हिरो माइस्ट्रो इन्शुरन्स ऑनलाइन खरेदी/नूतनीकरण करा
हिरो माइस्ट्रो टू-व्हीलर्स – या भारतातील सर्वोत्तम टू-व्हिलरपैकी एक का गणल्या जातात याबद्दल माहिती करून घ्या. तुम्ही तिच्यासाठी टू-व्हीलर इन्शुरन्स पॉलिसी शोधत असाल तर त्यामध्ये काय असावे याचीही माहिती घ्या.
हिरोने सातत्याने भारतातील काही उत्कृष्ट टू-व्हिलर बनवल्या आहेत. माइस्ट्रो हिरो कंपनी सर्वात किफायतशीर आणि वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांपैकी एक आहे. खास काटकसरी वर्गासाठी बनवलेल्या माइस्ट्रो स्कूटर्सची कामगिरी अगदी छाप पडण्यासारखी आहे आणि या किमतीत तिचा दर्जा अद्वितीय आहे.
चला तर, तयार आहात ना तुमची माइस्ट्रो घरी आणायला?
तुमची स्वतःची माइस्ट्रो असणं ही एक अभिमानाची बाब आहे. पण तरीही बाइक चालवताना अपघात झाल्यास तुमच्या बाइकची आणि अर्थव्यवहाराची काळजी घेतली पाहिजे. हिरो माइस्ट्रो इन्शुरन्स पॉलिसी अशा प्रसंगी होणाऱ्या नुकसानाचा धक्का कमी करते.
शिवाय तुमच्या माइस्ट्रोसाठी इन्शुरन्स पॉलिसी घेणे हे काही वैकल्पिक नाही. मोटार वाहन अधिनियम 1988 नुसार सर्व मोटार वाहनांचा किमान थर्ड पार्टी इन्शुरन्स असणे आवश्यक आहे. या नियमाची पूर्तता न केल्यास तुम्हाला 2,000 रुपये आणि पुन्हा तसे झाल्यास 4,000 रुपये इतका वाहतूक दंड होऊ शकतो.
माइस्ट्रो इन्शुरन्समध्ये काय कव्हर केले जाते?
तुम्ही डिजिटचा हिरो माइस्ट्रो इन्शुरन्स का घेतला पाहिजे?
हिरो माइस्ट्रोसाठी इन्शुरन्सचे प्रकार
थर्ड पार्टी
कॉम्प्रिहेन्सिव्ह
स्वतःच्या टू-व्हिलरला अपघातामुळे झालेले नुकसान/हानी |
×
|
✔
|
स्वतःच्या टू-व्हिलरला आगीमुळे झालेले नुकसान/हानी |
×
|
✔
|
स्वतःच्या टू-व्हिलरला नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान/हानी |
×
|
✔
|
थर्ड पार्टी वाहनाचे नुकसान |
✔
|
✔
|
थर्ड पार्टी मालमत्तेचे नुकसान |
✔
|
✔
|
वैयक्तिक अपघात कव्हर |
✔
|
✔
|
थर्ड पार्टी व्यक्तीला दुखापत/मृत्यू |
✔
|
✔
|
तुमची स्कूटर किंवा बाईक चोरीला जाणे |
×
|
✔
|
तुमचे आयडीव्ही (IDV) कस्टमाइझ करा |
×
|
✔
|
कस्टमाइझ्ड ॲड-ऑन्सद्वारे अतिरिक्त सुरक्षा |
×
|
✔
|
क्लेम कसा दाखल कराल?
तुम्ही टू-व्हीलर इन्शुरन्स प्लॅन घ्या किंवा त्याचे नूतनीकरण करा आणि निर्धास्त रहा, कारण आमची 3-स्टेप्सची क्लेम प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल आहे!
स्टेप 1
फक्त 1800-258-5956 वर फोन करा. कोणतेही फॉर्म्स भरण्याची आवश्यकता नाही.
स्टेप 2
तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर लिंक मिळवा. तुमच्या वाहनाला झालेल्या नुकसानाविषयीची माहिती टप्प्याटप्प्याने देण्यात येणाऱ्या मार्गदर्शनाप्रमाणे तुमच्या स्मार्टफोनवर द्या.
स्टेप 3
आमच्या नेटवर्क गॅरेजेसमधून रिएम्बर्समेंट किंवा कॅशलेस दुरुस्ती यापैकी तुम्हाला हवे ते निवडा.
डिजिटचे इन्शुरन्स क्लेम्स किती वेगाने निकाली काढले जातात?
तुम्ही जेव्हा तुमची इन्शुरन्स कंपनी बदलू पाहात असाल तेव्हा हा प्रश्न सर्वात आधी तुमच्या मनात यायला हवा. तुम्ही तसा विचार करत आहात ही चांगली गोष्ट आहे!
