फोक्सवॅगन तायगुन कार इन्शुरन्स

Get Instant Policy in Minutes*

Third-party premium has changed from 1st June. Renew now

फोक्सवॅगन टिगुआन इन्शुरन्स पॉलिसी खरेदी किंवा रिन्यू करा

जर्मन वाहन निर्माता फॉक्सवॅगनने 2007 मध्ये अनावरण केलेली टिगुआन ही कॉम्पॅक्ट क्रॉसओव्हर एसयूव्ही आणि कंपनीचे दुसरे क्रॉसओव्हर एसयूव्ही मॉडेल आहे. 2020 पर्यंत, ब्रँडमेकरने जगभरात सुमारे 6 दशलक्ष युनिट्सची विक्री केली, ज्यामुळे ही कार फोक्सवॅगनच्या सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या मॉडेल्सपैकी एक बनली.

भारतीय प्रवासी बाजारपेठेत डिसेंबर 2021 मध्ये टिगुआनची फेसलिफ्ट आवृत्ती लाँच करण्यात आली. ही नवी आवृत्ती सुधारित बंपर, अलॉय आणि स्टीअरिंग व्हीलसह सुसज्ज आहे. आधीच्या डिझेल इंजिनची जागा या कारने घेतली असून आता ती फक्त पेट्रोल व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे.

आता या मॉडेलचे बुकिंग सुरू झाले आहे, आज तुम्ही शोरूममधून तुमचे बुकिंग मिळवू शकता. तथापि, खरेदी सुरू करण्यापूर्वी, आपण आपल्या कारच्या सुरक्षिततेचा विचार केला पाहिजे कारण यामुळे आपल्याला भविष्यात जास्त बचत करता येईल. हे लक्षात घेता, आपण विश्वसनीय प्रदात्याकडून फोक्सवॅगन टिगुआन इन्शुरन्स मिळविणे आवश्यक आहे.

या बाबतीत, आपण डिजिट इन्शुरन्स कंपनीचा विचार करू शकता कारण त्याच्या ऑफरमुळे. खालील सेगमेंट मध्ये आपण या इन्शुरन्स कंपनीकडून टिगुआन इन्शुरन्स प्लॅन का खरेदी केल्या पाहिजेत हे डिटेल मध्ये स्पष्ट केले आहे.

फोक्सवॅगन टिगुआन कार इन्शुरन्समध्ये काय कवर्ड आहे

डिजिटचा फोक्सवॅगन टिगुआन कार इन्शुरन्स का खरेदी करावा?

फोक्सवॅगन टिगुआनसाठी कार इन्शुरन्स प्लॅन्स

थर्ड पार्टी कॉम्प्रिहेन्सिव्ह

अपघातामुळे स्वताच्या कारचे डॅमेज/नुकसान

×

आग लागल्यास स्वताच्या कारचे डॅमेज/नुकसान

×

नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी स्वताच्या कारचे डॅमेज/ नुकसान

×

थर्ड पार्टी वाहनाचे डॅमेज

×

थर्ड पार्टी मालमत्तेचे डॅमेज

×

पर्सनल एक्सीडेंट इन्शुरन्स

×

थर्ड-पार्टीच्या व्यक्तीची जखम / मृत्यू

×

आपल्या कारची चोरी

×

डोअरस्टेप पीक-अप आणि ड्रॉप

×

आपला आयडीव्ही(IDV) कस्टमाइज करा

×

कस्टमाइज्ड अॅड-ऑनसह अतिरिक्त संरक्षण

×
Get Quote Get Quote

कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि थर्ड पार्टी इन्शुरन्समधील डीफ्रंसबद्दल अधिक जाणून घ्या

क्लेम कसा फाइल करावा?

आपण आमची कार इन्शुरन्स योजना खरेदी किंवा रिनिवल केल्यानंतर, आपण तणावमुक्त राहता कारण आमच्याकडे 3-स्टेप्स, पूर्णपणे डिजिटल क्लेम्स प्रोसेस आहे!

स्टेप 1

फक्त 1800-258-5956 वर कॉल करा. फॉर्म भरायची गरज नाही.

स्टेप 2

आपल्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर सेल्फ इन्स्पेक्शनची लिंक मिळवा. स्टेप बाय स्टेप प्रक्रियेद्वारे आपल्या स्मार्टफोनमधून आपल्या वाहनाचे डॅमेज शूट करा.

