टोयोटा फॉर्च्युनर इन्शुरन्स

Get Instant Policy in Minutes*

Third-party premium has changed from 1st June. Renew now

अवघ्या दशकभरात टोयोटा फॉर्च्युनरने टॉप एसयूव्ही मॉडेल्सपैकी एक म्हणून भारतात बरीच प्रसिद्धी मिळवली आहे. तथापि, त्याची मजबूत, टिकाऊ बांधणी आणि इतर अनेक वैशिष्ट्ये पाहता हे आश्चर्यकारक नाही.

विशेष म्हणजे याचे 7 सीटचे कॉन्फिगरेशन भारतीय कुटुंबांसाठी योग्य निवड बनवते. आणि, गेल्या काही वर्षांत कारची अधिकाधिक विक्री होत असल्याने टोयोटा फॉर्च्युनर इन्शुरन्स पॉलिसी खरेदीतही लक्षणीय वाढ झाली आहे.

सर्वप्रथम, हे विसरता कामा नये की मोटर व्हेइकल अॅक्ट 1988 नुसार सर्व कार मालकांना कायदेशीररित्या कार रस्त्यावर चालविण्यासाठी थर्ड पार्टी लायबिलिटी इन्शुरन्स पॉलिसी असणे मॅनडेटरी आहे. ते जर नसेल तर, आपल्याला 2000 रुपये दंड (पुनरावृत्ती गुन्ह्यासाठी 4000 रुपये) होऊ शकतो. परंतु, कायदेशीर अनुपालनाव्यतिरिक्त, थर्ड-पार्टी टोयोटा फॉर्च्युनर कार इन्शुरन्स पॉलिसी आपल्या कारसह अपघातामुळे उद्भवणाऱ्या थर्ड पार्टीच्या डॅमेजच्या बाबतीत आर्थिक संरक्षण प्रदान करते.

कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करून आपण अशा परिस्थितीत आपल्या स्वत: च्या टोयोटा फॉर्च्युनरच्या डॅमेजचे कंपेनसेशन देखील मिळवू शकता.

तथापि, केवळ इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करणे आपल्या वाहनास जास्तीत जास्त संरक्षण देण्यासाठी पुरेसे असू शकत नाही. टोयोटा फॉर्च्युनर इन्शुरन्स पॉलिसी अंतर्गत इन्शुरन्स कंपनी आपल्याला इष्टतम फायदे देत आहे याची खात्री करणे आवश्यक आहे.

हे जरा पहा!

पुढे वाचा

टोयोटा फॉर्च्युनर कार इन्शुरन्समध्ये काय कवर्ड आहे

डिजिटचा टोयोटा फॉर्च्युनर कार इन्शुरन्स का खरेदी करावा?

टोयोटा फॉर्च्युनर साठी कार इन्शुरन्स प्लॅन्स

थर्ड पार्टी कॉम्प्रिहेन्सिव्ह

अपघातामुळे स्वताच्या कारचे डॅमेज/नुकसान

×

आग लागल्यास स्वताच्या कारचे डॅमेज/नुकसान

×

नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी स्वताच्या कारचे डॅमेज/ नुकसान

×

थर्ड पार्टी वाहनाचे डॅमेज

×

थर्ड पार्टी मालमत्तेचे डॅमेज

×

वैयक्तिक अपघात इन्शुरन्स

×

थर्ड-पार्टीच्या व्यक्तीची जखम / मृत्यू

×

आपल्या कारची चोरी

×

डोअरस्टेप पीक-अप आणि ड्रॉप

×

आपला आयडीव्ही(IDV) कस्टमाइज करा

×

कस्टमाइज्ड अॅड-ऑनसह अतिरिक्त संरक्षण

×
Get Quote Get Quote

कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि थर्ड पार्टी इन्शुरन्समधील डीफ्रंसबद्दल अधिक जाणून घ्या

क्लेम कसा फाइल करावा?

आपण आमची कार इन्शुरन्स योजना खरेदी किंवा रिनिवल केल्यानंतर, आपण तणावमुक्त राहता कारण आमच्याकडे 3-स्टेप्स, पूर्णपणे डिजिटल क्लेम्स प्रोसेस आहे!

