डिजिट इन्शुरन्स करा

पासपोर्टसाठी अर्ज कसा करावा: ऑनलाइन आणि ऑफलाइन प्रक्रिया स्पष्ट केली आहे

जर तुम्ही तीर्थयात्रा, कौटुंबिक भेटी, शिक्षण, पर्यटन आणि यासारख्या गोष्टींसाठी परदेशात जाण्याची योजना आखत असाल, तर पासपोर्ट हे आवश्यक वस्तूंच्या यादीतील सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे.

किंबहुना, प्रथमच भारताबाहेर प्रवास करणार्‍या व्यक्तींचा पासपोर्टसाठी ऑनलाइन अर्ज करण्याच्या प्रक्रियेमध्ये अनेकदा गोंधळ होऊ शकतो.

तुमचा गोंधळ होऊ नये, यासाठी तुम्हाला मार्गदर्शन करणारा हा परिपूर्ण लेख आहे.

वाचत राहा!

पासपोर्टसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा?

ऑनलाइन पासपोर्ट अर्जासाठी लागणाऱ्या तपशीलवार स्टेप्स पुढीलप्रमाणे -

  •  Step 1: अधिकृत पासपोर्ट सेवेच्या वेबसाइट वर जा, आणि स्वतःचे नाव नोंदवा.  तुम्ही तुमच्या सुरू असलेल्या अकाउंटद्वारे लॉग इन देखील करू शकता.
  • Step 2: आता, “Apply for Fresh Passport/ Re-issue of Passport” वर क्लिक करा. लक्षात घ्या, तुमच्याकडे सध्याचा भारतीय पासपोर्ट असल्यास तुम्ही "फ्रेश पासपोर्ट" साठी अर्ज करू शकत नाही.

  •  Step 3: अचूक तपशीलांसह पासपोर्ट ऑनलाइन अर्ज काळजीपूर्वक भरा, आणि "सबमिट" वर क्लिक करा.
  •  Step 4: आता मुख्य पेजवर परत जा, आणि "सेव्ह केलेले/सबमिट केलेले अर्ज पहा" निवडा.
  • Step 5: “सेव्ह/सबमिट केलेले अर्ज पाहून” “पे आणि शेड्यूल अपॉइंटमेंट” वर क्लिक करा.
  • Step 6: तुम्ही तुमच्या आवडीच्या पासपोर्ट सेवा केंद्रात भेटीची वेळ बुक करू शकता. त्यानंतर,ऑनलाइन पेमेंट किंवा ऑफलाइन पेमेंट करण्यासाठी पुढील प्रक्रिया करा. 

ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, तुम्ही ‘प्रिंट अॅप्लिकेशन रिसीप्ट’ वर क्लिक करून तुमच्या अर्जाच्या संदर्भ क्रमांकासह अर्जाच्या पावतीची एक प्रत डाउनलोड करू शकता.

तुम्हाला अपॉइंटमेंट तपशीलांसह एक एसएमएस प्राप्त होईल. नियोजित तारखेला पासपोर्ट सेवा केंद्राला तुम्ही भेट दिल्याचा पुरावा म्हणून हा एसएमएस तुमच्या जवळ राहील.

भेट द्यायला जाताना तुमची ओळख पटण्यासाठी सगळे ओरिजिनल कागदपत्र आणायला विसरू नका.

पासपोर्ट अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

कोणत्याही त्रासाशिवाय नवीन पासपोर्टचा अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे -

  • सध्याच्या पत्त्याचा पुरावा, जो खालीलपैकी कोणताही असू शकतो -

• कोणतीही उपयुक्तता बिले.

• आयकर मूल्यांकन आदेश, निवडणूक आयोगाचा फोटो आयडी

• आधार कार्ड, भाडे करार.

