टीव्हीएस (TVS) ज्यूपिटर इन्श्युरन्स

टीव्हीएस (TVS) ज्यूपिटर इन्श्युरन्स पॉलिसी सुरू होते फक्त ₹714 पासून

Third-party premium has changed from 1st June. Renew now

टीव्हीएस ज्युपिटर इन्श्युरन्स ऑनलाइन खरेदी/रिन्यू करा

तुमच्या रोजच्या येण्याजाण्यासाठी तुमच्या बजेटमध्ये बसणारी सर्वात चांगल्या स्कूटरच्या शोधात आहात? टीव्हीएस ज्युपिटरबद्दल विचार केलात का ? टीव्हीएस स्कूटर इतकी लोकप्रिय का आहे हे आणि टीव्हीएस ज्युपिटरसाठी विमा पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी कोणत्या गोष्टींची माहिती घ्यायला हवी त्या जाणून घ्या.

टीव्हीएस मोटर कंपनीच्या परवडणाऱ्या स्कूटर्सपैकी एक आहे ज्युपिटर. 1978 मध्ये स्थापन झालेली टीव्हीएस ही भारतात कार्यरत असलेली तिसरी सर्वात मोठी मोटारसायकल उत्पादक कंपनी आहे. मे 2019 मध्ये कंपनीने 3 लाख युनिट्सपेक्षा जास्त विक्री केली. (१)

या ब्रँडमधील टीव्हीएस ज्युपिटर विशेष लोकप्रिय वाहन आहे. ती मर्यादित बजेमध्ये प्रभावी कामगिरी देते. ऑक्टोबर २०१९ मधल्या एका सर्वेक्षणानुसार, ज्युपिटर ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक विकली जाणारी स्कूटर आहे. केवळ त्या एकाच महिन्यात टीव्हीएसने भारतातील ग्राहकांना 74,500 हून अधिक टीव्हीएस ज्युपिटर स्कूटर्स विकण्यात यश मिळवले. (२)

आता तुम्ही टीव्हीएस ज्युपिटर खरेदी करण्याचे ठरवले आहे तर अपघात, आग, नैसर्गिक आपत्ती इत्यादींमुळे आपल्या स्कूटरचे काही नुकसान झाले तर आर्थिक नुकसानापासून संरक्षण करण्याबद्दलही विचार करणे आवश्यक आहे.

त्यामुळे आता यापुढची पायरी म्हणजे अश्या परिस्थितीत आर्थिक नुकसान टाळण्यासाठी टीव्हीएस ज्युपिटर इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करणे.

शिवाय, मोटार वाहन अधिनियम, 1988 नुसार किमान थर्ड पार्टी टू व्हीलर इन्श्युरन्स  घेणे केवळ फायद्याचे आहे असे नाही तर अनिवार्यदेखील आहे. जर तुम्ही तुमच्या वाहनाला योग्य कव्हरेज घेतले नाहीत तर तुम्हाला 2,000 ते 4,000 रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. त्यामुळे न चुकता तुम्ही इन्श्युरन्स घेण्याची खात्री करा.

टीव्हीएस ज्युपिटर इन्श्युरन्समध्ये काय समाविष्ट आहे

तुम्ही डिजिटचा टीव्हीएस ज्युपिटर इन्श्युरन्सच का घ्यावा?

टीव्हीएस ज्युपिटरसाठी विमा योजनांचे प्रकार

थर्ड पार्टी कॉम्प्रिहेन्सिव्ह

अपघातामुळे स्वतःच्या स्कूटरचे नुकसान

×

आगीमुळे स्वतःच्या स्कूटरचे नुकसान

×

नैसर्गिक आपत्तीमुळे स्वतःच्या स्कूटरचे नुकसान

×

थर्ड पार्टीच्या वाहनाचे नुकसान

×

थर्ड पार्टीच्या मालमत्तेचे नुकसान

×

वैयक्तिक अपघातासाठी कव्हर

×

थर्ड पार्टी व्यक्ती जखमी होणे/मृत्यू पावणे

×

तुमची स्कूटर किंवा बाइक चोरी होणे

×

तुमचे आयडीव्ही (IDV) कस्टमाइझ करा

×

कस्टमाइज्ड अ‍ॅड-ऑन्ससह अतिरिक्त संरक्षण

×
Get Quote Get Quote

सर्वसमावेशक आणि थर्ड पार्टी टू व्हीलर इन्श्युरन्समधील फरक  काय आहे त्याबद्दल अधिक समजून घ्या

क्लेम कसा दाखल करावा?

