पासपोर्टला लसीकरण प्रमाणपत्राशी कसे लिंक करावे?
उच्च शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी परदेशात प्रवास करण्याचा विचार करत आहात का?
हो, तर गैरसोय टाळण्यासाठी लवकरात लवकर तुमच्या पासपोर्टला लस प्रमाणपत्राशी लिंक करा.
कारण भारत सरकारने कोविड-19 चा संसर्ग कमी करण्यासाठी देशाबाहेर प्रवास करणाऱ्या रहिवाशांसाठी हे पाऊल बंधनकारक केले आहे. प्रस्थानापूर्वी किंवा दरम्यान लसीकरण स्थिती व्हेरिफिकेशन दाखवताना तुमचा पासपोर्ट तुमच्या लसीकरण प्रमाणपत्राशी जोडलेला असणे उपयुक्त ठरेल.
तुम्ही या प्रक्रियेसाठी तपशीलवार स्टेप्स जाणून घेण्यास इच्छुक असल्यास, पुढे वाचन सुरू ठेवा!
पासपोर्टला लस प्रमाणपत्राशी जोडण्याच्या स्टेप्स
तुम्ही कोविन अॅप किंवा वेबसाइटद्वारे तुमचे लस प्रमाणपत्र तुमच्या पासपोर्टशी सहजपणे लिंक करू शकता.
लॉग इन केल्यानंतर तुम्ही खालील स्टेप्ससह पुढे जाऊ शकता -
स्टेप 1: "अकाऊंट डिटेल" टॅबमधून "रेज अॅन इश्यू" निवडा.
स्टेप 2: उपलब्ध पर्यायांमधून, "अॅड पासपोर्ट डिटेल्स" निवडा आणि पुढे जा.
स्टेप 3: रिडायरेक्ट झालेल्या पेजवर, एखाद्या सदस्याच्या नावावर क्लिक करा ज्याच्या पासपोर्ट तपशील तुम्ही जोडू इच्छिता.
स्टेप 4: त्यानंतर लाभार्थीचा पासपोर्ट क्रमांक योग्य रितीने भरा आणि डायलॉग बॉक्सवर टिक करा. "सबमिट" दाबा.
तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर तुम्हाला पुष्टीचा संदेश येईल.
यानंतर, तुम्हाला विनंती यशस्वीरित्या अपडेट केल्याची पुष्टी करणारी आणखी एक सूचना प्राप्त होईल.
जर तुम्हाला लस प्रमाणपत्राशी पासपोर्ट जोडण्यासाठी लागणाऱ्या वेळेची चिंता असेल तर खात्री बाळगा कारण यासाठी केवळ काही सेकंद लागतील.
लक्षात घ्या की जर तुम्ही कोविनवर स्वत: ची नोंदणी केली नसेल तर तुम्ही लसीकरणापूर्वी नोंदणी करताना तुमचा पासपोर्ट फोटो आयडी पुरावा म्हणून निवडू शकता. जर तुम्ही काही महिन्यांत परदेशात प्रवास करण्याचा विचार करत असाल तर हा एक चांगला पर्याय आहे.
आता पासपोर्टशी जोडलेल्या लसीकरण प्रमाणपत्रातील माहिती कशी एडिट करावी हे जाणून घेऊया.
पासपोर्टला लस प्रमाणपत्राशी जोडण्याचे महत्त्व
एखाद्या व्यक्तीला विमानात चढण्याची परवानगी देण्यापूर्वी विमानतळ अधिकारी लसीकरणाची स्थिती तपासतात. हे कोविड-19 प्रोटोकॉल आणि प्रवाशांची सुरक्षा राखण्यासाठी आहे.
एका अहवालानुसार, भारत सरकारने जाहीर केले की टोकियो ऑलिम्पिक खेळांसाठी असो वा शिक्षण, नोकरी किंवा भारतीय दलाचा भाग म्हणून परदेशात प्रवासाला जाणार्या सर्व प्रवाशांना लस प्रमाणपत्रासह पासपोर्ट लिंक करणे बंधनकारक आहे.
डोसचे प्रमाण, लसीचा बॅच क्रमांक इत्यादी महत्त्वाची माहिती जेव्हा तुम्ही तुमचा पासपोर्ट लस प्रमाणपत्राशी लिंक करता तेव्हा हे सगळे अपडेट होते.
