पर्सनल लोन इएमआय कॅल्क्युलेटर
लोनची रक्कम
कार्यकाळ(वर्षे)
व्याज दर (पी.ए)
पर्सनल लोन कॅल्क्युलेटरबद्दल सर्व काही समजावून सांगितले
क्रेडिट इंस्ट्रूमेंटच्या परतफेडीचे योग्य व्यवस्थापन केल्यास कर्जदाराची क्रेडिट हिस्टरी उज्वल दिसायला लागते. पर्सनल लोनची परतफेड वेळेत करण्यात इएमआय ची आधीच माहिती असणे ही महत्त्वाची भूमिका बजावते. यासाठी ऑनलाइन पर्सनल लोन इएमआय कॅल्क्युलेटर हे एक उपयुक्त साधन ठरते.
पर्सनल लोन कॅल्क्युलेटरशी संबंधित सर्व महत्त्वाच्या बाबी जाणून घेऊया. पण त्याआधी आपल्याला पर्सनल लोन इएमआय शी संबंधित योग्य माहिती मिळवणे आवश्यक आहे.
पर्सनल लोन इएमआय कॅल्क्युलेटर म्हणजे काय?
पर्सनल लोन हे असुरक्षित क्रेडिट इन्स्ट्रूमेंट आहे. घराचे नूतनीकरण, लग्न, प्रवास, वैद्यकीय उपचार आणि इतर तात्कालिक आर्थिक गरजा यासारख्या अनेक कारणांसाठी एखादी व्यक्ती याचा वापर करू शकते.
पर्सनल लोन इएमआय म्हणजे काय?
पर्सनल लोनसाठी समान मासिक हप्ते किंवा इएमआय म्हणजे पर्सनल लोन घेतल्यानंतर दरमहा देय रक्कम. ही इएमआय रक्कम संपूर्ण लोनची परतफेड होईपर्यंतच्या कार्यकाळात लोनचे व्याज आणि मुळ रक्कम दोन्ही परत फेडण्यासाठी वापरली जाते. पर्सनल लोन इएमआय संपूर्ण कार्यकाळात समान राहतो.
पर्सनल लोनवर परिणाम करणारे घटक कोणते आहेत?
पर्सनल लोनच्या इएमआय वर परिणाम करणारे तीन घटक खालीलप्रमाणे आहेत:
P म्हणजे लोनची मूळ रक्कम: देय इएमआय थेट पर्सनल लोनच्या रकमेच्या प्रमाणात असतात. लोनची रक्कम जितकी जास्त तितकी मासिक हप्ते जास्त असतात.
R म्हणजे मासिक व्याजदर: लोन देणाऱ्या आर्थिक संस्था मुळ रकमेवर व्याज आकारतात अशी टक्केवारी म्हणून लागू व्याजदराची व्याख्या केली जाते. इएमआय वाढविण्यासाठी उच्च व्याजदर जबाबदार आहे आणि त्याउलट.
N लोनचा कार्यकाळ दर्शवितो: हा पर्सनल लोनच्या परतफेडीचा कार्यकाळ दर्शवितो. लोनचा कालावधी इएमआय शी विपरीतपणे संबंधित आहे. दीर्घ कार्यकाळामुळे इएमआय कमी होतो तर कमी कार्यकाळामुळे तो वाढतो.
पर्सनल लोन इएमआय कॅल्क्युलेटर, पर्सनल लोन गणनेचे सूत्र आणि पर्सनल लोनसाठी इएमआय ची गणना कशी करावी याबद्दल जाणून घेण्यासाठी खाली बघा!
ऑनलाइन पर्सनल लोन इएमआय कॅल्क्युलेटर म्हणजे काय?
पर्सनल लोनसाठी लोन कॅल्क्युलेटर हे इएमआय मोजण्याचे एक ऑनलाइन साधन आहे जे एखाद्या व्यक्तीला लोनच्या परतफेडीसाठी भरणे आवश्यक आहे.
विनामूल्य पर्सनल लोन कॅल्क्युलेटर संभाव्य कर्जदारास लोनची रक्कम, कार्यकाळ आणि व्याज दरासाठी मूल्ये इनपुट करण्यास मदत करते. त्यानंतर हे साधन लोनचा कार्यकाळ, इएमआय आणि विशिष्ट कालावधीतील शिल्लक लोनची रक्कम मोजण्याकरिता या मूल्यांचा वापर करते.
मात्र, या ऑनलाइन साधनाचे कार्य समजून घेण्यासाठी आधी पर्सनल लोनच्या इएमआय ची मुळ कल्पना असणे आवश्यक आहे.
पर्सनल लोन इएमआय गणना करण्याचे सूत्र काय आहे?
