डिजिट इन्शुरन्स करा

पासपोर्टसाठी पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट साठी अर्ज कसा करावा?

तुम्‍ही परदेशात जाण्‍याची किंवा नोकरीसाठी इमिग्रेशन करण्‍याची योजना करत आहात? 

तुमचे उत्तर होय असल्यास, तुमचे भूतकाळात गुन्हेगारी रेकॉर्ड्स नाहीत, हे प्रमाणित करण्यासाठी आणि विना त्रास प्रवास करण्यासाठी तुम्हाला पोलीस क्लिअरन्स प्रमाणपत्र आवश्यक आहे.

अर्जाच्या प्रकारानुसार, हे प्रमाणपत्र भारतीय पोलीस किंवा अधिकृत भारतीय सरकारी प्राधिकरणाद्वारे प्रकाशित केले जाते.

हे पीसीसी प्रमाणपत्र आणि तुमच्या अर्जाशी संबंधित इतर तपशील कसे मिळवायचे, हे जाणून घ्या.

पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट किंवा पीसीसी म्हणजे काय?

पोलीस क्लिअरन्स प्रमाणपत्र किंवा पीसीसी भारतीय पासपोर्ट धारकाला नोकरी, निवासी स्थिती, दीर्घकालीन व्हिसा किंवा इमिग्रेशनसाठी अर्ज करताना जारी केले जाते.

हे प्रमाणपत्र प्रोटोकॉलचा एक भाग आहे, जे दीर्घ मुदतीसाठी परदेशात प्रवास करताना एखाद्या व्यक्तीच्या गुन्हेगारी रेकॉर्डची तपासणी करते. हे भारतीय आणि भारतात राहणारे परदेशी नागरिक दोघांनाही लागू आहे.

टुरिस्ट व्हिसावर परदेशात जाणाऱ्या व्यक्तींसाठी पीसीसी जारी करता येत नाही.

भारतातील पोलीस क्लिअरन्स प्रमाणपत्र साधारणपणे सहा महिन्यांसाठी वैध असते. तथापी, हा घटक प्राधिकरण आणि अर्जाच्या प्रकारानुसार बदलू शकतो.

हे लक्षात घेणे अत्यावश्यक आहे की,  पीसीसी केवळ 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना दिले जाते.

हे प्रमाणपत्र महत्त्वपूर्ण असल्याने, अर्जाच्या स्टेप्स नीट समजून घेणे महत्त्वाचे आहे.

भारतात पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेटसाठी अर्ज कसा करावा?

खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही पोलीस क्लिअरन्स प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करू शकता-

  • सर्वप्रथम, पासपोर्ट सेवा पोर्टल वर स्वतःची नोंदणी करा किंवा तुमच्या सुरू असलेल्या अकाउंट मधून लॉग इन करा.

  • "पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेटसाठी अर्ज करा" वर क्लिक करा आणि सबमिट करण्यासाठी अर्ज भरा.

  • पुढे, "सेव्ह केलेले/सबमिट केलेले अर्ज पहा" टॅब अंतर्गत "पे आणि शेड्यूल अपॉइंटमेंट" पर्याय निवडा.

  • पेमेंट करा आणि तुमचा अर्ज संदर्भ क्रमांक असलेली अर्जाची पावती प्रिंट करा.

  • तुमच्या कागदपत्रांच्या मूळ आणि प्रतींसह प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय किंवा पासपोर्ट सेवा केंद्रात भेट द्या.

तुम्हाला पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट अर्ज ऑनलाइन भरण्यात अडचण येत असल्यास, अर्ज डाउनलोड करण्यासाठी पर्यायावर क्लिक करा. पुढे, तुम्ही अर्ज भरू शकता आणि तो XML फॉरमॅटमध्ये ऑफलाइन सेव्ह करू शकता.

आता, अर्ज सबमिट करण्यासाठी वरील स्टेप्स फॉलो करा, आणि भेटीची वेळ बुक करा. येथे, तुम्ही भरलेली XML फाइल थेट अपलोड करू शकता.

