मोरॅटोरीअम आणि फुल मेडिकल अंडररायटिंग मधला फरक
जगभरातील हेल्थ केअरच्या वाढत्या किमती बघून आता आजारी पडणे देखील महागात पडते आहे. पण हे स्वाभाविकच आहे. तुम्हाला माहित नाही की तुम्हाला हेल्थ इन्शुरन्सची कधी गरज भासेल. अशा अनिश्चित परिस्थितींमध्ये, आधीच आजारपण आणि त्यावर हॉस्पिटलचे भरमसाठ बिल जास्तच त्रासदायक ठरतं.
अशा वेळेस, जर तुमच्याकडे हेल्थ इन्शुरन्स असेल, तर तुम्हाला आर्थिकच नाही तर अशा परिस्थितींमध्ये गरजेचा असणारा मानसिक आधार देखील मिळतो.
हेल्थ इन्शुरन्स मध्ये मोरॅटोरीअम पिरिअड म्हणजे काय?
“हेल्थ इन्शुरन्स मध्ये मोरॅटोरीअम पिरिअड म्हणजे काय” यावर बोलण्याआधी “जुने आजार” म्हणजे नाक्की कोणती परिस्थिती हे जणून घेणे महत्त्वाचे आहे. परिभाषेप्रमाणे, जुने आजार म्हणजे असे आजार ज्यांचा तुम्हाला त्रास होत होता आणि तुम्ही तुमची इन्शुरन्स पॉलिसी घेण्याच्या 48 महिन्यांच्या आत किंवा त्यापेक्षा कामी काळात त्यांच्यावर उपचार झालेला असेल.
जरी बऱ्याच पॉलिसीज जुन्या आजारांच्या बाबतीत कव्हर डेट असल्या तरी त्या काही ठराविक वेटिंग पिरिअड नंतरच हे कव्हर देतात.
मोरॅटोरीअम अंडररायटिंग असाच एक इन्शुरन्सचा प्रकार आहे ज्यामध्ये इंशुरर मागच्या पाच वर्षातील सर्व जुन्या आजारांच्या बाबतीतील नियम काही ठराविक काळासाठी वगळतो, म्हणजेच काही ठराविक काळाचा वेटिंग पिरिअड देतो आणि त्या पिरिअड नंतरच त्या जुन्या आजारांसाठी साठी कव्हर देतो.
मोरॅटोरीअम वेटिंग पिरिअड हा हेल्थ इन्शुरन्स मधील सामान्य वेटिंग पिरिअड पेक्षा वेगळा का आहे?
तर! मोरॅटोरीअम मध्ये तुम्हाला तुमच्या जुन्या आजारांबद्दल काहीच माहिती विचारली जात नाही, परंतु एकंदरच मागच्या पाच वर्षातील सर्वच आजारांच्या बाबतीतील नियम वगळले जातात. लक्षात असू द्या की प्रत्येक इन्शुरन्स प्रोव्हायडरचे मोरॅटोरीअमची आपली स्वतःची एक परिभाषा असते आणि आणि ती एकमेकांपासून वेगळी असते.
फुल मेडिकल अंडररायटिंग म्हणजे काय?
फुल मेडिकल अंडररायटिंग मध्ये पॉलिसी साठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीला इन्शुरन्स प्रोव्हायडर कडे त्याच्या संपूर्ण मेडिकल हिस्ट्री बद्दल माहिती द्यावी लागते, ज्यावरून कंपनी कॉम्प्रीहेन्सिव्ह हेल्थ कव्हरेज का खालील पैकी कोणता प्रकार, हे ठरवते:
- तुमच्या मेडिकल कव्हरेज मध्ये जुन्या आजारांच्या बाबतीतील कोणतेही नियम कव्हर केले जाणार नाही.
- क्लेम करण्याची गरज पडण्याची शक्यता वाढलेली असल्यामुळे तुमच्या प्रीमिअम मध्ये जास्तीचा “सरचार्ज” जोडला जाऊ शकतो.
- जुन्या आजारांच्या बाबतीतील सर्व नियम मान्य केले जातील.
- संपूर्ण अर्जच अमान्य केला जावा.
मोरॅटोरीअम आणि फुल मेडिकल अंडररायटिंग मध्ये काय फरक आहे?
