Third-party premium has changed from 1st June. Renew now
कार इन्शुरन्स कव्हरबद्दल आपल्याला माहीत नसलेल्या 10 गोष्टी
बऱ्याचदा, कार मालक फक्त कार इन्शुरन्स घेतात कारण तो मॅनडेटरी* आहे आणि रिनिवलची वेळ आली तरीही प्रत्यक्षात डिटेल्स वाचत नाहीत.
परंतु, आपले पॉलिसी दस्तऐवज तपासल्याशिवाय, आपण त्याच्या कव्हरेजची कोणतीही मुख्य वैशिष्ट्ये आणि फायदे गमावत आहात की नाही हे आपल्याला कधीच कळणार नाही.
आम्हाला खात्री आहे की आपल्याला आपल्या कारबद्दल अभिमान आहे आणि ती आपल्याला आनंद देते म्हणून आपण तिच्यावर प्रेम करता आणि ती घेण्यापूर्वी आपण अनेक महिने विचारविनिमय केला असेल, संशोधन आणि बचत केली असेल. मग जेव्हा आपल्या कारचे संरक्षण करण्याची वेळ येते तेव्हा आपण तेच संशोधन करणे का टाळता? कार इन्शुरन्स ही छत्रीसारखी आहे जी आपल्या कारला अनपेक्षित जोखीम आणि नुकसानीच्या जंजाळातून वाचवते.
पण काळजी करू नका! आम्ही आपल्या कार इन्शुरन्स पॉलिसीमध्ये आपण गमावलेल्या (किंवा माहित नसलेल्या) सर्व गोष्टींवर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत जेणेकरून आपण त्याचे जास्तीत जास्त फायदे घेऊ शकाल. आपल्या कार इन्शुरन्स पॉलिसीबद्दल आपण गमावलेल्या काही गोष्टी येथे आहेत:
*भारतात कायद्याने किमान थर्ड पार्टी लायबिलिटी इन्शुरन्स असणे आवश्यक आहे.
1. आपले कव्हरेजचे काम केवळ अपघात कव्हर करणे एवढेच नाहीये
अनेकांना असे वाटते की कार इन्शुरन्सचा उपयोग फक्त तेव्हाच असतो जेव्हा आपली कार खराब होते किंवा अपघातांमुळे डॅमेज होते. पण कार इन्शुरन्स मध्ये त्यापेक्षा बरंच काही कव्हर केलं जातं!
थर्ड पार्टी लायबिलिटी पॉलिसी केवळ कोणत्याही थर्ड-पार्टी किंवा त्यांच्या मालमत्तेचे डॅमेज कव्हर करते, परंतु कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्स आपल्या स्वत: च्या कारला चोरी, नैसर्गिक आपत्ती, आग आणि बरेच काही यामुळे होणारे डॅमेज आणि नुकसानीपासून देखील कव्हर करते.
2. आपण विनामूल्य टोइंग मिळवू शकता
जेव्हा आपल्या कारला अपघातात होतो किंवा खराब होते, विशेषत: महामार्ग किंवा दुर्गम भागात, मेकॅनिक कधीकधी गॅरेजमध्ये वाहन टो करायला अवाजवी अमाऊंट मागतात.
तथापि, आपणास माहित आहे का की कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅनसह, बहुतेक कार इन्शुरन्स प्रदाता सामान्यत: विशिष्ट रक्कम किंवा अंतरापर्यंत विनामूल्य टोइंग असिसटन्स प्रदान करतात?
त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा आपले वाहन खराब होईल तेव्हा आपल्या कार इन्शुरन्स प्रदात्याशी संपर्क साधा आणि जास्तीत जास्त फायदा उचला.
