प्लेट ग्लास इन्शुरन्स म्हणजे काय?
प्लेट ग्लास इन्शुरन्स हा एक प्रकारचा इन्शुरन्स आहे जो तुमच्या व्यावसायिक इमारतींवर, दुकानाच्या खिडक्यांसारख्या मोठ्या काचेच्या फलकांना होणारे डॅमेज किंवा तुटण्यापासून संरक्षण देण्यासाठी आहे.
जर तुम्ही विचार करत असाल तर, प्लेट ग्लास हा एक प्रकारचा जाड आणि उत्तम दर्जाची काच आहे ज्याचा उपयोग खिडक्या, काचेचे दरवाजे, पडदे आणि पारदर्शक भिंती बनवण्यासाठी केला जातो.
बऱ्याच बिझनेससाठी, मुबलक काच असणे खरोखर महत्वाचे असते. फक्त अशा दुकानाची कल्पना करा जिथे ते काय विकत आहेत हे पाहण्यासाठी तुम्ही आत पाहू शकत नाही! पण काच देखील अतिशय नाजूक आहे आणि चुकीने डॅमेज होऊ शकते किंवा अचानक फुटू शकते, फुटण्याचे कारण खराब असंतुलित शेल्फपासून ते क्रिकेट खेळणाऱ्या मुलांपर्यंत काहीही असू शकते! दुर्दैवाने, या प्लेट ग्लासची दुरुस्ती करणे महागडे ठरू शकते.
परंतु जर तुमचा व्यवसाय प्लेट ग्लास इन्शुरन्सद्वारे संरक्षित असेल तर तुम्हाला अशा आर्थिक नुकसानापासून संरक्षण मिळेल.
पण, तुम्हाला प्लेट ग्लास इन्शुरन्सची गरज का आहे?
तुटलेली किंवा फुटलेली काचेची खिडकी बदलण्यासाठी तुम्हाला प्रति चौरस फूट ₹1,200 पर्यंत खर्च येऊ शकतो! (1)
सुरक्षा आणि अलार्म सिस्टमची दुरुस्ती किंवा बदलण्यासाठी तुम्हाला जवळपास ₹75,000 खर्च करावा लागू शकतो. (2)
प्लेट ग्लास इन्शुरन्स काय कव्हर करू शकतो?
जेव्हा तुम्हाला प्लेट ग्लास इन्शुरन्स मिळेल, तेव्हा तुम्हाला अशा बाबतीत संरक्षण मिळेल...
आपल्या बिझनेसच्या आवारातील प्लेट काचेचे कोणतेही अपघाती नुकसान किंवा डॅमेज.
खराब झालेल्या खिडकीच्या चौकटी किंवा फ्रेमवर्क (परंतु झीजेसाठी योग्य भत्त्यासह) बदलण्याच्या खर्चासाठी देखील तुम्हाला संरक्षण दिले जाईल.
प्लेट ग्लास डॅमेज झाल्यानंतर आवश्यक असलेले कोणतेही तात्पुरते बोर्डिंग उभारण्याचा खर्च देखील पॉलिसीमध्ये कवर्ड आहे.
काच तुटण्यापूर्वी तुमच्याकडे अलार्म टेप किंवा वायरिंग जोडलेले असल्यास, ते बदलण्यासाठी तुम्हाला संरक्षण दिले जाईल.
तुटलेल्या प्लेटच्या काचेवर असलेले कोणतेही अक्षर, चिन्हे किंवा सजावट रीप्लेस करण्याची आवश्यकता असल्यास तुम्हाला संरक्षित केले जाईल.
काय कवर्ड नाही?
आमचा खरोखर पारदर्शकतेवर विश्वास असल्याने, येथे काही परिस्थिती आहेत ज्या कव्हर केल्या जाणार नाहीत...
भूकंप, पूर, वादळ किंवा चक्रीवादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे होणारे नुकसान आणि डॅमेज कव्हर केले जाणार नाही.
