टाटा सफारी इन्शुरन्स

Get Instant Policy in Minutes*

Third-party premium has changed from 1st June. Renew now

टाटा सफारी इन्शुरन्स पॉलिसी खरेदी किंवा रिन्यू करा

1998 मध्ये भारतीय ऑटोमेकर्स टाटा मोटर्सने टाटा सफारी नावाची एक मिड-साईज्ड एसयूव्ही बाजारात आणली. या मॉडेलची पहिली जनरेशन सेवन-सीटर एसयूव्ही आहे, ज्यामध्ये तीसरी रो फोल्ड होते आणि हे मॉडेल आतून अगदी ऐसपैस आहे. हे सर्व फीचर्स तुम्हाला अगदी वाजवी दरात मिळतात ज्यामुळे ही कार इतर ब्रँडच्या ऑफ-रोड गाड्यांसाठी एक चांगला पर्याय ठरते.

2021 मध्ये, कंपनीने या मॉडेलची दूसरी जनरेशन लॉंच केली ज्यामध्ये फ्रंट व्हील ड्राईव्ह फीचर हे आणि मुख्य म्हणजे हे मॉडेल मोनोकॉक क्रॉसओव्हर एसयूव्ही आहे.

या कारमध्ये सुरक्षित ड्रायव्हिंगसाठीचे फीचर्स आणि इतर वैशिष्ट्य असून सुद्धा या कारला देखील अपघातापासून जोखीम आहेच आणि इतरही नुकसान होण्याची शक्यता आहेच. या गोष्टी विचारात घेतल्या असता, तुम्ही ही कार खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुम्ही एक वैध टाटा सफारी इन्शुरन्स पॉलिसी घेणे अत्यावश्यक आहे. ज्यांच्याकडे ही कार आहे त्यांनी त्यांची पॉलिसी रिन्यू करून घेण्याचा विचार करावा आणि कारचे झालेले नुकसान रिपेअर करण्याचा खर्च करताना आर्थिक बाजू सुरक्षित करून घ्यावी.

याबाबतीत, तुम्ही डिजीटच्या असंख्य फायद्यांमुळे या कंपनीचा इन्शुरन्स प्रोव्हायडर म्हणून नक्कीच विचार करू शकता.

अधिकम माहितीसाठी पुढे वाचत रहा.

टाटा सफारी कार इन्शुरन्समध्ये काय कव्हर केले जाते

डिजिटचा टाटा सफारी कार इन्शुरन्स का खरेदी करावा?

टाटा सफारीसाठी कार इन्शुरन्स प्लॅन्स

थर्ड पार्टी कॉम्प्रिहेन्सिव्ह

अपघातामुळे झालेले तुमच्या स्वतःच्या कारचे नुकसान

×

आगीमुळे झालेले तुमच्या स्वतःच्या कारचे नुकसान

×

नैसर्गिक आपत्तिमुळे झालेले तुमच्या स्वतःच्या कारचे नुकसान

×

थर्ड पार्टीच्या गाडीला झालेले नुकसान

×

थर्ड पार्टीच्या मालमत्तेला झालेले नुकसान

×

पर्सनल एक्सिडेंट कव्हर

×

थर्ड पार्टी व्यक्तिला झालेली इजा/मृत्यू

×

तुमची कार चोरीला गेल्यास

×

डोअस्टेप पिक-अप एंड ड्रॉप

×

तुमचा आयडीव्ही कस्टमाइज करा

×

कस्टमाइज्ड एड-ऑन्स सह एक्स्ट्रा प्रोटेक्शन

×
Get Quote Get Quote

कॉम्प्रीहेन्सिव्ह आणि थर्ड पार्टी इन्शुरन्स मधला फरक याबद्दल आणखीन जाणून घ्या

मी क्लेम कसा फाईल करू शकतो?

एकदा तुम्ही आमचा कार इन्शुरन्स प्लॅन विकत घेतला किंवा रिन्यू केलात की तुम्ही निश्चिंत होऊ शकता, कारण आमच्याकडे 3 सोप्या स्टेप्स मध्ये मध्येपूर्ण होणारी पूर्णपणे डिजिटल अशी क्लेम प्रोसेस आहे.

स्टेप 1

फक्त 1800-258-5956 या नंबर वर कॉल करा. कोताही फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही.

