Third-party premium has changed from 1st June. Renew now
तुमच्या टू व्हीलरसाठी टीव्हीएस इन्शुरन्स खरेदी/ रिन्यू करा
आपण टीव्हीएस बाईकबद्दल बोलूया - त्यांच्या लोकप्रियतेचे कारणं, टीव्हीएस टू-व्हीलर इन्शुरन्स पॉलिसी आणि त्यातून तुमचे फायदे जास्तीत जास्त वाढवण्यासाठी निवड कशी करावी.
भारताला जगातील टू-व्हीलरचा सर्वात मोठ्या उत्पादकांपैकी एक असल्याचा अभिमान आहे. 2018-19 या आर्थिक वर्षात सुमारे 24.5 दशलक्ष युनिट्स बनवले होते. सुमारे 22 उत्पादकांसह, देशातील मोटार वाहन उत्पादन क्षेत्रात 2018 मध्ये सरासरी 21.18 दशलक्ष युनिट्सची देशांतर्गत विक्री झाली. (1)
या उत्पादकांमध्ये टीव्हीएस मोटर कंपनीचे नाव नेहमीच विश्वासार्हतेचे समानार्थी राहिले आहे. बाजारातील तिसरी सर्वात मोठी दुचाकी उत्पादक कंपनी असल्याने टीव्हीएसला वार्षिक 20,185.43 कोटी रुपयांचा फायदा मिळत आहे. या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की, भारतातील टीव्हीएसच्या उत्पादनांची बाजारपेठ बरीच मोठी आहे.
आता, आपण आपल्या टीव्हीएस टू-व्हीलर्सचा इन्शुरन्स उतरवण्याबद्दल बोलूया. टीव्हीएस बाईक इन्शुरन्स हे तुमच्या टीव्हीएस टू-व्हीलरसाठी एक उत्कृष्ट आर्थिक उत्पादन आहे जे तुम्हाला रस्त्यावर बाईक चालवताना झालेल्या नुकसानीपासून तुम्हाला आर्थिक संरक्षण देऊन मदत करते.
मोटार वाहन कायदा, 1988 अंतर्गत आपल्या टीव्हीएस टू-व्हीलरसाठी या इन्शुरन्स पॉलिसीचा (थर्ड पार्टी लायॅबिलिटी कव्हर) लाभ देणे अनिवार्य आहे. शिवाय, टू-व्हीलरच्या अपघातामुळे उद्भवू शकणारे तुमचे आर्थिक नुकसान भरून घेणे ही देखील पूर्वअट आहे.
टीव्हीएस बाईक इन्शुरन्समध्ये काय कव्हर्ड आहे
काय कव्हर केले जात नाही
तुमच्या टू-व्हीलर इन्शुरन्स पॉलिसीमधे कशाचा समावेश होत नाही हे माहिती असणेही महत्त्वाचे आहे. म्हणजे कधी क्लेम करायचा झाला तर तुमच्यावर आश्चर्यचकित होण्याची पाळी येऊ नये. अशा काही घटना इथे दिल्या आहेत:
थर्ड-पार्टी लायॅबिलिटी ओन्ली बाईक पॉलिसी असल्यास त्यात स्वतःच्या वाहनाला झालेल्या नुकसानाची भरपाई केली जात नाही.
तुम्ही दारू पिऊन किंवा टू-व्हिलरचे वैध लायसन्स नसताना गाडी चालवत असाल तर अशा वेळी तुम्हाला तुमच्या बाईक इन्शुरन्सचे संरक्षण मिळत नाही.
जर तुमच्याकडे लर्निंग लायसन्स असेल आणि तुम्ही तुमच्यामागे वैध लायसन्सधारक बसलेला नसताना टू-व्हिलर चालवत असलात तर अशा वेळी तुमचा क्लेम कव्हर केला जाणार नाही.
