I agree to the Terms & Conditions
लाईट कमर्शियल वाहनांचे इन्शुरन्स: कव्हरेज, फायदे आणि ते कसे कार्य करते
लाईट कमर्शियल वाहनांचे इन्शुरन्स काय आहे?
लाईट कमर्शियल वाहन (LCV) इन्शुरन्स हा एक प्रकारचा कमर्शियल वेहिकल इन्शुरन्स आहे जो व्यावसायिकदृष्ट्या माल वाहतूक करण्यासाठी वापरल्या जाणार्या हलक्या वजनाच्या वाहनांसाठी डिझाइन केलेला आहे.
लाईट कमर्शियल वाहन इन्शुरन्स कव्हर केलेल्या वाहनांच्या प्रकारांमध्ये मिनी ट्रक्स, पिकअप मिनी व्हॅन्स आणि लाईट कमर्शियल वाहन श्रेणी अंतर्गत येणारी इतर वाहने समाविष्ट आहेत.
लाईट कमर्शियल वाहन इन्शुरन्स तुमचे आणि तुमच्या वाहनाचे अपघात, चोरी, नैसर्गिक आपत्ती, थर्ड पार्टी लायबिलिटी इ. पासून संरक्षण करतो.
नियमांचे कायदेशीरपणे पालन करण्यासाठी तुम्हाला सर्वात मूलभूत वैशिष्ट्ये ऑफर करणार्या लाईबलिटी ओन्ली पॉलिसीची आवश्यकता आहे. लायबिलिटी ओन्ली पॉलिसीच्या अंतर्गत इन्शुर्ड वाहन आणि मालमत्तेचे कोणतेही नुकसान कव्हर केले जाणार नाही. तरी, जर तुम्हाला अधिक संरक्षण हवे असेल तर तुम्ही डिजिट इन्शुरन्स मध्ये स्टँडर्ड पॅकेज आणि विविध एड-ऑन्स सह तुमची इन्शुरन्स पॉलिसी कस्टमाईज करू शकता आणि ते ही योग्य प्रीमिअम सह ऑनलाइन.
नोट: कमर्शियल वाहनांमध्ये लाईट कमर्शियल वाहन इन्शुरन्स डिजिटल कमर्शियल वेहिकल पॅकेज पॉलिसी अंतर्गत येते - माल वाहक वाहन
यूआयएन नंबर आयआरडीएएन 158RP0001V01201819
पुढे वाचा
कमर्शियल वाहन इन्शुरन्स तुम्हाला लाईट कमर्शियल वाहनांसाठी का गरजेचा आहे?
तुमच्याकडे खालील कारणांसाठी लाईट कमर्शियल वाहन इन्शुरन्स पॉलिसी असणे आवश्यक आहे.
- भारतात लाईट कमर्शियल मालवाहक वाहनासाठी किमान एक तरी ओन्ली लायबिलिटी कमर्शियल वाहन पॉलिसी असणे अनिवार्य आहे. त्याचे पालन न केल्यास दंड होऊ शकतो.
- तुमच्या लाईट कमर्शियल कमर्शियल वाहनासाठी इन्शुरन्स घेतल्याने तुम्हाला लायबिलिटी कव्हरेज मिळते. याचा अर्थ ते तुमच्या वाहनामुळे थर्ड पार्टीला झालेले कोणतेही नुकसान कव्हर करेल.
- वाहन मालकाच्या/ ड्रायव्हरच्या शारीरिक दुखापतीमुळे झालेल्या मृत्यूसाठी पॉलिसीधारकाला दिली जाणारी नुकसान भरपाई पॉलिसी खरेदी केलेल्या पॉलिसीच्या प्रकारावर आणि अटींवर अवलंबून असते.
- लाईट कमर्शियल वाहनाच्या इन्शुरन्समध्ये तुमचे वाहन खराब झाले असता किंवा चोरीला गेले असता तुमच्या वाहनाच्या दुरुस्तीचा किंवा रिप्लेसमेंटचा खर्च देखील समाविष्ट आहे, अर्थात तुम्हाला कोणत्याही आर्थिक जोखमीपासून संरक्षण मिळते.
