भारतात पासपोर्टचे नूतनीकरण कसे करावे?
पासपोर्ट ही तुमची ओळख आणि नागरिकत्व सिद्ध करणाऱ्या आवश्यक कागदपत्रांपैकी एक आहे, हे सांगण्याची गरज नाही. शिवाय पासपोर्टची वैधता 10 वर्षांपेक्षा जास्त असेल तर त्याचे नूतनीकरण करावे लागते.
तर, ऑनलाइन पासपोर्ट नूतनीकरणाच्या कार्यपद्धतीबद्दल जाणून घेण्यासाठी खाली स्क्रोल करा. याव्यतिरिक्त, हा लेख तुमच्या पासपोर्टचे नूतनीकरण करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि प्रक्रिया वेळ यासारख्या इतर पैलूंवर प्रकाश टाकेल.
भारतीय पासपोर्टचे ऑनलाइन नूतनीकरण करण्याच्या स्टेप्स
सर्वप्रथम, तुम्हाला पासपोर्ट सेवेच्या अधिकृत वेबसाइटवर पासपोर्ट खाते तयार करणे गरजेचे आहे. यासाठी, तुम्ही या स्टेप्सचे अनुसरण केले पाहिजे:
पासपोर्ट सेवेच्या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या आणि "न्यु युझर रजिस्ट्रेशन" निवडा.
"पासपोर्ट ऑफिस" निवडा आणि तुमच्या निवासी पत्त्याच्या आधारे पासपोर्ट कार्यालय निवडा.
पासवर्ड आणि लॉगिन आयडी तयार करण्यासाठी तुमचे नाव आणि इमेल आयडी सारखे तपशील एंटर करा. कॅप्चा सबमिट करा आणि "रजिस्टर" वर क्लिक करा.
त्यानंतर तुम्हाला तुमच्या इमेलवर खात्यावर सक्रिय करणारी लिंक मिळेल. त्यावर क्लिक करून तुमचे खाते सक्रिय करा.
एकदा तुम्ही पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर, तुम्ही नवीन पासपोर्टसाठी अर्ज करू शकता किंवा तुमच्या विद्यमान पासपोर्टचे नूतनीकरण करू शकता.
आता तुम्ही ऑनलाइन पासपोर्ट नूतनीकरण प्रक्रियेसाठी तयार आहात!
म्हणून, तुम्ही पासपोर्टचे नूतनीकरण करण्यासाठी या स्टेप्सचे अनुसरण करू शकता:
पासपोर्ट सेवेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
'अप्लाय फॉर फ्रेश पासपोर्ट/रि-इश्यू ऑफ पासपोर्ट' हा पर्याय निवडा. हे पृष्ट ऑनलाइन अर्जावर रिडायरेक्ट होते. तुमचे नाव, जन्मतारीख आणि ठिकाण इत्यादी अशा संबंधित तपशीलांसह फॉर्म भरा.
फॉर्म भरल्यानंतर 'व्हॅलिडेट' वर क्लिक करा.
सर्व तपशीलांचे व्हेरिफिकेशन केल्यानंतर हा फॉर्म अपलोड करा आणि सबमिट करा.
याशिवाय इ-फॉर्म, डाऊनलोड करून तो भरून वेबसाइटवर अपलोड ही करता येईल. मात्र, तुम्ही प्रिंटेड इ-फॉर्म पीएसके किंवा प्रादेशिक पोस्ट ऑफिसमध्ये सबमिट करू शकत नाही.
पासपोर्टचे नूतनीकरण कसे करायचे याबद्दल हे सर्व होते. आता, तुमचे नूतनीकरण केलेले पासपोर्ट मिळविण्यासाठी अपॉइंटमेंटचे वेळापत्रक कसे ठरवावे ते जाणून घेऊया.
पासपोर्ट नूतनीकरणासाठी अपॉइंटमेंटचे वेळापत्रक कसे ठरवावे?
तुमचा नूतनीकरण केलेला पासपोर्ट मिळविण्यासाठी तुमची सोयीस्कर वेळ बुक करण्यासाठी खाली एक नजर टाका:
- तुमच्या युझर आयडी आणि पासवर्ड सह पोर्टलवर लॉग इन करा.
- 'व्ह्यू सेव्हड अँड सबमिटेड अॅप्लिकेशन' वर नेव्हिगेट करा आणि 'पे अँड शेड्यूल अपॉइंटमेंट लिंक' निवडा.