• अल्पवयीन मुलांच्या संबंधित असल्यास पालकांच्या पासपोर्टची प्रत (पहिले आणि शेवटचे पान)

  •    जन्मतारखेचा पुरावा जो खालीलपैकी कोणताही असू शकतो -

• जन्म आणि मृत्यू रजिस्टार किंवा महानगरपालिका किंवा अन्य विहित प्राधिकरणाने जारी केलेले जन्म दाखला प्रमाणपत्र. 

• आधार कार्ड

• मतदार ओळखपत्र

• आयकर विभागाने जारी केलेले पॅन कार्ड

 

 कोणत्याही Non-ECR (previously ECNR) श्रेणीसाठी कागदोपत्री पुरावा.

पासपोर्ट अर्ज फी

पासपोर्ट अर्ज करण्यासाठी लागणाऱ्या ऑनलाइन किंवा ऑफलाइन फी बद्दल सांगणारा टेबल खालीलप्रमाणे -

सेवा अ‍ॅप्लिकेशन फी तात्काळ अ‍ॅप्लिकेशन फी
10 वर्षांची वैधता असलेली व्हिसा पेजेस (36 पेज) संपल्यास अतिरिक्त पुस्तिकेसह नवीन पासपोर्ट/पासपोर्ट पुन्हा जारी करणे. 1500 रुपये 2000 रुपये
10 वर्षांची वैधता असलेली व्हिसा पेजेस (60 पेज) संपल्यास अतिरिक्त पुस्तिकेसह नवीन पासपोर्ट/पासपोर्ट पुन्हा जारी करणे. 2000 रुपये 2000 रुपये
नवीन पासपोर्ट/अल्पवयीन (18 वर्षांखालील) अर्जदारांसाठी (36 पानी) पासपोर्ट पुन्हा जारी करणे, यासाठी 5 वर्षांची वैधता किंवा अल्पवयीन 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत, यापैकी जे आधी असेल  1000 रुपये 2000 रुपये
हरवलेल्या, खराब झालेल्या किंवा चोरीला गेलेल्या पासपोर्टच्या बदल्यात पासपोर्ट बदलणे (36 पेज) 3000 रुपये 2000 रुपये
हरवलेल्या, खराब झालेल्या किंवा चोरीला गेलेल्या पासपोर्टऐवजी पासपोर्ट तयार करून घेणे (60 पेज). 3500 रुपये 2000 रुपये
पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट (PCC) 500 रुपये शून्य 
ECR हटवण्यासाठी पासपोर्ट बदलणे (36 पेज) / वैयक्तिक तपशीलांमध्ये बदल (10 वर्षांची वैधता) 1500 रुपये 2000 रुपये
ECR हटवण्यासाठी पासपोर्ट बदलणे (60 पेज) / वैयक्तिक तपशीलांमध्ये बदल (10 वर्षांची वैधता) 2000 रुपये 2000 रुपये
ECR हटवण्यासाठी पासपोर्ट बदलणे (36 पेज) / अल्पवयीन (18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या), 5 वर्षांची वैधता किंवा अल्पवयीन 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत वैयक्तिक तपशीलांमध्ये बदल, यापैकी जे आधी असेल. 1,000 रुपये 2,000 रुपये

पासपोर्ट अर्ज प्रक्रियेची वेळ

पासपोर्ट अर्ज भरताना अर्जदाराने नमूद केलेल्या पत्त्यावर स्पीड पोस्टद्वारे पासपोर्ट पाठवण्याचे काम भारतीय पोस्ट विभागाद्वारे केले जाते.

सामान्य पासपोर्ट अर्जदारांसाठी प्रक्रिया वेळ 30 ते 45  दिवस आहे.  तथापि, तत्काळ मोड अंतर्गत केलेल्या अर्जांसाठी पासपोर्ट अर्जाची वेळ 7 ते 14 दिवस आहे.