स्टेप 1

फक्त 1800-258-5956 वर कॉल करा. फॉर्म भरायची गरज नाही.

स्टेप 2

आपल्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर सेल्फ इन्स्पेक्शनची लिंक मिळवा. स्टेप बाय स्टेप प्रक्रियेद्वारे आपल्या स्मार्टफोनमधून आपल्या वाहनाचे डॅमेज शूट करा.

स्टेप 3

आमच्या गॅरेजच्या नेटवर्कद्वारे आपण निवडू इच्छित असलेल्या दुरुस्तीची पद्धत म्हणजेच रीएमबर्समेंट किंवा

डिजिट इन्शुरन्स क्लेम्स किती वेगाने सेटल केले जातात? इन्शुरन्स कंपनी बदलताना हा पहिला प्रश्न आपल्या मनात यायला हवा. आपण असा विचार करताय हे चांगले आहे! डिजिटचे क्लेम रिपोर्ट कार्ड वाचा

डिजिटची टोयोटा फॉर्च्युनर इन्शुरन्स पॉलिसी का निवडावी?

त्याअंतर्गत होणाऱ्या फायद्यांचा विचार न करता केवळ इन्शुरन्स पॉलिसी खरेदी केल्यास आपल्याला नंतर अनेक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. म्हणून, आपण आपल्या टोयोटा फॉर्च्युनरचा इन्शुरन्स काढण्यासाठी शीर्ष इन्शुरन्स कंपन्यांकडे जाऊ शकता, विशेषत: कारण ते एक महाग मॉडेल आहे.

अशा प्रकारे, आपण आपले फायदे आणि आरओआय जास्तीत जास्त करण्यासाठी आपल्या टोयोटा फॉर्च्युनर कार इन्शुरन्स पॉलिसीअंतर्गत सर्वोत्तम सेवांचा फायदा मिळवण्याची खात्री करू शकता. या संदर्भात, आपल्या गरजा कार्यक्षमतेने पूर्ण करण्यासाठी डिजिट हा सर्वोत्तम पर्याय असू शकतो.

आपल्या टोयोटा फॉर्च्युनरचा इन्शुरन्स विकत घेण्यासाठी आम्हाला एक आदर्श पर्याय बनविणाऱ्या काही वैशिष्ट्यांवर एक नजर टाकूया:

