I agree to the Terms & Conditions
जेसीबी इन्शुरन्स पॉलिसी: कव्हरेज, बेनिफिट्स आणि हे कसे काम करते
काय आहे जेसीबी बॅकहो लोडर इन्शुरन्स?
जेसीबी इन्शुरन्स किंवा बॅकहो लोडर इन्शुरन्स ही एक कमर्शिअल वेहिकल इन्शुरन्स पॉलिसी आहे ज्यामध्ये मोठमोठी बांधकामे, शेतीकाम, व्यावसायिक कामे आणि खोदकामाच्या ठिकाणी वापरल्या जाणाऱ्या जेसीबी मशीन्स आणि उपकरणे कव्हर केली जातात.
कोणत्याही वाहनाचे अनपेक्षित अपघात, चोरी, नैसर्गिक आपत्ती, थर्ड पार्टी लायबिलिटी अशा कोणत्याही कारणामुळे नुकसान झाले असता ही कॉम्प्रीहेन्सिव्ह इन्शुरन्स पॉलिसी फायनान्शियल कव्हरेज देते. सगळं कव्हर होऊ शकत पण तुम्ही निवडलेल्या एड ऑन्स वरती तुम्हला मिळणारे कव्हरेज अवलंबून असते.
तुमचा प्रिमियम भरून तुम्ही सगळे बेनिफिट मिळवू शकता आणि मिळवा मनःशांतीची हमी.
नोट: जेसीबी चा इन्शुरन्स हा कमर्शियल गाड्यांच्या पॅकेज मध्ये फाईल केला गेला आहे - मिसलेनीयास एंड स्पेशल टाइप्स ऑफ वेहिकल
यूआयएन नंबर आयआरडीएएन 158RP0003V01201819.
तुम्हाला जेसीबी इन्शुरन्सची गरज का आहे?
तुम्ही जेसीबी ओनर म्हणून तुमच्याकडे खालील काही कारणांमुळे तुमच्याकडे बॅकहो लोडर इन्शुरन्स असले पाहिजे
- थर्ड पार्टीचे तुमच्या बॅकहो लोडर मुळे कोणतेही नुकसान किंवा हानी झाल्यास त्या पार्टीचे संरक्षण करण्यासाठी एक तरी लायबिलिटी ओन्ली पॉलिसी असणे कायद्याने बंधनकारक आहे.
- आकस्मिक परीस्थितीमध्ये होणाऱ्या अनपेक्षित नुकसानापासून तुमचे जेसीबी इन्शुरन्स पॉलिसी द्वारे संरक्षण केले जाईल.
- जसे की जेसीबी सारख्या अवजड मशीन्स जोखमीच्या परिस्थितीत काम करतात आणि नुकसान होण्याची दाट शक्यता असते, अशातच कोणत्याही अपघातामुळे तुमच्या गुंतवणुकीचे मोठे नुकसान होऊ शकते. अशा परिस्थितीत जेसीबीला एखाद्या स्टँडर्ड पॉलिसी द्वारे सुरक्षित केल्याने तुमचे आर्थिक संरक्षण होऊ शकते.
- तूम्ही निवडलेल्या जेसीबी पॉलिसीनुसार मशिनरीच्या करंट रिप्लेसमेंट व्हॅल्यू प्रमाणे तुम्हाला इन्शुरन्स मिळेल.
- जर तुम्ही कॉम्प्रीहेन्सिव्ह पॉलिसी खरेदी केलीत तर तुम्हाला मशीनचे आंशिक किंवा पूर्णतः कोणत्याही प्रकारे नुकसान झाल्यास कव्हरेज मिळू शकते.
डीजीटचेच जेसीबी इन्शुरन्स का निवडावे?
आमच्या ग्राहकांना आम्ही व्हीआयपी सारखीच वागणूक देतो, कसे ते जाणून घ्या..
जेसीबी इन्शुरन्समध्ये काय कव्हर होते?
काय कव्हर होत नाही?
आपल्या जेसीबी इन्शुरन्स पॉलिसी मध्ये काय कव्हर होत नाही हे माहित करून घेणे देखील महत्वाचे आहे , जेणेकरून क्लेम केल्यावर तुम्हाला कोणतेही आश्चर्यकारक तथ्य समोर येणार नाही. अशा काही परिस्थिती खाली दिलेल्या आहेत:
डिजीटच्या जेसीबी इन्शुरन्सची काही महत्वाची वैशिष्ट्ये
वैशिष्ट्ये |
डिजीट फायदे |
क्लेमची प्रक्रिया |
पेपर लेस क्लेमस |
ग्राहक सेवा |
24*7 सपोर्ट |
अतिरिक्त कव्हरेज |
पीए कव्हर्स, लीगल लायबिलिटी कव्हर, स्पेशल एक्सक्लूजन आणि कम्पलसरी डिडक्टीबल्स इत्यादी |
थर्ड पार्टीचे नुकसान |
वैयक्तिक नुकसानासाठी अनलिमिटेड लायबिलिटी आणि मालमत्तेच्या / वाहनाच्या नुकसानासाठी 7.5 लाखांपर्यंत |
जेसीबी इन्शुरन्स प्लॅन्सचे प्रकार
तुमच्या अवजड वाहनाचा प्रकार आणि तुम्ही इन्शुअर करू इच्छित असलेल्या वाहनांच्या संख्येवर आधारित आम्ही दोन प्रायमरी प्लॅन्स ऑफर करतो ज्यातून तुम्ही निवडू शकता.
लायबिलिटी ओन्ली
स्टँडर्ड पॅकेज
तुमच्या अवजड वाहनामुळे कोणत्याही थर्ड पार्टी व्यक्ती किंवा मालमत्तेचे झालेले नुकसान. |
✔
|
✔
|
तुमच्या इन्शुअर्ड अवजड वाहनाद्वारा टो केल्या गेलेल्या वाहनामुळे कोणत्याही थर्ड पार्टी व्यक्ती किंवा मालमत्तेचे झालेले नुकसान. |
✔
|
✔
|
नैसर्गिक आपत्तीमुळे ,आग, चोरी किंवा अपघातामुळे स्वत:च्या अवजड वाहनाचे होणारे नुकसान |
×
|
✔
|
अवजड वाहनाच्या मालक- ड्रायवरला झालेली इजा / मृत्यू जर मालक-चालकाचा कोणताही आधीचा पर्सनल एक्सिडेंट कव्हर नसेल तर |
✔
|
✔
|
क्लेम कसा करावा?
1800-258-5956 या नंबर वर आम्हाला कॉल करा किंवा तुम्ही आम्हाला hello@godigit.com या मेल आयडी वर मेल करू शकता.
ही प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी तुमच्या पॉलिसीचे डिटेल्स म्हणजेच पॉलिसी नंबर, अपघाताचे ठिकाण, वेळ आणि तारीख,आणि इन्शुर्ड / कॉलरचा नंबर तुमच्या हाताशी ठेवा.
डिजीट इन्शुरन्स क्लेम्स किती काळात सेटल केले जातात?
तुमची इन्शुरन्स कंपनी बदलताना तुमच्या मनात हा प्रश्न सर्वात पहिले यायला हवा. तुमचे अभिनंदन, तुम्ही हे करता आहात.
डिजीट इन्शुरन्स रिपोर्ट कार्ड वाचा