Third-party premium has changed from 1st June. Renew now
फोक्सवॅगन कार इन्शुरन्स प्लॅन खरेदी किंवा रिनिव करा
फोक्सवॅगन ही 1937 मध्ये स्थापन झालेली जर्मन वाहन निर्माता कंपनी असून 2016 आणि 2017 मध्ये जगभरातील विक्रीनुसार ही सर्वात मोठी कार निर्माता कंपनी आहे. या ब्रँडच्या अनेक ए, बी आणि सी-सेगमेंट हॅचबॅक तसेच एसयूव्ही क्रॉसओव्हर्स आहेत ज्या 2019 मध्ये सर्वाधिक विकल्या गेलेल्या मॉडेल्स ठरल्या. कारची रेंज आणि अपडेटेड टेक्नॉलॉजीमुळे 2019 मध्ये कंपनीने सुमारे 11 दशलक्ष युनिट्सची विक्री केली.
शिवाय, फोक्सवॅगनच्या भारतीय उपकंपनीमुळे जर्मन बनावटीच्या या कार भारतीय प्रवासी मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. फोक्सवॅगनच्या भारतातील लोकप्रिय कारमध्ये व्हेंटो, पोलो, पोलो जीटी आदींचा समावेश आहे. 2021 मध्ये या कंपनीने संपूर्ण भारतात सुमारे 26,000 पॅसेंजर वाहने विकण्यात यश मिळवले आहे.
जर आपण या वर्षी वरीलपैकी कोणतेही मॉडेल खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर आपल्याला अपघातादरम्यान होणाऱ्या डॅमेजची जाणीव असणे आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन, आपण नामांकित इन्शुरन्स कंपनीकडून फोक्सवॅगन कार इन्शुरन्स घेणे आवश्यक आहे.
कार इन्शुरन्स पॉलिसीमध्ये अपघातामुळे मोठ्या प्रमाणात डॅमेज झाल्यामुळे भरमसाठ दुरुस्ती शुल्क आकारले जाते. या कॉस्टसाठी पे करावे लागल्यास आपल्याला खूप महागात पडू शकते आणि आपला आर्थिक बोजा वाढू शकतो. अशा प्रकारे, फोक्सवॅगन कारसाठी इन्शुरन्स मिळविणे आपले आर्थिक लायबिलिटी कमी करू शकते आणि भविष्यातील हेतूंसाठी निधी वाचविण्यास मदत करू शकते.
मोटर व्हेइकल अॅक्ट, 1988 नुसार दंड टाळण्यासाठी फोक्सवॅगनसाठी बेसिक कार इन्शुरन्स प्लॅन घेणे मॅनडेटरी आहे. बेसिक इन्शुरन्स प्लॅन म्हणजे फोक्सवॅगन कारसाठी थर्ड पार्टी इन्शुरन्स जो थर्ड पार्टी व्यक्ती, मालमत्ता किंवा वाहनाच्या डॅमेजला कव्हर करतो. तथापि, आपण स्वत: च्या कारच्या डॅमेजसाठी अतिरिक्त कव्हरेज मिळविण्यासाठी कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स प्लॅनचा विचार करू शकता.
भारतातील अनेक इन्शुरन्स कंपन्या थर्ड पार्टी आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स तसेच आपल्या गरजेनुसार इतर आकर्षक ऑफर्स देतात. स्पर्धात्मक फोक्सवॅगन कार इन्शुरन्स प्राइज, ऑनलाइन प्रक्रिया, नेटवर्क गॅरेजमधून कॅशलेस दुरुस्ती आणि बरेच काही यासारख्या अनेक फायद्यांमुळे आपण डिजिट इन्शुरन्सचा विचार करू शकता.
तथापि, आपण जास्तीत जास्त पर्क्ससह येणारा प्लॅन निवडण्यापूर्वी फोक्सवॅगन कार इन्शुरन्सची ऑनलाइन तुलना केली पाहिजे.
फोक्सवॅगन कार इन्शुरन्समध्ये काय कवर्ड आहे
काय कव्हर केलेले नाही
आपल्या कार इन्शुरन्स पॉलिसीमध्ये काय कवर्ड नाही हे जाणून घेणे देखील तितकेच महत्वाचे आहे, जेणेकरून आपण क्लेम करताना किंवा केल्यानंतर धक्का बसणार नाही. अशा काही परिस्थिती येथे आहेत:
थर्ड पार्टी किंवा लायबिलिटी ओनली कार पॉलिसीच्या बाबतीत, स्वत: च्या वाहनाचे डॅमेज कव्हर केले जाणार नाही.