  • त्वरित क्लेम सेटलमेंट - उत्कृष्ट इन्शुरन्स कंपनीचे वैशिष्ट्य म्हणजे ते क्लेम्स कीती पटकन सेटल करतात यावर आधारित असते. आम्ही समजतो की अनपेक्षित मोठा एक्सपेन्स आपल्यावर एक मोठा बोजा बनू शकतो. म्हणूनच आम्ही लवकरात लवकर क्लेम्स सेटल करून अशा चिंता कमी करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून, आपण खात्री बाळगू शकता की आपण आपल्या डिजिट टोयोटा फॉर्च्युनर इन्शुरन्स पॉलिसीविरूद्ध आपले क्लेम्स सबमिट करताच ते त्वरित सेटल करू.
  • 100% डिजिटल प्रक्रिया - डिजिटद्वारे, आपण वैयक्तिकरित्या क्लेम करण्याची कंटाळवाणे प्रक्रिया दूर करू शकता. इतकेच काय, आमची पूर्णपणे डिजिटायझ्ड प्रक्रिया क्लेम करण्यापासून ते सेटल करण्यापर्यंत सर्व काही करते; अगदी आपल्या टोयोटा फॉर्च्युनरचे इन्सपेक्शन देखील ऑनलाइन पूर्ण केले जाऊ शकते. कसे? आपल्याला फक्त आपल्या फॉर्च्युनरच्या डॅमेजची छायाचित्रे प्रदान करण्यासाठी आपल्या स्मार्टफोनचा वापर करण्याची आवश्यकता आहे आणि बस झाले काम! त्यानंतर आमची टीम त्या प्रतिमांची तपासणी करेल आणि त्यानुसार आपल्या टोयोटा फॉर्च्युनर कार इन्शुरन्स पॉलिसीवरील क्लेम सेटल करेल.
  • नेटवर्क गॅरेजची संपूर्ण रेंज- डिजिटच्या टोयोटा फॉर्च्युनर इन्शुरन्स पॉलिसीद्वारे आपण संपूर्ण भारतातील 1400 पेक्षा जास्त गॅरेजमध्ये कॅशलेस दुरुस्तीचा फायदा घेऊ शकता. म्हणून, पुढच्या वेळी जेव्हा आपल्या फॉर्च्युनरला झालेल्या अपघातामुळे दुरुस्ती किंवा पार्ट रीप्लेसमेंटची आवश्यकता असेल तेव्हा आपण आपली कार आमच्या जवळच्या नेटवर्क गॅरेजमध्ये विनाअडथळा आणि जलद गतीने मदतीसाठी नेऊ शकता.
  • कस्टमाइज करण्यायोग्य आयडीव्ही(IDV) - सामान्यत: आम्ही आयडीव्ही चे कॅलक्युलेशन करताना उत्पादकाची यादीबद्ध प्राइज वजा डेप्रीसीएशन असे करतो, जे आम्ही आपली कार चोरीला गेल्यास किंवा दुरुस्तीच्या पलीकडे डॅमेज झाल्यास आपल्याला कंपेनसेशन म्हणून पे करतो. परंतु, याचा अर्थ असा नाही की ते असेच होईल आणि हे म्हणजे काळ्या दगडावरची रेघ आहे. आपण आपल्या टोयोटा फॉर्च्युनरसाठी उच्च इन्शुअर्ड डीक्लेअर्ड व्हॅल्यूचा फायदा घेऊ शकता आणि आम्हाला ते समजते. म्हणूनच आम्ही आपल्याला टोयोटा फॉर्च्युनर इन्शुरन्स प्राइजमध्ये किंचित बदल करून आपला आयडीव्ही कस्टमाइज करण्याची परवानगी देतो.
  • विविध अॅड-ऑन्स - ज्याप्रमाणे आयडीव्ही मध्ये आपण बदल करू शकतो, त्याचप्रमाणे आमच्या फॉर्च्युनर इन्शुरन्स पॉलिसीमधील वैशिष्ट्यांमध्ये सुद्धा बदल करू शकतो. फॉर्च्युनर इन्शुरन्स खर्चात किंचित वाढ करून आपण नेहमीच आमच्या विस्तृत रेंज मधील अॅड-ऑन्समधून निवड करून अतिरिक्त फायदा घेण्याचा पर्याय निवडू शकता. आम्ही टायर प्रोटेक्शन कव्हर, रिटर्न टू इनव्हॉइस कव्हर, झिरो डेप्रिसिएशन कव्हर, रोडसाइड असिस्टन्स, कंझ्युमेबल कव्हर इत्यादी 7 वेगवेगळे अॅड-ऑन ऑफर करतो जे ही संपूर्ण रेंज उपलब्ध करून खऱ्या अर्थाने कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हरेज प्रदान करते. उदाहरणार्थ, इंजिन आणि गिअरबॉक्स प्रोटेक्शन कव्हरच्या अॅड-ऑनचा फायदा घेऊन आपण आपल्या फॉर्च्युनरच्या इंजिनचा इन्शुरन्स कव्हर करू शकता.
  • आपल्या दारापर्यन्त सेवा - डिजिटच्या टोयोटा फॉर्च्युनर इन्शुरन्स पॉलिसीसह, जर आपण आमच्या कोणत्याही नेटवर्क गॅरेजमध्ये आपल्या वाहनासाठी अपघाती डॅमेजच्या दुरुस्तीसाठी शोधत असाल तर आपण डोरस्टेप पिक अप आणि ड्रॉप सुविधांचा फायदा उचलू शकता. आपली फॉर्च्युनर आपल्या घरापासून पिक अप केली जाईल, दुरुस्त केली जाईल आणि नंतर लवकरात लवकर आपल्याकडे डेलिव्हर केली जाईल. इतकेच काय, आमच्या नेटवर्क गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी 6 महिन्यांची वॉरंटी देखील मिळते.
  • चोवीस तास ग्राहक सपोर्ट - राष्ट्रीय सुट्टी आहे की नियमित आठवड्याचा दिवस आहे हे महत्वाचे नाही, आमची ग्राहक सपोर्ट टीम आपल्याला 24 × 7 मदत करेल. म्हणूनच, भारतातील टोयोटा फॉर्च्युनर इन्शुरन्सच्या प्राइजबद्दल किंवा आपल्या इन्शुरन्स पॉलिसीशी संबंधित कोणत्याही केसबद्दल आपल्याला काही प्रश्न असल्यास, आपल्या सोयीनुसार टीमशी संपर्क साधा!

