भारतातील डिप्लोमॅटिक पासपोर्ट
डिप्लोमॅटिक पासपोर्ट राजनैतिक किंवा सरकारी कर्तव्यांसाठी परदेशात प्रवास करणाऱ्या अधिकाऱ्याला दिला जातो. यामध्ये, व्यक्तींना “Type D” पासपोर्ट मिळतात, जे लाल रंगाच्या कव्हरमध्ये येतात. हे गडद निळ्या कव्हरच्या सामान्य पासपोर्टपेक्षा वेगळे आहे, आणि सामान्य नागरिकांसाठी (व्हीआयपी रहिवाशांसह) लागू आहे.
या अधिकृत पासपोर्टबद्दल अधिक जाणून घेऊ इच्छिता? या लेखात डिप्लोमॅटिक पासपोर्ट म्हणजे काय? यासंबंधी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या.
डिप्लोमॅटिक पासपोर्ट कोण मिळवू शकतो?
"डिप्लोमॅटिक पासपोर्टसाठी कोण पात्र आहे?" हे जाणून घेण्यासाठी खालील यादी नीट वाचा-
परदेशात प्रवास करणारे भारतीय परराष्ट्र सेवा (वर्ग अ) चे अधिकारी.
परराष्ट्र मंत्रालयातील अधिकारी आणि भारतीय परराष्ट्र सेवा (वर्ग ब ) मधील निवडक अधिकारी जे अधिकृत कर्तव्यांसाठी परदेशात प्रवास करत आहेत.
जेव्हा अवलंबून असणारे पालक, अपत्ये, जोडीदार किंवा अधिकृत परिचारिका पात्र अधिकाऱ्यासोबत परदेशात प्रवास करत असतात. यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने अवलंबून असलेल्या व्यक्तीची स्थिती ओळखणे आवश्यक आहे.
वर नमूद केलेल्या कुटुंबातील सदस्यांना त्यांच्या निवासी देशाव्यतिरिक्त वेगळ्या देशात शैक्षणिक आणि इतर कारणांसाठी डिप्लोमॅटिक पासपोर्ट देखील मिळू शकतो.
राजनैतिक दर्जा असलेल्या व्यक्ती.
परदेशात प्रवास करण्यासाठी भारत सरकारने नियुक्त केलेले अधिकारी.
भारतातील डिप्लोमॅटिक पासपोर्ट काय आहे, आणि त्याची पात्रता याबद्दल तुम्हला उत्तर मिळाले? आता, त्यासाठी अर्ज कसा करायचा, ते जाणून घेऊया.
डिप्लोमॅटिक पासपोर्ट कसा मिळवायचा?
डिप्लोमॅटिक पासपोर्टसाठी अर्ज फक्त कॉन्सुलर, पासपोर्ट आणि व्हिसा, विभाग, नवी दिल्ली येथे करण्यासाठी परवानगी आहे. तथापि, तुम्ही तुमच्या जवळच्या पासपोर्ट कार्यालयातही डिप्लोमॅटिक पासपोर्टसाठी अर्ज करू शकता.
जर तुम्ही डिप्लोमॅटिक पासपोर्टसाठी अर्ज कसा करायचा, ते शोधत असाल तर सोप्या स्टेप्स फॉलो करा.
पासपोर्ट सेवा पोर्टल वर स्वतःची नोंदणी करा.
एकदा तुम्ही सेवा पोर्टलवर अकाउंट तयार केल्यानंतर, तुमचा वापरकर्ता आयडी आणि पासवर्डसह लॉग इन करा.
“डिप्लोमॅटिक/ऑफिशियल पासपोर्टसाठी अर्ज करा” लिंक निवडा.
तुमचे नाव, कुटुंब तपशील इत्यादी संबंधित तपशीलांसह फॉर्म भरा.
“पहा/सबमिट केलेला फॉर्म प्रिंट” लिंक निवडा आणि अर्जाची प्रिंट आउट घ्या.