- टेम्पोसारख्या कमर्शियल वाहनांचा वापर अनेकदा माल वाहून नेण्यासाठी आणि ऑनलाइन डिलिव्हरी साठी केला जातो, ज्यामुळे त्यांना अपघात, किंवा नुकसान होण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळे स्टँडर्ड पॅकेज इन्शुरन्स पॉलिसीसह त्यांचे संरक्षण केले जाते आणि अशा परिस्थितीत तुमचे संरक्षण होईल.
डिजिटचेच लाईट कमर्शियल वाहन इन्शुरन्स का निवडावे?
आमच्या ग्राहकांना आम्ही व्हीआयपी सारखीच वागणूक देतो, कसे ते जाणून घ्या..
लाईट कमर्शियल वाहन इन्शुरन्समध्ये काय कव्हर होते?
काय कव्हर होत नाही?
तुमच्या लाईट कमर्शियल वाहन इन्शुरन्स पॉलिसी मध्ये काय कव्हर होत नाही या विषयी माहिती घेणे महत्वाचे आहे जेणेकरून क्लेम केल्यावर तुम्हाला कोणतेही आश्चर्यकारक तथ्य समोर येणार नाही. अशा काही परिस्थिती खाली दिलेल्या आहेत:
डिजीटच्या लाईट कमर्शियल वाहन इन्शुरन्सची काही महत्वाची वैशिष्ट्ये
वैशिष्ट्ये |
डिजीट फायदे |
क्लेमची प्रक्रिया |
पेपर लेस क्लेमस |
ग्राहक सेवा |
24*7 सपोर्ट |
अतिरिक्त कव्हरेज |
पीए कव्हर्स, लीगल लायबिलिटी कव्हर, स्पेशल एक्सक्लूजन आणि कम्पलसरी डिडक्टीबल्स इत्यादी |
थर्ड पार्टीचे नुकसान |
वैयक्तिक नुकसानासाठी अनलिमिटेड लायबिलिटी आणि मालमत्तेच्या / वाहनाच्या नुकसानासाठी 7.5 लाखांपर्यंत |
लाईट कमर्शियल वाहन इन्शुरन्स प्लॅन्सचे प्रकार
तुमच्या लाईट कमर्शियल वाहनाचा प्रकार आणि तुम्ही विमा करू इच्छित असलेल्या वाहनांच्या संख्येवर आधारित आम्ही दोन प्रायमरी प्लॅन्स ऑफर करतो ज्यातून तुम्ही निवडू शकता.
लायबिलिटी ओन्ली
स्टँडर्ड पॅकेज
तुमच्या लाईट कमर्शियल वाहनामुळे कोणत्याही थर्ड पार्टी व्यक्ती किंवा मालमत्तेचे झालेले नुकसान |
✔
|
✔
|
तुमच्या इन्शुअर्ड लाईट कमर्शियल वाहनाद्वारा टो केल्या गेलेल्या वाहनामुळे कोणत्याही थर्ड पार्टी व्यक्ती किंवा मालमत्तेचे झालेले नुकसान |
✔
|
✔
|
नैसर्गिक आपत्ती, आग, चोरी किंवा अपघातामुळे स्वत:च्या लाईट कमर्शियल वाहनाचे होणारे नुकसान |
×
|
✔
|
लाईट कमर्शियलवाहनाच्या मालक- ड्रायवरला झालेली इजा / मृत्यू जर मालक-चालकाचा कोणताही आधीचा पर्सनल एक्सिडेंट कव्हर नसेल तर |
✔
|
✔
|
क्लेम कसा करावा?
1800-258-5956 या नंबर वर आम्हाला कॉल करा किंवा तुम्ही आम्हाला hello@godigit.com या मेल आयडी वर मेल करू शकता.
ही प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी तुमच्या पॉलिसीचे डिटेल्स म्हणजेच पॉलिसी नंबर, अपघाताचे ठिकाण, वेळ आणि तारीख,आणि इन्शुर्ड / कॉलरचा नंबर तुमच्या हाताशी ठेवा.
डिजीट इन्शुरन्स क्लेम्स किती काळात सेटल केले जातात?
तुमची इन्शुरन्स कंपनी बदलताना तुमच्या मनात हा प्रश्न सर्वात पहिले यायला हवा. तुमचे अभिनंदन, तुम्ही हे करता आहात.
डिजीट इन्शुरन्स रिपोर्ट कार्ड वाचा