या कारणांमुळे आणि अतिशय तत्पर आणि उत्कृष्ट सेवांमुळे, डिजिट इन्शुरन्स टोयोटा फॉर्च्युनर इन्शुरन्स पॉलिसींसाठी सर्वांच्या पसंतीला उतरली आहे. तर, विलंब न करता आजच आपल्या फॉर्च्युनरचा इन्शुरन्स मिळवा!

टोयोटा फॉर्च्युनर इन्शुरन्स खरेदी करणे का महत्वाचे आहे?

फॉर्च्युनर कार इन्शुरन्स ही एक आवश्यक स्टेप आहे जी आपण वाहन खरेदी केल्यानंतर करणे आवश्यक आहे. इन्शुरन्स हे सरकारने केलेले कायदेशीर दायित्व आहे ज्याने वाहन मालकांना त्यांच्या सुरक्षिततेच्या उद्देशाने मॅनडेटरी केले आहे. मार्केट मध्ये अनेक प्रकारचे इन्शुरन्स प्लॅन्स उपलब्ध आहेत

  • कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स प्लॅनसह कव्हरेज वाढवा - प्रत्येक महागड्या कारमध्ये महागडे पार्ट्स असतात. त्यामुळे कोणत्याही अनपेक्षित अपघातापासून किंवा आपत्तीपासून त्या पार्ट्सचे रक्षण करणे. हे मालकाचे स्वत: चे डॅमेज आणि अपघातानंतर वाहनाच्या डॅमेजपासून वाचवते. यामध्ये ब्रेकडाउन असिस्टन्स, इंजिन आणि गिअरबॉक्स प्रोटेक्शन, टायर प्रोटेक्टिव्ह कव्हर आणि झिरो-डेप कव्हरचा समावेश असू शकतो.
  • आर्थिक लायबिलिटीझपासून बचाव करते- चोरी किंवा अपघात किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे आपण कार किंवा त्याच्या पार्ट्सचे मूल्य गमावू शकता. मोठा दुरुस्तीसाठीचा खर्च कधीकधी आपल्या खिशावर बोजा टाकू शकतो परंतु कार इन्शुरन्समुळे आपण यातून तारले जाऊ शकता. ओन डॅमेज कार इन्शुरन्सबद्दल अधिक जाणून घ्या.
  • कायदेशीररित्या अनुपालीत: आपली टोयोटा फॉर्च्युनर कार इन्शुरन्स पॉलिसी आपल्याला रस्त्यावर कायदेशीररित्या वाहन चालविण्यास सक्षम करेल. पॉलिसी नसल्यास आपल्याला 2,000 रुपयांचा दंड आकारला जाऊ शकतो आणि आपले लायसन्स अपात्र ठरू शकते. यात 3 महिन्यांचा तुरुंगवासही होऊ शकतो.
  • थर्ड पार्टी लायबिलिटीज कव्हर करते - थर्ड पार्टी लायबिलिटीज, अपघातात थर्ड-पार्टी किंवा पॅसेंजर्सना झालेले डॅमेज आणि आपला खिसा रिकामा करू शकणाऱ्या मागण्यांचे प्रमाण कव्हर करतात. या केस मध्ये आपला टोयोटा फॉर्च्युनर कार इन्शुरन्स थर्ड पार्टीच्या मागण्या कव्हर करण्यास उपयोगात येतो.

