डिजिट इन्शुरन्स करा

पासपोर्ट सेवा केंद्र (पीएसके) म्हणजे काय?

पासपोर्ट सेवा केंद्र ही भारतातील पासपोर्ट कार्यालयांची विस्तारित शाखा आहे. या कार्यालयांवर टियर 1 आणि 2 शहरांमध्ये पासपोर्ट आणि इतर संबंधित सेवा पुरविण्याची जबाबदारी आहे. याव्यतिरिक्त, ते ऑनलाइन सेवांचा विस्तार करतात, ज्यामुळे एजंटद्वारे अर्ज करण्याची गरज नाही. यामुळे पासपोर्ट अर्ज अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि जलद होतात.

पासपोर्ट सेवा केंद्र म्हणजे काय हे आता तुम्हाला माहित आहे, चला तर मग जाणून घेऊया इतर महत्त्वाच्या गोष्टी.

पासपोर्टसाठी पीएसकेची भूमिका आणि जबाबदाऱ्या

पासपोर्ट सेवा केंद्रे खालील भूमिका आणि जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी जबाबदार आहेत:

  • पासपोर्ट अर्ज स्वीकारणे आणि व्हेरीफिकेशन करणे

  • पात्र उमेदवारांना पासपोर्ट जारी करणे किंवा पुन्हा जारी करणे

  • पोलिस व्हेरीफिकेशन

  • पासपोर्टची छपाई आणि अंतिम वितरण

पासपोर्ट सेवा केंद्रात अर्ज कार्यपद्धती काय आहे?

पासपोर्ट सेवा केंद्रात ऑनलाइन आणि ऑफलाइन पासपोर्टसाठी अर्ज करण्यासाठी सोप्या स्टेप्सचे अनुसरण करा:

 

पासपोर्ट सेवा केंद्र ऑनलाइन अर्ज

  • स्टेप 1: पासपोर्ट सेवे च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. तुम्ही नोंदणीकृत सदस्य नसल्यास प्रथम पोर्टलवर स्वतःची नोंदणी करा.

  • स्टेप 2: एकदा तुम्ही तुमचे युझरनेम आणि आयडी तयार केल्यानंतर त्या क्रेडेंशियलसह लॉग इन करा.

  • स्टेप 3: "अप्लाय फॉर फ्रेश पासपोर्ट ऑर रिइश्यू ऑफ पासपोर्ट" निवडा. तुमचे नाव, संपर्क तपशील इत्यादी आशा संबंधित माहितीसह फॉर्म भरा.

  • स्टेप 4: "व्ह्यू सेव्हड ऑर सबमिटेड अ‍ॅप्लिकेशन” अंतर्गत उपलब्ध "पे अँड शेड्यूल अपॉइंटमेंट" निवडा.

  • स्टेप 5: पासपोर्ट सेवा केंद्रात नियुक्ती बुक करण्यासाठी ऑनलाइन पेमेंट अनिवार्य आहे. खालील पेमेंट पर्यायांमधून निवडा:

    • इंटरनेट बँकिंग (स्टेट बँक ऑफ इंडिया आणि इतर संलग्न बँक्स).

    • क्रेडिट किंवा डेबिट कार्ड (व्हिसा किंवा मास्टरकार्ड).

    • एसबीआय चे बँक चालान.

  • स्टेप 6: प्रिंटआउट घेण्यासाठी "प्रिंट अ‍ॅप्लिकेशन रिसीट" निवडा. यापुढे ही अर्ज पावती बाळगणे अनिवार्य नाही. नियुक्तीच्या दिवशी तुमच्या नियुक्ती संदर्भ क्रमांकासह तुमच्या भेटीच्या तपशीलांचा सारांश देणारा एसएमएस(SMS) देखील स्वीकारला जातो.

पासपोर्ट सेवा केंद्र ऑफलाइन अर्ज

  1. पोर्टलवरून इ-फॉर्म डाऊनलोड करा. 

  2. अर्जाचा प्रकार, तुमचे नाव, जन्मठिकाण इत्यादी अशा संबंधित माहितीसह ते भरा.

