी अट केलेल्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी को-पेमेंट नावाची एक कॉस्ट शेअरिंग रिक्वायरमेंट असते. यामुळे इन्शुअर्ड रक्कम कमी होत नाही. ही टक्केवारी वय, किंवा कधी-कधी तुम्ही कोणत्या शहरात उपचार घेत आहात म्हणजेच झोन यावर आधारित कोपेमेंट यासारख्या अनेक घटकांवर अवलंबून असते. आमच्या प्लॅन्स मध्ये वय किंवा झोन वर आधारित कोपेमेंट समाविष्ट नाही.
जर तुम्हाला हॉस्पिटल मध्ये एडमिट करावे लागले तर रोड एम्ब्युलन्सचा खर्च तुम्ही तो परत मिळवू शकता.
यामध्ये तपासणी, टेस्ट्स आणि रिकव्हरी यासारख्या हॉस्पिटलायझेशनच्या आधीचे आणि नंतरचे खर्च कव्हर केले जातात.
इतर फीचर्स
अशी काही स्थिती किंवा आजार जो तुम्हाला पूर्वी पासून आहे आणि जो तुम्ही आम्हाला पॉलिसी घेताना सांगितला होता आणि आम्ही ते मान्य देखील केले होते, अशा आजारांसाठी तुम्ही निवडलेल्या प्लॅननुसार वेटिंग पिरिअड असतो आणि जो तुमच्या पॉलिसी शेड्युल मध्ये लिहिलेला असतो.
तुम्ही कोणत्याही विशिष्ठ आजारासाठी क्लेम केल्यावर तुम्हाला थांबवा लागणारा हा कालावधी असतो. डिजीट मध्ये हा कालावधी 2 वर्षांचा आहे आणि तुमची पॉलिसी सुरु झालेल्या दिवसापासून सुरु होतो. यामधून वगळलेले अपवादांची सूची बघण्यासाठी तुमच्या पॉलिसी कागदपत्रांमधील स्टॅडर्ड एकस्क्लूजन्स (एक्सक्ल02) हा विभाग वाचा.
पॉलिसी कालावधी दरम्यान जर तुम्हाला अपघातामुळे काही शारीरिक इजा झाली आणि अपघाताच्या 12 महिन्यांच्या आत जर याच एकमेव कारणामुळे तुमचा मृत्यू झाला तर या कव्हर अंतर्गत निवडलेल्या प्लॅननुसार पॉलिसी शेड्युल मध्ये लिहिल्या प्रमाणे आम्ही संपूर्ण 100% इन्शुअर्ड रक्कम तुम्हाला परत देऊ.
तुम्हाला ऑर्गन डोनेट करणारी व्यक्ती तुमच्या पॉलिसीमध्ये कव्हर होतो. आम्ही त्या डोनरचे हॉस्पिटलायझेशनच्या आधीचा आणि नंतरचा सर्व खर्च देखील भरून देतो. ऑर्गन डोनेशन हे सर्वात उदार कृत्य आहे आणि आम्ही विचार केला की आपणही यामध्ये खारीचा वाटा द्यावा!
हॉस्पिटल मध्ये जागा रिकामी नाही असे असू शकते, किंवा रुग्णाची परिस्थिती अशी नाही की त्याला कोणत्याही हॉस्पिटलमध्ये एडमिट करता येऊ शकत नाही. काळजी करू नका! आम्ही तुमचे घरी उपचार घेतल्याचे मेडिकल खर्च देखील कव्हर करतो.
लठ्ठपणा अनेक आरोग्याच्या समस्यांचे करण असू शकते. आम्ही हे समजू शकतो, आणि मेडिकल आवश्यकता असल्यास आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जर तुम्हाला बॅरिएट्रिक सर्जरी करावी लागणार असेल तर आम्ही त्याचा खर्च देखील कव्हर करतो. असे असले तरी, बॅरिएट्रिक सर्जरीच्या हॉस्पिटलायझेशनची काही कॉस्मेटिक कारणे असतील तर आम्ही हा खर्च मात्र कव्हर करत नाही.