आपण मद्यपान करून किंवा वैध लायसन्स नसताना राइड करत असाल तर.
जर आपल्यालाकडे लर्नर लायसन्स असेल आणि पुढच्या सीटवर वैध लायसन्सहोल्डर शिवाय कार चालवत असाल, तर अशा परिस्थितीत आपला क्लेम कव्हर होणार नाही.
अपघाताचा थेट परिणाम नसलेले कोणतेही डॅमेज (उदा. अपघातानंतर खराब झालेली कार चुकीच्या पद्धतीने वापरली जात असेल आणि इंजिन खराब झाले असेल तर ते कव्हर केले जाणार नाही)
कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा (उदा. पुरात कार चालवल्यामुळे होणारे डॅमेज, ज्याची निर्मात्याच्या ड्रायव्हिंग मॅन्युअलनुसार शिफारस केली गेली नाहीये जात नाही) कव्हर केले जाणार नाही.
काही परिस्थिती अॅड-ऑनमध्ये कव्हर केल्या जातात. आपण ते अॅड-ऑन खरेदी केले नसल्यास, संबंधित परिस्थिती कव्हर केली जाणार नाही.
डिजिटचा फोक्सवॅगन कार इन्शुरन्स का खरेदी करावा?
फोक्सवॅगनसाठी कार इन्शुरन्स प्लॅन्स
तृतीय-पक्ष | कॉम्प्रिहेन्सिव्ह |
अपघातामुळे स्वत:च्या कारचे डॅमेज/ नुकसान |
|
आग लागल्यास स्वत:च्या कारचे डॅमेज/नुकसान |
|
नैसर्गिक आपत्ती च्या प्रसंगी स्वतःच्या कारचे डॅमेज / नुकसान |
|
थर्ड पार्टी वाहनाचे डॅमेज |
|
थर्ड पार्टी मालमत्तेचे डॅमेज |
|
पर्सनल एक्सीडेंट इन्शुरन्स |
|
थर्ड-पार्टीच्या व्यक्तीची जखम / मृत्यू |
|
आपल्या कारची चोरी |
|
डोरस्टेप पिक-अप आणि ड्रॉप |
|
आपला आयडीव्ही(IDV) कस्टमाइज करता येणे |
|
कस्टमाइज्ड अॅड-ऑनसह अतिरिक्त संरक्षण |
|
Get Quote | Get Quote |
कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि थर्ड-पार्टी इन्शुरन्समधील डीफ्रंसबद्दल अधिक जाणून घ्या
क्लेम कसा फाइल करावा?
आपण आमचा कार इन्शुरन्स प्लॅन खरेदी किंवा रिनिव केल्यानंतर, आपण तणावमुक्त राहता कारण आमच्याकडे 3-स्टेप, पूर्णपणे डिजिटल क्लेम्स प्रक्रिया आहे!
स्टेप 1
फक्त 1800-258-5956 वर कॉल करा. फॉर्म भरायचा नाही
स्टेप 2
आपल्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर सेल्फ इन्स्पेक्शनची लिंक मिळवा. स्टेप बाय स्टेप प्रक्रियेद्वारे आपल्या स्मार्टफोनमधून आपल्या वाहनाचे डॅमेज शूट करा.
स्टेप 3
आमच्या गॅरेजच्या नेटवर्कद्वारे आपण निवडू इच्छित असलेल्या दुरुस्तीची पद्धत निवडा म्हणजेच रीएमबर्समेंट किंवा कॅशलेस.
फोक्सवॅगन बद्दल अधिक जाणून घ्या
फोक्सवॅगन, ज्याचा जर्मन मध्ये "पीपल्स कार" असा होतो, आणि हा ब्रँड आपले नावाचा अर्थ पूर्ण न्याय देतो. यात प्रीमियम लक्झरी कारपासून ते बेसिक परवडणाऱ्या कारपर्यंत विविध प्रकारच्या कार ची विक्री केली जाते.
फोक्सवॅगनने आपल्या 'पसाट' या कारद्वारे जागतिक स्तरावर यश मिळविले. 2007 मध्ये याच कारसह भारतीय बाजारात दाखल झाली होती. पुढच्याच वर्षी जुलैमध्ये त्यांनी शक्तिशाली मॉडेल जेट्टासह ऑटोमोबाईल बाजारपेठ जिंकली. 2007 मध्ये त्यांची सर्वात प्रसिद्ध कार पोलो सादर झाली आणि सलग वर्षांत, त्यांनी व्हेंटो आणि त्यांची आलिशान कार फेटन सादर केली.