- एकदा तुम्ही अपॉइंटमेंट वेळ शेड्यूल केल्यावर, तुम्हाला त्यासाठी ऑनलाइन पेमेंट करणे आवश्यक आहे. शिवाय, अर्जाचा प्रकार (सामान्य/तत्काळ) आणि तुमच्या पासपोर्ट पुस्तिकेतील पृष्ट क्रमांकानुसार फी वेगवेगळी असेल. ऑनलाइन पेमेंट खालील पद्धतींमध्ये उपलब्ध आहे:
- एसबीआय बँक चलान
- क्रेडिट किंवा डेबिट कार्ड (फक्त व्हिसा आणि मास्टरकार्ड स्वीकार्य आहे)
- इंटरनेट बँकिंग (एसबीआय आणि इतर सहयोगी बँक्स)
- 'प्रिंट अॅप्लिकेशन रिसीट' हा पर्याय निवडा. या पावतीमध्ये अर्ज संदर्भ क्रमांक किंवा अपॉइंटमेंट क्रमांक असतो. सध्या अर्जाची पावती सोबत बाळगणे अनिवार्य नाही.
तुम्ही ऑनलाइन पासपोर्ट नूतनीकरणासाठी कधी अर्ज करू शकता?
याबद्दल खालील तक्त्यात तपशीलवार माहिती दिली आहे:
श्रेणी | पासपोर्ट नूतनीकरणासाठी अर्ज करण्याची वेळ |
---|---|
प्रौढ | पासपोर्टची मुदत संपण्याच्या 1 वर्ष आधी तुम्ही पासपोर्ट नूतनीकरणासाठी अर्ज करू शकता. |
अल्पवयीन मुले (वय 4 वर्षापेक्षा कमी) | 5 वर्षांची वैधता संपल्यानंतर किंवा 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत (जे आधी येईल) पुनर्मुद्रणासाठी अर्ज करू शकतात. 15 ते 18 वर्षे वयोगटातील अल्पवयीन मुलेही 10 वर्षांच्या वैधतेच्या पासपोर्टसाठी अर्ज करू शकतात. |
पासपोर्ट नूतनीकरणासाठी आवश्यक कागदपत्रे
पासपोर्ट नूतनीकरणासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी येथे आहे:
प्रौढांसाठी:
- जुना पासपोर्ट
- ना हरकत प्रमाणपत्र किंवा एनओसी
- एक सूचना पत्र
- खालील गोष्टींच्या सेल्फ-अटेस्टेड प्रती:
- तुमच्या पासपोर्टची पहिली आणि शेवटची दोन पाने
- अल्प वैधता पासपोर्ट किंवा एसवीपीच्या अनुषंगाने वैधता विस्तार पान
- नॉन-इसीआर / इसीआर पृष्ट
- पासपोर्ट जारी करणाऱ्या प्राधिकरणाने जारी केलेले निरीक्षणाचे पान
अल्पवयीन अर्जदारांसाठी:
सध्याचे 4.5 X 3.5 सेंमी पासपोर्ट आकाराचे फोटो आणणे आवश्यक आहे. फोटोतील पार्श्वभूमी पांढरी हवी.
तुम्ही पालकांच्या नावे सध्याचा निवासी पत्त्याचा पुरावा सादर करू शकता.
अल्पवयीन मुलाच्या वतीने पालक कागदपत्रांची पडताळणी करू शकतात.
शिवाय, लक्षात घ्या की पासपोर्ट नूतनीकरणाचा प्रकार (सामान्य किंवा तत्काळ) आणि अर्जदाराचे वय (प्रौढ किंवा अल्पवयीन) यावर आधारित कागदपत्रांची कार्यपद्धत भिन्न असेल.
पासपोर्ट नूतनीकरणासाठी फी आणि शुल्क काय आहे?