असे कोणतेही नुकसान जे आपघातामुळे झाले नसेल (उदा. अपघातानंतर जर नादुरुस्त टू-व्हिलर चुकीच्या पद्धतीने वापरली आणि त्यामुळे इंजिन खराब झाले तर त्याची भरपाई मिळणार नाही)
कोणत्याही प्रकारे निष्काळजीपणा कारणीभूत असेल तर (उदा. पुरामधे टू-व्हिलर चालवणे उत्पादकाच्या सूचनापत्रकानुसार योग्य नाही. तरीही तसे केल्यास त्यासाठी कव्हर मिळणार नाही)
काही विशिष्ट घटना ॲड-ऑन्सद्वारे कव्हर केल्या जातात. असे ॲड-ऑन्स तुम्ही घेतले नसतील तर त्या संबंधित घटनांसाठी कव्हर मिळणार नाही.
तुम्ही डिजिटचा टीव्हीएस बाईक इन्शुरन्स का विकत घ्यावा?
टीव्हीएस टू व्हीलर इन्शुरन्स प्लॅन्स जे तुमच्या गरजा पूर्ण करतात
कॉम्प्रिहेन्सिव्ह बाईक इन्शुरन्स हा बाईक इन्शुरन्सचा सर्वात महत्त्वाचा प्रकार आहे. त्यात थर्ड पार्टीचे आणि तुमच्या स्वतःच्या बाईकचे नुकसानही भरून दिले जाते.
थर्ड पार्टी | कॉम्प्रिहेन्सिव्ह |
अपघातामुळे टू-व्हीलरचे नुकसान/ हानी |
|
आग लागल्यास टू-व्हीलर वाहनाचे नुकसान/ हानी |
|
नैसर्गिक आपत्ती उद्भवली तर टू-व्हीलरचे नुकसान/ हानी |
|
थर्ड-पार्टीचे नुकसान |
|
थर्ड-पार्टीचे नुकसान |
|
वैयक्तिक अपघात कव्हर |
|
थर्ड-पार्टीच्या व्यक्तीच्या जखमा/मृत्यू |
|
तुमची स्कूटर किंवा बाईक चोरी |
|
तुमचे आयडीव्ही कस्टमाइझ करा |
|
कस्टमाइझ ॲड-ऑनसह अतिरिक्त संरक्षण |
|
Get Quote | Get Quote |
कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि थर्ड-पार्टी टू-व्हीलर इन्शुरन्समधील फरकाबद्दल अधिक जाणून घ्या
क्लेम कसा दाखल कराल?
आमचा टू -व्हीलर इन्शुरन्स प्लॅन घ्या किंवा त्याचे नूतनीकरण करा आणि निर्धास्त रहा, कारण आमची 3-स्टेप्सची क्लेम प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल आहे!
स्टेप 1
फक्त 1800-258-5956 वर फोन करा. कोणतेही फॉर्म्स भरण्याची आवश्यकता नाही.
स्टेप 2
तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर लिंक मिळवा. तुमच्या वाहनाला झालेल्या नुकसानाची माहिती टप्प्याटप्प्याने देण्यात येणाऱ्या मार्गदर्शनाप्रमाणे तुमच्या स्मार्टफोनवर द्या.
स्टेप 3
आमच्या नेटवर्क गॅरेजेसमधून रिएम्बर्समेंट किंवा कॅशलेस यांमधला तुम्हाला हवा असणारा दुरुस्तीचा मार्ग निवडा.
टीव्हीएस मोटर कंपनी - संक्षिप्त इतिहास
टीव्हीएस मोटर कंपनी लिमिटेड ही टीव्हीएस ग्रुपची आकार आणि उलाढालीच्या संदर्भात सर्वात मोठे योगदान देणारी कंपनी आहे. त्यांचे मुख्यालय चेन्नईला आहे, टीव्हीएसला 1972 मध्ये सुंदरम क्लेटन कंपनीच्या माध्यमातून त्यांचे मूळ सापडले. कंपनीने जपानच्या अग्रगण्य वाहन उत्पादकांपैकी एक असलेल्या सुझुकीबरोबर तांत्रिक सहकार्याद्वारे मोटारसायकली तयार करण्यास सुरुवात केली.