स्टेप 2

सेल्फ इन्स्पेक्शन साठी तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवर लिंक मिळवा. तुमच्या मोबाईलवरून एका गाईडेड स्टेप बाय स्टेप प्रोसेस ने तुमच्या गाडीचे झालेले नुकसान एका व्हिडीओ द्वारे शूट करा.

स्टेप 3

आमच्या गॅरेज नेटवर्क मधून रीएम्बर्समेंट किंवा कॅशलेस यापैकी रिपेअर साठी तुम्हाला जो पर्याय निवडायचा आहे तो निवडा.

डिजीट इन्शुरन्स क्लेम्स किती काळात सेटल केले जातात? तुमची इन्शुरन्स कंपनी बदलताना तुमच्या मनात हा प्रश्न सर्वात पहिले यायला हवा. तुमचे अभिनंदन, तुम्ही हे करता आहात. डिजीट इन्शुरन्स रिपोर्ट कार्ड वाचा

टाटा सफारी इन्शुरन्ससाठी डिजीटचीच निवड का करावी?

एक योग्य इन्शुरन्स प्लॅन निवडण्याआधी तुम्ही ऑनलाईन वेगवेगळ्या इन्शुरन्स प्लॅन्सची तुलना करून बघणे कधीही फायद्याचे ठरेल. असे करताना, यासंदर्भातील तुम्ही डिजीटच्या ऑफर्स देखील बघून घ्यायला हव्यात जेणेकरून तुमचे पर्याय निश्चित होतील. डिजीटला तुमचा इन्शुरन्स प्रोव्हायडर निवडल्यावर तुम्हाला मिळणारे फायदे खालीलप्रमाणे आहेत:

1. सोपी ऑनलाईन प्रक्रिया

डिजीट तुम्हाला तुमच्या स्मार्ट फोनवरूनच टाटा सफारी इन्शुरन्स ऑनलाईन खरेदी करण्याची मुभा देतो. ही टेक्नोलॉजी वर आधरित खरेदी प्रक्रिया जुन्या पारंपारिक ऑफलाईन पद्धतीच्या तुलनेने जलद पूर्ण होते. यामध्ये तुम्हाला काही कागदपत्र ऑनलाईनच अपलोड करायचे आहेत, ज्यामुळे हार्डकॉपी जमा करण्याची ही गरज पडत नाही.

2. कॅशलेस गॅरेजेसचे विस्तृत नेटवर्क

डिजीट कडून सफारी इन्शुरन्स पॉलिसी घेतल्यानंतर तुम्ही भारतामध्ये कुठेही डिजीट-ऑथराइज्ड असंख्य नेटवर्क गॅरेजेस मधून प्रोफेशनल रिपेअर सर्व्हिसेस घेऊ शकता. तसेच, तुम्ही या रिपेअर सेंटर्समध्ये कॅशलेस पर्याय निवडून टाटा करचे नुकसान झाले असता रिपेअरिंग साठी स्वतःच्या खिशातून पैसे भरायला लागणे टाळू शकता.

3. सोपी क्लेम प्रक्रिया

डिजीटच्या सम्रतफोन एनेबल्ड प्रक्रियेमुळे, तुम्हाला तुमच्या टाटा सफारी इन्शुरन्सचा क्लेम अगदी वेळेत मिळतो. या फीचरअंतर्गत तुम्हाला तुमच्या कारचे झालेले नुकसान तुमच्या स्मार्टफोनमधून केवळ निवडायचे आहे आणि रीएम्बर्समेंट किंवा कॅशलेस यापैकी एक उचित रिपेअर मोड निवडायचा आहे. थोडक्यात सांगायचे तर ही प्रक्रिया अगदी चुटकीसरशी पूर्ण होऊन तुम्हाला क्लेमची रक्कम झटपट मिळते.