3. पेपरलेस आणि त्वरित रिनिवलचा फायदा मिळेल
आपला असा समज असेल की दस्तऐवजांशी संबंधित कोणतीही गोष्ट एक लांबलचक आणि वेळखाऊ प्रक्रिया असेल. परंतु जेव्हा आपल्या कार इन्शुरन्स पॉलिसीचे रिनिवल करण्याची वेळ येते तेव्हा आजकाल बरेच इन्शुरन्स प्रदाता आपल्याला एक सोपे आणि त्वरित ऑनलाइन रिनिवल करण्याची सुविधा देतात ज्यात शून्य किंवा कमीतकमी दस्तऐवज आणि कोणतेही गुंतागुंतीचे फॉर्म भरणे समाविष्ट नसते. फक्त काही क्लिक्स वर हे शक्य होते! 😊
4. डॅमेज झाल्यास आपण कॅशलेस दुरुस्तीचा पर्याय निवडू शकता
आपल्याकडे कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्स पॉलिसी असेल तर आपल्याला कॅशलेस कार इन्शुरन्सचा फायदा मिळू शकतो.
ही त्रासमुक्त प्रक्रिया आपल्याला आपल्या खिशातून काहीही न देता अपघातामुळे कोणत्याही डॅमेजनंतर कोणत्याही अधिकृत गॅरेजमध्ये - ज्याला नेटवर्क गॅरेज देखील म्हणतात - आपली कार दुरुस्त करण्यास मदत करते. दुरुस्तीची बिले थेट आपल्या इन्शुररकडे पाठविली जातील आणि ते गॅरेज बरोबर त्याचा निपटारा करतील.
5. आपण आपल्या कार अॅक्सेसरीज आणि बदलांसाठी देखील कव्हर करू शकता
जर आपली कार अपघातात खराब झाली असेल किंवा हरवली असेल तर बहुतेक कार इन्शुरन्स पॉलिसी फक्त त्या कारलाच कव्हर करतील आणि आपण त्यामधील अॅक्सेसरीज किंवा त्यामध्ये केलेले बदल (उदाहरणार्थ सीएनजी फ्यूअल किट बसविणे) कव्हर करणार नाही.
तथापि, आपण आपल्या इन्शुररला या नवीन अॅक्सेसरीजबद्दल सूचित करून हे कव्हर देखील करू शकता. यामुळे आपला प्रीमियम वाढू शकतो, परंतु अॅक्सेसरीजचा संपूर्ण नवीन सेट खरेदी करण्यापेक्षा ते अधिक किफायतशीर ठरेल! 😄
6. आपण नो क्लेम बोनससाठी पात्र असू शकता
नो क्लेम बोनस (किंवा एनसीबी) एक प्रकारचे डिसकाऊंट आहे जे इन्शुरन्स कंपन्या मागील वर्षात कोणताही क्लेम न केलेल्यांना देतात.
तर, जर आपण पॉलिसी वर्षात सुरक्षितपणे वाहन चालवत असाल तर इन्शुरन्स कंपनी आपल्याला रिनिवलच्या वेळी आपल्या प्रीमियमवर डिसकाऊंट देते.
नो क्लेम बोनस डिसकाऊंट 20% ते 50% पर्यंत असते आणि प्रत्येक क्लेम-फ्री वर्षाबरोबर वाढते. ही कपात आपल्या प्रीमियममध्ये किती डीफ्रंस तयार करू शकते याचा विचार करून, सुरक्षितपणे वाहन चालविणे लक्षात ठेवा.
आपण काही छोटे क्लेम्स केले तरीही आपले एनसीबी वैध आहे याची खात्री करण्यासाठी आपण अॅड-ऑन म्हणून काही इन्शुरन्स कंपन्यांकडून नो-क्लेम बोनस प्रोटेक्शन कव्हर देखील खरेदी करू शकता.
7. आपण आपला नो क्लेम बोनस ट्रान्सफर करू शकता
जर आपण आपली कार अपग्रेड करण्याचे प्लॅनिंग करत असाल आणि आपण आपल्या सध्याच्या वाहनासह नो क्लेम बोनस (एनसीबी) जमा केला असेल तर आपला एनसीबी गमावला जात नाही.