याशिवाय विमानतळावर हे कोविन लसीकरण प्रमाणपत्र स्कॅन केले जाणार आहे. तांत्रिकदृष्ट्या विमानतळ प्राधिकरण प्रमाणीकरणासाठी कोव्हॅक्सिन, कोविशिल्ड, स्पुटनिक V लसीकरण प्रमाणपत्रावरील क्यूआर कोड स्कॅन करते.
लस प्रमाणपत्रांशी पासपोर्ट जोडण्याचे प्रकार शोधत असलेल्या व्यक्तींना पुढील विभागात दिलेल्या स्टेप्सचा फायदा होऊ शकतो.
लसीकरण प्रमाणपत्रातील माहिती अपडेट कशी करावी?
प्रमाणपत्रातील बदल अपडेट करण्यासाठी या स्टेप्सचे अनुसरण करा -
1. कोविनच्या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या आणि तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांक आणि ओटीपी सह लॉग इन करा.
2. त्याच्या मुखपृष्ठावरील "रेज अॅन इश्यू" वर क्लिक करा आणि रिडायरेक्ट झालेल्या पृष्ठावर "करेक्शन इन सर्टिफिकेट" निवडा.
3. त्यानंतर ड्रॉप-डाऊन मेन्यूमधून संबंधित व्यक्तीची निवड करा आणि सर्व दुरुस्त्या करा आणि तपशील अपडेट करा. पुढे, "सबमिट" वर क्लिक करा.
ही कार्यपद्धत यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर, तुम्ही पूर्णपणे लसीकरण केले आहे हे सिद्ध करण्यासाठी तुम्हाला या जोडलेल्या प्रमाणपत्राची हार्ड कॉपी विमानतळ प्राधिकरणाला दाखवणे गरजेचे आहे.
कोविन पोर्टलवरून हे प्रमाणपत्र डाऊनलोड करण्याच्या कार्यपद्धतीची माहिती खाली आहे.
पासपोर्टशी लिंक केलेल्या लस प्रमाणपत्राची प्रत कशी डाउनलोड करावी?
पासपोर्टला लस प्रमाणपत्राशी जोडण्याची कार्यपद्धत पूर्ण केल्यानंतर तुम्ही खालील स्टेप्समध्ये कोविन अॅप आणि पोर्टल वरून लिंक केलेले लसीकरण प्रमाणपत्र डाउनलोड करू शकता -
1. डॅशबोर्डवर तुम्हाला पहिल्या आणि दुसऱ्या डोसची माहिती मिळेल. हे प्रमाणपत्र डाऊनलोड करण्यासाठी लागू पर्यायावर क्लिक करा.
2. डाउनलोड लिंकवर क्लिक करून तुम्ही या प्रमाणपत्राचा पीडीएफ फॉर्म शोधू शकता.
तुमचा पासपोर्ट सहजपणे लस प्रमाणपत्राशी जोडण्यासाठी वरील स्टेप्सचे अनुसरण करा.
हे पुन्हा एकदा तुम्हाला जास्त त्रास न घेता परदेशात प्रवास करण्यास आणि त्याच वेळी कोविड प्रोटोकॉलचे पालन करण्यास मदत करेल.
पासपोर्टला लसीकरण प्रमाणपत्राशी जोडण्याशी संबंधित वारंवार विचारले जाणारे प्रश्न
मी मोबाइल क्रमांकाशिवाय माझे पासपोर्टला जोडलेले लसीकरण प्रमाणपत्र डाउनलोड करू शकतो का?
नाही, तुम्हाला नोंदणी करण्यासाठी आणि लस प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी मोबाइल क्रमांक देणे आवश्यक आहे.
मी कोविन व्यतिरिक्त इतर कोणत्याही अॅपवरून माझे पासपोर्टला जोडलेले लसीकरण प्रमाणपत्र डाउनलोड करू शकतो का?
होय, हे लसीकरण प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी तुम्ही आरोग्य सेतू अॅप तपासू शकता आणि कोविन टॅबवर क्लिक करू शकता. सरकारी व्हॉट्सअॅप क्रमांकावर संदेश पाठवूनही तुम्ही हे प्रमाणपत्र मिळवू शकता.
पासपोर्ट आणि लसीकरण प्रमाणपत्र लिंक करणे आवश्यक आहे का?
नोकरी किंवा शाळेसाठी परदेशात जाणाऱ्या व्यक्तींसाठी भारत सरकारने लसीकरणाच्या नोंदी पासपोर्टशी जोडणे बंधनकारक केले आहे.