रॉयल एनफील्ड क्लासिक इन्शुरन्स

रॉयल एनफील्ड क्लासिक बाईक इन्शुरन्स प्रीमियम त्वरित तपासा

Third-party premium has changed from 1st June. Renew now

रॉयल एनफील्ड क्लासिक 350/500 इन्शुरन्सची किंमत आणि पॉलिसीचे ऑनलाइन नूतनीकरण

तुमच्या एन्फिल्डवरून एखाद्या रॉयल सफरीवर जाण्याच्या विचारात आहात? मात्र तुम्ही तुमची मोटारसायकल फिरण्यासाठी बाहेर काढण्यापूर्वी, तुम्ही रॉयल एनफिल्ड क्लासिक टू व्हिलर इन्शुरन्स पॉलिसी घेण्याचा विचार केला आहे का ? टू-व्हीलर इन्शुरन्स पॉलिसीच्या वैशिष्ट्यांविषयी जाणून घ्या आणि त्यातून जास्तीत जास्त फायदे मिळवा!

रॉयल एनफिल्ड ही मूळतः ब्रिटीश मोटारसायकल कंपनी आहे. या कंपनीने 20 व्या शतकातील बहुतांश काळात, विशेषत: दोन्ही महायुद्धांमध्ये इंग्लिश सशस्त्र दलांना मोटारसायकलचा पुरवठा केला.

रॉयल एनफिल्ड क्लासिक कंपनीने केवळ WW2 युद्धाचे प्रतीक बनायचे म्हणून नाही तर उलट तत्कालीन संस्कृतीचे आणि त्या काळातील शास्त्रीय दृष्टिकोनाचेही प्रतीक बनून येत्या काळात ब्रँड निर्माण करायचा असे आराखडे आखले. हे एकमेव उद्दिष्ट ठेवून, सध्याच्या बुलेटच्या मुख्य बांधणीत मोटारसायकलची रचना करण्यात आली आहे.

इतर सर्व रॉयल एनफिल्ड मॉडेल्सप्रमाणे, क्लासिकची किंमतदेखील भारतात उत्पादित मोटारसायकलच्या स्पेक्ट्रमशी संबंधित आहे. त्यामुळेच अपघातात किंवा इतर कोणत्याही दुर्घटनेमुळे झालेल्या नुकसानीची दुरुस्ती करणे तुमच्या खिशाला खूप महाग पडू शकते.

अशा प्रकारे, रॉयल एनफील्ड क्लासिक इन्शुरन्स पॉलिसी हे एक महत्त्वाचे साधन आहे जे अशा परिस्थितीत उद्भवणारी तुमची आर्थिक लायॅबलिटी कमी करू शकते. दुसरीकडे, मोटार वाहन कायदा 1988 देखील प्रत्येक मोटार चालवलेल्या वाहन मालकाने त्यांच्या वाहनासाठी थर्ड-पार्टी लायॅबलिटी इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करणे अनिवार्य करते.या पॉलिसीशिवाय, तुम्हाला २००० रुपये ट्रॅफिक दंड आकारला जाऊ शकतो आणि वारंवार गुन्ह्यासाठी 4000 रुपयांपर्यंत दंड आकाराला जाऊ शकतो.

रॉयल एनफील्ड क्लासिक इन्शुरन्समध्ये काय कव्हर केले आहे

तुम्ही डिजिटचा रॉयल एनफील्ड क्लासिक इन्शुरन्स का खरेदी करावा?