डिजिटचे क्लेम्स रिपोर्टकार्ड वाचाहिरो माइस्ट्रो : भारतातील सर्वोत्तम स्कूटर्सपैकी एक
फक्त आठ वर्षांपूर्वी आलेल्या हिरो माइस्ट्रोने देशात आधीपासूनच असलेल्या स्कूटर्सला चांगलीच टक्कर दिली आहे. हिरो आणि होंडा या दोन वेगवेगळ्या कंपन्या झाल्यानंतर लगेचच लंडनमध्ये ओटू अरेनामध्ये हिरो माइस्ट्रोचे लाँच करण्यात आले.
- मुख्यतः मोटारसायकल्सवर भर असणाऱ्या हिरोची माइस्ट्रो ही दुसरी स्कूटरची श्रेणी होती. आकर्षक डिझाईन आणि वैशिष्ट्ये व परवडण्याजोगी किंमत यामुळे ती लोकप्रिय आहे.
- 110 सीसी इंजिन असलेली ही स्कूटर 65 किमी प्रतिलिटर इतके मायलेज देऊ शकते.
- 2016 मध्ये सीएनबीसी-टीव्ही 18च्या ओव्हरड्राइव्ह अवॉर्डसमध्ये माइस्ट्रो एजला स्कूटर ऑफ द इयर अवॉर्ड मिळाले. (1)
- समीक्षकांनी आरामदायक चालवण्याबरोबरच युएसबी (USB) 3.0 चार्जिंग पोर्टसारख्या अत्त्याधुनिक वैशिष्ट्यांसाठी तिचे खूपच कौतुक केले.
- सरकारी नियमांना अनुसरून हिरोने प्रदूषण कमी करणारी बीएस(BS)- VI सुसंगत माइस्ट्रो एज लाँच केली.
- 2017 मधील लोकप्रिय स्कूटर्समध्ये माइस्ट्रोला तिसरा क्रमांक मिळाला. त्याच वर्षी जुलैमध्ये हिरोने 40,000 पेक्षा जास्त माइस्ट्रोंची विक्री करून बाजारावर अधिराज्य स्थापन केले.(2)
अशा सर्व यश आणि कौतुकाची वाटेकरी असलेली माइस्ट्रो प्रवाडणारी किंमत आणि उत्तम कामगिरीचा सवाल येतो तेव्हाही एक सर्वोत्तम स्कूटर आहे.
पण भारतातल्या रस्त्यांवर चालणाऱ्या इतर कोणत्याही टू-व्हिलरप्रमाणेच माइस्ट्रोलासुद्धा अपघात, चोरी आणि इतर धोके संभवतात.
त्यामुळेच, तुम्ही हिरो माइस्ट्रो खरेदी करता तेव्हा तिला आपघातांपासून पुरेसे संरक्षण असल्याची खात्री करून घेणे आवश्यक आहे. असे करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे खरेदीच्या वेळीच माइस्ट्रो इन्शुरन्स घेणे.
पण पॉलिसी घेण्यापूर्वी तुम्ही देशातील इन्शुरन्स कंपन्यांचा बारकाईने अभ्यास करणे आवश्यक आहे.
वाहन मालकांना विविध इन्शुरन्स पॉलिसींची श्रेणी देणारी डिजिट ही एक कंपनी आहे.
तुमच्या टू-व्हीलर इन्शुरन्स पॉलिसीसाठी डिजिटच का?
अनेक कारणांमुळे डिजिट तुमच्या स्कूटर इन्शुरन्ससाठी सर्वोत्तम पर्याय आहे. काही मुख्य मुद्दयांकडे आपण पाहू:
- ऑनलाइन खरेदी आणि क्लेम्स – माइस्ट्रोचे मालक म्हणून इन्शुरन्स घेताना किंवा क्लेम्स दाखल करताना तुमची दगदग कमी करतील अशा सोयी तुम्हाला वापरयाव्याशा वाटतील. डिजिटला हे चांगले समजते. म्हणूनच टू-व्हीलर पॉलिसी घेण्यासाठी आणि क्लेम दाखल करण्यासाठी आमची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे. या संदर्भात डिजिटची स्मार्टफोन एनेबल्ड सेल्फ इन्स्पेक्शन प्रोसेस खूपच उपयोगी आहे. या कागदपत्रविरहित पद्धतीमुळे तुमच्या अर्जांवर लवकर प्रक्रिया केली जाते. तसेच एकूणच तुम्हाला त्यासाठी कमी दगदग करावी लागते.