स्टेप 3

आमच्या गॅरेजच्या नेटवर्कद्वारे आपण निवडू इच्छित असलेल्या दुरुस्तीची पद्धत म्हणजेच रीएमबर्समेंट किंवा

डिजिट इन्शुरन्स क्लेम्स किती वेगाने सेटल केले जातात? इन्शुरन्स कंपनी बदलताना हा पहिला प्रश्न आपल्या मनात यायला हवा. आपण असा विचार करताय हे चांगले आहे! डिजिटचे क्लेम रिपोर्ट कार्ड वाचा

फोक्सवॅगन टिगुआन इन्शुरन्ससाठी डिजिट का निवडावा?

आपल्या फोक्सवॅगन कारसाठी इन्शुरन्स प्लॅन निवडताना आपण फोक्सवॅगन टिगुआन इन्शुरन्स किंमत, अॅड-ऑन सुविधा, नो क्लेम बोनस, आपल्या कारचा आयडीव्ही यासारख्या अनेक गोष्टींचा विचार केला पाहिजे. या गोष्टींवर विविध इन्शुरन्स कंपन्यांच्या अनेक प्लॅन्सची तुलना केल्यास आपल्याला माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत होईल.

या संदर्भात, आपण डिजिटद्वारे दिलेल्या फायद्यांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी पुढे वाचा.

1. विविध इन्शुरन्स पॉलिसी

जर आपण या इन्शुरन्स कंपनीकडून फोक्सवॅगन टिगुआनसाठी इन्शुरन्स मिळविण्याचा प्लॅन करत असाल तर आपण खालील इन्शुरन्स प्रकारांमधून निवडू शकता:

  • थर्ड पार्टी इन्शुरन्स : आपल्या फोक्सवॅगन कार आणि थर्ड पार्टी यांच्यात अपघात झाल्यास हे इन्शुरन्स कव्हर फायदेशीर ठरते ज्यामुळे आपल्या फोक्सवॅगन कारचे मोठे डॅमेज होते. या इन्शुरन्स शिवाय, आपल्याला झालेल्या डॅमेजची कॉस्ट सहन करावी लागेल ज्यामुळे आपला आर्थिक बोजा वाढू शकतो. फोक्सवॅगन टिगुआनसाठी थर्ड पार्टी कार इन्शुरन्स केवळ थर्ड पार्टी डॅमेजलाच कव्हर करत नाही तर खटल्याच्या समस्यांची काळजी देखील घेतो.
  • कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स : अशी परिस्थिती उद्भवू शकते जेव्हा आपल्या फोक्सवॅगन कारला धडक, आग, चोरी, नैसर्गिक किंवा कृत्रिम आपत्तीमुळे डॅमेज होते. अशा परिस्थितीत, आपण डिजिटकडून कॉम्प्रिहेन्सिव्ह फोक्सवॅगन टिगुआन इन्शुरन्स मिळविला पाहिजे आणि मोठ्या डॅमेज दुरुस्ती कॉस्टमुळे उद्भवणाऱ्या आर्थिक नुकसानापासून स्वत: चे संरक्षण केले पाहिजे. ही इन्शुरन्स पॉलिसी एखाद्या व्यक्तीला, मालमत्तेला किंवा वाहनाला झालेल्या थर्ड पार्टी डॅमेजविरूद्ध कव्हरेज देखील प्रदान करते.

2. अॅड-ऑन कव्हरची रेंज

जर आपण कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅनसाठी डिजिटवरून फोक्सवॅगन टिगुआन इन्शुरन्स रिन्यू करण्याची निवड केली तर आपल्याला संपूर्ण कव्हरेज मिळू शकत नाही. त्यादृष्टीने, आपण अतिरिक्त शुल्का भरून काही अॅड-ऑन कव्हरचा फायदा घेऊ शकता. काही अॅड-ऑन पॉलिसीझमध्ये हे समाविष्ट आहे:

  • झीरो डेप्रीसीएशन
  • इंजिन आणि गिअरबॉक्स प्रोटेक्शन कव्हर
  • रोडसाइड असिसटन्स
  • रिटर्न टू इंव्हॉईस कव्हर
  • कंझ्युमेबल कव्हर

3. कॅशलेस क्लेम्स

डिजिट आपल्याला फोक्सवॅगन टिगुआन इन्शुरन्स ऑनलाइन क्लेम्सची निवड करण्यास आणि दुरुस्तीचा कॅशलेस मार्ग निवडण्यास अनुमती देते. या पद्धतीत, आपण व्यावसायिक सेवा मिळविण्यासाठी दुरुस्ती केंद्राला काहीही पे करणे टाळू शकता. आपला इन्शुरर आपल्यावतीने पेमेंट सेटल करेल, ज्यामुळे आपण भविष्यातील गरजांसाठी आपले पैसे वाचवू शकाल.