या कव्हर अंतर्गत, जर कोणत्याही मानसिक धक्क्यामुळे तुम्हाला मानसिक उपचारांसाठी हॉस्पिटल मध्ये एडमिट करावे लागले तर 1,00,000 रुपयापर्यंतचा याचा खर्च आम्ही कव्हर करू. असे असले तरी, ओपीडी कन्सल्टेशन यामध्ये कव्हर केले जात नाहीत. या मानसिक आजारांसाठीचा वेटिंग पिरिअड विशिष्ठ आजारांसाठीच्या वेटिंग पिरिअड इतकाच असतो.
हॉस्पिटलायझेशन आधी, दरम्यान आणि नंतर, चालण्यासाठी आधार घेण्याचे साधन, क्रेप बॅन्डेज, बेल्ट्स अशा इतर अनेक मेडिकल गरजा आणि खर्च असतात जे तुम्हाला तुमच्या खिशातून करावे लागतात. पॉलिसी मधून वगळलेले हे खर्च आम्ही भरून देतो.
मेडिकल खर्च वाढत चालले आहेत. एक फॅमिली हेल्थ इन्शुरन्स तुम्हाला एकाच प्लॅन अंतर्गत, कुटुंबातील इन्शुअर्ड सदस्यांचे मेडिकल बिल्स भरण्यामध्ये मदत करून तुमच्या केलेल्या बचतीला सुरक्षित ठेवतो.
इंडीव्हिजुअल हेल्थ इन्शुरन्स मध्ये प्रत्येक सदस्यासाठी वेगळे इन्शुरन्स घेण्यापेक्षा फॅमिली फ्लोटर हेल्थ इन्शुरन्स खरेदी करणे कधीही कॉस्ट इफेक्टिव्ह आहे. कारण यामध्ये एकाच प्रीमियम अंतर्गत सर्व कुटुंबीय कव्हर केले जातात. खरं तर आम्ही ही असेच सुचवतो की तुमच्या प्लॅन मध्ये लवकरात लवकर तुमच्या मुलांना देखील समाविष्ट करून घ्या जेणेकरून प्रीमियम कमी होईल आणि वेटिंग पिरिअड पण लवकर संपेल.
सर्व सदस्यांसाठी एकच पॉलिसी सांभाळणे कधी ही सोयीचे असते आणि पेपरवर्क आणि अनेक पॉलिसी सांभाळताना पार पाडाव्या लागणाऱ्या औपचारिकता देखील कमी होतात. विभागलेले कव्हरेज पॉलिसी अंतर्गत असेलेल्या सदस्यांना उपलब्ध कव्हरेज गरजेप्रमाणे वापरता येते. यामुळे इन्शुअर्ड रकमेचा अनुकूल किंवा योग्य उपयोग होतो.
लाइफस्टाइल संबंधी आजारांची समस्या देखील वाढत चालली आहे. भारतामध्ये 61% गंभीर आजार आणि मृत्यू, लाईफस्टाईलमुळे उद्भवलेल्या आजारांमुळेच होतात. एक फॅमिली हेल्थ इन्शुरन्स तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला अशा प्रकारच्या आजारांपासून अगदी तपासणी ते उपचार होईपर्यंत सुरक्षित ठेवण्याची हमी देतो.
कोणत्याही मेडिकल इमर्जन्सी पासून तुमच्या कुटुंबाला संपूर्ण आर्थिक सुरक्षा मिळाल्यामुळे तुम्हाला देखील समाधान आणि मानसिक शांतता लाभते.