- 24x7 ग्राहक सहकार्य आणि उपलब्धता – अपघातामुळे अर्ध्या रात्री तुम्हाला तुमच्या हिरो माइस्ट्रो क्लेमची आवश्यकता लागू शकते. अशा वेळी तुम्हाला जो कोणत्याही वेळी तुम्हाला मदत करेल अशा एका तत्पर इन्शुरन्स कंपनीची गरज असते. डिजिटची 24x7 ग्राहक सेवा अशा वेळी तुम्हाला उपयोगी पडते. फक्त फोन करा आणि क्लेम भरण्याची प्रक्रिया चालू करा.
- 1,000 पेक्षा जास्त नेटवर्क गॅरेजेस – तुमच्याकडे एक चांगल्यापैकी इन्शुरन्स प्लॅन असेल तर तुमच्या स्वतःच्या पैशांनी तुमच्या स्कूटरला अपघातामुळे झालेले नुकसान भरून काढणे तसे कठीणच असते. डिजिटच्या अधिकृत गॅरेजेसचे विस्तृत जाळे असल्याने देशातील 1000 पेक्षा जास्त गॅरेजेसमध्ये तुम्ही कॅशलेस दुरुस्ती करून घेऊ शकता.
- साधे-सोपे नूतनीकरण – हिरो माइस्ट्रो इन्शुरन्सचे नूतनीकरण करायचे असल्यास पॉलिसीधारक त्यासाठी असलेल्या वेगवान आणि सोप्या प्रक्रियेचा उपयोग करू शकतात. कंपनी डिजिटल क्षेत्रात असल्याने ग्राहक इंटरनेटद्वारेही नूतनीकरण करू शकतात. प्लॅनच्या नूतनीकरणासाठी कागदपत्रे प्रस्तुत करून इन्स्पेक्शनची वाट पहात बसण्याची गरज नाही.
- आयडीव्ही कस्टमाइझ करण्याची सोय – इन्शुअर्ड डिक्लेअर्ड व्हॅल्यू ही एक विशिष्ट रक्कम आहे जी तुमची स्कूटर चोरीला गेली किंवा पूर्णपणे खराब झाली तर तुमची इन्शुरन्स कंपनी तुम्हाला देतो. ही रक्कम वाहनाच्या विक्रीच्या किंमतीतून डिप्रिसिएशनमधून वजा करून मोजली जाते. तुमच्या दुचाकीला अशा दुर्दैवी घटनांचा सामना करावा लागला तर अशा वेळी जास्त आयडीव्ही (IDV) मुळे तुम्हाला टू-व्हिलरमधली तुमची बहुतांश गुंतवणूक परत मिळू शकते. डिजिट तुम्हाला तुमच्या आवश्यकतेनुसार आयडीव्ही (IDV) कस्टमाइझ करू देते. तुम्ही भरघोस आयडीव्ही (IDV) निवडले तर तुमच्या हिरो माइस्ट्रोला आत्यंतिक नुकसान झाल्यास तुम्हाला जास्त रक्कम क्लेम करता येते.
- आकर्षक एनसीबीज – डिजिट पॉलिसीच्या कालावधीदरम्यान जर एखादे क्लेम-फ्री वर्ष असले तर पॉलिसीच्या नूतनीकरणाच्या वेळी तुम्हाला प्रीमियमवर आकर्षक सूट मिळते. लागोपाठ क्लेम-फ्री कालावधी आल्यास 50% पर्यंत एनसीबी (NCB) गोळा होत जाते आणि त्यामुळे पॉलिसी प्रीमियमवर अधिकाधिक सूट मिळते.
- पॉलिसींचे जास्त पर्याय – डिजिट तुम्हाला टू-व्हीलर इन्शुरन्सचे अनेक प्रकारचे पर्याय देते. त्यामुळे तुम्हाला निवडीला जास्त वाव मिळतो.
- a) थर्ड पार्टी लायॅबिलिटी टू-व्हीलर इन्शुरन्स पॉलिसी – या पॉलिसी थर्ड पार्टी व्यक्ती, वाहन किंवा मालमत्तेला झालेल्या नुकसानासाठी सुरक्षा देतात. मात्र तुम्ही तुमच्या स्कूटरला झालेल्या नुकसानासाठी क्लेम करू शकत नाही.
- b) कॉम्प्रिहेन्सिव्ह टू-व्हीलर इन्शुरन्स पॉलिसी – अशा पॉलिसी थर्ड पार्टी लायॅबिलिटीसाठी संरक्षणासोबत अपघाती नुकसान झाल्यास तुमच्या स्वतःच्या हिरो माइस्ट्रोच्या नुकसानासाठीसुद्धा संरक्षण देतात. त्याशिवाय अशा योजना चोरी, आग आणि नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तींमुळे होणाऱ्या नुकसानाचीही भरपाई करतात.