मोरॅटोरीअम आणि फुल मेडिकल अंडररायटिंग मधील जाणवणारे फरक बघूया
फरक दर्शवणारे मुद्दे | मोरॅटोरीअम | फुल मेडिकल अंडररायटिंग |
मेडिकल हिस्ट्री | यासाठी अर्ज करण्यासाठी तुम्हला जुन्या आजारासंबंधी कोणतेही नियम जाहिर करण्याची गरज नाही. | तुम्हाला जर काही जुना आजार असेल माहिती देण्यासाठी एक कॉम्प्रीहेन्सिव्ह क़्वेश्चनेअर भरून द्यावा लागतो. |
वेटिंग पिरिअड | पॉलिसी घेण्याआधीच्या पाच वर्ष आधी पासून जर तुम्हाला कोणता आजार असेल तर दोन वर्षांपर्यंत तुम्हाला कोणतेही कव्हर मिळत नाही. | जुन्या आजारासंबंधी नियम काही ठराविक वेटिंग पिरिअड साठी कव्हर केले जात नाहीत. हे प्रत्येक कंपनी प्रामाणे बदलते आणि कव्हरेजची व्याप्ती किंवा परिस्थिती वेगवेगळ्या असू शकतात. |
क्लेम सेटलमेंट | तुमच्या इन्शुरन्स प्रोव्हायडरने तुमच्या त्यामुळे जेव्हां जेव्हां तुम्ही क्लेम करता कंपनी कोणताही निर्णय घेण्याआधी तुमची मेडिकल हिस्ट्री तपासून घेते. आणि म्हणून क्लेम सेटलमेंटला वेळ लागू शकतो. | तुमच्या इन्शुरन्स प्रोव्हायडरने अर्ज करतानाच तुमच्या जुन्या आजारांबद्दल सगळी माहिती तुम्हाला विचारलेली असते. त्यामुळे मोरॅटोरीअम क्लेम प्रोसेस पेक्षा ही क्लेम प्रोसेस सुटसुटीत आणि कमी वेळेत होणारी आहे. |
मोरॅटोरीअम आणि अंडररायटिंग, यापैकी चांगला पर्याय कोणता आहे?
दोन्ही पर्यायांची आपली स्वतंत्र वैशिष्ट्य, फायदे आणि तोटे आहेत. दोन्हीची तंतोतंत बरोबरी होऊ शकणार नाही, उलट त्यातील कोणता पर्याय चांगला आहे हे तुम्ही तुम्हाला कोणता पर्याय सूट करतो यावरून ठरवणे योग्य ठरेल.
एखाद्या सुदृढ आणि निरोगी व्यक्ती ज्याला कोणताही जुना आजार नाही, त्याच्यासाठी फुल मेडिकल अंडररायटिंग पर्याय जास्त योग्य ठरेल, तर एखादा व्यक्ती ज्याला काही जुना आजार आहे, तो कदाचित मोरॅटोरीअम पर्याय निवडेल. त्यामुळे आधी म्हणल्याप्रामाणे प्रत्येकाची आपली स्वतंत्र वैशिष्ट्ये आहेत आणि कोणता पर्याय चांगला हा निर्णय सर्वस्वी तुमच्या आरोग्यावर आणि गरजांवर अवलंबून असतो.
वारंवार विचारले जाणारे प्रश
जुन्या आजारासंबंधी मोरॅटोरीअमचे काय तोटे आहेत?
जुन्या आजारासंबंधी नियमांच्या बाबतीत मोरॅटोरीअम पर्यायाचे तोटे असे आहेत की, सर्वसाधारणपणे असा नियम आहे की 5 वर्षांपासून असलेल्या जुन्या आजाराच्या नियमांचे कव्हर तुम्हाला 2 वर्षांच्या वेटिंग पिरिअड नंतर मिळते. अशा परिस्थितीत जर तुम्ही वरचेवर आजारी पडलात, तर कव्हर नसल्यामुळे पहिली 2 वर्ष हेल्थ केअरसाठी तुम्हाला तुमच्या खिशातून पैसे भरावे लागतात.
रोलिंग मोरॅटोरीअम कव्हर म्हणजे काय?
रोलिंग मोरॅटोरीअम कव्हर म्हणजे मोरॅटोरीअम कव्हर मध्ये जुन्या आजारासंबंधीचे सर्व नियम वगळले असले तरी, पुढे काही त्या आजारासंबंधी लक्षणे दिसून आली नाहीत तर दोन वर्षांच्या वेटिंग पिरिअड नंतर कव्हर मिळतो.