इन्कमटॅक्स एक्टच्या सेक्शन 80डी अंतर्गत, हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीज साठी भरलेले प्रीमियम्स डीडक्टेबल्स साठी पात्र असतात. तुम्ही तुमच्या जोडीदार, मुलं, आणि आईवडिलांसाठी भरलेल्या हेल्थ इन्शुरन्स प्रीमियमसाठी एका ठराविक मर्यादेपर्यंत डीडक्शन क्लेम करू शकता.
को-पेमेंट |
नाही |
रूम रेंट कॅप |
नाही |
कॅशलेस हॉस्पिटल्स |
भारतभर 16400+ नेटवर्क हॉस्पिटल्स |
वेलनेस बेनिफिट्स |
10+ वेलनेस पार्टनर्स कडून उपलब्ध |
शहराप्रमाणे डिस्काउन्ट्स |
10% पर्यंत डिस्काउन्ट्स |
वर्ल्डवाईड कव्हरेज |
होय* |
चांगल्या आरोग्याबद्दल डिस्काउंट |
5% पर्यंत डिस्काउंट |
क्न्झ्युमेबल कव्हर |
एड-ऑन म्हणून उपलब्ध |
तुलनेचे मुद्दे |
इंडीव्हिजुअल फॅमिली हेल्थ इन्शुरन्स फॅमिली |
फ्लोटर हेल्थ इन्शुरन्स |
व्याख्या |
इंडीव्हिजुअल फॅमिली हेल्थ इन्शुरन्स एक असा प्लॅन आहे ज्यामध्ये प्रत्येक प्लॅन हेल्थ मध्ये एकच व्यक्ती कव्हर होऊ शकते. याचा अर्थ, इन्शुअर्ड रक्कम आणि इन्शुरन्स कुटुंबातील सदस्य एकच प्लॅन प्रीमियम दोन्ही एकाच व्यक्तीसाठी असतात आणि विभागले जाऊ शकत नाही. |
फॅमिली फ्लोटर हेल्थ इन्शुरन्स इन्शुरन्सचा असा प्लॅन आहे ज्यामध्ये तुम्ही आणि तुमच्या कुटुंबातील सदस्य एकाच प्लॅन खाली कव्हर केले जाता. याचा अर्थ तुमचे हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम आणि इन्शुअर्ड रक्कम मधील सर्व सदस्यांमध्ये विभागले जाईल. |
कव्हरेज |
ही योजना या योजनेत विमा उतरवलेल्या एकट्या व्यक्तीलाच कव्हरेज देते. उदाहरणार्थ; तुम्ही 10 लाख रुपयांची एसआय योजना घेतली असल्यास, संपूर्ण पॉलिसी कालावधीसाठी तुम्हाला 10 लाखांपर्यंत लाभ मिळतील. |
ही योजना योजनेत विमा उतरवलेल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना कव्हरेज देते. उदाहरणार्थ; जर तुमचा प्लॅन SI 10 लाख रुपये असेल, तर संपूर्ण कुटुंबाला पॉलिसी कालावधीसाठी ही रक्कम सामायिक करावी लागेल. |
लाभ |
वैयक्तिक आरोग्य विमा योजनेचा सर्वात मोठा फायदा हा आहे की कव्हरेज खूप विस्तृत आहे कारण प्रत्येक व्यक्तीची स्वतःची विमा रक्कम असते, फॅमिली फ्लोटरच्या विपरीत जिथे विमा रक्कम योजनेतील सर्व विमाधारकांमध्ये सामायिक केली जाते. हे विशेषतः ज्येष्ठ पालकांसाठी चांगले कार्य करते. |
फॅमिली फ्लोटर प्लॅनचा सर्वात मोठा फायदा हा आहे की आरोग्य विमा प्रीमियम किफायतशीर आहे, कारण प्रीमियम हा कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी एक वेळचा प्रीमियम असतो. |
तोटे |