  3. ऑनलाइन अर्ज करताना अपलोड करा.

आपला अर्ज यशस्वीरित्या ऑनलाइन सबमिट केल्यानंतर, सर्व मूळ कागदपत्रांसह निर्धारित तारखेला तुमच्या जवळच्या पीएसकेला भेट द्या.

पीएसकेसाठी ऑनलाइन नियुक्तीची उपलब्धता तपासण्यासाठी स्टेप्स

पासपोर्टसाठी अर्ज करताना अर्जदारांची बायोमेट्रिक तपासणी अनिवार्य आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर तुमच्या जवळच्या पासपोर्ट सेवा केंद्राला भेट देणे गरजेचे आहे. त्यानुसार, तुम्हाला नियुक्तीसाठी सोयीस्कर स्लॉट शेड्यूल करणे गरजेचे आहे.

पासपोर्ट सेवा केंद्रात नियुक्ती स्लॉटची उपलब्धता तपासण्यासाठी या सोप्या स्टेप्सचे अनुसरण करा:

  • स्टेप 1: पासपोर्ट सेवेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या."चेक अपॉइंटमेंट अवेलॅबिलिटी" निवडा

  • स्टेप 2: "पासपोर्ट ऑफिस" निवडा.  व्हेरिफिकेशन कोड एंटर करा आणि "चेक अपॉइंटमेंट अवेलॅबिलिटी" वर क्लिक करा.

  • स्टेप 3: आता तुम्ही तुमच्या जवळच्या पासपोर्ट सेवा केंद्राचे लोकेशन, पत्ता आणि नियुक्ती तारीख पाहू शकता. 

तुम्ही या ऑनलाइन पोर्ट लवर आपली नियुक्ती देखील रिशेड्यूल किंवा रद्द करू शकता.

पीएसके कार्यालयात नियुक्तीच्या दिवशी पाळण्याची प्रक्रिया

 

पासपोर्ट सेवा केंद्रात नियुक्तीच्या दिवशी खाली नमूद केलेल्या प्रक्रियांचे अनुसरण करा:

1. मुख्य कार्यालयात प्रवेश केल्यानंतर नियुक्ती पावती आणि मूळ कागदपत्रे पासपोर्ट अधिकाऱ्याला द्या. तो/ती टोकन देईल.

2. आता तुम्हाला काउंटर A, B आणि C या तीन काउंटरमध्ये वॉक-इन करावे लागेल.

 

काउंटरचे प्रकार काउंटरची भूमिका काउंटरवर लागलेला सरासरी वेळ
A या काऊंटरवर बायोमेट्रिक डेटा चाचणी करावी लागते. याव्यतिरिक्त, यात तुमच्या कागदपत्रांचे व्हेरिफिकेशन आणि अपलोड देखील समाविष्ट आहे. 10 ते 15 मिनिटे
B या काऊंटरवर पासपोर्ट अधिकारी तुमच्या मूळ कागदपत्रांची व्हेरफिकेशन करून कागदपत्रांवर आणि तुमच्या पासपोर्टवर शिक्का मारतो. 20 ते 30 मिनिटे
C वरिष्ठ अधिकारी तुमच्या कागदपत्रांची व्हेरफिकेशन करतात. ते/त्या काही प्रश्न विचारतात आणि आपला पासपोर्ट अर्ज यशस्वी आहे की नाही हे तुम्हाला सांगतात. या दरम्यान किंवा नंतर कोणत्याही पोलिस व्हेरफिकेशनची गरज आहे की नाही याची पुष्टी देखील ते/त्या करतात. 15 मिनिटे
एक्झिट काउंटर एक्झिट काउंटरवर तुमचे टोकन परत द्या. पीएसके मधील व्यक्ति पासपोर्ट अर्जाची पावती देईल. यात तुमचा पासपोर्ट फाइल नंबर समाविष्ट आहे, ज्याचा वापर तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती ऑनलाइन ट्रॅक करण्यासाठी करू शकता. लागू नाही

पासपोर्ट सेवा केंद्राच्या अर्जाच्या स्थितीचा मागोवा घेण्यासाठी स्टेप्स

आपला अर्ज सबमिट केल्यानंतर, तुमच्या अर्जाची स्थिती तपासा. खालील स्टेप्सवर एक नजर टाका:

पीएसके ऑनलाइन अर्जाच्या स्थितीचा मागोवा घ्या

  • स्टेप 1: पासपोर्ट सेवा पोर्टल ला भेट द्या. "ट्रॅक अ‍ॅप्लिकेशन स्टेटस" निवडा.