भारतीय पोस्ट विभागाच्या स्पीड पोस्ट पोर्टलवर उपलब्ध असलेल्या ट्रॅकिंग युटिलिटी वैशिष्ट्यावर जाऊन तुम्ही डिलिव्हरी स्थितीचा मागोवा घेऊ शकता.

पासपोर्ट अर्जासाठी पात्रता आवश्यकता

सहज व सोप्या पासपोर्ट अर्ज प्रक्रियेसाठी व्यक्तींनी खालील पात्रता निकष पूर्ण केले पाहिजेत -

  • 18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे भारतीय नागरिक पासपोर्टसाठी अर्ज करू शकतात.

  •  18 वर्षाखालील मुले 5 वर्षांसाठी किंवा 18 वर्षांची होईपर्यंत वैध असलेल्या पासपोर्टसाठी अर्ज करू शकतात.

  •  15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना 10 वर्षांचा वैध पासपोर्ट मिळू शकतो.  पालक त्यांच्या मुलांसाठी पासपोर्ट देखील निवडू शकतात, जो पाल्य 18 वर्षांचा होईपर्यंत वैध असतो.

पासपोर्टची वैधता आणि कालबाह्यता

तुमचा नवीन पासपोर्ट किती काळ वैध असेल? असा प्रश्न तुम्हाला पडत असेल, तर थोडक्यात जाणून घेऊ.

 सामान्य पासपोर्टमध्ये साधारणपणे 36/60 पेज असतात आणि तो जारी केल्याच्या तारखेपासून 10 वर्षांसाठी वैध असतो.

  • 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या अर्जदारांसाठी, पासपोर्टची वैधता 5 वर्षे आहे.

  • 15-18 वयोगटातील अल्पवयीन, 10 वर्षांच्या वैध पासपोर्टची निवड करू शकतात.  शिवाय, ते 18 वर्षांचे होईपर्यंत वैध असलेल्या पासपोर्टचा पर्याय निवडू शकतात.

  • आता तुम्हाला पासपोर्टसाठी ऑनलाइन अर्ज करण्याच्या विविध आवश्यकतांची जाणीव झाली आहे, आता अर्ज प्रक्रियेसह पुढे जा.

लक्षात घ्या की, तुम्हाला तुमच्या पासपोर्टची तातडीने गरज असल्यास, तुम्ही जवळच्या RPO कडे त्याचे कारण सांगणारा अर्ज सबमिट करू शकता.  त्यानंतर प्रादेशिक अधिकारी तुमची विनंती लक्षात घेऊन त्याची वितरण वेळ ठरवतील.

पासपोर्टसाठी अर्ज कसा करावा? याबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न

पेमेंट केल्यानंतर मी पासपोर्ट अर्जासाठी अपॉइंटमेंट पुन्हा शेड्यूल करू शकतो का?

होय, सुरुवातीच्या भेटीच्या तारखेपासून तुम्ही तुमची भेट वर्षभरात दोनदा पुढे ढकलू शकता.

पासपोर्ट अर्जांसाठी ऑनलाइन पेमेंटच्या उपलब्ध पद्धती कोणत्या आहेत?

अपॉइंटमेंट शेड्यूल करण्यासाठी ऑनलाइन पेमेंटच्या  उपलब्ध पद्धती खालीलप्रमाणे आहेत -

  •  एसबीआय वॉलेट  
  • एसबीआय बँक चलन
  •  क्रेडिट/डेबिट कार्ड (व्हिसा आणि मास्टरकार्ड)
  • इंटरनेट बँकिंग (एसबीआय आणि इतर बँका)

तत्काळ पासपोर्टसाठी टर्नअराउंड वेळ किती आहे?

पोलीस पडताळणी अहवालाची वाट न पाहता, तुमचा पासपोर्ट "मंजूर" या अंतिम स्थितीसह तुमचा अर्ज यशस्वीरीत्या सबमिट केल्यानंतर तिसऱ्या कामकाजाच्या दिवशी पाठवला जाईल.