सुझुकीबरोबरचा करार संपल्यानंतर 2001 मध्ये टीव्हीएस मोटर्सची स्वतंत्रपणे स्थापना करण्यात आली. तेव्हापासून कंपनीने अनेक पुरस्कार आणि वाहवा मिळवली आहे. आणि भारताच्या मोटारसायकल उत्पादन क्षेत्रात आपले स्थान पक्के केले आहे.
- कंपनीने नुकत्याच लॉन्च केलेल्या काही गाड्या खालीलप्रमाणे आहेत:
- टीव्हीएस अपाचे आरटीआर 200
- टीव्हीएस अपाचे आरआर 310
- टीव्हीएस एक्सएल 100
- टीव्हीएस व्हिक्टर
त्यांच्या कॅटलॉगमध्ये उच्च दर्जाची उत्पादने असल्यामुळे, टीव्हीएस हा एक ब्रँड आहे ज्याने आपल्या देशातील मोटारसायकल उत्पादन मार्केट बदलण्यास हातभार लावला आहे. त्यामुळेच आपल्या दुचाकींबरोबरच मोटारसायकल शौकिनांमध्ये टीव्हीएस बाईक इन्शुरन्सची मागणीही बरीच जास्त आहे.
टीव्हीएस मोटर कंपनी इतकी लोकप्रिय कशामुळे आहे ?
ब्रँडच्या लोकप्रियतेला हातभार लावणारी अनेक कारणे आहेत. त्यापैकी काही कारणांची यादी खाली दिली आहे :
- भारताची पहिली स्वदेशी बाईक - व्हिक्टर बाजारात सादर करणारी ही पहिली कंपनी आहे.
- ते परवडणाऱ्या प्रवासी बाईक्स तयार करतात ज्या दररोजच्या वापरासाठी योग्य आहेत. फॅन्सी बाईक आकर्षक असल्या तरी प्रवासी बाईक्स सोयीस्कर असतात आणि सामान्य लोकांसाठी परिपूर्ण वाहने बनवतात.
- टीव्हीएसने 2019 मध्ये भारताची पहिली इथेनॉल-आधारित मोटारसायकल सुरू केली. जीवाश्म इंधनाऐवजी इथेनॉलचा वापर करणे हा प्रदूषण रोखण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे, जो काळाची एक गरज आहे.
- टीव्हीएसने तयार केलेल्या बाईक्स अद्ययावत तंत्रज्ञान, स्लीक डिझाइन्स आणि उत्कृष्ट कामगिरीसह येतात.
हे काही प्रमुख घटक आहेत जे टीव्हीएस बाईक्सला भारतीयांमध्ये इतके लोकप्रिय बनवतात, विशेषत: जे दररोजच्या प्रवासासाठी मोटारसायकलवर अवलंबून असतात.
टीव्हीएस टू-व्हीलरची वैशिष्ट्ये - त्यांना इतके आकर्षक कोणती गोष्ट बनवते ?
जेव्हा भारतीय उत्पादकांनी तयार केलेल्या बाईक्सचा विचार केला जातो, तेव्हा टीव्हीएस बाईक्सची लोकप्रियता सगळ्यात वरती आहे.
आपण विचारताय का? हे बघा!
- टिकाऊपणा – बाईक्सचा टिकाऊपणा बहुतेक त्यांचा वापर आणि देखभाल कशी केली जाते यावर अवलंबून असली तरी टीव्हीएस टू-व्हीलरने स्वत:ला बाजारातील सर्वात मजबूत बाईक्सपैकी एक म्हणून स्थापित केले आहे. कमी देखभाल खर्चासह, टीव्हीएस मॉडेल्स प्रवासी दुचाकींमध्ये उत्कृष्ट आहेत.