  • स्टेप 2: अर्जाचा प्रकार निवडा, आपला 15 अंकी फाइल नंबर आणि जन्मतारीख एंटर करा. स्क्रीनवर आपल्या अर्जाची स्थिती पाहण्यासाठी "ट्रॅक स्टेटस" वर क्लिक करा.

पीएसके ऑफलाइन अर्जाची स्थितीचा मागोवा घ्या

तुम्ही खालील गोष्टींद्वारे तुमच्या पासपोर्ट अर्जाची स्थिती ऑफलाइन देखील तपासू शकता:

  • एसएमएस(SMS) सेवा (<STATUS FILE NUMBER> 9704100100 ला पाठवा). 

  • राष्ट्रीय कॉल सेंटर (संपर्क क्रमांक - 18002581800).

  • थेट आपल्या स्थानिक पासपोर्ट सेवा केंद्राला भेट द्या

भारतात किती पासपोर्ट सेवा केंद्रे कार्यरत आहेत?

 

भारतात अंदाजे 81 पासपोर्ट सेवा केंद्रे आहेत. भारतातील इतर पासपोर्ट कार्यालयांची उपलब्धता पाहा:

पासपोर्ट कार्यालये भारतात उपलब्धता
पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र 424
प्रादेशिक पासपोर्ट कार्यालये 36
पासपोर्ट सेवा लघु केंद्र 15

पासपोर्ट सेवा पोर्टल द्वारे तुम्ही तुमचे जवळचे पासपोर्ट सेवा केंद्र ऑनलाइन शोधू शकता.

प्रत्येक भारतीय शहरात उपलब्ध असलेल्या पासपोर्ट सेवा केंद्राचा उद्देश त्या विशिष्ट क्षेत्रातील पासपोर्टच्या वाढत्या मागणीची पूर्तता करणे आहे. पासपोर्ट सेवा केंद्र काय आहे हे जाणून घेणे आणि त्याद्वारे पासपोर्टसाठी अर्ज करणे सुरळीत अर्ज प्रक्रियेसाठी आवश्यक आहे. शिवाय, ऑनलाइन प्लॅटफॉर्ममुळे सध्याच्या जागतिक आरोग्य संकटात स्पर्शविरहित पासपोर्टशी संबंधित सेवांचा लाभ घेणे सोयीस्कर झाले आहे.

पासपोर्ट सेवा केंद्राविषयी वारंवार विचारले जाणारे प्रश्न

नियुक्तीशिवाय पासपोर्ट सेवा केंद्राला भेट देऊ शकता का?

केवळ आपत्कालीन, वैद्यकीय कारणे आणि इतर पूर्व-मंजूर प्रकरणांसाठी तुम्ही नियुक्तीशिवाय पासपोर्ट सेवा केंद्रास भेट देऊ शकता. लक्षात ठेवा की तुम्हाला सेवा देणे पासपोर्ट अधिकाऱ्याच्या विवेकावर आहे.

पासपोर्ट अर्जाची वैधता काय आहे?

ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर 90 दिवसांच्या आत पासपोर्ट सेवा केंद्रावर जाण्यात अर्जदार अपयशी ठरल्यास त्याला नवीन अर्ज करावा लागेल.

पीएसकेमध्ये दुसऱ्या व्यक्तीचा पासपोर्ट अर्ज सादर करू शकेल का?

नाही, पीएसकेमध्ये दुसऱ्या व्यक्तीचा पासपोर्ट अर्ज सादर करणे शक्य नाही. अर्ज सादर करताना अर्जदाराने प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक आहे.