टोयोटा फॉर्च्युनर कार बद्दल अधिक माहिती

टोयोटाच्या दुसऱ्या जनरेशनने त्याचे विशाल आणि बोल्ड व्हर्जन लाँच केले असून त्याचे नाव टोयोटा फॉर्च्युनर असे ठेवले आहे. टोयोटा फॉर्च्युनर टीआरडी सेलिब्रेशन एडिशनमध्ये अनेक अद्ययावत वैशिष्ट्ये देण्यात आले आहेत. यात नवीन इंजिन, मोठ्या प्रमाणात रिवर्क केलेले चेसिस आणि ढीगभर इलेक्ट्रॉनिक उपकरणे देण्यात आला आहे.

टोयोटा फॉर्च्युनर 10.01 ते 15.04 किमी/लीटर मायलेज देते. मॅन्युअल डिझेल व्हेरियंटचे मायलेज 14.24 किमी प्रति लीटर आहे. ऑटोमॅटिक डिझेल व्हेरियंटचे मायलेज 15.04 किमी प्रति लीटर आहे. ऑटोमॅटिक पेट्रोल व्हेरियंटचे मायलेज 10.26 किमी प्रति लीटर आहे.

मॅन्युअल पेट्रोल व्हेरियंट 27.83 ते 33.85 लाख रुपयांच्या रेंजमध्ये मिळते आणि त्याचे मायलेज 10.01 किमी प्रति लीटर देते. जेव्हा एसयूव्ही चा विचार केला जातो तेव्हा लिंग, जात किंवा वंशाचा विचार न करता टोयोटा फॉर्च्युनर सर्वांमध्ये अव्वल असेल.

आपण टोयोटा फॉर्च्युनर का खरेदी करावी?

आरामाचा विचार केला तर टोयोटा फॉर्च्युनर ही एक मोठी, जड प्रशस्त गाडी आहे जी सात सिटर आहे आणि सुरळीत प्रवासासाठी आपल्या वाहनात बरेच अॅडजस्टमेंट्स करते. मल्टीफंक्शनल स्टीअरिंग, डिटेल्ड ड्रायव्हर इन्फॉर्मेशन सिस्टम, टचस्क्रीन मल्टिमीडिया सिस्टम ड्राइव्ह मनोरंजक आणि आश्चर्यकारक बनवते.

समर्पित एसी व्हेंट आणि ड्रायव्हर सीटसाठी इलेक्ट्रिकल अॅडजस्टमेंट असलेली सिंगल झोन्ड क्लायमेट कंट्रोल सिस्टीम आपली राइड किती आलिशान असेल हे दर्शवते. टोयोटा फॉर्च्युनर खरेदी करण्याचे मुख्य कारण म्हणजे त्याची ऑफ-रोड गुणवत्ता. पुरेसे प्रस्थान आणि अप्रोच अँगलसह योग्य 220 मिमी ग्राउंड क्लिअरन्स एसयूव्ही ची आलिशान ऑफ-रोडिंग क्षमता दर्शविते.

2.8 लीटर चार सिलिंडर टर्बो-डिझेल व्हेरिएंट 6-स्पीड मॅन्युअलसह 177 पीएस पॉवर आणि 420 एनएम टॉर्क निर्माण करते, तर ऑटोमॅटिक ट्रान्समिशन-सुसज्ज व्हर्जन अतिरिक्त 30 एनएम टॉर्क निर्माण करते. 2.7 लीटर चार सिलिंडर पेट्रोल व्हेरिएंट 166 पीएस आणि 245 एनएम टॉर्क निर्माण करते, जे 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय देते. हे केवळ 2 डब्ल्यूडी कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध आहे, तर डिझेलमध्ये 2 डब्ल्यूडी आणि 4 डब्ल्यूडी दोन्ही पर्याय आहेत.

फॉर्च्युनरमध्ये 2-हाय, 4- हाय आणि 4-लो सिस्टमचे हार्डवेअर वापरले जाते. पुढील दोन हार्डवेअरमध्ये 50-50 प्रमाणे टॉर्क विभाजित केला जातो. वाहन स्थिरता नियंत्रणासाठी ए-ट्रॅक किंवा अॅक्टिव्हेशन ट्रॅक्शनशिवाय ब्रेक लावते. टोयोटा फॉर्च्युनरमध्ये सात एअरबॅग, हिल असिस्ट कंट्रोल आणि ईबीडी सह एबीएस देण्यात आले आहे.