आमच्याकडून टू व्हीलर इन्श्युरन्स प्लॅन घेतल्यानंतर किंवा रिन्यू केल्यानंतर सर्व टेन्शन विसरून जा, कारण आमच्याकडे आहे 3-स्टेप, पूर्णपणे डिजिटल क्लेम प्रक्रिया!

स्टेप 1

फक्त १८००-२५८-५९५६ वर कॉल करा. कोणतेही फॉर्म भरायची गरज नाही.

स्टेप 2

तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर सेल्फ-इन्सपेक्शनसाठी लिंक मिळवा. तुमच्या स्मार्टफोनने तुमच्या वाहनाचे झालेले नुकसान मार्गदर्शनाप्रमाणे टप्प्याटप्प्याने शूट करा.

स्टेप 3

परतावा किंवा आमच्या गॅरेजच्या नेटवर्कंधून कॅशलेस यांपैकी तुम्हाला हव्या असलेल्या मार्गाने दुरुस्ती करून घ्या.

डिजिटचे इन्श्युरन्स क्लेम्स किती वेगाने निकाली काढले जातात? तुम्ही तुमची विमा कंपनी बदलू पाहत असाल तर हा प्रश्न सर्वप्रथम तुमच्या मनात आला पाहिजे. म्हणजे तुम्ही योग्य दिशेने विचार करत आहात! डिजिटचे क्लेम्स रिपोर्ट कार्ड वाचा

टीव्हीएस ज्युपिटरचा संक्षिप्त आढावा

टीव्हीएसने २०१३ मध्ये ज्युपिटरचा शुभारंभ केला. पुढील सात वर्षांत ज्युपिटरने भारतातील स्कूटर मार्केटवर जादूच केली. दरवर्षी हे मॉडेल विक्रीच्या आकडेवारीची नवीन उंची गाठण्यात यशस्वी होते आहे.

टीव्हीएस ज्युपिटरबद्दल तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे अशी काही मनोरंजक वस्तुस्थिती:

  • ज्युपिटरला एक ११० सीसी सिलिंडर असून तिचे इंजिन फोर स्ट्रोक आहे. भारतातील परवडणाऱ्या वाहनांमधे मायलेज किंवा इंधन कार्यक्षमता हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. सुदैवाने टीव्हीएस ज्युपिटर एका लिटरमध्ये 49 किमी चालण्याचे आश्वासन देते. बेस्ट-इन-क्लास मॉडेलचे 62 किमी पीएलचे मायलेज देते.
  • याच्या अंतर्गत वैशिष्ट्यांव्यतिरिक्त बाह्य बांधणीची गुणवत्तादेखील खूपच प्रभावित करणारी आहे. याचे डिझाइन साधे असले तरी मनमोहक दिसते आणि प्रभावी आहे. त्याशिवाय याच्या बॉडीचे मटेरियल इतके टिकाऊ आहे की त्यावर लहानसहान धककयांनी पोचे पडणार नाहीत.
  • ग्राहकांना आजवर मिळालेल्या विविध पुरस्कारांमुळे या स्कूटरच्या लोकप्रियतेचा अंदाज येईल. २०१४ मध्ये एनडीटीव्ही कार आणि बाईक अवॉर्ड्समध्ये टीव्हीएस ज्युपिटर व्ह्यूअर्स चॉइस २-व्हीलर ऑफ द इयर हा पुरस्कार मिळवणारी पहिली स्कूटर ठरली.
  • या स्कूटरच्या मॉडेलला लाँच झाल्यापासून पाच वेगवेगळ्या स्त्रोतांकडून स्कूटर ऑफ द इयर पुरस्कारही मिळाला आहे.

तुमच्या लक्षात आलेच असेल की टीव्हीएस ज्युपिटर घेणे ही एक अभिमानाची बाब आहे. त्यामुळे तुम्ही यातील तुमच्या गुंतवणुकीचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक तो खर्च करून काळजी घेतली पाहिजे.

तुमच्या स्कूटरचे अपघातात नुकसान झाले तर किंवा अपघातामुळे त्यातील इतर पार्टीजचे नुकसान झाले तर त्याचा परतावा मिळवण्याचा एकमेव मार्ग आहे ज्युपिटर इन्श्युरन्स घेणे.