- विश्वासार्हता – टीव्हीएस बाईक्स बाजारात त्यांच्या विश्वासार्हतेसाठी प्रसिद्ध आहेत. प्रवासी बाईक्सचा विचार केला तर टीव्हीएस व्हिक्टर्स ही बहुतेक भारतीयांची पहिली पसंती आहे. शिवाय, अपाचे मालिकेमुळे टीव्हीएसने चांगल्या मायलेज आणि उत्कृष्ट इंजिनसह उच्च दर्जाची बाजारपेठ काबिज करण्यात यश मिळवले आहे.
- परवडण्याजोगी - त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी ते प्रसिद्ध असले तरी टीव्हीएस बाईक्सही परवडण्याजोग्या असतात. जरी सर्वात महागडी टीव्हीएस बाईक – टीव्हीएस अपाचे आर.आर 310 ची किंमत 2.28 लाख रुपये असली, तरी आपण सहजपणे 40,000 रुपयांना टीव्हीएस स्पोर्ट खरेदी करू शकता.
- विविध प्रॉडक्ट्स - दरवर्षी ते तयार होणारे विविध प्रॉडक्टस हा त्यांचे एक योगदान देणारा घटक आहे ज्यामुळे त्यांना एक वेगळेपण मिळवता आले. "प्रत्येकासाठी वाहन" या टॅगलाइनसह, टीव्हीएस स्कूटर, मोटारसायकल, मोपेड इत्यादींची विस्तृत श्रेणी प्रदान करते.
- नवीनतम तंत्रज्ञान – टीव्हीएस हे देशातील बी.एस- VI नियमांचे पालन करणाऱ्या मोटारसायकली सुरू करणाऱ्या पहिल्या उत्पादकांपैकी एक आहे. शिवाय, टीव्हीएस बाईकमध्ये बाजारात काही सर्वात परिष्कृत इंजिने आहेत.
परंतु, बाजारपेठेतील सर्वोत्तम उत्पादनांपैकी एक असूनही टीव्हीएस बाईक्स् भारतीय रस्त्यांवर असलेल्या धोक्यांपासून मुक्त नाहीत. आपण आपली बाईक चालवत असाल तर अपघात आणि चोरीसारख्या घटना दुर्दैवाने असामान्य नाहीत.
त्यामुळेच, अशा घटनांपासून निर्माण होणारे आर्थिक दायित्वे टाळण्यासाठी भारतातील अनेक इन्शुरन्स कंपन्यांनी आपल्या टीव्हीएस दुचाकी, स्कूटर आणि मोपेडसाठी कस्टमाइझ बाईक इन्शुरन्स कव्हर्स सुरू केले आहेत.
टीव्हीएस बाईक इन्शुरन्स पॉलिसीचा लाभ घेणे तुमच्यासाठी का महत्वाचे आहे यावर एक नजर टाका.
तुम्ही टीव्हीएस बाईक इन्शुरन्स पॉलिसी का निवडली पाहिजे
तुमच्या टीव्हीएस बाईकसाठी थर्ड-पार्टी लायॅबिलिटी इन्शुरन्स कव्हर घेणे मोटार वाहन कायदा, 1988 अंतर्गत अनिवार्य आहे. मात्र तुमच्या टू-व्हीलर वाहनासाठी अधिक चांगल्याप्रकारे आर्थिक संरक्षण मिळविण्यासाठी तुम्ही कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हरचा लाभ घेण्याची शिफारस केली जाते.
मग, तुम्ही इन्शुरन्स कव्हर का खरेदी करावे किंवा टीव्हीएस बाईक इन्शुरन्स रिन्यूअल का करावे ?
एक दृष्टिक्षेप टाका!
- तुमच्या स्वत:च्या वाहनाे नुकसान/हानी रिकव्हर करणे - टीव्हीएस बाईक इन्शुरन्स पॉलिसीचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे अपघात, आग, नैसर्गिक आपत्ती इत्यादी घटनांमुळे तुमच्या स्वतःच्या वाहनाच्या नुकसान किंवा हानीपासून झालेल्या खर्चाची रिएम्बर्समेंट प्रदान करते. शिवाय, सुरक्षा उपाय योजल्यानंतरही तुमची टीव्हीएस बाईक किंवा स्कूटी चोरीला जाण्याचा नेहमीच धोका असतो. या परिस्थितीत आर्थिक नुकसान टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या टू-व्हीलरचा इन्शुरन्स कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स कव्हर खाली मिळवू शकता.