4. इन्शुरन्सचे विविध पर्याय

टाटा सफारीसाठी डिजीटचे कार इन्शुरन्स तुम्हाला खालील पर्यायांपैकी निवड करण्याची संधी देतो:

  • थर्ड पार्टी कार इन्शुरन्स प्लॅन: हा टाटा इन्शुरन्सचा प्रकार तुम्ही डिजीट कडून घेऊ शकता आणि थर्ड पार्टी लायबिलिटीसाठी कव्हरेज मिळवू शकता. तुमच्या कार आणि थर्ड पार्टी व्यक्ती, मालमत्ता किंवा कारमध्ये झालेल्या अपघातामध्ये नंतर तुम्हाला रिपेअर्ससाठी भरपूर पैसा खर्च करावा लागू शकतो. त्यामुळे, हा इन्शुरन्स प्लॅन खरेदी करून तुम्ही तुमचे आर्थिक ओझे कमी करू शकता.
  • कॉम्प्रीहेन्सिव्ह कार इन्शुरन्स प्लॅन: तुमच्या टाटा सफारी कारसाठी खरेदी केलेला एक कॉम्प्रीहेन्सिव्ह कार इन्शुरन्स प्लॅन तुमच्या स्वतःच्या आणि थर्ड पार्टीच्या कारचे दोन्हीचे नुकसान कव्हर करतो. तुमच्या टाटा कारचा अपघात होऊ शकतो आणि त्यामध्ये कारचे जास्त नुकसान होऊ शकते आणि त्याच्या रिपेअरिंग साठी नंतर तुम्हाला भरघोस खर्च करावा लागू शकतो. त्यामुळे, रिपेअरिंगचा भलामोठा खर्च तळण्यापेक्षा टाटा सफारी इन्शुरन्सच्या कॉम्प्रीहेन्सिव्ह प्लॅनसाठी वाजवी किंमत देऊन हा प्लॅन खरेदी करणे कधीही श्रेयस्कर ठरते.

5. असंख्य एड-ऑन पॉलिसीज

कॉम्प्रीहेन्सिव्ह कार इन्शुरन्स प्लॅन तुमच्या टाटा सफारी कारला संपूर्ण सुरक्षा नाही देऊ शकत. या संदर्भात, तुम्ही अतिरिक्त चार्जेस देऊन डिजीटच्या एड-ऑन्सचा लाभ घेण्याचा विचार करायला हवा. तुम्ही तुमच्या टाटा सफारी इन्शुरन्सची किंमत वाढवून बेसिक इन्शुरन्स प्लॅनमध्ये एड-ऑन्स जोडून घेऊ शकता. कन्झ्युमेबल कव्हर, रिटर्न टू इन्व्हॉइस कव्हर, इंजिन आणि गिअर बॉक्स प्रोटेक्शन कव्हर, रोडसाईड असिस्टंस ही एड-ऑन्सची काही उदाहरणे आहेत.

6. डोअरस्टेप पिक-अप आणि ड्रॉप सुविधा

डिजीटकडून तुमच्या टाटा सफारी कॉम्प्रीहेन्सिव्ह इन्शुरन्सच्या रिन्युअलचा पर्याय निवडल्यावर तुम्हाला तुमच्या टाटा सफरीच्या नुकसान झालेल्या पार्ट्स साठी तुमच्या सोयीने डोअरस्टेप पिक-अप आणि ड्रॉप सुविधा मिळू शकते. या सुविधेमुळे तुम्हाला घरबसल्या प्रभावशाली रिपेअर सर्व्हिस मिळते.

7. आयडीव्ही कस्टमायझेशन

टाटा सफारी इन्शुरन्स रिन्युअलची किंमत तुमच्या कारच्या इन्शुअर्ड डिक्लेअर्ड (आयडीव्ही) व्हॅल्यू वर अवलंबून असते. या व्हॅल्यूच्या आधारे इन्शुरर कार चोरीला गेली असता किंवा कारचे रिपेअर न होऊ शकणारे नुकसान झाले असता तुम्हाला परतावा देतो. डिजीटसारखे इन्शुरर्स तुमचे फायदे वाढवण्यासाठी तुम्हाला तुमच्या कारची आयडीव्ही कस्टमाइज करण्याची मुभा देतात.

8. 24x7 कस्टमर सर्व्हिस

तुमच्या टाटा सफारी इन्शुरन्स प्लॅन संबंधी शंकांसाठी तुम्ही डिजीटच्या प्रतिक्रीयाशील कस्टमर सपोर्टशी संपर्क साधू शकता. ते 24x7, अगदी राष्ट्रीय सुट्ट्यांच्या दिवशी देखील तुमच्या सेवेसाठी तत्पर असतात.