रॉयल एनफील्ड क्लासिकसाठी इन्शुरन्स प्लॅन्सचे प्रकार

थर्ड पार्टी कॉम्प्रिहेन्सिव्ह

अपघातामुळे स्वत:च्या टू-व्हिलरचे नुकसान

×

आग लागल्यास स्वत:च्या टू-व्हिलरचे नुकसान

×

नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी स्वत:च्या टू-व्हिलरचे नुकसान

×

थर्ड-पार्टीच्या वाहनाचे नुकसान

×

थर्ड-पार्टीच्या मालमत्तेचे नुकसान

×

वैयक्तिक अपघात संरक्षण

×

थर्ड-पार्टीच्या व्यक्तीच्या दुखापती/मृत्यू

×

तुमच्या स्कूटर किंवा बाईकची चोरी

×

तुमचा आयडीव्ही( IDV) कस्टमाइझ करा

×

कस्टमाइझ ॲड-ऑनसह अतिरिक्त संरक्षण

×
Get Quote Get Quote

कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि थर्ड पार्टी टू व्हीलर इन्शुरन्समधील फरकाबद्दल अधिक जाणून घ्या

क्लेम कसा दाखल करायचा?

तुम्ही आमचा टू-व्हिलर इन्शुरन्स प्लॅन खरेदी केल्यानंतर किंवा नूतनीकरण केल्यानंतर, तुम्ही तणावमुक्त राहता कारण आमच्याकडे 3-स्टेप्सची पूर्णपणे डिजिटल, क्लेमची प्रक्रिया आहे!

स्टेप1

फक्त 1800-258-5956 वर कॉल करा. कोणतेही फॉर्म भरायचे नाहीत.

स्टेप2

तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर स्वयं-तपासणीसाठी लिंक मिळवा. सांगितलेल्या स्टेप बाय स्टेप प्रक्रियेद्वारे आपल्या स्मार्टफोनवरून आपल्या वाहनाच्या नुकसानाविषयीची माहिती द्या.

स्टेप3

आमच्या गॅरेजच्या नेटवर्कद्वारे तुम्हाला रिएम्बर्समेंट किंवा कॅशलेसची निवड करायची असलेली दुरुस्तीची पद्धत निवडा.

डिजिट इन्शुरन्स क्लेम किती वेगाने निकाली काढले जातात? तुमची इन्शुरन्स कंपनी बदलताना तुमच्या मनात हा पहिला प्रश्न यायला हवा. तुम्ही तसा विचार करत आहात ही चांगली गोष्ट आहे! डिजिटचे क्लेम रिपोर्ट कार्ड वाचा

रॉयल एनफील्ड क्लासिक: श्रद्धांजली ची कथा

2009 पासून उत्पादनात, रॉयल एनफिल्ड क्लासिक ही एक मोटारबाईक रेट्रो-बाईक म्हणून ख्यात आहे.  बुलेटप्रमाणेच, क्लासिक 350 सुद्धा अनेक रायडर्सचे ड्रीम व्हेईकल आहे. 

रॉयल एनफिल्डला क्लासिक बनवण्यासाठी अनेक कारणे आहेत, जी भारतीय बाजारपेठेत सर्वाधिक मागणी असलेल्या मोटरसायकलपैकी एक आहे. उदाहरणार्थ:

  • पारंपारिक गोल हेडलॅम्प असलेल्या क्लासिकमध्ये एक अनोखी आसन व्यवस्था आहे ज्यामुळे ती बुलेटपेक्षा वेगळी आहे.
  • रायडर्स मागच्या मडगार्डवर स्वतंत्रपणे जोडलेली पिलियन सीट काढून टाकणे निवडू शकतात, ज्यामुळे त्यांना त्यांच्या राइडला एक रेट्रो लुक देता येईल.
  • त्याच नावाने ओळखल्या जाणार्‍या आणि वेगळी रंगसंगती असलेल्या WW2 मॉडेलला पेगासससारखे मॉडेल देखील मर्यादित कालावधीसाठी ऑफर केले गेले आहेत.

इतकी रॉयल वैशिष्ट्य असलेल्या बाईकचे मालक त्यांच्या मोटार वाहनाच्या काळजीबद्दल खूप सावध असतील, परंतु अपघात कधीही सांगून होत नाहीत . त्यामुळेच रॉयल एनफिल्ड क्लासिकसाठी कॉम्प्रिहेन्सिव्ह टू-व्हिलर इन्शुरन्स पॉलिसी घेणे उचित आहे.