खालील तक्त्यात पासपोर्ट नूतनीकरणाच्या सर्व लागू फी ची यादी आहे:
सेवा | अर्ज करण्यासाठी | अतिरिक्त फी (तत्काळ) |
पासपोर्ट नव्याने/पुनर्मुद्रण करणे; 10 वर्षांच्या वैधतेसह व्हिसा पृष्ट संपल्यामुळे अतिरिक्त पुस्तिकांचा समावेश (36 पाने) | ₹1,500 | ₹2,000 |
पासपोर्ट नव्याने/पुनर्मुद्रण करणे; 10 वर्षांच्या वैधतेसह व्हिसा पृष्ट संपल्यामुळे अतिरिक्त पुस्तिकांचा समावेश (60 पाने) | ₹2,000 | ₹2,000 |
अल्पवयीन (18 वर्षांखालील) 5 वर्षांच्या वैधतेसह किंवा अल्पवयीन व्यक्ती 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत (36 पाने) पासपोर्ट नव्याने/पुनर्मुद्रण करणे | ₹1,000 | ₹2,000 |
पासपोर्टच्या नूतनीकरणासाठी लागणारी प्रक्रियेची वेळ
पासपोर्ट नूतनीकरणाला किती वेळ लागतो हे खालील तक्यात दाखवले आहे:
पासपोर्ट प्रकार | प्रक्रियेची वेळ |
---|---|
सामान्य | 30-60 दिवस |
तत्काळ | 3-7 दिवस |
पासपोर्ट नूतनीकरण नियम काय आहेत?
तुम्ही हे लक्षात ठेवले पाहिजे की पासपोर्ट नूतनीकरण आणि पुनर्मुद्रण यात फरक आहे. पासपोर्ट नूतनीकरणाच्या बाबतीत, पासपोर्ट प्राधिकरण तुम्हाला विद्यमान पासपोर्ट नूतनीकरण करून प्रदान करते. जेव्हा तुम्ही पुनर्मुद्रण करण्यासाठी अर्ज करता तेव्हा तुम्हाला नवीन पासपोर्ट मिळतो.
आधी सांगितल्याप्रमाणे, जेव्हा पासपोर्टची वैधता संपते तेव्हा तुम्ही त्याचे नूतनीकरण करण्यास पात्र आहात. दुसरीकडे, खालील घटनांमध्ये पासपोर्ट पुनर्मुद्रण केले जाते:
जेव्हा तुम्ही तुमचा पासपोर्ट हरवला
पासपोर्ट चोरीला गेला
तुमचा पासपोर्ट खराब झाला आहे.
पाने वापरुन संपली
वैयक्तिक माहितीत बदल
तुमच्या पासपोर्ट नूतनीकरण स्थितीचा मागोवा कसा घ्यावा?
पासपोर्ट सेवा पोर्टलवर तुम्ही तुमच्या पासपोर्ट नूतनीकरणाची स्थितीचा मागोवा सहजपणे घेऊ शकता. या पोर्टलवर फक्त तुमचा अर्ज प्रकार, फाइल क्रमांक आणि जन्मतारीख यासारखे तपशील एंटर करा. त्यानंतर 'ट्रॅक स्टेटस'वर क्लिक करा.
सुट्टी असो किंवा बिझनेस ट्रिप, पासपोर्ट बाळगणे आवश्यक आहे. त्यामुळे जर तुमच्या पासपोर्टची वैधता संपली असेल तर लवकरात लवकर ऑनलाइन नूतनीकरणाचा पर्याय निवडा. शिवाय, ऑनलाइन पासपोर्ट नूतनीकरणासाठी वरील तपशील लक्षात ठेवा आणि विनाअडथळा कार्यपद्धतीचा आनंद घ्या.
भारतातील पासपोर्ट नूतनीकरण प्रक्रियेबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न
किती दिवस आधी भारतीय पासपोर्टचे नूतनीकरण करता येते?
पासपोर्टची मुदत संपण्यापूर्वी 9 ते 12 महिन्यांच्या आत नूतनीकरणासाठी अर्ज करता येतो.
पासपोर्टचे नूतनीकरण करण्यासाठी तुम्हाला पासपोर्ट एजंटची गरज आहे का?
नाही, तुम्ही सोप्या आणि पारदर्शक कार्यपद्धतीसाठी ऑनलाइन पासपोर्ट नूतनीकरण देखील निवडू शकता.
पासपोर्ट नूतनीकरणासाठी फक्त वॉक-इन करता येईल का?
वॉक-इन करत पासपोर्टचे नूतनीकरण करणे शक्य नाही. त्यांना ऑनलाइन अपॉइंटमेंट घ्यावी लागेल, त्यानंतर पासपोर्ट सेवा केंद्राला भेट द्यावी लागेल आणि संपूर्ण प्रक्रिया पार पाडावी लागेल.