अशा पॉलिसीची किंमत तुमच्या स्कूटरच्या इंजिनची क्षमता, ती किती जुनी आहे यावर आणि इतर अनेक घटकांवर अवलंबून असते. शिवाय, इन्श्युरन्स कंपनी तुमच्या स्कूटरच्या मॉडेलमध्ये अद्ययावत सेफ्टी फीचर्स समाविष्ट आहेत की नाही हे देखील तपासते.

तुमच्या मनात इन्श्युरन्स कंपनीबद्दल गोंधळ आहे का? मग तुम्ही डिजिटचा विचार का करत नाही?

टीव्हीएस ज्युपिटर इन्शुरन्ससाठी डिजिटचीच निवड का?

अतिशय कमी कालावधीत डिजिटने इन्श्युरन्स कंपन्यांमध्ये स्वत:ची अग्रणी म्हणून ओळख बनवली आहे. इतर इन्श्युरन्स कंपनीज देतच नाहीत अशा सुविधा आणि पर्याय देऊन एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. डिजिट टू-व्हीलर इन्शुरन्स निवडण्याचे काही फायदे इथे दिले आहेत:

  • तुमच्या ज्युपिटर टू-व्हीलरसाठी कॅशलेस दुरुस्तीचा लाभ घेणे सोपे आहे – डिजिटच्या नेटवर्कमध्ये संपूर्ण भारतात हजारो हून अधिक गॅरेजेस आहेत. त्यामुळे जेव्हा तुमच्या स्कूटरला अपघात होतो तेव्हा तुम्ही कुठेही असलात तरी खिशातून एकही पैसा खर्च न करता तुम्ही सहज दुरुस्ती करून घेऊ शकता. जर तुम्ही नॉन-नेटवर्क गॅरेजमधून दुरुस्ती करून घेतली  तर आधी दुरुस्तीचा खर्च भरून तुम्हाला तुमच्या विमा कंपनीकडून त्याच्या परताव्यासाठी अर्ज करावा लागेल. खास करून  अपघाताच्या वेळी तुमच्याकडे निधी कमी असेल तर ही एक नकोशी कटकट आहे.
  • कमीत कमी कागदपत्रे आणि जलद क्लेम – डिजिट पॉलिसीधारकांना दावे दाखल करण्यासाठी गुंतागुंतीच्या प्रक्रिया करायला भाग पाडत नाही. तुम्ही  फक्त ऑनलाइन दावा दाखल करून् अल्पावधीतच आर्थिक मदत मिळवू शकता. नुकसान झाल्यानंतर लगेचच स्कूटरची दुरुस्ती करायची असते तेव्हा ही स्ट्रीमलाइण्ड प्रक्रिया फार सोयीची आहे. विशेषत: आमच्या स्मार्टफोन एनेबल्ड सेल्फ-इन्स्पेक्शनमुळे क्लेम करण्याची प्रक्रिया खूपच सोपी आणि अधिक कार्यक्षम होते. शिवाय डिजिट इन्शुरन्सचे क्लेम सेटलमेंटचे प्रमाण उच्च असल्याने तुमचा क्लेम नाकारला जाण्याची शक्यता कमी असते.
  • तुमच्या विशिष्ट गरजांना अनुकूल असे अनेक पॉलिसींचे पर्याय – तुम्ही निवडलेली विमा कंपनी तुमच्या वाहनाचे संरक्षण करण्यासाठी तुम्हाला योग्य पॉलिसी कव्हर निवडण्यासाठी पुरेसे पर्याय देत असणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने अनेक टू-व्हीलर इन्श्युरन्स प्लॅन्समुळे डिजिट बिनतोड आहे.
  • थर्ड-पार्टी टू-व्हीलर इन्श्युरन्स पॉलिसी – अश्या ज्युपिटर इन्श्युरन्स पॉलिसीज ज्या तुमच्या टीव्हीएस ज्युपिटरला अपघात झाल्यास थर्ड पार्टीला व्यक्ती, वाहन किंवा मालमत्तेच्या नुकसानीसाठी आर्थिक मदत देतात परंतु तुमच्या स्वत:च्या स्कूटरच्या दुरुस्तीचा खर्च त्यांच्या कव्हरमध्ये समाविष्ट होत नाही. अशी पॉलिसी थर्ड पार्टी लायॅबिलिटी कव्हर म्हणून ओळखली जाते.
  • कॉम्प्रिहेन्सिव्ह टू-व्हीलर इन्श्युरन्स पॉलिसी – थर्ड पार्टीचे नुकसान आणि तुमच्या स्वत:च्या वाहनाचे झालेले नुकसान या दोन्हींसाठी संरक्षण देणाऱ्या इन्श्युरन्स पॉलिसीला कॉम्प्रिहेन्सिव्ह टू-व्हीलर इन्श्युरन्स पॉलिसी म्हणतात. आग आणि इतर मानवनिर्मित आपत्तीं, शिवाय पूर, भूकंप इत्यादी नैसर्गिक आपत्तींमुळे तुमच्या वाहनाला नुकसान झाल्यासही अशा पॉलिसीज आर्थिक मदत देतात.