पण, कोणत्या टू-व्हिलर इन्शुरन्स पॉलिसीची निवड करायची?

गोंधळ थांबवा! डिजिटचे फायदे पहा!

रॉयल एनफील्ड क्लासिक इन्शुरन्ससाठी डिजिटची निवड का करावी?

तुमच्या लाडक्या एनफिल्डच्या इन्शुरन्ससाठी डिजिट एक सर्वोत्कृष्ट पर्याय का आहे? ही कारणे पाहा आणि स्वतःच निर्णय घ्या:

संपूर्ण भारतात नेटवर्क गॅरेजेसची मोठी संख्या

कोणतेही मोटार वाहन, मग ते टू-व्हिलर असो किंवा फोर व्हिलर असो, अपघात किंवा यांत्रिक बिघाड कधीही होऊ शकतात. अशा परिस्थितीत, तुमच्या क्लासिकसाठी कॅशलेस दुरुस्तीची सुलभ उपलब्धता तुमच्या अडचणी बर्‍याच प्रमाणात कमी करू शकते. डिजिटमध्ये भारतभर 1,000 पेक्षा जास्त नेटवर्क गॅरेज आहेत, ज्यामुळे इन्शुरन्सधारक मालकांना त्यांचे रॉयल एनफील्ड क्लासिक 350 किंवा अगदी 500 अडचणीच्या परिस्थितीत दुरुस्त करणे सोपे होते.

ऑफर केलेल्या पॉलिसीचे प्रकार

डिजिट तुमच्या रॉयल एनफील्ड क्लासिक आणि क्लासिक 350 साठी अनेक प्रकारच्या टू-व्हिलर इन्शुरन्स पॉलिसीज ऑफर करते. तुम्ही या पॉलिसी समजून घेणे आणि स्वतःसाठी योग्य ती निवडणे महत्त्वाचे आहे कारण रॉयल एनफील्ड क्लासिक 350 इन्शुरन्स किंमत निवडीच्या पॉलिसीनुसार बदलते.

  • थर्ड-पार्टी टू-व्हीलर इन्शुरन्स पॉलिसी - या पॉलिसी आपल्या मोटारसायकलच्या अपघातात सहभागी असलेल्या थर्ड-पार्टीचे आर्थिक नुकसान भरून काढतात. व्यक्तीला शारीरिक इजा असो किंवा त्याच्या/तिच्या वाहनाचे, मालमत्तेचे नुकसान असो, ही इन्शुरन्स पॉलिसी आर्थिकदृष्ट्या सर्व लायॅबलिटी खर्च कव्हर करते.
  • कॉम्प्रिहेन्सिव्ह टू-व्हिलर इन्शुरन्स पॉलिसी - तुमच्या रॉयल एनफील्ड क्लासिक 350 साठी इन्शुरन्सचा हा पर्याय थर्ड-पार्टीच्या लायॅबलिटीज तसेच तुमची बाईक आणि स्वत:चा समावेश करतो. ही पॉलिसी रॉयल एनफिल्ड क्लासिकच्या अपघातात, आगीच्या घटनेत, नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्ती इत्यादींमुळे झालेल्या कोणत्याही नुकसानासाठी कव्हरेज प्रदान करते. तुमची मोटारसायकल चोरीला गेल्यास किंवा दुरुस्तीच्या पलीकडे खराब झाल्यास तुम्ही त्याची किंमत देखील वसूल करू शकता.

रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 किंवा 500 चे मालक ज्यांनी सप्टेंबर 2018 नंतर त्यांचे वाहन खरेदी केले आहे ते देखील स्वतंत्र पॉलिसी घेऊ शकतात ज्यात 'ओन डॅमेज' समाविष्ट आहे. जरी या पॉलिसी थर्ड-पार्टीच्या लायॅबलिटींना कव्हर करत नसल्या तरीही, मोटारसायकलचा मालक तसेच बाईक स्वतः या पॉलिसी अंतर्गत समाविष्ट आहेत.