- थर्ड पार्टी व्हेईकल किंवा प्रॉपर्टीच्या नुकसानीसाठी रिएम्बर्समेंट - हे कव्हर थर्ड-पार्टी लायॅबिलिटी आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह बाइक इन्शुरन्स पॉलिसी या दोन्हीद्वारे प्रदान केले जाते. या फायद्यामुळे, तुम्ही तुमच्या विमाधारक टू-व्हीलरद्वारे थर्ड-पार्टी मालमत्तेचे किंवा वाहनाचे नुकसान झाल्यामुळे नुकसानीपासून स्वतःचे आर्थिक संरक्षण करू शकता. आपल्या वाहनामुळे झालेल्या दुखापतीमुळे तिसऱ्या व्यक्तीला किंवा त्यांच्या मृत्यूमुळे उद्भवणाऱ्या लायॅबिलिटीचा समावेश करण्यासाठी पॉलिसी त्यांचे फायदे देखील वाढवतात. हे अशा परिस्थितीत आपल्याला होणाऱ्या कोणत्याही खटल्याच्या शुल्काची भरपाई करते.
- वैयक्तिक अपघात कव्हर करते - या फायद्यासह, तुम्ही तुमच्या टू-व्हीलरच्या अपघातामुळे अपंग झाल्यास आपण आर्थिकदृष्ट्या संरक्षित आहात याची खात्री करू शकता. अशा परिस्थितीत तुमचा मृत्यू झाल्यास वैयक्तिक अपघात कव्हर तुमच्या कुटुंबातील सदस्यांना नुकसान भरपाई देखील देते.
- जास्त इन्शुअर्ड डिक्लेअर्ड व्हॅल्यू (IDV) - टीव्हीएस बाईक इन्शुरन्स मिळविण्याचे आणखी एक महत्त्वपूर्ण महत्त्व म्हणजे तुम्ही तुमच्या बाईक/स्कूटीचे नुकसान किंवा चोरी झाल्यास त्याची किंमत वसूल करू शकता. इन्शुअर्ड डिक्लेअर्ड व्हॅल्यू ही अशी रक्कम आहे जी अशा परिस्थितीत दिली जाते आणि टीव्हीएसच्या विक्री किंमतीद्वारे तुमच्या दुचाकी वाहनाची विक्री किंमत धरली जाते पण डिप्रिसिएशन वजा करून.
- तुम्ही तुमच्या इन्शुरन्स पॉलिसीतून आपले फायदे जास्तीत जास्त केले आहेत याची खात्री करण्यासाठी, उच्च आणि कस्टमाइझ आयडीव्हीसह येणाऱ्या पॉलिसीचा लाभ घेणे चांगले आहे.
जर तुम्ही टीव्हीएस बाईक इन्शुरन्स रिन्यूअल शोधत असाल आणि तुमचा इन्शुरन्स पुरवठादार बदलण्याचा विचार करत असाल, तर ॲड-ऑन आणि रायडर्स हा तुलना करण्याचा एक महत्त्वाचा बिंदू आहे.
आता टीव्हीएस बाईक इन्शुरन्स पॉलिसी का महत्त्वाच्या आहेत हे आपल्याला माहीत असल्याने सक्षम सेवा पुरवठादार निवडण्याची वेळ आली आहे.
तुम्ही डिजिट इन्शुरन्सचा विचार केला आहे का ?
तुम्ही तुमच्या टीव्हीएस टू-व्हीलर इन्शुरन्ससाठी डिजिट का निवडले पाहिजे ?
भारतातील अग्रगण्य आणि प्रतिष्ठित इन्शुरन्स कंपन्यांपैकी एक असण्याव्यतिरिक्त, तुमच्या टीव्हीएस टू-व्हीलरसाठी डिजिटद्वारे ऑफर केलेली टू-व्हीलर इन्शुरन्स पॉलिसी असंख्य फायद्यांसह येते.