चेक: टोयोटा कार इन्शुरन्स बद्दल अधिक जाणून घ्या

टोयोटा फॉर्च्युनर - व्हेरियंट आणि एक्स-शोरूम प्राइज

व्हेरियंट्स एक्स-शोरूम प्राइज (शहरानुसार बदलू शकते)
2.7 2 डब्ल्यूडी एमटी 2694 सीसी, मॅन्युअल, पेट्रोल, 10.01 किमी/लीटर ₹ 27.83 लाख
2.7 2डब्ल्यूडी एटी 2694 सीसी, ऑटोमॅटिक, पेट्रोल, 10.26 किमी/लीटर ₹ 29.42 लाख
2.8 2 डब्ल्यूडी एमटी 2755 सीसी, मॅन्युअल, डीझेल, 14.24 किमी/लीटर ₹ 29.84 लाख
2.8 2डब्ल्यूडी एटी 2755 सीसी, ऑटोमॅटिक, डीझेल, 12.9 किमी/लीटर ₹ 31.7 लाख
2.8 4 डब्ल्यूडी एमटी 2755 सीसी, मॅन्युअल, डीझेल, 14.24 किमी/लीटर ₹ 31.81 लाख
2.8 4डब्ल्यूडी एटी 2755 सीसी, ऑटोमॅटिक, डीझेल, 15.04 किमी/लीटर ₹ 33.6 लाख

भारतातील टोयोटा फॉर्च्युनर कार इन्शुरन्स पॉलिसी बद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न

फॉर्च्युनर इन्शुरन्सचा प्रीमियम प्रभावीपणे कसा कमी करावा?

आपण आपल्या इन्शुरन्स पॉलिसीविरूद्ध उच्च व्हॉलंटरी डीडक्टीबलचा पर्याय निवडू शकता किंवा आपला जमवलेले एनसीबी ट्रान्सफर करू शकता किंवा पॉलिसी प्रीमियम कमी करण्यासाठी अनावश्यक अॅड-ऑन घेणे टाळू शकता.

टोयोटा फॉर्च्युनर इन्शुरन्स पॉलिसीसाठी कंपलसरी डीडक्टीबलची अमाऊंट किती आहे?

या इंजिनची घनक्षमता 2500 सीसी पेक्षा जास्त असल्याने फॉर्च्युनर कार इन्शुरन्स पॉलिसीअंतर्गत कंपलसरी डीडक्टीबल 2000 रुपये असेल, असे आयआरडीएआय च्या निर्देशांनुसार स्पष्ट करण्यात आले आहे.

माझी फॉर्च्युनर कार चोरीला गेली तर मला वाहनाची पूर्ण प्राइज मिळेल का?

जर आपण आपल्या फॉर्च्युनर इन्शुरन्स पॉलिसीसह रिटर्न टू इनव्हॉइस कव्हरचा पर्याय निवडला तर आपल्याला रजिस्ट्रेशन शुल्कासह आपल्या कारचे इंव्हॉईस मूल्य मिळेल.

रस्त्याच्या मधोमध मेकॅनिकल ब्रेकडाउन झाल्यास मला कव्हरेज मिळतो का?

आपण आपल्या टोयोटा फॉर्च्युनर इन्शुरन्स पॉलिसीसह आमच्या ब्रेकडाउन असिस्टन्स अॅड-ऑनचा फायदा घेऊन अशा केसेसमध्ये मदत मिळवू शकता.

मला माझ्या फॉर्च्युनर कार इन्शुरन्स पॉलिसीसह वैयक्तिक अपघात कव्हर घेण्याची आवश्यकता आहे का?

होय, आयआरडीएआय ने प्रत्येक कार मालकाला थर्ड पार्टी आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह अशा दोन्ही प्रकारच्या त्यांच्या कार इन्शुरन्स पॉलिसीसह या कव्हरचा फायदा घेणे मॅनडेटरी केले आहे. यात कार मालक-ड्राइव्हरचा अपघातात मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास कंपेनसेशन दिले जाते.