2016 मध्ये फोक्सवॅगनने दमदार बिल्ट कॉम्पॅक्ट सेडान एमियो आणि त्यानंतर 2017 मध्ये प्रीमियम एसयूव्ही फोक्सवॅगन टिगुआन सादर केली. ब्रँडची सर्वात स्वस्त कार 5.84 लाख रुपयांपासून सुरू होते आणि टॉप मॉडेलची किंमत 30.88 लाख रुपयांपर्यंत जाते.
फोक्सवॅगनच्या कारचे मॅन्यूफॅकचरिंग करणारे भारतातील दोन मुख्य कारखाने पुणे आणि औरंगाबाद इथे आहेत.
डिझाइन आणि अपीअरन्स विभागात हा ब्रँड उत्कृष्ट आहे. फोक्सवॅगन पसाटने एनडीटीव्ही कार अँड बाइक अवॉर्ड्स 2018 मध्ये "फुलसाइज सेडान ऑफ द इयर ट्रॉफी" जिंकली. विश्वासार्ह ऑटोमोबाईल ब्रँड म्हणून त्यांनी वेळोवेळी स्वत:ला सिद्ध केले आहे.
आपण किफायतशीर लाइन मॉडेल किंवा टॉप मॉडेल निवडले तरी कार इन्शुरन्स खरेदी करणे महत्वाचे आहे. मोटर व्हेइकल अॅक्टनुसार कार इन्शुरन्सशिवाय वाहन चालविणे हा गुन्हा असून त्यासाठी तुम्हाला 2000/- रुपयांचा दंड भरावा लागेल.
फोक्सवॅगन कार का खरेदी करावी?
- उच्च रिसेल व्हॅल्यू: फॉक्सवॅगनच्या कार आपल्याला उच्च रिसेल व्हॅल्यू देतात. त्यामुळे जेव्हा आपण आपली कार विकण्याचा विचार करत असाल, तेव्हा ही प्राइज आपल्याला फारशी कमी करावी लागत नाही.
- फोक्सवॅगनच्या कारमध्ये नेव्हिगेशन, ट्रॅफिक अपडेट्स, स्पोर्ट्स स्कोअर आणि हवामानाची माहिती मिळण्याची सुविधा पण देण्यात आली आहे.
- स्मार्ट कार: ही कार अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो या दोन्ही कंपॅटिबल मध्ये उपलब्ध आहे. त्यांची प्रीमियम दर्जाची म्युसिक सिस्टम आपल्याला अखंड मनोरंजनाचा अनुभव देते.
- स्ट्राँग ड्राइव्ह असिस्ट आणि सुरक्षा वैशिष्ट्ये: जबरदस्त ड्रायव्हिंग अनुभवासाठी फोक्सवॅगनच्या कारमध्ये अॅडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, ब्लाइंड स्पॉट मॉनिटर, लेन असिस्ट, फ्रंट असिस्ट, एअरबॅग्स आणि रियर ट्रॅफिक अलर्ट देण्यात आले आहेत.
- अपीअरन्स आणि डिझाइन: फोक्सवॅगन कार्स शार्प लाइन्स आणि अॅथलेटिक डिझाइनसह ठळकपणे दिसतात. हा ब्रँड अत्याधुनिक टेक्नॉलॉजीसह साध्या डिझाइन्सचे मिश्रण करतो.
- विश्वासार्ह: फोक्सवॅगनची सर्व मॉडेल्स विश्वसनीय आहेत आणि उच्च परफॉर्मन्स दर्शवितात.
फोक्सवॅगन कार इन्शुरन्स खरेदी करणे का महत्वाचे आहे?
फोक्सवॅगन कार इन्शुरन्स खरेदी करण्याची कारणे येथे आहेत:
- मोटर व्हेइकल अॅक्टनुसार कार इन्शुरन्स पॉलिसी घेणे मॅनडेटरी आहे: मोटर व्हेइकल अॅक्टनुसार कार इन्शुरन्स पॉलिसी घेणे मॅनडेटरी आहे. विनालायसन्स वाहन चालविणे गुन्हा आहे. तसे केल्यास रु.2000/- दंड आकारला जाईल.