आग, स्फोट, वायू किंवा उष्णता यांमुळे होणारे नुकसान किंवा डॅमेज कव्हर केलेले नाही.
प्लेट ग्लासला कोणतेही नुकसान न करता फ्रेम किंवा फ्रेमवर्कचे नुकसान झाल्यास, ते कव्हर केले जाणार नाही.
कोणतेही कॉनसीक्वेनशियल नुकसान (जसे की नफा तोटा किंवा बिझनेसमधील व्यत्यय) कव्हर केले जात नाही.
प्लेट ग्लास बदलताना, काढताना किंवा दुरुस्त करताना होणारे नुकसान आणि डॅमेज कव्हर केले जात नाही.
युद्ध, दंगल, संप किंवा आण्विक आपत्तीमुळे झालेले डॅमेज भरून काढले जाणार नाही.
प्लेट ग्लास इन्शुरन्सची कॉस्ट किती आहे?
तुमच्या प्लेट ग्लास इन्शुरन्सच्या प्रीमियमची किंमत अनेक घटकांवर आधारित आहे. प्रीमियम निश्चित करण्यासाठी वापरल्या जाणार्या या घटकांपैकी काही हे आहेत:
- तुम्ही निवडलेली सम इन्शुअर्ड (म्हणजे, पॉलिसी अंतर्गत एकूण देय असलेली कमाल रक्कम).
- तुमचा बिझनेस कुठे आहे.
- कव्हर केलेल्या वस्तूंची संख्या.
- कुठल्या प्रकारच्या ग्लासचा इन्शुरन्स उतरवला जात आहे
कव्हरेजचे प्रकार
डिजिटच्या प्लेट ग्लास इन्शुरन्ससह, खालीलपैकी कोणता तुमच्या बिझनेसला अनुकूल असेल यावर आधारित तुम्ही सम इनशूअर्ड निवडू शकता.
आंतरिक मूल्य
येथे, प्लेट ग्लासचे मूल्य पॉलिसी कालावधीच्या पहिल्या दिवशी रीप्लेसमेंटच्या किंमतीनुसार किंवा ते नवीन असताना, वय, झीज वजा केलेल्या कोणत्याही डेप्रीसीएशनसह निश्चित केले जाते.
रीप्लेसमेंट मूल्य
"पुनर्स्थापना मूल्य" असेही म्हटले जाते, हे पॉलिसी कालावधीच्या पहिल्या दिवसाप्रमाणे बदलण्याच्या किंमतीनुसार निश्चित केले जाते आणि वयानुसार कोणतेही डेप्रीसीएशन, किंवा झीज विचारात घेतले जात नाही.
प्लेट ग्लास इन्शुरन्स असण्याचे फायदे
ही पॉलिसी खास अशा बिझनेससाठी डिझाइन केले आहे जे त्यांच्या इमारतीत किंवा परिसरात ग्लासचा वापर करतात.
प्लेट ग्लास चुकून फुटल्यास तुमच्या बिझनेसला फारसे आर्थिक नुकसान सहन करावे लागणार नाही.
वाईट परिस्थितीचा सामना करूनही तुमचा बिझनेस अधिक सुरळीत चालण्यास मदत होईल!
प्लेट ग्लास इन्शुरन्स कोणाला आवश्यक आहे?
जर तुम्ही किंवा तुमच्या बिझनेस आस्थापनांमध्ये थोडासा प्लेट ग्लास बसवला असेल, तर तुम्हाला प्लेट ग्लासचा इन्शुरन्स अत्यंत महत्त्वाचा वाटेल. उदाहरणार्थ, जर...
जसे की फर्निचर स्टोअर्स, ग्लास डीलरशिप आणि बरेच काही.
जसे की शोरूम्स, रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, थिएटर इ.
उदाहरणार्थ, कार्यालये, दुकाने, बुटीक इ.