4. अनेक नेटवर्क गॅरेज

संपूर्ण भारतात कॅशलेस गॅरेजचे एक विशाल नेटवर्क आहे जिथून आपण आपल्या फोक्सवॅगन कारसाठी दुरुस्ती सेवांचा फायदा घेऊ शकता. या दुरुस्ती केंद्रांमुळे आपल्याला आपल्या टिगुआन कार दुरुस्ती कॅशलेस पद्धतीने करणे देखील शक्य होते.

5. आयडीव्ही(IDV) कस्टमायझेशन

फोक्सवॅगन टिगुआन इन्शुरन्स कॉस्ट कारच्या आयडीव्ही किंवा इन्शुअर्ड डीक्लेअर्ड व्हॅल्यूवर अवलंबून असल्याने, जास्तीत जास्त फायदे मिळविण्यात मदत करणारे योग्य मूल्य निवडणे महत्वाचे आहे. या संदर्भात, डिजिट आपल्या कारच्या आयडीव्ही साठी कस्टमायझेशन पर्याय देते, ज्यामुळे आपण आपल्या गरजेनुसार मूल्य निवडू शकता. अशा प्रकारे, आपण कार चोरी किंवा कधीही भरून न येणारे डॅमेज झालेले असल्यास जास्तीत जास्त रिटर्न्स मिळवू शकता.

6. डोरस्टेप पिक-अप आणि ड्रॉप सुविधा

जर आपण डिजिटकडून कॉम्प्रिहेन्सिव्ह फोक्सवॅगन टिगुआन इन्शुरन्स प्लॅन खरेदी केलात तर आपण आपल्या कारच्या खराब झालेल्या भागांसाठी सोयीस्कर पिक-अप आणि ड्रॉप सुविधेचा फायदा घेऊ शकता. ही सुविधा आपल्याला घरबसल्या आपल्या फोक्सवॅगनसाठी व्यावसायिक दुरुस्ती सेवा मिळविण्यास मदत करते.

7. नो क्लेम फायदे

जर आपण आपल्या पॉलिसी कालावधीत क्लेम-फ्री वर्ष राखले तर डिजिट फोक्सवॅगन टिगुआन इन्शुरन्स रिन्यू प्राइजवर नो क्लेम बोनस ऑफर करते. नो क्लेम बोनस म्हणजे पॉलिसी प्रीमियमवरील डिसकाउंट जी नॉन-क्लेम वर्षांच्या संख्येवर अवलंबून असते. हा इन्शुरर 50% पर्यंत डिसकाउंट देतो.

8. 24×7 ग्राहक सपोर्ट

आपल्या फोक्सवॅगन कारसाठी इन्शुरन्स घेताना आपल्याला प्रश्न किंवा शंका उत्पन्न होऊ शकतात. अशा परिस्थितीत, आपण आपल्या इच्छेनुसार डिजिटच्या ग्राहक सेवेशी संपर्क साधू शकता आणि त्वरित समाधान मिळवू शकता. राष्ट्रीय सुट्टीच्या दिवशीही ते 24 तास उपलब्ध असतात.

आता आपल्याला डिजिटच्या फायद्यांबद्दल सर्व काही माहित आहे, आपण आपल्या फोक्सवॅगन टिगुआन इन्शुरन्ससाठी याचा विचार करू शकता. या कंपनीकडून चांगला इन्शुरन्स मिळविणे आपल्याला आर्थिक आणि कायदेशीर लायबिलिटी प्रभावीपणे कमी करण्यास मदत करेल.

फोक्सवॅगन टिगुआन कार इन्शुरन्स खरेदी करणे का महत्वाचे आहे?

फोक्सवॅगन टिगुआन ही महागडी कार आहे. त्यासाठी इन्शुरन्स खरेदी करावा लागेल. अनपेक्षित अपघाती परिस्थितीत कार इन्शुरन्स पॉलिसी आपल्याला मदतनीस ठरेल. खालील गिष्टींमध्ये इन्शुरन्स पॉलिसी पे करेल.