खाली पर्सनल लोन इएमआय कॅल्क्युलेटर सूत्र दिले आहे -
इएमआय = [P x R x (1+R) ^N] / [(1+R) ^ N-1]
पर्सनल लोनचे समान मासिक हप्ते बनविणारे तीन घटक वरील पर्सनल लोन गणना सूत्रात P, R आणि N म्हणून नमूद केले आहेत.
हे दर्शवितात -
P = मूळ रक्कम
R = व्याज दर
N = लोन कार्यकाळ
खालील तक्ता आपल्याला वरील सूत्र अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास मदत करेल. या उदाहरणात, विचार करा की उधार घेतलेली रक्कम किंवा मुळ रक्कम ₹ 10,00,000 आहे. वार्षिक व्याज दर 10.5% आहे. या सूत्रात मासिक आधारावर व्याजदराची गणना केली जाते. याचा अर्थ R = वार्षिक व्याज दर / 12/100. त्यामुळे येथे वार्षिक व्याजदर 10.5% असल्याने R= 10.5/12/100=0.00875.
गणना केलेला इएमआय ₹13,493 असेल. त्यामुळे लोनची संपूर्ण रक्कम फेडण्यासाठी 120 महिन्यांसाठी ₹13,493 भरावे लागतील. एकूण देय रक्कम ₹ 13,493 * 120 = ₹ 16,19,220 असेल. यात अधिग्रहित लोनच्या व्याजापोटी ₹6,19,220 चा समावेश आहे.
घटक |
मूल्य |
मूळ रक्कम |
₹10,00,000 |
वार्षिक व्याज दर |
10.5% |
कार्यकाळ |
10 वर्ष किंवा 120 महीने |
इएमआय |
₹13,493 |
पर्सनल लोन इएमआय कॅल्क्युलेटरचे फायदे
पर्सनल लोन इएमआय कॅल्क्युलेटर वापरण्याचे अनेक फायदे खाली दाखवले आहेत:
मासिक बजेटमध्ये इएमआयला सहजतेने बसवते
पर्सनल लोन इएमआय कॅल्क्युलेटरद्वारे मासिक हप्ते गणना करताना कर्जदाराला नेमकी किती रक्कम भरायची गरज आहे, याची माहिती मिळते. यामुळे त्यांना लोनच्या कार्यकाळातील त्यांचे सर्व मासिक खर्च इएमआय सह सहजपणे भागण्यास मदत होते.
मासिक हप्त्यावर परिणाम करणारे घटक बदलून विचारपूर्वक निर्णय घ्या
पर्सनल लोन इएमआय कॅल्क्युलेटरच्या माध्यमातून विविध व्याजदर आणि कार्यकाळासह विविध मुळ रक्कमेच्या प्रयोग करता येतो. यामुळे कर्जदाराला त्यांच्या आर्थिक आणि जीवनशैलीत अडथळा न आणता लोनच्या रकमेचा निर्णय घेणे सोपे जाते.
चांगले क्रेडिट रेटिंग सुनिश्चित करणे
पर्सनल लोन घेण्यापूर्वी मासिक हफ्त्यांची गणना करून व्यक्ती आपले आर्थिक व्यवस्थापन करू शकतात. यामुळे त्यांच्या लोनच्या परतफेडीत आणखी मदत होणार आहे. ते त्यांचे इएमआय पेमेंट चुकवणार नाहीत. ते त्यांचे इएमआय पेमेंट चुकवणार नाहीत. यामुळे खराब पतमानांकन टाळता येईल.
अचूक परिणाम आणि वेळ वाचविण्यास मदत
पर्सनल लोन इएमआय कॅल्क्युलेटर सर्व गुंतागुंतीची गणिते क्षणार्धात पार पाडते, ज्यामुळे बराच वेळ वाचण्यास मदत होते. इएमआय च्या मॅन्युअल गणनेदरम्यान त्रुटी येण्याची शक्यता आहे. परंतु या साधनामुळे, अशा त्रुटींची शक्यता शून्य आहे, ज्यामुळे अचूक परिणाम सुनिश्चित होतात.
वापरण्यास सोपे आणि सहज उपलब्ध
पर्सनल लोन इएमआय कॅल्क्युलेटर अनेक वेब पोर्टल्सवर ऑनलाइन सहज उपलब्ध आहे आणि त्याचा वापर करणे खूप सोपे आहे. देय मासिक हप्त्यांचे मूल्य मिळविण्यासाठी वापरकर्त्यांना फक्त लोनची मूळ रक्कम, लोनचा कार्यकाळ आणि व्याज दर इनपुट करणे गरजेचे आहे. याचा अर्थ असा की ते कधीही आणि कोणत्याही ठिकाणाहून मासिक हप्ते सहज गणना करू शकतात.