त्यातील काही पुढीलप्रमाणे आहेत:
1. मोठ्या संख्येने नेटवर्क गॅरेजेस – डिजिट इन्शुरन्स त्यांच्या टीव्हीएस टू-व्हीलर इन्शुरन्स संरक्षणांतर्गत कॅशलेस दुरुस्ती सुविधा प्रदान करते. या सुविधेमुळे, आपण आपल्या विमा प्रदात्याअंतर्गत कोणत्याही नेटवर्क गॅरेजमध्ये आपली टू-व्हीलर दुरुस्त करू शकता आणि सेवेसाठी कोणतीही रोख रक्कम न भरता. डिजिटमध्ये 2900 हून अधिक नेटवर्क गॅरेज आहेत, अशा प्रकारे तुम्हाला कॅशलेस दुरुस्ती शोधण्याची आपली व्याप्ती जास्तीत जास्त वाढवण्यास मदत करते.
2. टू-व्हीलर इन्शुरन्स पॉलिसीचे पर्याय – डिजिटसह आपण खालील इन्शुरन्स पॉलिसी अंतर्गत आपली टी.व्ही.एस बाईक इन्शुरन्स उतरवू शकता. हे आहेत:
- थर्ड पार्टी टू-व्हीलर इन्शुरन्स - या पॉलिसीमध्ये विमाधारक वाहनामुळे थर्ड-पार्टी मालमत्ता किंवा वाहन, इजा किंवा मृत्यूमुळे उद्भवणाऱ्या आर्थिक लायॅबिलिटीनचा समावेश आहे.
- कॉम्प्रिहेन्सिव्ह टू-व्हीलर इन्शुरन्स – थर्ड-पार्टी लायॅबिलिटी व्यतिरिक्त हे इन्शुरन्स कव्हर अपघात, नैसर्गिक आपत्ती इत्यादींमुळे आपल्या स्वत:च्या वाहनाच्या नुकसानीमुळे उद्भवणाऱ्या आर्थिक लायॅबिलिटीचाही समावेश करते.
सप्टेंबर 2018 नंतर तुम्ही तुमची टीव्हीएस टू-व्हीलर खरेदी केले असल्यास तुम्ही ओन डॅमेज कव्हर देखील निवडू शकता. हे कव्हर तु्म्हाला थर्ड पार्टी लायॅबिलीटीसाठी कव्हरेज प्रदान करणाऱ्या कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसीचे फायदे प्रदान करेल. जर तुमच्याकडे विद्यमान थर्ड पार्टी बाईक इन्शुरन्स कव्हर असेल तर ते स्टँडअलोन कव्हर म्हणून खरेदी केले जाऊ शकते.
3. उच्च क्लेम सेटलमेंटसह वेगवान आणि सुलभ क्लेम सेटलमेंट - सहसा, तुमच्या इन्शुरन्स पॉलिसीमध्ये क्लेम उपस्थित केल्यानंतर, कंपनीच्या प्रतिनिधीला आपल्या बाईकची तपासणी करण्यासाठी आणि तुमच्या क्लेमची पडताळणी करण्यासाठी पाठविले जाते. परंतु डिजिटसह, तुम्ही स्मार्टफोन-एनेबल्ड सेल्फ-इन्स्पेक्शन प्रक्रियेचे फायदे घेऊ शकता. हे तुम्हाला प्रक्रिया वेगवान करण्यास अनुमती देते आणि विस्तृत कागदोपत्री काम करण्याच्या अडचणी कमी करते.
त्यांच्या ऑनलाइन प्रक्रियेमुळे डिजिटने त्यांचे क्लेम निकाली काढण्याचे प्रमाण बऱ्याच अंशी सुव्यवस्थित केले आहे. कंपनीचा क्लेम निकाली काढण्यासाठी काही दिवसच लागतात, जो देशातील अनेक अग्रगण्य विमा प्रदात्यांपेक्षा खूपच कमी आहे.
