Third-party premium has changed from 1st June. Renew now
बाईकसाठी कॅशलेस इन्शुरन्सबद्दल सविस्तरपणे माहिती
आपल्या देशाची लोकसंख्या 133.92 कोटी आहे. प्रचंड हा फक्त एक शब्द असेल परंतु ही प्रचंड संख्या समाजातील वेगवेगळ्या पार्श्वभूमी आणि घटकांमधून बनते.
तसेच जर तुम्हाला लोकांच्या गतिशीलतेबद्दल आश्चर्य वाटले, तर तुम्हाला रेंगाळत चाललेली रहदारी, असंख्य डोकी आणि सर्वत्र वाहनांनी भरलेले रस्ते दिसू शकतात. दुचाकी वाहनांची विशेषत: बाईक्सची संख्या जास्त असते. कारण गाडी चालवणे सोयीस्कर असते, देखभाल करणे सोपे असते आणि वाजवी किमतीत उपलब्ध असते.
मोटार वाहन कायदा, 1988 नंतर, तुमच्या वाहनासाठी थर्ड-पार्टी इन्शुरन्स कव्हर खरेदी करणे अनिवार्य आहे. सर्वसाधारणपणे बाजारातील इन्शुरन्स कंपन्या दोन प्रकारच्या मोटार पॉलिसी ऑफर करतात. एक कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स आणि थर्ड पार्टी लायॅबिलिटी इन्शुरन्स.
जर तुमच्याकडे वाहन असेल आणि ते तुमच्या कामासाठी तुम्ही रस्त्यावर चालवणार असाल, तर इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे.
कॅशलेस बाईक इन्शुरन्स म्हणजे काय?
अपघातानंतर, माणूस सुविधेच्या आणि इन्शुरन्स असिस्टन्सच्या शोधात असतो, ज्यामुळे इन्शुरन्स कंपनीशी जोडल्या गेलेल्या कोणत्याही टू-व्हीलर गॅरेजमध्ये बाईक दुरुस्त करणे त्यांना शक्य होईल. ज्यावेळी पॉलिसीधारकाला त्यांच्या खिशातून एक पैसाही खर्च करावा लागत नाही आणि इन्शुरन्स कंपनी सर्व दुरुस्ती बिलांसाठी पैसे अदा करेल तेव्हा तो कॅशलेस बाईक इन्शुरन्स बनतो. क्लेमच्या वेळी या कव्हरचा फायदा घेऊ शकता.
कॅशलेस बाईक इन्शुरन्स किती उपयुक्त आहे, याच्या तपशीलात जाण्यापूर्वी, मोटार इन्शुरन्स पॉलिसी अंतर्गत प्रत्येक प्रकारच्या कव्हरकडे तपशीलवार पाहूया.
- कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स पॉलिसी: एक मोटार पॉलिसी ज्यात तुम्ही स्वत:साठी, तुमच्या दुचाकीसाठी आणि थर्ड-पार्टीसाठी कव्हर खरेदी करणे निवडता त्याला कॉम्प्रिहेन्सिव्ह बाईक इन्शुरन्स पॉलिसी म्हणतात. अपघात, आग, चोरी, नैसर्गिक आपत्ती आणि आपल्या नियंत्रणाखाली नसलेल्या इतर तत्सम घटनांच्या वेळी हे आपले संरक्षण करेल.
- थर्ड पार्टी लायॅबिलिटी पॉलिसी: थर्ड पार्टी बाईक इन्शुरन्स हा अपघातात सहभागी असलेल्या थर्ड पार्टीला संरक्षण देतो. त्यांना शारीरिक इजा आणि मालमत्तेचे नुकसान होऊ शकते. जर इन्शुअर्ड व्यक्तीची किंवा वाहन मालकाची चूक असेल, तर तिला/त्याला कायदेशीर आणि वैद्यकीय मदतीच्या खर्चासाठी पैसे देण्यास जबाबदार धरले जाते.
- तपासा : थर्ड पार्टी किंवा कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी प्रीमियम कॅल्क्युलेट करण्यासाठी बाईक इन्शुरन्स कॅल्क्युलेटरचा वापर करा.