तुम्ही तुमच्या माइस्ट्रो स्कूटरसाठी इन्शुरन्स प्लॅन ती गाडी सप्टेंबर 2018 नंतर घेतली असल्यास विचारात घेऊ शकता. तो इन्शुरन्स आहे ओन-डॅमेज टू-व्हीलर इन्शुरन्स. यात तुम्हाला थर्ड-पार्टी वगळता कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसीचे सर्व फायदे मिळतात. ही एक खास अशी योजना आहे जिच्यामध्ये तुम्हाला थर्ड-पार्टी लायॅबिलिटीव्यतिरिक्त कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हरचे सर्व लाभ मिळतात. ज्यांच्याकडे आधीच थर्ड-पार्टी लायॅबिलिटी इन्शुरन्स आहे त्यांना त्यांच्या वाहनासाठी अधिक संपूर्ण आर्थिक सुरक्षा हवी असेल तर ही पॉलिसी उपयोगी ठरते.
ॲड-ऑन्स घ्या, तुम्हाला हवे तसे प्लॅन्स बनवा – माइस्ट्रोसाठी इन्शुरन्स घेताना त्याचे संपूर्ण संरक्षण व्हावे अश्या प्रकारे तो घेणे चांगले. सुदैवाने डिजिट त्यासाठी आवश्यक ती लवचिकता आणि विचारपूर्वक बनवलेले आणि परवडणारे ॲड-ऑन कव्हर्स देते. उदाहरणार्थ:
- झिरो डिप्रिसिएशन कव्हर
- ब्रेकडाऊन असिस्टन्स
- कंझ्यूमेबल कव्हर
- रिटर्न टू इनव्हॉईस कव्हर
- इंजिन अँड गियर प्रोटेक्शन कव्हर
या ॲड-ऑन कव्हर्सने तुमचे आर्थिक संरक्षण जास्त बळकट होते.
हिरो माइस्ट्रोच्या लोकप्रिय मॉडेल्ससाठी इन्शुरन्स पॉलिसीज
हिरो माइस्ट्रोची दोन मॉडेल्स हिरोद्वारे बनवली जातात – माइस्ट्रो एज आणि माइस्ट्रो एज 125. डिजिट त्या दोन्ही मॉडेल्ससाठी स्वतंत्र असे इन्शुरन्स देते.
हिरो माइस्ट्रो एज - हिरो माइस्ट्रो एजचे इंजिन ड्युअल व्हाल्व्ह 110 सीसी इंजिन आहे ऑटोमटीक क्लच आणि 8.7 एनएमचा कमाल टॉर्क असलेली माइस्ट्रो एक दमदार स्कूटर आहे. माइस्ट्रो एज इन्शुरन्स प्लॅन तुम्हाला तुमच्या स्कूटरला झालेल्या नुकसनामुळे होऊ शकणाऱ्या आर्थिक तोट्यापासून वाचवतो. त्याशिवाय अपघातात थर्ड पार्टीला झालेल्या नुकसानामुळे कोणत्याही कायदेशीर बाबीत अडकण्यापासून तुमचा बचाव होऊ शकतो.
- हीरो माइस्ट्रो एज 125 - हिरो माइस्ट्रो एज 125 ही भारताची पहिली फ्यूएल-इंजेक्शनवर आधारित स्कूटर आहे. यात अनेक सेन्सर्स आहेत ज्यामुळे अधिक स्मार्ट इंधन पुरवठा होतो. याच्या तंत्रज्ञानामुळे चढावर जास्त दमदार आणि एकूणच शक्तिशाली कामगिरी आणि इतर बरेच काही मिळते. या स्कूटरचे 125 सीसी इंजिन जोरदार वेग देऊ शकते. शिवाय 10.2 एनएम टॉर्क हे खिशाला परवडणाऱ्या स्कूटर्समध्ये खूपच प्रभावी वैशिष्ट्य आहे.
तुमचे माइस्ट्रो मॉडेल कोणतेही असो, त्यासाठी उत्तम इन्शुरन्स पॉलिसी घेण्याचे विसरू नका.
तुमच्या विशिष्ट गरजा आणि आवश्यकता विचारात घेऊनच तुमचा डिजिट टू-व्हीलर इन्शुरन्स निवडा.
हिरो माइस्ट्रो – विविध प्रकार आणि त्यांच्या एक्स-शोरूम किंमती
प्रकार |
एक्स-शोरून किंमत (शहरागणिक बदलू शकते) |
माइस्ट्रो एज व्हिएक्स, 53 केएमपीएल, 110.9 सीसी |
₹ 51,530 |
माइस्ट्रो एज, 53 केएमपीएल, 110.9 सीसी |
₹ 52,930 |