वैयक्तिक आरोग्य विम्याचा एकच तोटा असा आहे की एका पॉलिसी वर्षात त्यांच्यासाठी कव्हर करण्यासाठी पुरेसे असेल. याव्यतिरिक्त, त्यांनी वर्षभरात दावा केला नसला तरीही, त्यांना नो क्लेम बोनसचा फायदा होऊ शकतो 😊 |
फॅमिली फ्लोटर प्लॅनचा एक मुख्य तोटा असा आहे की, विम्याची रक्कम कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी पुरेशी असू शकत नाही. |
उदाहरण |
एक 30 काहीतरी काम करणारी महिला स्वतःसाठी आणि तिच्या ज्येष्ठ वडिलांसाठी वैयक्तिक आरोग्य विमा योजना घेणे निवडते. ती प्रत्येकी SI 5 लाखांपर्यंतची वैयक्तिक योजना घेते. याचा अर्थ, तिच्या आणि तिच्या वडिलांकडे वर्षभरातील आरोग्यविषयक गरजा भागवण्यासाठी प्रत्येकी ५ लाख असतील. |
दोन मुले असलेले जोडपे फॅमिली फ्लोटर हेल्थ इन्शुरन्स प्लॅनसाठी जाण्याचे निवडतात; या अंतर्गत चारही सदस्यांना एकूण विम्याची रक्कम आपापसात वाटून घ्यावी लागेल. उदाहरणार्थ; जर त्यांनी SI 5 लाखांची योजना घेतली असेल, तर ते वर्षभरातील त्यांच्या सर्व आरोग्य दाव्यांसाठी फक्त 5 लाखांपर्यंतच वापरू शकतात. |
उपयोगिता |
मोठ्या कुटुंबांसाठी वैयक्तिक आरोग्य विम्याची अत्यंत शिफारस केली जाते, किंवा कुटुंब फ्लोटर म्हणून ज्येष्ठ पालक असलेल्यांसाठी पुरेसे नाही. |
कौटुंबिक फ्लोटर आरोग्य विमा तरुण जोडप्यासाठी किंवा लहान आणि विभक्त कुटुंबांसाठी चांगले काम करेल. |
टिप्स आणि रेकमेंडेशन्स |
तुम्ही वैयक्तिक आरोग्य विमा योजनेसाठी जात असल्यास, तुम्ही प्रत्येक सदस्यासाठी देखील संबंधित ॲड-ऑन निवडल्याची खात्री करा. उदाहरणार्थ; तुम्ही तुमच्या पालकांसाठी वैयक्तिक योजना घेत असाल तर तुमच्या प्लॅनमध्ये समाविष्ट करण्यासाठी आयुष ॲड-ऑन हे शिफारस केलेले ॲड-ऑन असेल. |
तुम्ही फॅमिली फ्लोटर प्लॅनची निवड करणार असाल, तर जास्त विम्याची निवड करा कारण तुम्हाला एकूण विमा रक्कम कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी पुरेशी आहे याची खात्री करणे आवश्यक आहे. |
फॅमिली फ्लोटर हेल्थ इन्शुरन्स एक मौल्यवान ठेव आहे जी तुम्हाला एकाच पॉलिसी अंतर्गत तुमच्या संपूर्ण कुटुंबाला कॉम्प्रिहेन्सिव्ह हेल्थ कव्हरेज प्रदान करतो. योग्य दर, असंख्य सुविधा आणि कव्हरेज बेनिफिट्स विभागण्याची सुविधा या सर्व वैशिष्ट्यांमुळे मुळे ही पॉलिसी मेडिकल इमर्जन्सीच्या काळात तुमची आर्थिक सुरक्षा सुनिश्चित करून तुम्हाला निश्चिंत राहण्यात मदत करते. विचारपूर्वक निर्णय घेतल्याने तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींचे सुरक्षित आयुष्य आणि त्यांना जेव्हा गरज असेल तेव्हा त्यांना योग्य ती आरोग्यासंबंधी मदत मिळेल हे देखील सुनिश्चित करू शकता.