- स्वत: चे डॅमेज एक्सपेनसेस व्यवस्थापित करा: कधीकधी कारचे नुकसान मोठ्या प्रमाणात होऊ शकते. दुरुस्तीचा कॉस्ट मोठा आणि आपल्या पे करण्याच्या क्षमतेपेक्षा जास्त असू शकतो. आग, चोरी, अपघात किंवा कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे डॅमेज झाल्यास कार इन्शुरन्स पॉलिसी आपल्याला पैसे देईल.
- थर्ड पार्टी कायदेशीर लायबिलिटीचा पे ऑफ: कार इन्शुरन्स पॉलिसी आपल्याला आपले कायदेशीर लायबिलिटी पे ऑफ करण्यास मदत करते. जेव्हा आपण आपल्या कारसह थर्ड-पार्टीचे डॅमेज करता तेव्हा मालमत्तेचे डॅमेज किंवा शारीरिक इजा भरून देण्याची जबाबदारी आपल्यावर असू शकत
- बेसिक कार पॉलिसी एनहॅन्स करा: कार पॉलिसीअंतर्गत कवर्ड नसलेल्या नुकसानीसाठी (जसे की इंजिनचे गैर अपघाती डॅमेज), आपल्याला अॅड-ऑन कव्हर खरेदी करणे आवश्यक आहे. झिरो डेप्रिसिएशन कव्हर, रिटर्न-टू-इनव्हॉइस कव्हर, ब्रेकडाउन असिस्टन्स, टायर प्रोटेक्ट कव्हर आणि पॅसेंजर कव्हर अशी काही अॅड-ऑन कव्हर आपण निवडू शकता.
फोक्सवॅगन कार इन्शुरन्स प्रीमियमवर परिणाम करणारे घटक
फोक्सवॅगन कार इन्शुरन्स प्रीमियमवर परिणाम करणारे घटक खालील प्रमाणे आहेत:
- कारची व्हॅल्यू: आपल्या कारची इन्शुअर्ड डीक्लेअर्ड व्हॅल्यू (आयडीव्ही) प्रीमियमवर परिणाम करते. उच्च आयडीव्ही साठी, प्रीमियम जास्त असेल आणि उलट.
- अॅड-ऑन कव्हर: प्रत्येक अॅड-ऑन कव्हर अतिरिक्त प्रीमियम पेमेंटसह येते. अॅड-ऑन कव्हर निवडताना प्रीमियम वाढेल.
- नो क्लेम बोनस (एनसीबी): जर आपण संपूर्ण वर्षभर एकही क्लेम केला नाहीत तर आपल्याला पुढच्या रिनिवलच्या वेळी एनसीबी मिळेल.
- भौगोलिक स्थान: ज्या शहरांमध्ये कारची संख्या जास्त असते, तेथे अपघाताची शक्यताही अधिक असते. त्यामुळे आपल्याला कार इन्शुरन्सचा जास्त प्रीमियम पे करावा लागेल. विशेषत: महानगरांमध्ये हे घडू शकते.
- कारचे वय: जेव्हा कारचे वय वाढते तेव्हा डेप्रिसिएशन खर्चही वाढतो. त्यामुळे आपल्या कारचा आयडीव्ही कमी होतो ज्यामुळे प्रीमियम मध्ये घट होऊ शकते.
- इंजिन क्षमता: इन्शुरन्स प्रीमियममधील थर्ड पार्टी घटक कारच्या इंजिन क्षमतेवर अवलंबून असतो. इंजिनची क्षमता जास्त, टीपी प्रीमियम जास्त असेल.
- व्हॉलंटरी डीडक्टीबल: इन्शुरन्स कंपनीला क्लेम्सची संपूर्ण अमाऊंट कव्हर करण्याऐवजी, आपण क्लेम्सच्या अमाऊंटमध्ये कॉँट्रीब्यूट करणे निवडू शकता. याला व्हॉलंटरी डीडक्टीबल म्हणून ओळखले जाते. उच्च व्हॉलंटरी डीडक्टीबलमुळे आपला प्रीमियम कमी होईल.
फोक्सवॅगन कार इन्शुरन्ससाठी डिजिटला का निवडावे?
आपण डिजिट इन्शुरन्स का निवडावा याची कारणे येथे आहेत:
- इन्शुरन्स पॉलिसीची निवड: डिजिट इन्शुरन्स आपल्याला निवडण्यासाठी दोन प्रकारचा कार इन्शुरन्स ऑफर करते. एक म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्स नावाची पॅकेज पॉलिसी जी स्वतःचे नुकसान आणि थर्ड पार्टी लायबिलिटी कव्हरेजसाठी संरक्षण प्रदान करते. दुसरे म्हणजे स्वतंत्र थर्ड-पार्टी पॉलिसी जे तिसऱ्या व्यक्तीला इजा किंवा मालमत्तेच्या डॅमेजसाठी झालेल्या कोणत्याही कायदेशीर लायबिलिटी पे करते.