ऑनलाइन खरेदी आणि नूतनीकरण

डिजिट मोटारबाईक मालकांना ऑनलाइन अर्ज आणि नूतनीकरण ऑफर करते, ज्यामुळे संपूर्ण अर्ज प्रक्रिया जलद आणि सुलभ होते. तुम्ही रॉयल एनफिल्ड क्लासिक 500 इन्शुरन्सची किंमत तसेच त्याच्या 350 प्रकाराच्या विविध पर्यायांसह तपासू शकता आणि स्वतःसाठी योग्य पॉलिसी निवडू शकता. पॉलिसी निवडल्यानंतर, अर्जाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी काही मिनिटे पुरेशी होतात.

जलद ऑनलाइन क्लेम सेटलमेंट प्रक्रिया

डिजिटला, एक सुलभ आणि तत्पर क्लेम दाखल करण्याची प्रक्रिया देत असल्याचा तसेच जलद सेटलमेंट देत असल्याचा अभिमान आहे.क्लेम दाखल करण्याच्या दृष्टीने, डिजिट आपल्या ग्राहकांना स्मार्टफोन सक्षम सेल्फ-क्लेम प्रक्रियेचा पर्याय ऑफर करतो जी प्रक्रिया काही मिनिटांत पूर्ण करते. या व्यतिरिक्त, डिजिटमध्ये क्लेम सेटलमेंट प्रमाणाचे उच्च रेकॉर्डदेखील आहे, ज्यामुळे तुमचा क्लेेम नाकारला जाण्याची शक्यता कमी होते.

कोणतेही नो क्लेम बोनस (NCB) बेनिफीट नाही

रॉयल एनफील्ड क्लासिक 350 इन्शुरन्स नूतनीकरणाची निवड करताना, तुम्ही नो क्लेम बोनसचा लाभ देखील घेऊ शकता. तुम्ही विशिष्ट पॉलिसी कालावधीत कोणतेही क्लेम  न केल्यास, तुम्ही नूतनीकरण प्रीमियमवर सूट मिळवू शकता. सवलत 50% पर्यंत जाऊ शकते आणि क्लासिक मालक जे त्यांची इन्शुरन्स पॉलिसी डिजिटमध्ये हस्तांतरित करत आहेत ते देखील हा लाभ घेऊ शकतात.

प्रीमियम ग्राहक सेवा

राष्ट्रीय सुट्टी असली तरीही डिजिटची ग्राहक सेवा 24X7 उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त, डिजिट त्यांच्या ग्राहक सेवेपर्यंत ऑनलाइन किंवा कॉलद्वारे पोहोचण्याचा पर्याय देखील देते. ऑनलाइन क्लेम दाखल करण्यासोबतच, मालकांना फोन कॉलवर ग्राहक सेवेकडून मदत घेण्याचा पर्याय देखील असू शकतो.

वैयक्तिकृत आयडीव्ही( IDV)

आयडीव्ही (IDV) किंवा इन्शुअर्ड डिक्लेअर्ड व्हॅल्यू म्हणजे तुमच्या मोटरसायकलसाठी काढण्यात आलेल्या इन्शुरन्सची एकूण रक्कम. हे मूल्य तुमच्या मोटारसायकलचे डिप्रिसिएशन व्हॅल्यू वजा करून मोजले जाते ज्या किमतीला ती खरेदी केली होती. डिजिट आयडीव्ही सुचवत असताना, तुमच्याकडे तुमच्या गरजेनुसार तुमचा आयडीव्ही (IDV) कस्टमाइझ करण्याचा पर्याय देखील आहे.

एकापेक्षा जास्त ॲड-ऑन पर्याय

रॉयल एनफिल्ड क्लासिकचे मालक, जे त्यांच्या बाईकसाठी कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हर निवडतात, ते त्यांच्या पॉलिसीवर ॲड-ऑनच्या रूपात अतिरिक्त संरक्षण देखील खरेदी करू शकतात. डिजिटद्वारे ऑफर केलेले विविध ॲड-ऑनची यादी पुढे दिली आहे.