शिवाय, कंपनीकडे उच्च क्लेम सेटलमेंट रेशीओ (प्रमाण) आहे जे तुमचा क्लेम नाकारण्याची शक्यता कमी करते.
4. सुलभ विमा खरेदी आणि नूतनीकरण प्रक्रिया - जर तुम्ही टीव्हीएस टू-व्हीलर किंवा टीव्हीएस स्कूटी इन्शुरन्स रिन्यूअल ऑनलाइन शोधत असाल, तर या प्रक्रियेत तुम्हाला मदत करण्यासाठी डिजिटपेक्षा चांगले कोणीही नाही. तुम्ही इन्शुरन्स पॉलिसीची विना अडथळा खरेदी आणि रिन्यूअल करू शकता. आणखी काय, तुम्ही तुमच्या आधीच्या पॉलिसीतला नो क्लेम बोनस देखील पुढे नेऊ शकता आणि आपल्या प्रीमियम पेमेंटवर सूट उपभोगू शकता.
5. जास्त इन्शुअर्ड डिक्लेअर्ड व्हॅल्यू (IDV) - आम्ही यापूर्वी आयडीव्हीवर चर्चा केली आहे. म्हणून, तुमच्या टीव्हीएस बाईक इन्शुरन्सचा लाभ घेताना किंवा नूतनीकरण करताना, आपले प्राथमिक उद्दीष्ट उच्च आयडीव्ही शोधणे, तुमच्या दुचाकीचे एकूण नुकसान किंवा हानी झाल्यास जास्तीत जास्त लाभ घेणे हे असले पाहिजे. डिजिट तुम्हाला तुमच्या गरजेनुसार तुमच्या दुचाकी वाहनासाठी आयडीव्ही कस्टमाइझ करण्याची संधी देते.
6. विविध ॲड-ऑन कव्हर्स – डिजिट टीव्हीएस टू-व्हीलर इन्शुरन्स पॉलिसी अनेक ॲड-ऑन ऑफर करते जे तुमच्या टू-व्हीलरसाठी जास्तीत जास्त कव्हर करण्यास मदत करते. तुमच्या टीव्हीएस बाईकसाठी तुम्ही घेऊ शकता अशा काही ॲड-ऑनची माहिती खालील प्रमाणे आहेत -
- झिरो डिप्रिसिएशन कव्हर.
- इंजिन आणि गिअर प्रोटेक्शन कव्हर.
- रिटर्न टू इनव्हॉईस कव्हर.
- ब्रेकडाउन मदत.
- कंझ्युमेबल कव्हर.
हे ॲड-ऑन महत्वाचे आहेत कारण ते आपल्याला आपल्या दुचाकी/स्कूटीसाठी प्रगत संरक्षण घेऊ देतील.
7. 24X7 ग्राहक सेवा - डिजिटची टीम तुम्हाला शक्य असलेली सर्वोत्तम सेवा प्रदान करण्यासाठी अथक परिश्रम करते. त्यामुळेच तुम्ही त्यांच्या ग्राहक सेवेला कधीही, तुमच्या सोयीनुसार - अगदी राष्ट्रीय सुट्टीच्या दिवशीही कॉल करू शकता!
चला तर मग!
परवडणारे प्रीमियम आणि आकर्षक ॲड-ऑन ऑफरसह, डिजिट इन्शुरन्स तुम्हाला तुमच्या टीव्हीएस बाईक, स्कूटर किंवा मोपेडसाठी सर्वांगीण संरक्षण देऊ शकते!
इन्शुरन्स संरक्षण घेण्याबद्दल अजूनही विचार करताय?
तुम्ही तुमच्या टीव्हीएस टू-व्हीलर इन्शुरन्स पॉलिसीचे प्रीमियम पेमेंट कसे कमी करू शकता याबद्दल रहस्य जाणून घेऊया.
तुम्ही तुमच्या टीव्हीएस इन्शुरन्स पॉलिसीचा प्रीमियम कसा कमी करू शकता?