तसेच, जास्त डीडक्टिबलचा प्लॅन खरेदी करून तुम्ही तुमच्या टाटा सफारी इन्शुरन्सचे प्रीमियम कमी करू शकता. तरी, जर तुमच्या इन्शुरन्सचा क्लेम कमी प्रमाणात करण्याकडे तुमचा कल असेल तर हा प्लॅन तुमच्यासाठी अगदी प्रॅक्टिकल पर्याय आहे.

टाटा सफारीसाठी कार इन्शुरन्स घेणे गरजेचे का आहे?

सुरक्षा आणि संरक्षण सर्वतोपरी आहे. सर्वात पहिले तर, प्रत्येक कार मालकासाठी त्याची कार इन्शुअर करणे कायद्याने बंधनकारक आहे अन्यथा भरघोस दंड आणि फाईन भरण्यासाठी तयार रहावे. दूसरी गोष्ट म्हणजे, कार इन्शुरन्स तुमच्या खिशाला अनपेक्षित/दुर्दैवी घटनांमधून उद्भवणाऱ्या खर्चांपासून सुरक्षित ठेवेल.

  • आर्थिक लायबिलिटीपासून सुरक्षा: तुमची टाटा सफारी कार कितीही मजबूत किंवा दणकट असली तरी अनपेक्षित/अचानक आलेल्या नैसर्गिक आपत्ति, हवामान/निसर्ग, एखादा अपघात, आग लागणे किंवा चोरी याला बळी पडू शकते. अशा परीस्थित कार इन्शुरन्स तुमचा खरा मित्र बनून तुम्हाला अनपेक्षित खर्चांपासून वाचवतो.

आता तुमच्या कारचे नुकसान जर तुमच्या चुकीने झाले असेल तर तुम्ही तुमच्या खिशातून कदाचित पैसे भरालही पण यामध्ये जर तुमची काहीही चूक नसेल तर हा खर्च जिव्हारी लागतो, पण तुम्ही हे टाळू शकता.

  • लीगली कम्प्लायंट: मोटर वेहिकल एक्ट प्रमाणे, तुमच्या कारचा इन्शुरन्स असणे अनिवार्य आहे, असे नसणे हा एक दंडनीय अपराध आहे. तुमची कार इन्शुरन्स नसताना चालवणे कायदेशीर गुन्हा आहे. इन्शुरन्स नसताना कार चालवल्याबद्दल तुम्हाला रु. 2000 इतका दंड होऊ शकतो आणि अटकही होऊ शकते. त्यामुळे, जरी तुम्ही साहसी असाल, तरी इन्शुरन्स न घेणे काही फायद्याचे नाही.
  • थर्ड पार्टी लायबिलिटी कव्हर करतो: अपघात झालेला असताना, थर्ड पार्टीला झालेले सर्व नुकसान इन्शुरन्स पॉलिसी कव्हर करते. कधी कधी, झालेले नुकसान खूप मोठे असते आणि रीप्वर न होण्यासारखे असते. इतके मोठे की ते एखाद्याला परवडणार देखील नाही, अशा वेळेस थर्ड पार्टी कर इन्शुरन्स आपली भूमिका बजावतो. जास्तीत जास्त आर्थिक नुकसानाची जवाबदारीची काळजी घेतो आणि ज्या पार्टीचे नुकसान झाले आहे त्यासाठी संरक्षक म्हणून काम करतो.
  • कॉम्प्रीहेन्सिव्ह कव्हर सह अतिरिक्त सुरक्षा: या प्रकारचे कव्हर हे नेहमीच सर्वोत्तम असते कारण हे थर्ड पार्टीसाठीच नाही तर तुमच्या टाटा सफारी कारसाठी देखील सुरक्षाकवच म्हणून काम करते. कॉम्प्रीहेन्सिव्ह कार इन्शुरन्स घेऊन तुम्ही निश्चिंत राहू शकता कारण या प्लॅन अंतर्गत झालेल्या नुकसानाची भरपाई ही केली जाते आणि कारला अधिक चांगले कव्हरेज देखील मिळते.