- अॅड-ऑन कव्हर ऑफर करते: इन्शुरन्स कंपनी टायर प्रोटेक्ट कव्हर, झिरो डेप्रिसिएशन कव्हर, ब्रेकडाउन असिस्टन्स, इंजिन आणि गिअरबॉक्स प्रोटेक्शन आणि कंझ्युमेबल कव्हर सारखे अॅड-ऑन कव्हर ऑफर करते. हे अतिरिक्त प्रीमियम पेमेंटसह येतात. फोक्सवॅगनसाठी आपण झिरो डेप्रिसिएशन कव्हर खरेदी करू शकता. हे आपल्याला क्लेम्सच्या वेळी सुट्या भागांवर लागू होणारे डेप्रिसिएशन वाचविण्यात मदत करेल. जेव्हा आपण हे अॅड-ऑन कव्हर खरेदी कराल तेव्हा आपला इन्शुरर नुकसानीच्या एकूण अमाऊंट पे करेल. आपण सहप्रवाशांच्या संरक्षणासाठी पॅसेंजर कव्हर देखील खरेदी करू शकता जे अन्यथा मूलभूत पॉलिसीअंतर्गत कवर्ड नाही.
- कस्टमाइज्ड आयडीव्ही(IDV): डिजिट इन्शुरन्स आपल्याला आपल्या कारसाठी योग्य आयडीव्ही कस्टमाइज आणि निवडण्यास मदत करते. त्यानुसार प्रीमियममध्ये बदल होणार आहे.
- योग्य प्रीमियम रेट्स: डिजिट इन्शुरन्स कोणत्याही छुप्या कॉस्टशिवाय वाजवी आणि स्पर्धात्मक प्रीमियम रेट्स प्रदान करते.
- ऑनलाइन आणि स्मार्टफोन-सक्षम प्रक्रिया: डिजिटसह आपण ऑनलाइन पॉलिसी निवडू शकता. पॉलिसीचा क्लेम करण्यासाठी आपण आपल्या स्मार्टफोनद्वारे आवश्यक दस्तऐवज अपलोड करू शकता.
- हाय-क्लेम सेटलमेंट रेशिओ: डिजिट इन्शुरन्स क्लेम सेवेमध्ये जलद आहे. त्यांच्याकडे क्लेम सेटलमेंट रेशिओ जास्त आहे.
- गॅरेजचे विस्तृत नेटवर्क: डिजिट इन्शुरन्सने आपल्याला सुलभ दुरुस्ती सेवा प्रदान करण्यासाठी गॅरेजच्या विस्तृत रेंज देऊन मदत केली आहे.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
फोक्सवॅगन कार इन्शुरन्स प्लॅनमध्ये कंझ्युमेबल कव्हरमध्ये काय समाविष्ट आहे?
आपल्या सध्याच्या इन्शुरन्स प्लॅनव्यतिरिक्त कंझ्युमेबल कव्हर आपल्या फोक्सवॅगन कारच्या सर्व वैशिष्ट्यांसाठी व्यापक कव्हरेज देते. अतिरिक्त शुल्कांपासून संरक्षणाच्या या अतिरिक्त थरामध्ये इंजिन ऑइल, ग्रीस, नट्स आणि बोल्ट इत्यादींच्या कॉस्ट्सचा समावेश आहे
फोक्सवॅगन कार इन्शुरन्स पॉलिसी पर्सनल एक्सीडेंट इन्शुरन्स कव्हर प्रदान करेल का?
होय, आपल्या इन्शुरन्स प्लॅनचा प्रकार कोणताही असो, अपघातामुळे कायमचे अपंगत्व किंवा मृत्यू झाल्यास आपल्याला पर्सनल एक्सीडेंट कव्हर मिळण्यास आपण लायेबल आहात.
मला माझ्या सेकंड हँड फोक्सवॅगन कारसाठी इन्शुरन्स घेण्याची आवश्यकता आहे का?
जर आपल्या कारच्या मागील मालकाकडे वैध इन्शुरन्स पॉलिसी असेल तर आपल्याला फक्त आपल्या स्वत: च्या नावाने तो प्लॅन ट्रान्सफर करणे आवश्यक आहे. अन्यथा, आपल्याला नवीन पॉलिसी खरेदी करावी लागेल.