एकदा आपण पर्सनल लोनच्या इएमआय कॅल्क्युलेटरचा वापर करून आपली आवश्यक रक्कम निश्चित केली की, अशी रक्कम मिळविण्यासाठी तपशीलवार आवश्यकता जाणून घेण्याची वेळ आली आहे.
पर्सनल लोनसाठी आवश्यक कागदपत्रे
पर्सनल लोन घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे शोधत आहात?
आपल्याला इथे उत्तर मिळेल!
पर्सनल लोन घेऊ इच्छिणाऱ्या संभाव्य कर्जदारांनी पर्सनल लोनसाठी आवश्यक असलेली विविध कागदपत्रे लक्षात ठेवली पाहिजेत. या क्रेडिट इन्स्ट्रूमेंटसाठी अर्ज करताना आवश्यक पर्सनल लोनच्या कागदपत्रांची यादी खाली दिली आहे:
- केवायसी कागदपत्रे
- गेल्या काही महिन्यांच्या वेतन स्लिप
- कर्मचारी ओळखपत्र
- गेल्या काही महिन्यांपासून वेतन खात्याचे बँक विवरणपत्र
कर्जदारांनी हे लक्षात ठेवावे की वरील यादी सूचक आहे आणि लोन प्रक्रियेदरम्यान अतिरिक्त कागदपत्रांची आवश्यकता असू शकते. त्यामुळे त्यांनी संबंधित आर्थिक संस्थेशी संपर्क साधून आवश्यक पर्सनल लोनच्या कागदपत्रांची पूर्ण यादी मागून घ्यावी.
पर्सनल लोनवरील टॅक्स फायदे काय आहेत?
पर्सनल लोनवर काही कर फायदे आहेत का याबद्दल विचार करताय?
जरी पर्सनल लोन करपात्र नसले तरी, व्यक्तींनी हे क्रेडिट इन्स्ट्रुमेंट विशिष्ट अंतिम वापरासाठी ठेवल्यास पर्सनल लोनवर कर लाभ मिळू शकतो. प्राप्तिकर कायदा 1961 नुसार लोनची रक्कम काही विशिष्ट वापरात आणल्यास कर वजावट आणि सवलतींचा क्लेम करता येतो.
एखादी व्यक्ती व्यवसाय विस्तारासंदर्भातील खर्च भागविण्यासाठी या रकमेचा वापर केल्यास पर्सनल लोनच्या व्याज परतफेडीवर कर वजावटीचा क्लेम करू शकते. मात्र, व्यवसायाचे उत्पन्न वाढविण्यासाठी गुंतवणूक करणे आवश्यक आहे.
प्राप्तिकर कायदा 1961 च्या कलम 24(ब) नुसार एखाद्या व्यक्तीने घर सुधारणा किंवा नूतनीकरणासाठी ही रक्कम वापरल्यास पर्सनल लोनवर करसवलत मिळते. यासाठी ₹30000 पर्यंतच्या लोनच्या परतफेडीवर भरलेल्या व्याजावर एकूण करपात्र उत्पन्नातून वजावट म्हणून क्लेम करता येतो. जर एखाद्या व्यक्तीने निवासी घर खरेदीसाठी या रकमेचा वापर केला तर भरलेल्या व्याजासाठी ₹2 लाख रुपयांपर्यंत वजावट दिली जाते.
याचा अर्थ असा आहे की एखादी व्यक्ती घराच्या नूतनीकरणासाठी रक्कम वापरून या क्रेडिट इन्स्ट्रूमेंट्सवर कर बचतीचा आनंद घेऊ शकते.
सोने, अनिवासी घराची मालमत्ता, शेअर्स आणि दागिने यासारख्या इतर कोणत्याही मालमत्तेच्या खरेदीसाठी या रकमेचा वापर केल्यास फायदे उपलब्ध आहेत. अशा गुंतवणुकीसाठी लोनवरील करमुक्त कराचा फायदा होऊ शकतो. यावर दिले जाणारे व्याज मालमत्ता अधिग्रहण खर्च मानले जाते.
हे एकूण भांडवली नफा कमी करते आणि पर्सनल लोनसाठी कर फायदे देते.
आता हे स्पष्ट झाले आहे की आपल्या परतफेडीच्या रकमेवर किती घटकांचा परिणाम होऊ शकतो, प्रभावी आर्थिक व्यवस्थापनासाठी पर्सनल लोन इएमआय कॅल्क्युलेटर आधीच वापरणे सुरक्षित आहे. याव्यतिरिक्त, संभाव्य कर्जदारांनी अनेक लोन देणाऱ्या संस्थांवर संशोधन केले पाहिजे आणि सर्वोत्तम ऑफर निवडण्यासाठी पर्सनल लोनच्या दरांची तुलना केली पाहिजे.