Work
in spare time
Earn
side income
FREE
training by Digit
भारतात निष्क्रीय उत्पन्न कसे मिळवायचे?
तुम्हाला 9 ते 5 या वेळेतील नोकरी मिळाली असेल, तुमचा स्वतःचा व्यवसाय असेल किंवा तुम्ही फ्रीलांसर असाल, खूप प्रयत्न न करता नियमितपणे अतिरिक्त पैसे कमावण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे निष्क्रिय कमाईसाठी काम शोधणे
निष्क्रिय उत्पन्न म्हणजे काय?
निष्क्रिय उत्पन्नाचा अर्थ म्हणजे तुम्हाला भाड्याच्या मालमत्तेतून किंवा इतर एखाद्या उपक्रमातून मिळणारी कमाई. ज्यामध्ये तुम्ही सक्रियपणे सहभागी नसाल. मुळात, हे असे पैसे आहेत, ज्यासाठी खूप "सक्रिय" काम करण्याची आवश्यकता नाही. मुळात तुम्ही आराम करत असताना पैसे मिळवणे हे मुख्य ध्येय आहे.
हे करण्यासाठी, तुम्हाला एकदाच वेळ किंवा काही पैसे गुंतवावे लागतील, आणि नंतर ही गुंतवणूक तुम्हाला अगदी कमीत कमी मेहनतीत उत्पन्न मिळविण्यात मदत करेल.
निष्क्रिय उत्पन्न मिळविण्याचे सोपे मार्ग खालीलप्रमाणे
1. भाड्याच्या मालमत्तेमध्ये गुंतवणूक करणे
रिअल इस्टेट गुंतवणूक हा निष्क्रिय उत्पन्न मिळविण्याचा सर्वात प्रसिद्ध मार्ग आहे. थोड्या गुंतवणुकीसह, तुम्ही घर, कार्यालय, अपार्टमेंट आणि इतर प्रकारच्या रिअल इस्टेट खरेदी करून भाड्याने देऊ शकता. त्यानंतर तुम्ही दर महिन्याला भाड्याचे उत्पन्न मिळवू शकता. भाडेकरूंच्या दैनंदिन समस्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि कोणतीही बिलं गोळा करण्यासाठी प्रॉपर्टी मॅनेजरची नेमणूक करू शकता.
कशा प्रकारची गुंतवणूक आवश्यक आहे? भाड्याने मिळणाऱ्या मालमत्तेसाठी सुरुवातीला थोडे काम आणि आर्थिक गुंतवणूक आवश्यक असते.
आपण किती कमवू शकता? - तुमच्या मालकीच्या किती मालमत्ता आहेत, भाडेकरूंचे प्रकार आणि भाड्याची रक्कम यावर कमाई अवलंबून आहे. तुम्ही भाड्याच्या मालमत्तेद्वारे लक्षणीय रक्कम कमवू शकता.
काय लक्षात ठेवावे? - मालमत्तेच्या मालकीमध्ये काही आर्थिक धोके आहेत. जसे की, भाडेकरू न मिळणे. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या मालमत्तेसाठी बाजारपेठ आहे, याची खात्री करा.
2. तुमचे घर भाड्याने द्या
तुम्ही भाड्याने देण्यासाठी वेगळ्या मालमत्तेत गुंतवणूक करू शकत नसल्यास, तुम्ही Airbnb सारख्या भाड्याने देणाऱ्या कंपनीशी भागीदारी करून तुमची सध्याची मालमत्ता भाड्याने देऊ शकता. जर तुमच्याकडे अतिरिक्त खोल्या असतील किंवा तुम्ही काही काळ शहराबाहेर राहणार असाल, तर हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरेल. थोडे अतिरिक्त पैसे कमवण्यासाठी तुम्ही तुमची कार भाड्याने देखील देऊ शकता.
काय गुंतवणूक आवश्यक आहे? - यासाठी खूप कमी गुंतवणूक आणि कमी कमी काम आवश्यक आहे.
आपण किती कमवू शकता? - तुमची कमाई तुमच्या मालमत्तेचा आकार आणि तुम्ही भागीदारी करत असलेल्या भाडे कंपनीवर अवलंबून असेल.
- काय लक्षात ठेवावे? - येथे फारच कमी आर्थिक धोका असला तरी अनोळखी व्यक्तींना तुमच्या जागेत राहू देताना तुम्ही नेहमी सावधगिरी बाळगली पाहिजे.
3. स्टॉक्समध्ये गुंतवणूक करणे
जेव्हा तुम्ही स्टॉकमध्ये गुंतवणूक करता, तेव्हा तुम्ही कंपनीचे शेअर्स खरेदी करता, आणि जेव्हा त्या शेअर्सचे मूल्य वाढते, तेव्हा तुम्हाला कंपनीकडून नियमित अंतराने पेमेंट (किंवा लाभांश) मिळेल. हे लाभांश स्टॉकच्या प्रति शेअर दिले जात असल्याने, तुमच्या मालकीचे जितके जास्त शेअर्स तितकी तुमची कमाई जास्त.