योग्य प्लेट ग्लास इन्शुरन्स कसा निवडावा?
वेगवेगळ्या पॉलिसींची तुलना करा - पैसे वाचवण्याचे मार्ग शोधणे नेहमीच छान असते, काहीवेळा कमी प्रीमियम असलेल्या पॉलिसी तुमच्या बिझनेससाठी सर्वोत्तम पर्याय नसू शकतात, कारण ते तुम्हाला योग्य कव्हरेज देऊ शकत नाहीत. त्यामुळे, परवडणाऱ्या किमतीत तुमच्यासाठी योग्य ती शोधण्यासाठी विविध पॉलिसींची वैशिष्ट्ये आणि प्रीमियम यांची तुलना करा.
तुमच्याकडे संपूर्ण कव्हरेज असल्याची खात्री करा - एक पॉलिसी शोधा जी तुम्हाला तुमच्या बिझनेसमधील सर्व जोखमी आणि त्याच्या परिसरावरील प्लेट ग्लाससाठी जास्तीत जास्त कव्हरेज देते.
योग्य सम इन्शुअर्ड निवडा - तुमच्या बिझनेससाठी कोणते चांगले आहे यावर अवलंबून, प्लेट ग्लासचे आंतरिक मूल्य किंवा रीप्लेसमेंट मूल्य यावर आधारित सम इन्शुअर्ड निवडण्याचा प्रयत्न करा.
सुलभ क्लेम्सची प्रोसेस शोधा - क्लेम्स खरोखरच महत्त्वाचे असल्याने, सोपी क्लेम्सची प्रोसेस असलेली इन्शुरन्स कंपनी शोधा, कारण यामुळे तुमचा आणि तुमच्या बिझनेसचा बराच त्रास वाचू शकतो.
तुम्हाला अतिरिक्त सेवा फायदा मिळू शकतात का ते पहा - अनेक इन्शुरन्स कंपन्या इतर सर्व प्रकारचे फायदे देतात, जसे की 24X7 ग्राहक सहाय्य, वापरण्यास सुलभ मोबाइल अॅप्स आणि बरेच काही.
भारतातील प्लेट ग्लास इन्शुरन्सबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न
प्लेट ग्लास म्हणजे काय?
प्लेट ग्लास हा मुळात आर्किटेक्चर, खिडक्या, ग्लासचे दरवाजे, पारदर्शक भिंती आणि अधिकसाठी वापरल्या जाणार्या ग्लासच्या वस्तूंचा संदर्भ देतो. हे ऑटोमोटिव्ह ग्लासपेक्षा वेगळे आहे जे वाहनांमध्ये वापरले जाते आणि ग्लासच्या वस्तू आणि फुलदाण्यांमध्ये ज्यांची स्वत: ची अशी वेगळी कॅटेगरी आहे आणि म्हणून समाविष्ट नाहीत.
प्लेट ग्लास इन्शुरन्सचा अर्थ काय आहे?
प्लेट ग्लास इन्शुरन्स ही एक प्रकारची इन्शुरन्स पॉलिसी आहे जो तुमच्या व्यावसायिक इमारतींवर, दुकानाच्या खिडक्यांसारख्या ग्लासच्या मोठ्या फलकांच्या कोणत्याही डॅमेजपासून किंवा फुटण्यापासून तुमच्या बिझनेसचे संरक्षण करेल.
प्लेट ग्लास इन्शुरन्स प्रीमियम कसा कॅलक्युलेट केला जातो?
तुमचा प्लेट ग्लास इन्शुरन्स प्रीमियम अनेक घटकांच्या आधारे कॅलक्युलेट केला जातो, जसे की तुम्ही निवडलेला सम इनशूअर्ड, तुमचा बिझिनेस कुठे आहे, कव्हर केलेल्या वस्तूंची संख्या आणि इन्शुरन्स काढला जात असलेल्या ग्लासचा प्रकार.