हे लक्षात घ्या की, दोन्ही अर्ज सबमिशन ऑनलाइन करावे लागतील. कागदपत्रांच्या व्हेरिफिकेशनसाठी पासपोर्ट कार्यालयात केवळ नंतरची भेट ऑफलाइन आहे.

स्थानिक पोलीस स्टेशनमधून पीसीसी कसे मिळवायचे?

पीसीसी अर्ज करण्यासाठी तुम्ही जवळचे पोलीस स्टेशन निवडू शकता. त्यानंतर, पीसीसी सहज मिळवण्यासाठी नमूद केलेल्या स्टेप्स फॉलो करा

  • तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनला भेट द्या.

  • पोलीस अधिकाऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्या. या प्रश्नांमध्ये सहसा तुमची पार्श्वभूमी तपासली जाते, आणि अर्जाच्या उद्देशाबद्दल चौकशी होते.

  • अधिकृत पासपोर्ट सेवा पोर्टल मध्ये नमूद केलेली स्व-प्रमाणित कागदपत्रे सबमिट करा. 

  • आवश्यक फी रोखीने किंवा चेकद्वारे भरा.

अधिकारी कागदपत्रांची तपासणी करून पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट द्यायचे की नाही, याचा निर्णय घेतील.

हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी कागदपत्रे महत्त्वाची असल्याने, तुम्हाला कोणती कागदपत्रे सादर करायची आहेत, ते पाहू या.

पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेटसाठी आवश्यक कागदपत्रे

कागदपत्रांचे दोन प्रकार आहेत. यासाठी संबंधित अर्जदार जे की-

  • रोजगारासाठी ECR देशांमध्ये जाणे

  • Non- ECR देशांमध्ये स्थलांतर करणे 

रोजगाराच्या उद्देशाने ECR देशांमध्ये स्थलांतरित होणारे

स्किल/सेमी- स्किल कामगारांसाठी -

  • जुना पासपोर्ट त्याच्या पहिल्या दोन आणि शेवटच्या दोन पेजच्या स्वयं-प्रमाणित फोटोकॉपीसह, निरीक्षण पेज आणि ECR /Non-ECR पेज

  • परदेशी नियोक्तासह रोजगार कराराची स्वयं-प्रमाणित प्रत

  • विद्यमान निवासाचा पुरावा 

  • वैध व्हिसाची प्रत (इंग्रजी भाषांतर) कॉपी ऑफ व्हॅलिड व्हिसा

अकुशल/महिला कामगारांसाठी ( 30 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या) -

  • जुना पासपोर्ट त्याच्या पहिल्या दोन आणि शेवटच्या दोन पेजच्या स्वयं-प्रमाणित फोटोकॉपीसह, निरीक्षण पेज आणि ECR /Non-ECR पेज

  • परदेशी नियोक्तासह रोजगार कराराची स्वयं-प्रमाणित प्रत

  • विद्यमान निवासाचा पुरावा 

  • वैध व्हिसाची प्रत (इंग्रजी भाषांतर) कॉपी ऑफ व्हॅलिड व्हिसा

कुशल/अर्ध-कुशल कामगारांसाठी (भरती एजंटद्वारे) -

  • विद्यमान निवासाचा पुरावा

  • जुना पासपोर्ट त्याच्या पहिल्या दोन आणि शेवटच्या दोन पेजच्या स्वयं-प्रमाणित फोटोकॉपीसह, निरीक्षण पेज आणि ECR /Non-ECR पेज

  • मूळ रोजगार कराराच्या प्रती, मुखत्यारपत्र आणि परदेशी नियोक्त्याकडून रिक्रूटिंग एजंट द्वारे प्रमाणित केलेल्या मागणी पत्राच्या प्रती

  • परदेशी भारतीय व्यवहार मंत्रालय, सरकार, स्थलांतरितांच्या संरक्षणामार्फत जारी केलेल्या वैध नोंदणी प्रमाणपत्राची प्रत

अकुशल व्यक्ती/महिला अर्जदारांसाठी (रिक्रूटिंग एजंटद्वारे) -

  • रोजगार कराराच्या प्रती, विदेशी नियोक्त्याकडून मागणी पत्र आणि मुखत्यारपत्र, संबंधित भारतीय मिशनद्वारे प्रमाणित

  • पीओई जारी केलेल्या नोंदणी प्रमाणपत्राची प्रत.