तुमच्या टीव्हीएस टू-व्हीलर इन्शुरन्स पॉलिसीचा प्रीमियम कमी करण्यासाठी तुम्ही काही पद्धती वापरू शकता. उदाहरणार्थ:
- तुम्ही स्वेच्छेने डीडक्टीबल्स निवडू शकता ज्यामुळे तुम्हाला क्लेम सेटलमेंट दरम्यान तुमच्या वाहनासाठी दुरुस्ती खर्चाचा काही भाग भरावा लागेल.
- तुमच्या इन्शुरन्स पॉलिसीसाठी ॲड-ऑन कव्हर निवडताना तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे, कारण आपण लाभ घेत असलेल्या प्रत्येक ॲड-ऑनसाठी आपल्याला किरकोळ जास्त प्रीमियम रक्कम भरावी लागेल.
- तुमच्या इन्शुरन्स कंपनीचे नो क्लेम बोनस पॉलिसी तपासा आणि तुम्ही त्यातून जास्तीत जास्त लाभ घेऊ शकता की नाही हे जाणून घ्या.
- इन्शुरन्स कंपनीकडून थेट तुमची इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करा. जर तुम्ही एजंट किंवा ब्रोकरच्या सेवेचा लाभ घेतलात, तर तुम्हाला त्यांच्या सेवेसाठी अतिरिक्त शुल्क भरावे लागेल. यामुळे तुम्ही तुमच्या विमा पॉलिसीवर खर्च केलेली रक्कम आपोआप वाढेल.
या काही टिप्स लक्षात घेऊन, तुम्ही तुमच्या इन्शुरन्स पॉलिसीचा प्रीमियम पेमेंट वाचवण्याची खात्री करू शकता.
तर, आता आपण आपल्या टीव्हीएस बाईक किंवा स्कूटरसाठी इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करण्याचा प्रत्येक पैलू शिकला आहात तर चला घाई करा आणि तुमच्या वाहनाची इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करा!
टीव्हीएस टू व्हीलर ऑनलाइन इन्शुरन्सबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न
मी माझ्या टीव्हीएस बाईक इन्शुरन्स पॉलिसीचे ऑनलाइन रिन्यूअल करू शकतो का?
होय, तुम्ही तुमच्या टीव्हीएस बाईक इन्शुरन्स पॉलिसीच्या ऑनलाइन रिन्यूअलची निवड करू शकता. तथापि, तुम्ही त्यातून नो क्लेम बोनसचा लाभ घ्यावा याची खात्री करण्यासाठी सध्याच्या पॉलिसीची मुदत संपण्यापूर्वी तुम्ही तुमच्या पॉलिसीचे रिन्यूअल करणे महत्वाचे आहे.
मी माझी इन्शुरन्स कंपनी बदलण्याचा पर्याय निवडल्यास मी माझ्या टीव्हीएस टू-व्हीलर इन्शुरन्सवर नो क्लेम बोनस (NCB) घेऊ शकतो का?
होय, तुम्ही तुमची इन्शुरन्स कंपनी बदलण्याचा निर्णय घेतला तरीही तुमच्या टीव्हीएस टू-व्हीलर इन्शुरन्सवर नो क्लेम बोनसचा लाभ घेऊ शकता.
माझ्या टीव्हीएस बाईकच्या इन्शुरन्स पॉलिसीचे रिन्यूअल करण्यासाठी मला कोणते तपशील द्यावे लागतील ?
तुमच्या टीव्हीएस बाईक इन्शुरन्स पॉलिसीचे रिन्यूअल करण्यासाठी, तुम्हाला खालील तपशील प्रदान करणे आवश्यक आहे -
वाहन नोंदणी क्रमांक.
वाहन खरेदीची तारीख आणि जागा.
तुमचे नाव.
तुमचा पत्ता आणि संपर्काचे तपशील.
तुमच्या टीव्हीएस टू-व्हीलरचे मॉडेल आणि त्याच्या उत्पादनाची तारीख.