कॉन्सुलर ऑफिस, नवी दिल्लीला भेट देताना हा छापलेला अर्ज आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे सोबत ठेवा. अन्यथा, तुमच्या जवळच्या पासपोर्ट कार्यालयाच्या भेटीदरम्यान हा अर्ज व कागदपत्रे आवश्यक आहेत
डिप्लोमॅटिक पासपोर्टसाठी आवश्यक कागदपत्रे:
तुम्हाला खालील कागदपत्रांची एक प्रत सबमिट करणे आवश्यक आहे -
तुमचे अधिकृत ओळखपत्र.
फॉरवर्डिंग ऑफिसरकडून अधिकृत पत्र सबमिट करा.
कार्यालय प्रमुखाचे प्रमाणपत्र.
राजकीय मंजुरी प्रमाणपत्र, असल्यास सबमिट करा.
मूळ डिप्लोमॅटिक पासपोर्ट.
तुमचा मूळ डिप्लोमॅटिक पासपोर्ट परराष्ट्र मंत्रालयाच्या सुरक्षित ताब्यात असल्यास, मूळ सुरक्षित कस्टडी किंवा सरेंडर प्रमाणपत्र सोबत ठेवा.
परराष्ट्र मंत्रालयाने सुरक्षित कस्टडी किंवा सरेंडर प्रमाणपत्र रद्द केल्यास, मूळ रद्द प्रमाणपत्र सादर करा.
अर्ज केल्याच्या तारखेपासून 6 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत निवृत्त होणार्या डिप्लोमॅट्सनी त्यांच्या कार्यालयाकडून हमीपत्र सादर करणे आवश्यक आहे. हे निर्दिष्ट करते की, ते अधिकृत दौर्यावरून परतल्यानंतर पासपोर्ट त्यांच्या कार्यालयात जमा करतील.
टीप: तुम्ही खालील क्रमाने कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे -
अर्जाची प्रिंट
राजकीय मंजुरी प्रमाणपत्र
ओळखपत्राची प्रत
कार्यालय प्रमुखाने जारी केलेले प्रमाणपत्र
फॉरवर्डिंग ऑफिसरकडून विनंती पत्र
- इतर महत्वाची कागदपत्रे
सामान्य आणि डिप्लोमॅट पासपोर्टमध्ये काय फरक आहे?
दोघांमधील फरकाबद्दल तुम्हाला हे माहित असणे आवश्यक आहे -
पॅरामीटर्स | सामान्य पासपोर्ट | तत्काळ पासपोर्ट |
अर्थ | हा पासपोर्ट व्हीआयपी व्यक्तींसह सर्वसामान्य नागरिकांना दिला जातो. पासपोर्ट पुस्तिका 30-60 पृष्ठांसह येते. | ते उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना दिले जाते पासपोर्ट पुस्तिका 28 पृष्ठांसह येते. |
वैधता | प्रौढ - 10 वर्षे, अल्पवयीन - 5 वर्षे | 5 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी कालावधीसाठी जारी |
वापर | हा पासपोर्ट वैयक्तिक किंवा व्यावसायिक प्रवासासाठी वापरला जातो. त्यात सरकारचा सहभाग नाही. | अधिकारी या पासपोर्टचा वापर भारत सरकारच्या अधिकृत कर्तव्यासाठी परदेशात जाण्यासाठी करतात. |
सतत विचारले जाणारे प्रश्न
तुमच्याकडे भारतात डिप्लोमॅटिक पासपोर्ट असला तर तुम्ही नवीन सामान्य पासपोर्टसाठी अर्ज करू शकता का?
होय तुमच्याकडे डिप्लोमॅटिक पासपोर्ट असला तरीही तुम्ही नवीन सामान्य पासपोर्टसाठी अर्ज करू शकता. पत्ता, जन्मतारीख पुरावा आणि सरेंडर प्रमाणपत्र सबमिट करा.
डिप्लोमॅटिक पासपोर्टसाठी अर्ज करण्यासाठी किती फी लागते?
डिप्लोमॅटिक पासपोर्टसाठी अर्ज करण्यासाठी कोणतीही फी लागत नाही.
डिप्लोमॅटिक पासपोर्ट अर्जाच्या प्रक्रियेसाठी किती वेळ लागतो?
डिप्लोमॅटिक पासपोर्टसाठी तुमच्या अर्जावर प्रक्रिया होण्यासाठी अंदाजे ३ ते ५ कामकाजाचे दिवस लागतात.