ECR नसलेल्या देशांमध्ये स्थलांतरित होणारे अर्जदार

  • निवासी स्थिती, रोजगार करार किंवा दीर्घकालीन व्हिसासाठी किंवा इमिग्रेशनसाठी अर्ज करण्याचा कागदोपत्री पुरावा.

  • जुना पासपोर्ट त्याच्या पहिल्या दोन आणि शेवटच्या दोन पेजच्या स्वयं-प्रमाणित फोटोकॉपीसह, निरीक्षण पेज आणि ECR /Non-ECR पेज

  • विद्यमान निवासाचा पुरावा

पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेटसाठी ऑनलाइन अर्ज करताना नमूद कागदपत्रे हातात ठेवा. हे संपूर्ण प्रक्रिया सहज करण्यात मदत करेल, आणि महत्त्वपूर्ण वेळ वाचवेल.

पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेटची स्थिती कशी तपासायची?

या स्टेप्स तुम्हाला पीसीसी स्थिती तपासण्यास मदत करतील.

  1. पासपोर्ट सेवा पोर्टल ला भेट द्या आणि “ट्रॅक अॅप्लिकेशन स्टेटस” वर क्लिक करा.

  2. पासपोर्ट, पीसीसी, आयसी आणि जीईपी पर्यायांमधून तुमचा अर्ज प्रकार निवडा.

  3. तुमचा 13-अंकी फाइल क्रमांक आणि जन्मतारीख एंटर करा आणि "ट्रॅक स्टेटस" वर क्लिक करा.

  4. ही स्टेटस ट्रॅकर स्क्रीन तुमच्या पासपोर्ट अर्जाचा अपडेटेड स्टेटस दाखवेल.

अशाप्रकारे आपण भारतातील पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट मिळवण्याची प्रक्रिया जाणून घेतली आहे. अर्ज करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा आणि विना त्रास अपडेटेड स्थिती तपासा.

भारतात पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट प्रक्रियेसाठी किती वेळ लागतो?

भारतातील पोलीस अधिकाऱ्यांकडून 'स्पष्ट' अहवाल मिळाल्यानंतरच तुम्हाला पीसीसी मिळू शकते. तुम्ही अधिकृत पोर्टलवर संबंधित पासपोर्ट कार्यालयाने केलेले पीसीसी स्टेटस तपासू शकता.

सहसा, या प्रक्रियेस 1 महिना. लागू शकतो. मात्र, अर्ज आणि पोलीस स्टेशननुसार यामध्ये बदल होऊ शकतो.

पोलीस क्लिअरन्स प्रमाणपत्राबाबत वारंवार विचारले जाणारे प्रश्न

माझ्या पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेटची स्थिती विचारण्यासाठी मी कॉल सेंटरशी संपर्क साधू शकतो का?

होय, तुम्ही पासपोर्ट सेवा कॉल सेंटरवर 1800-258-1800 वर कॉल करून तुमच्या अर्जाची स्थिती तपासू शकता. तुमच्या अर्जाची स्थिती तपासण्यासाठी तुम्ही कॉल सेंटर एक्झिक्युटिव्हशी बोलू शकता.

पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेटची वैधता काय आहे?

विशेष कारण नमूद न केल्यास पोलीस क्लिअरन्स प्रमाणपत्र जारी केल्याच्या तारखेपासून सहा महिन्यांसाठी वैध आहे.

पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेटसाठी दोनदा अर्ज करणे शक्य आहे का?

एक पीसीसी मिळाल्यानंतरच एखादी व्यक्ती दुसऱ्यासाठी अर्ज करू शकते. प्रथम पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेटचे पेमेंट पूर्ण केल्यानंतर एखादी संस्था पीसीसी साठी अर्ज करू शकते.