Thank you for sharing your details with us!
प्लेट ग्लास इन्शुरन्स म्हणजे काय?
प्लेट ग्लास इन्शुरन्स हा एक प्रकारचा इन्शुरन्स आहे जो तुमच्या व्यावसायिक इमारतींवर, दुकानाच्या खिडक्यांसारख्या मोठ्या काचेच्या फलकांना होणारे डॅमेज किंवा तुटण्यापासून संरक्षण देण्यासाठी आहे.
जर तुम्ही विचार करत असाल तर, प्लेट ग्लास हा एक प्रकारचा जाड आणि उत्तम दर्जाची काच आहे ज्याचा उपयोग खिडक्या, काचेचे दरवाजे, पडदे आणि पारदर्शक भिंती बनवण्यासाठी केला जातो.
बऱ्याच बिझनेससाठी, मुबलक काच असणे खरोखर महत्वाचे असते. फक्त अशा दुकानाची कल्पना करा जिथे ते काय विकत आहेत हे पाहण्यासाठी तुम्ही आत पाहू शकत नाही! पण काच देखील अतिशय नाजूक आहे आणि चुकीने डॅमेज होऊ शकते किंवा अचानक फुटू शकते, फुटण्याचे कारण खराब असंतुलित शेल्फपासून ते क्रिकेट खेळणाऱ्या मुलांपर्यंत काहीही असू शकते! दुर्दैवाने, या प्लेट ग्लासची दुरुस्ती करणे महागडे ठरू शकते.
परंतु जर तुमचा व्यवसाय प्लेट ग्लास इन्शुरन्सद्वारे संरक्षित असेल तर तुम्हाला अशा आर्थिक नुकसानापासून संरक्षण मिळेल.
पण, तुम्हाला प्लेट ग्लास इन्शुरन्सची गरज का आहे?
प्लेट ग्लास इन्शुरन्स काय कव्हर करू शकतो?
जेव्हा तुम्हाला प्लेट ग्लास इन्शुरन्स मिळेल, तेव्हा तुम्हाला अशा बाबतीत संरक्षण मिळेल...
काय कवर्ड नाही?
आमचा खरोखर पारदर्शकतेवर विश्वास असल्याने, येथे काही परिस्थिती आहेत ज्या कव्हर केल्या जाणार नाहीत...
प्लेट ग्लास इन्शुरन्सची कॉस्ट किती आहे?
तुमच्या प्लेट ग्लास इन्शुरन्सच्या प्रीमियमची किंमत अनेक घटकांवर आधारित आहे. प्रीमियम निश्चित करण्यासाठी वापरल्या जाणार्या या घटकांपैकी काही हे आहेत:
- तुम्ही निवडलेली सम इन्शुअर्ड (म्हणजे, पॉलिसी अंतर्गत एकूण देय असलेली कमाल रक्कम).
- तुमचा बिझनेस कुठे आहे.
- कव्हर केलेल्या वस्तूंची संख्या.
- कुठल्या प्रकारच्या ग्लासचा इन्शुरन्स उतरवला जात आहे
कव्हरेजचे प्रकार
डिजिटच्या प्लेट ग्लास इन्शुरन्ससह, खालीलपैकी कोणता तुमच्या बिझनेसला अनुकूल असेल यावर आधारित तुम्ही सम इनशूअर्ड निवडू शकता.
आंतरिक मूल्य
येथे, प्लेट ग्लासचे मूल्य पॉलिसी कालावधीच्या पहिल्या दिवशी रीप्लेसमेंटच्या किंमतीनुसार किंवा ते नवीन असताना, वय, झीज वजा केलेल्या कोणत्याही डेप्रीसीएशनसह निश्चित केले जाते.
रीप्लेसमेंट मूल्य
"पुनर्स्थापना मूल्य" असेही म्हटले जाते, हे पॉलिसी कालावधीच्या पहिल्या दिवसाप्रमाणे बदलण्याच्या किंमतीनुसार निश्चित केले जाते आणि वयानुसार कोणतेही डेप्रीसीएशन, किंवा झीज विचारात घेतले जात नाही.
प्लेट ग्लास इन्शुरन्स असण्याचे फायदे
प्लेट ग्लास इन्शुरन्स कोणाला आवश्यक आहे?
जर तुम्ही किंवा तुमच्या बिझनेस आस्थापनांमध्ये थोडासा प्लेट ग्लास बसवला असेल, तर तुम्हाला प्लेट ग्लासचा इन्शुरन्स अत्यंत महत्त्वाचा वाटेल. उदाहरणार्थ, जर...