जर तुम्ही सप्टेंबर-2018 नंतर तुमची टीव्हीएस ज्युपिटर घेतली असेल तर तुम्ही तुमच्या स्कूटरसाठी  ओन डॅमेज कव्हर चा विचार करायला हवा. जर तुमच्याकडे आधीच थर्ड पार्टी लायॅबिलिटी इन्शुरन्स पॉलिसी असेल तर तुम्ही या स्टँडअलोन कव्हरचा लाभ घेऊ शकता आणि तुमच्या इन्श्युरन्स पोलिसीची व्याप्ती अधिक वाढवून तुमच्या स्वतःच्या स्कूटरसाठी आर्थिक संरक्षण मिळवू शकता. 

  • 24 X 7 कस्टमर केअर सेवा – चांगल्या इन्श्युरन्स कंपनीच्या सेवा ग्राहकांना सतत उपलब्ध असणे आवश्यक आहे. डिजिट खूप काळजीपूर्वक या संदर्भात ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करते. कंपनीची कस्टमर सर्व्हिस या उद्योगातल्या सर्वोत्तम सेवांपैकी एक आहे. डिजिट तुमच्या सर्व समस्यांचे जलद आणि विनात्रास समाधान करते. तुम्हाला एखादा प्रश्न असो किंवा क्लेम दाखल करायचा असो, डिजिटच्या कस्टमर असिसटन्स डिपार्टमेन्टला केवळ एक कॉल करायची गरज आहे.
  • नो क्लेम बोनस बेनिफिट्सचा लाभ घ्या - जर तुम्ही सुरक्षित ड्रायव्हिंग करत असाल आणि अपघात टाळू शकत असाल तर तुम्हाला दरवर्षी तुमचे इन्श्युरन्स कव्हर क्लेम करण्याची आवश्यकता लागणार नाही. दावामुक्त वर्षांसाठी डिजिट तुम्हाला विशिष्ट लाभ देते. प्रत्येक दावा न केलेल्या वर्षासाठी डिजिट तुम्हाला आकर्षक प्रीमियम सवलतीच्या स्वरूपात नो-क्लेम बोनस देते ज्यामुळे तुमच्या पॉलिसीची किंमत आणखी कमी होते. हा एनसीबी (NCB) लाभ दावा न केलेल्या वर्षांच्या संख्येनुसार कमाल 50% पर्यंत असू शकतो.
  • कस्टमाइज्ड इन्श्युअर्ड डिक्लेअर्ड व्हॅल्यू – अशी एकूण रक्कम जी तुम्ही तुमच्या स्कूटरचे पूर्ण नुकसान किंवा चोरी झाली तर क्लेम करू शकता ती म्हणजे आयडीव्ही (IDV). आयडीव्हीचे महत्व हे आहे की फार मोठे नुकसान झाल्यास नवी स्कूटर घेण्यासाठी त्यामुळे तुम्हाला आर्थिक मदत मिळते. डिजिटच्या टू-व्हीलर विमा योजनांमध्ये तुम्हाला तुमच्या वाहनांची आयडीव्ही (IDV).वाढविण्याची सोय आहे. त्यामुळे अशा काही दुर्दैवी घटना घडतात तेव्हा तुम्हाला भक्कम आधार मिळतो.
  • अ‍ॅड-ऑन कव्हर्ससह वाढीव संरक्षण – विशेषत: जेव्हा तुम्हाला तुमच्या इन्श्युरन्स कंपनीकडून विशिष्ट गरजा असतात तेव्हा अ‍ॅड-ऑन्स हा पॉलिसी कव्हरचा फार महत्त्वाचा भाग असतो. जर बेस प्लॅनमध्ये काही विशिष्ट कलम दिलेले नसले तर तुम्ही तुमच्या प्लॅनसाठी आवश्यक असे रायडर्स निवडू शकता. डिजिट ऑफर करत असलेले काही अ‍ॅड-ऑन कव्हर्स आहेत:
  • शून्य डेप्रिसीएशन कव्हर.
  • इंजिन आणि गियर प्रोटेक्शन कव्हर.   
  • रिटर्न टू इन्व्हॉइस कव्हर.
  • ब्रेकडाउन असिस्टन्स .
  • कन्झ्यूमेबल कव्हर .
  • ऑनलाइन उपलब्धतेमुळे पॉलिसी खरेदी करणे आणि रिन्यू करणे सुलभ – डिजिटच्या टू व्हीलर इन्श्युरन्स पॉलिसीज ऑनलाइन घेता येतात. विविध पॉलिसी उत्पादनांची तुलना करण्यासाठी ग्राहकांना फक्त कंपनीच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागते. पॉलिसी निवडून कव्हरेज सुरू करण्यासाठी त्याचा ठरलेला प्रीमियम भरू शकतात. त्याचप्रमाणे पॉलिसी रिन्यू करायची असेल तेव्हा तुमच्या पॉलिसी क्रेडेन्शियल्स वापरून, लॉग-इन करून लगेचच पॉलिसी रिन्यू करू शकता.