हे आपण आपल्या नव्या कारमध्ये ट्रान्सफर करू शकता. जरी आपण आपली कार इन्शुरन्स पॉलिसी ट्रान्सफर करण्याचे प्लॅनिंग करत असाल तरीही आपण आपल्या नवीन पॉलिसीअंतर्गत कार इन्शुरन्स पॉलिसीमध्ये आपले सध्याचे एनसीबी ठेवू शकता.
8. आपण झीरो-डेप्रीसीएशन कव्हरसह अधिक बचत करू शकता
आपल्या वाहनाची आणि त्याच्या भागांची वास्तविक किंमत कालांतराने कमी होते, मुख्यत: विअर आणि टीयर मुळे. किंबहुना, शोरूममधून नवीन कार बाहेर काढल्यावर तिची किंमत 5% घसरली असे मानले जाते! 😲
झीरो डेप्रीसीएशन अॅड-ऑनसह, आपण हे सुनिश्चित करू शकता की दुरुस्ती किंवा रीप्लेसमेंटसाठी क्लेम सेटलमेंट अमाऊंटची कॉम्पप्युटिंग करताना आपली इन्शुरन्स कंपनी आपल्या वाहनाच्या आणि त्याच्या भागांच्या मूल्यांच्या या डेप्रीसीएशनचा विचार करणार नाही.
9. सामान्य दुरुस्तीव्यतिरिक्त, आपण आपल्या इंजिनचे संरक्षण देखील करू शकता
आपले इंजिन दुरुस्त करणे किंवा कोणत्याही कारणास्तव आपले इंजिन रीप्लेस करणे एखाद्या अपघाताव्यतिरिक्त खूप महाग ठरू शकते, आणि ते स्टँडर्ड पॉलिसीअंतर्गत कवर्ड केले जात नाही.
तथापि, जर आपण इंजिन प्रोटेक्शन अॅड-ऑन घेतले असेल तर ऑइल लिकेज किंवा पाणी शिरल्यामुळे आपल्या कारचे इंजिन सीझ झाले असले तरीही आपण सुरक्षित असाल.
10. आपण आपल्या हरवलेल्या कीज देखील रीप्लेस करू शकता!
आपल्या कारच्या कीज गमावणे हा खरोखर तणावपूर्ण अनुभव असू शकतो. परंतु जर आपल्याकडे ब्रेकडाउन असिस्टन्स अॅड-ऑन कव्हरअसेल तर आपल्याला केवळ आपले वाहन टोईंग करण्यास मदत मिळणार नाही, तर आपण आपल्या अतिरिक्त कीजचा सेट आपल्याला डेलिव्हर केला जाइल.
किंवा, जर आपण चुकून आपल्या कारच्या आत कीज विसरून कार लॉक केली असले तर आपल्याला कार अनलॉक करण्यासाठी आणि कीज मिळवण्यासाठी देखील मदत मिळू शकते!
म्हणूनच, आपल्यासाठी कार इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करणे मॅनडेटरी आहे (कमीतकमी, थर्ड-पार्टी लायबिलिटी ओन्ली प्लॅन), याचा अर्थ असा नाहीये की आपण आपल्या पॉलिसीचे सर्व फायदे नीट तपासून पाहू नये.
आपली पॉलिसी नेमकी काय ऑफर करते हे आपल्याला माहित असल्यास, आपण उपलब्ध असलेल्या बऱ्याच पर्यायांची तुलना देखील करू शकता आणि योग्य इन्शुरन्स पॉलिसी निवडू शकता.जी आपल्या सर्व आवश्यकतांशी सर्वात चांगली जुळते, जेणेकरून आपण आपल्या कार इन्शुरन्स पॉलिसीचा जास्तीत जास्त फायदा घेऊ शकाल.
कृपया पुन्हा एकदा प्रयत्न करा!