कॅशलेस बाईक इन्शुरन्स - संपूर्ण सुस्पष्ट माहिती
कॅशलेस सुविधेचा वापर करण्यासाठी कॅशलेस बाईक इन्शुरन्सची सगळी स्पष्ट माहिती जाणून घेणे शहाणपणाचे ठरेल. कॅशलेस इन्शुरन्स सुविधा कशी कार्य करते हे समजून घेणे महत्वाचे आहे. इन्शुरन्स कंपनी निवडक गॅरेजशी करार करते जे उत्कृष्ट सेवा आणि दुरुस्ती मदत प्रदान करतात. क्लेमच्या वेळी, विमाधारकाला विशिष्ट गॅरेजला भेट देण्याचे निर्देश दिले जातात आणि दुरुस्ती करून घ्यायला सांगितले जाते. त्यानंतर गॅरेज प्रतिनिधी दुरुस्तीची बिले इन्शुरन्स कंपनीकडे पाठवेल. विमाधारक म्हणून, तुम्ही इन्शुरन्स कंपनीला नुकसान/ अपघाताच्या स्वरूपाबद्दल तपशीलवार माहिती दिली पाहिजे. सर्व तपशीलांच्या पडताळणीनंतर, इन्शुरन्स कंपनी पॉलिसीमध्ये नमूद केलेल्या मर्यादेनुसार पेमेंट मंजूर करेल.
कॅशलेस बाईक इन्शुरन्ससाठी क्लेम कसा करावा?
जर तुम्ही डिजिट इन्शुरन्स घेतला असेल तर कॅशलेस बाईक इन्शुरन्सचा क्लेम करण्यासाठीची टप्प्याटप्प्याने करण्याची प्रक्रिया येथे दिली आहे.
- स्टेप 1: इन्शुरन्स कंपनीच्या अर्जाद्वारे इन्शुरन्स कंपनीला ऑनलाइन किंवा स्मार्टफोनद्वारे कळवा.
- स्टेप 2: 1800-258-5956. या क्रमांकावर फोन करा. क्लेम करणाऱ्याला त्यावर एक लिंक मिळेल.
- स्टेप 3: या सेल्फ-इन्स्पेक्शन लिंकवर क्लिक करा आणि बाईकला झालेल्या नुकसानीपर्यंत पोहोचवा. आम्हाला तपशील पाठवा.
- स्टेप 4: इन्शुरन्स कंपनीच्या नेटवर्कमधील गॅरेजच्या यादीतील एका गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी बाईकला नया. गॅरेज प्रतिनिधी इन्शुरन्स कंपनीला बिले पाठवेल.
- स्टेप 5: विमाधारक डिजिट इन्शुरन्स कंपनीकडून रिएम्बर्समेंटचा क्लेम करू शकतो.
कॅशलेस बाईक इन्शुरन्स क्लेमसाठी आवश्यक कागदपत्रे
डिजिटमध्ये कोणत्याही कागदपत्रांची गरज नाही. सर्व क्लेम्स स्मार्टफोन-एनेबल्ड आहेत किंवा ऑनलाइन विनंती केली जाऊ शकते. ही प्रक्रिया जलद आणि पूर्णपणे पेपरलेस आहे.
कॅशलेस बाईक इन्शुरन्सबद्दल जाणून घ्याव्यात अशा काही गोष्टी
जर तुम्ही कॅशलेस बाईक इन्शुरन्सचा पर्याय निवडलात, तर तुम्हाला खात्री आहे की क्लेमच्या वेळी होणारा सर्व खर्च इन्शुरन्स कंपनीद्वारे भरला जाईल. परंतु बाईक इन्शुरन्सबद्दल तुम्हाला अधिक काय माहित असणे आवश्यक आहे ते येथे आहे:
·कधीकधी कॅशलेस सुविधा मिळणे कठीण होते. अशा परिस्थितीत आपण बाईक दुरुस्त करून त्यासाठी पैसे देऊ शकता. नंतर गॅरेजमधून सर्व बिले गोळा करून ती इन्शुरन्स कंपनीकडे जमा करा. ते तुम्हाला सर्वेक्षणकर्त्याच्या अहवालानुसार रक्कम रिएम्बर्स करतील.
·दुचाकीचे सर्व भाग इन्शुरन्सखाली कव्हर केलेले नाहीत. तुम्हाला या भागांची माहिती असणे आवश्यक आहे आणि दुरुस्ती प्रक्रियेची वाट पाहू नका. विमाधारकाला अशा भागांच्या खर्चासाठी पैसे द्यावे लागतील.
कॅशलेस बाईक इन्शुरन्स सुविधा बऱ्याच इन्शुरन्स कंपन्यांद्वारे सोयीस्कर आणि सुलभरित्या केली जाते. निवड करण्यापूर्वी तुम्ही पर्यायांची चांगली तुलना केली तर ते योग्य ठरेल.