अशा प्रकारे या सर्व  फायद्यांसह, आपल्या टीव्हीएस ज्युपिटर स्कूटरसाठी टू-व्हीलर इन्श्युरन्स पॉलिसी निवडताना डिजिट हा सर्वोत्तम पर्याय आहे.

टीव्हीएस ज्युपिटर – व्हेरिएअंट्स आणि एक्स-शोरूम किंमत

व्हेरिअंट्स एक्स-शोरूम किंमत (शहरानुसार बदलू शकते)
ज्युपिटर एसटीडी, 62 किमीपीएल, 109.7 सीसी ₹ 52,945
ज्युपिटर झेडएक्स, 62 केएमपीएल, 109.7 सीसी ₹ 57,443
ज्युपिटर क्लासिक, 62 किमीपीएल, 109.7 सीसी ₹ 59,935
ज्युपिटर झेडएक्स डिस्क, 62 केएमपीएल, 109.7 सीसी ₹ 59,950

भारतातील टीव्हीएस ज्युपिटर इन्श्युरन्स पॉलिसीबद्दल सर्वात जास्त विचारले जाणारे प्रश्न

प्रीमियम कमी ठेवायचे असतील तर माझ्या टीव्हीएस ज्युपिटरसाठी कोणत्या प्रकारची इन्श्युरन्स पॉलिसी सर्वात चांगली आहे?

तुम्ही निवडू शकता असे सर्वात मूलभूत संरक्षण म्हणजे थर्ड पार्टी लायॅबिलिटी पॉलिसी. पण तुमच्या वाहनाला  झालेल्या नुकसानीदुरुस्तीसाठी कोणतीही आर्थिक मदत त्यात मिळत नाही. त्यात फक्त अपघातामुळे झालेल्या दुसऱ्या पक्षाप्रती तुमचे आर्थिक दायित्व पूर्ण केले जाते.

नेटवर्क गॅरेजमध्ये गेल्याने मला कोणता फायदा होईल?

अपघातामुळे तुमच्या स्कूटरच्या नुकसानीसाठी तुम्ही कॅशलेस दुरुस्तीचा लाभ घेऊ शकता अशी एकमेव जागा म्हणजे तुमच्या विमा कंपनीचे नेटवर्क गॅरेज. इतर सर्व गॅरेजमध्ये तुम्हाला तुमच्या खिशातून दुरुस्तीचा खर्च भरावा लागेल आणि नंतर त्याच्या परताव्यासाठी क्लेम दाखल करावा लागेल.

माझ्या स्कूटरवर एक छोटासा डेन्ट आहे. मी क्लेम दाखल करू का?

तुम्ही दावा दाखल करावा की नाही हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे. स्कूटरचे किरकोळ डेन्ट किंवा नुकसान यासाठी क्लेम करणे टाळणे चांगले कारण त्यामुळे तुम्हाला क्लेम फ्री इयर्स मिळतील. छोट्या अपघातांसाठी दाखल केलेल्या क्लेमपेक्षा नो क्लेम बोनसमुळे जास्त फायदा होईल.