कायदेशीर अनुपालन पूर्ण करते: मोटर व्हेइकल अॅक्टनुसार, भारतीय रस्त्यांवर धावणाऱ्या प्रत्येक कारमध्ये थर्ड पार्टी लायबिलिटी पॉलिसी असणे मॅनडेटरी आहे. जर आपण कार इन्शुरन्स खरेदी केला नाही तर आपल्याला रु.2000/- दंड भरावा लागेल आणि/ किंवा 3 महिन्यांसाठी तुरुंगात टाकले जाईल.

थर्ड-पार्टी कायदेशीर लायबिलिटी कव्हर करते: आपण आपली कार ड्राइव्ह करताना थर्ड-पार्टीला दुखापत करू शकता किंवा त्यांच्या मालमत्तेचे डॅमेज करू शकता. अशा परिस्थितीत जर आपल्याला लायेबल धरले गेले तर दुरुस्ती किंवा ट्रीटमेंटची कॉस्ट आपल्याला करावी लागेल. थर्ड पार्टी कार इन्शुरन्स घेणे उपयुक्त ठरेल कारण आपला इन्शुरर आपल्यावतीने या लायबिलिटीझची काळजी घेईल.

स्वतःचे डॅमेज झाल्यास त्याच्या दुरुस्तीला येणारी कॉस्ट पे करते: फोक्सवॅगन टिगुआनसाठी कार इन्शुरन्स पॉलिसी आपल्याला अपघात, नैसर्गिक आपत्ती, चोरी किंवा आग इत्यादींमुळे उद्भवू शकणाऱ्या डॅमेजपासून वाचवेल. जर तुमची गाडी खराब झाली आणि दुरुस्तीची गरज भासली तर लागणारी कॉस्ट इन्शुरन्स पॉलिसीअंतर्गत कव्हर केली जाईल. हे आपल्याला आपल्या बचतीचे संरक्षण करण्यास मदत करेल. कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स नेहमीच सुचविला जातो कारण तो स्वत: चे नुकसान आणि थर्ड पार्टी लायबिलिटी देखील कव्हर करतो.

अॅड-ऑनसह कव्हरेज व्यापक करते: जर आपल्याकडे कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्स पॉलिसी असेल तरच आपण पॉलिसी कव्हरेज व्यापक करू शकता. वर नमूद केलेल्या घटनांमध्ये मूलभूत कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हर आपले संरक्षण करते. त्या व्यतिरिक्त इतर नुकसानीसाठी, आपल्याला काही अतिरिक्त प्रीमियम भरून अॅड-ऑन कव्हरची आवश्यकता असेल. झिरो डेप्रिसिएशन कव्हर, टायर प्रोटेक्ट कव्हर, पॅसेंजर कव्हर, रिटर्न-टू-इनव्हॉइस कव्हर, इंजिन आणि गिअरबॉक्स प्रोटेक्शन कव्हर, ब्रेकडाउन असिस्टन्स आणि कंझ्युमेबल कव्हर यांचा समावेश आहे.

फोक्सवॅगन टिगुआन बद्दल अधिक जाणून घ्या

आपल्याकडे मोठी एसयूव्ही पार्क करण्यासाठी जागा नाही परंतु तरीही एसयूव्हीसह मजा करायची आहे! कॉम्पॅक्ट खरेदी करा! होय, फोक्सवॅगन टिगुआन ही एक उत्कृष्ट कार्यक्षम एसयूव्ही आहे जी आपण खरेदी करू शकता. या कारसोबत थरार आणि धमाल आहे. निर्माते म्हणतात, "ही कार सर्व प्रवास पूर्ण करण्यासाठी तयार करण्यात आली आहे."

फोक्सवॅगन टिगुआन दोन व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे एक हायलाइन आणि दुसरा कम्फर्टलाइन. या एसयूव्हीची किंमत 28.14 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 31.52 लाख रुपयांपर्यंत जाते. नवीन फोक्सवॅगन टिगुआनमध्ये टर्बोचार्ज्ड चार सिलिंडर इंजिन आहे ज्याची क्षमता 1968 सीसी आहे. कंपनी दोन्ही व्हेरियंटमध्ये डिझेल इंजिन आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देते. ही कार फ्यूअल-एफीशीयन्ट असून एक लीटरमध्ये 16.65 किमीचे मायलेज देते.