  • रिटर्न टू इनव्हॉईस कव्हर
  • झिरो डिप्रिसिएशन कव्हर
  • ब्रेकडाउन असिस्टन्स
  • इंजिन आणि गिअर प्रोटेक्शन इन्शुरन्स
  • कंझ्युमेबल इन्शुरन्स

तुम्ही रॉयल एनफील्ड क्लासिक 350 इन्शुरन्स किंमत तपासणे आणि तुम्ही निवडलेल्या ॲड-ऑनसह तुलना करणे आवश्यक आहे.

अशाप्रकारे, यासारख्या  इतर अनेक फायद्यांसह , डिजिटची इन्शुरन्स पॉलिसी तुमच्या रॉयल एनफील्ड क्लासिकसाठी टू-व्हिलर इन्शुरन्स पॉलिसीचा लाभ घेण्याच्या बाबतीत सर्वोत्तम पर्यायांपैकी एक आहे.

रॉयल एनफील्ड क्लासिक - प्रकार आणि एक्स- शोरूम किंमत

रॉयल एनफील्ड क्लासिक - प्रकार प्रकारांची एक्स-शोरूम किंमत (शहरानुसार बदलू शकते)
रॉयल एनफील्ड क्लासिक
क्लासिक 350 ABS, 40.8 केएमपीएल, 346 सीसी ₹ 153,444
क्लासिक 350 गनमेटल ग्रे, 40.8केएमपीएल, 346 सीसी ₹ 153,444
क्लासिक 350 गनमेटल ग्रे, 40.8 केएमपीएल, 346 सीसी ₹ 155,281
क्लासिक 350 सिग्नल एडिशन, 40.8 केएमपीएल, 346 सीसी ₹ 163,635
क्लासिक 500 ABS, 32 केएमपीएल, 499 सीसी ₹ 201,384
क्लासिक 500 स्क्वाड्रन ब्लू, 32 केएमपीएल, 499 सीसी ₹ 204,519
क्लासिक 500 स्टेल्थ ब्लॅक, 32 केएमपीएल, 499 सीसी ₹ 204,519
क्लासिक 500 डेझर्ट स्टॉर्म, 32 केएमपीएल, 499 सीसी ₹ 204,519
क्लासिक 500 Chrome, 32 केएमपीएल, 499 सीसी ₹ 211,818
क्लासिक 500 पेगासस , 499 सीसी ₹ 216,819

भारतातील रॉयल एनफील्ड क्लासिक इन्शुरन्सबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न

माझी रॉयल एनफील्ड क्लासिक इन्शुरन्स पॉलिसी बऱ्याच काळापासून बंद झाली असल्यास त्याचे नूतनीकरण करणे शक्य आहे का?

जर तुमची इन्शुरन्स पॉलिसी बऱ्याच काळापूर्वी बंद झाली असेल, तर तिचे नूतनीकरण केले जाऊ शकत नाही. तथापि, तुम्ही नवीन पॉलिसीसाठी अर्ज करू शकता जे तपासणीनंतर मंजुरीच्या अधीन आहे.

माझ्या रॉयल एनफिल्ड क्लासिक मोटारसायकलचा किरकोळ अपघात झाल्यावर मी क्लेम केला नाही तर काय होईल?

तुमच्‍या मोटारसायकलचा किरकोळ अपघात झाला असेल तर तुम्‍ही क्लेम दाखल न करणे निवडू शकता. हे तुम्हाला तुमच्या पॉलिसीच्या एनसीबी( NCB) बेनिफीटसह नूतनीकरण करण्यास अनुमती देईल.

अपघातात कोणाला थर्ड-पार्टी मानले जाते?

अपघातामुळे बाधित झालेल्या रायडरशिवाय इतर कोणतीही व्यक्ती थर्ड-पार्टी मानली जाते. यामध्ये टू-व्हिलरवर मागे बसलेल्या व्यक्तीचाही समावेश आहे.