कोणतीही हमी नसल्यामुळे बरेच लोक शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास टाळाटाळ करतात. परंतु जर तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये वैविध्य आणले, आणि जोखीम कमी केली, तर कालांतराने तुम्हाला निष्क्रिय उत्पन्न मिळवण्याचा हा एक उत्तम मार्ग असू शकतो.
काय गुंतवणूक आवश्यक आहे? - जेव्हा तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करता, तेव्हा तुम्हाला खरेदी करण्यासाठी योग्य स्टॉक शोधण्यासाठी सुरुवातीला थोडे काम करावे लागेल. याशिवाय, तुम्हाला आगाऊ आर्थिक गुंतवणूक देखील करावी लागेल.
आपण किती कमवू शकता? - फायदेशीर शेअर्स तुमच्यासाठी उच्च लाभांश आणि दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्याचा उत्तम मार्ग असू शकतो.
- काय लक्षात ठेवावे? - शेअर बाजारात गुंतवणूक करताना नेहमीच थोडासा धोका असतो, कारण जेव्हा कंपन्या चांगले काम करत नाहीत, किंवा अनिश्चिततेच्या काळात तुमच्या शेअर्सचे मूल्य कमी होऊ शकते. परंतु, तुम्ही एक्स्चेंज-ट्रेडेड फंड (ईटीएफ) किंवा आर्थिकदृष्ट्या स्थिर कंपन्यांकडून उच्च-लाभांश समभागांमध्ये गुंतवणूक करण्याचा पर्याय निवडून हा धोका कमी करू शकता.
4. डिजिटल उत्पादने विकणे
डिजिटल उत्पादने म्हणजे डाउनलोड किंवा स्ट्रीम करण्यायोग्य मीडिया कॉन्टेक्ट यामध्ये टेम्पलेट्स, प्लग-इन, पीडीएफ, प्रिंटेबल, ई-पुस्तके, ऑडिओ किंवा व्हिडिओ कोर्स किंवा UX किट्स समाविष्ट आहेत. या उत्पादनांचे प्रकार रेसिपी पासून ते डिझाइन टेम्पलेट्स आणि वायरफ्रेमपर्यंत विविध स्वरूपात असू शकतात. एकदा हे उत्पादन तयार झाल्यानंतर, तुम्ही Udemy , SkillShare किंवा Coursera सारख्या साइट्सद्वारे त्यांचे वितरण आणि विक्री करून निष्क्रिय उत्पन्न मिळवू शकता.
काय गुंतवणूक आवश्यक आहे? - इतरांना विकण्यासाठी तुम्हाला उत्पादन तयार करताना सुरुवातीला थोडे काम करावे लागेल.
आपण किती कमवू शकता? - डिजिटल उत्पादनांमध्ये उच्च नफ्याचे मार्जिन असते. कारण तुम्हाला फक्त एकदाच मालमत्ता बनवायची असते. परंतु तुम्ही ती तुम्हाला पाहिजे तितक्या वेळा ऑनलाइन विकू शकता.
- काय लक्षात ठेवावे? – इंटरनेटवर बरीच उत्पादने असल्याने, तुम्हाला काहीतरी वेगळे तयार करावे लागेल, किंवा त्यातून चांगले पैसे कमवण्यासाठी विशिष्ट बाजाराला संबोधित करणारे काहीतरी तयार करावे लागेल. तुम्हाला तुमच्या उत्पादनांचे मार्केटिंग कसे करायचे, हे देखील माहित असणे आवश्यक आहे.
5. ऍफिलिएट मार्केटिंग प्लॅन
ऍफिलिएट मार्केटिंग हा एक असा मार्ग आहे, ज्याद्वारे तुम्ही अन्य कंपनी ज्या आपल्या ब्रँड प्रमोशनसाठी प्रयत्न करत आहात, त्यांना मदत करू शकता. तुम्ही Amazon सारख्या ब्रँड किंवा कंपनीचे ऍफिलिएट बनता आणि तुम्ही तुमच्या फॉलोअर्स किंवा वाचकांना तुमच्या साइटवर किंवा सोशल मीडिया अकाउंटवर उत्पादनांच्या लिंकसह त्यांच्या उत्पादनांचा प्रचार करता.
त्यानंतर तुम्ही त्यांच्या उत्पादनांची ऑनलाइन मार्केटिंग करण्यासाठी कमिशनमधून निष्क्रिय उत्पन्न मिळवू शकता, आणि तुम्ही प्रत्येक विक्रीतून नफा मिळवू शकता. अशा प्रकारे, जेवढे लोक तुमची विशिष्ट लिंक वापरून ही उत्पादने विकत घेतात, तितके जास्त पैसे तुम्हाला मिळतील.
काय गुंतवणूक आवश्यक आहे? - यामध्ये फारच कमी आर्थिक गुंतवणुकीचा समावेश असला तरी, वेबसाइट, ब्लॉग किंवा ईमेल लिस्ट वाढवल्यानंतर मोठा सोशल मीडिया तयार करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला बराच वेळ द्यावा लागेल.