एकंदरीत, यात विस्तृत आणि आकर्षक वैशिष्ट्यांची यादी आहे जी आपल्याला ड्रायव्हिंग आनंद देईल. ही आपली पुढची फॅमिली कार असू शकते जी 7 प्रवाशांना सामावून घेते. रंगांबद्दल बोलायचे झाले तर, आपण इंडियम ग्रे, ओरिक्स व्हाईट, डीप ब्लॅक, टंगस्टन सिल्व्हर आणि अटलांटिक ब्लू या पाच आकर्षक रंगांमधून निवडू शकता.

फोक्सवॅगन कार इन्शुरन्स बद्दल अधिक जाणून घ्या.

आपण फोक्सवॅगन टिगुआन का खरेदी करावे?

  • एक्सस्टेरियर्स: टिगुआनची रस्त्यावर उपस्थितीसाठी ठळकपणे जाणवते. त्याचे मसक्युलर हुड आणि क्रोम-फिनिश्ड ग्रिल छाप पाडण्यास मदत करते. एकंदरीत बॉडी सडपातळ आहे आणि त्यामुळे कार इतरांपेक्षा उठून दिसते.
  • इंटिरिअर्स: कारमध्ये 6.1 इंचाची इन्फोटेनमेंट स्क्रीन देण्यात आली आहे. अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटोशी सहज कनेक्ट होणारी स्मार्टफोन-कंपॅटिबल सिस्टम आपल्याला मिळते. खुर्चीच्या कव्हरवरील चामड्याची अपहोल्स्ट्री आपल्याला बघता क्षणीच आवडेल. सीट आरामदायक असतात ज्यामुळे आपल्याला लांबच्या प्रवासात आराम मिळतो.
  • असिस्टन्स वैशिष्ट्ये: फॉक्सवॅगन टिगुआनमध्ये उच्च दर्जाची असिस्टन्स इक्विपमेंट्स देण्यात आली आहेत ज्यात अॅडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, 360 डिग्री कॅमेरा, पार्किंग सेन्सर्स, रियर क्रॉस-ट्रॅफिक अलर्ट, ब्लाइंड-स्पॉट मॉनिटरिंग, पादचारी डिटेक्शन, लेन डिपार्चर आणि फॉरवर्ड-कोलिशन चेतावणी आणि ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग चा समावेश आहे.
  • सुरक्षा वैशिष्ट्ये: या एसयूव्ही मध्ये सुरक्षित प्रवासासाठी 6 एअरबॅग, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम आणि इलेक्ट्रॉनिक स्टेबिलायझेशन प्रोग्राम देण्यात आला आहे. हिल होल्ड कार वर चढताना खाली घसरण्यापासून रोखते आणि हिल डिसेंट उतार उतरताना सुरक्षितपणे नियंत्रण ठेवते. पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी कारमध्ये अॅक्टिव्ह हुड सेन्सर देण्यात आला आहे, जो कोलिशननंतर समोरचा बंपर सिग्नल देताच सक्रिय होतो.

फोक्सवॅगन टिगुआनचे व्हेरियंट्स

व्हेरियंटचे नाव व्हेरियंटची प्राइज (नवी दिल्लीमध्ये, इतर शहरांमध्ये वेगवेगळी असू शकते)
2.0 टीएसआई एलिगन्स ₹31.99 लाख

[1]

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

एक्सपायरी नंतर माझ्या फोक्सवॅगन टिगुआन इन्शुरन्सचे रिन्यू करताना मला नो क्लेम फायदे मिळतील का?

एक्सपायरीनंतर 90 दिवसांच्या आत पॉलिसीचे रिन्यू केल्यास नो क्लेम बोनसचा फायदा घेता येतो. मात्र, त्या कालखंडानंतर पॉलिसीचे रिन्यू केल्यास आपल्याला त्याचा फायदा गमवावा लागेल

फोक्सवॅगन टिगुआन इन्शुरन्सचा माझा प्रदाता बदलताना मी नो क्लेम बोनस ट्रान्सफर करू शकतो का?

होय, नो क्लेम बोनस ट्रान्सफर करता येतो. अशा प्रकारे, जर आपण आपला इन्शुरन्स प्रदाता बदलला तरी आपण त्याचा फायदा घेऊ शकता.