आपण किती कमवू शकता? - ऍफिलिएट मार्केटिंग हा एक वाढणारा उद्योग आहे आणि त्यामुळे उच्च कमाईसाठी भरपूर वाव आहे.
- काय लक्षात ठेवावे? - ऍफिलिएट मार्केटिंगसाठी खूप कमी खर्च किंवा जोखीम आहे, आणि तुम्ही तुमच्या प्रेक्षकांसाठी नवीन उत्पादनांचा प्रचार करून सहजतेने तुमच्या उत्पन्नात वाढ करू शकता.
6. POSP विमा एजंट व्हा
POSP, किंवा Point of Salesperson, म्हणजे तुम्ही विमा एजंट बनू शकता. ते ग्राहकांना त्यांच्या वैयक्तिक गरजांनुसार विमा पॉलिसी विकण्यासाठी विमा कंपन्यांसोबत काम करतात. यासाठी सुरुवातीला सक्रिय सहभाग आवश्यक आहे. जेव्हा ग्राहक त्यांच्या पॉलिसीचे नूतनीकरण करतात, तेव्हा तुम्ही निष्क्रिय उत्पन्न मिळवू शकता.
POSP एजंट होण्यासाठी च्या स्टेप्स, आवश्यकता आणि नियमांबद्दल तुम्ही येथे अधिक जाणून घेऊ शकता.
काय गुंतवणूक आवश्यक आहे? – तुम्ही सुरुवातीला सक्रिय काम केल्यास आणि चांगला ग्राहक वर्ग तयार केल्यास, तुम्ही अगदी कमी प्रयत्नात पॉलिसीचे नूतनीकरण कराल आणि निष्क्रीय उत्पन्न मिळवाल.
आपण किती कमवू शकता? - तुमचे उत्पन्न कमिशनवर आधारित असेल, आणि त्यामुळे तुम्ही जितक्या अधिक पॉलिसी विकता तितक्या लवकर तुम्ही उच्च उत्पन्न मिळवू शकता.
काय लक्षात ठेवावे? - विमा POSP होण्यासाठी फारसे धोके नाहीत. तुमच्याकडे स्मार्टफोन आणि चांगले इंटरनेट कनेक्शन असल्यास तुम्ही POSP एजंट बनू शकता. आपण ज्या कंपनीत सामील होत आहात, त्याबद्दल सविस्तर माहिती घ्या. तसेच सही करण्यापूर्वी करार वाचायला विसरू नका
नवशिक्यांसाठी निष्क्रिय उत्पन्न मिळवण्याबद्दल जाणून घेण्यासारख्या गोष्टी
बरेच लोक ज्यांना थोडे अधिक पैसे कमवायचे आहेत, ते पार्टटाइम नोकरी, फ्रीलान्स काम किंवा इतर प्रकल्पांकडे वळतात. मात्र, यासाठी आपण नियमित आणि सक्रिय प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यामुळे, तुमचा बराचसा वेळ वाया घालवणे थांबवून निष्क्रिय उत्पन्न कसे मिळवायचे, याचे मार्ग तुम्हीही शोधू शकता.
तुम्हाला निष्क्रिय उत्पन्न मिळवण्याचा अनुभव नसल्यास, तुम्ही गुंतवणूक करणे आणि पैसे कमविणे सुरू करण्यापूर्वी येथे काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात.
ही "त्वरीत श्रीमंत व्हा" योजना नाही - निष्क्रिय उत्पन्नासह, तुम्ही जास्त सक्रिय काम न करता पैसे कमवू शकता. परंतु तुम्हाला काहीही विनाकारण मिळत नाही. तुम्हाला काम किंवा गुंतवणुक अगोदरच करावी लागते, ज्यावर तुम्ही उत्पन्न मिळवू शकता. यातून तुम्हाला लाभांश मिळेल, व्याज मिळेल किंवा मूल्यात वाढ होईल आणि कालांतराने तुम्हाला आर्थिक सुरक्षितता मिळेल.
तुम्हाला अजूनही काही अतिरिक्त कष्ट करावे लागतील – जरी तुमचे बहुतांश काम आणि गुंतवणूक सुरुवातीलाच केली जाईल, तरीही तुम्हाला काही अतिरिक्त कष्ट घ्यावे लागू शकतात. यामध्ये तुमचे उत्पादन अद्ययावत ठेवणे, तुमची भाड्याची मालमत्ता चांगली राखणे किंवा निष्क्रिय उत्पन्न चालू ठेवण्यासाठी तुमचे स्टॉक आणि गुंतवणूक नेहमी अपडेट करणे, याची गरज आहे
- निष्क्रिय उत्पन्न करपात्र आहे - या प्रकारच्या उत्पन्नावर सक्रिय उत्पन्नापेक्षा वेगळ्या पद्धतीने कर आकारला जातो (जसे की तुमचा पगार), तो करांच्या अधीन असेल.