तुम्ही कार इन्शुरन्स कॅल्क्युलेटर वापरून प्रीमियम कॅल्क्युलेट करू शकता आणि बाजारात उपलब्ध असलेल्या असंख्य एड-ऑन्स मधून निवड करून तुमच्या गरजांना आणि खिशाला सूट होईल असा प्लॅन कस्टमाइज करू शकता. आम्ही नेहमी हा प्लॅन घेण्याबद्दलच सुचवतो, तुम्ही तुमच्या टाटा सफारीसाठी एक अतिरिक्त पॉलिसी म्हणून देखील तुम्ही ही पॉलिसी घेऊ शकता.

टाटा सफारी बद्दल आणखीन जाणून घ्या

टाटा सफारी, आपल्याच देशातील ऑटोमोबाईल मॅन्यूफॅक्चरर टाटा मोटर्सने 1998 मध्ये बनवलेली स्वदेशी कार आहे. ‘रील्क्लेम युअर लाईफ’, मेक युअर ओन रोड’ अशा टॅगलाईन असलेल्या जाहिरातींनी टाटा मोटर्सने भारतीय रस्त्यांवर प्रभुत्व स्थापित केले आणि रस्त्यावर टाटाच्या कार्सचे जणु वादळच उठले. यापासून शब्दशः प्रेरणा घेऊन टाटा ने त्यांच्या बीस्टचे इम्प्रूव्ह्ड व्हर्जन टाटा सफारी ‘स्टॉर्म’ या नावाने लॉंच केले.

मूळतः टाटा सफारी भारतीय बाजारामध्ये 1998 मध्ये लॉंच करण्यात आली. कालांतराने ग्राहकांच्या मागणीनुसार, टाटा मोटर्सने मूळ डिझाईनमध्ये अनेक बदल आणि सुधारणा केल्या, ज्यामुळे नवनवीन व्हेरियंट्सना पेव फुटला आणि तेव्हा जन्म झाला ‘टाटा सफारी डेकोर’ आणि ‘टाटा सफारी स्टॉर्म’चा. या मिड-साईज्ड एसयूव्हीला भरभरून यश मिळाले आणि प्रचंड लोकप्रिय झाली, अशा कारला अवॉर्ड नाही मिळाले तरच नवल, सफारी डेकोरला ओएंडएम साठी ओव्हरड्राईव्ह कॅम्पेन ऑफ द इअरचे अवॉर्ड मिळाले.

टाटा कार इन्शुरन्स बद्दल आणखीन जाणून घ्या.

तुम्ही टाटा सफारी का खरेदी करायला हवी?

याला असंख्य कारणे आहेत!! त्यातील काहींवर आपण इथे चर्चा करू! टाटा मोटर्सचे म्हणणे आहे की सफारी स्टॉर्म (सफारी फॅमिलीची लेटेस्ट कार) ही त्यांनी ‘डिझाईन्ड टू डॉमिनेट, परफेक्टेड टू परफॉरमन्स’ या ब्रीद वाक्याला समोर ठेवून बनवली आहे आणि टाटा मोटर्सच्या तत्वांवर ठाम राहून या कारने तिचे वचन पाळले आणि इतिहास घडवला.

कारच्या ऐसपैस इंटिरियर, पर्याप्त हेडरूम, भव्य लेगरूम मुळे टाटा सफारी मध्ये लॉंग ड्राईव्ह म्हणजे जणु एक सुखद अनुभव. स्टायलिश इंटिरियर्स, बोल्ड आणि मजबूत बॉडी. टाटा सफरीच्या लेटेस्ट व्हेरियंटचे काही फीचर्स आहेत: 2.2एल व्हीएआरआयसीओआर 400चे best इन क्लास एडव्हान्स्ड इंजिन, सिक्स-स्पीड गिअर बॉक्स, 63 लिटर क्षमतेचा मोठा फ्युएल टँक, 14.1 प्रति लिटरचे मायलेज, ईएसओएफ, 200मिमी ग्राउंड क्लिअरन्स, नवीन आणि सुधारित मल्टी-फंक्शनल स्टिअरिंग व्हील, साईड-इम्पॅक्ट बार्स, ऑटोमॅटिक ओआरव्हीएम्स, थ्री-पोजिशन लंबर सपोर्ट मुळे तणाव-मुक्त ड्राईव्ह, उत्तम टर्निंग रेडियस, रूफ-माउंटेड रिअर एसी आणि इतर अनेक.

11.09 - 16.44 लाख (एक्स-शोरूम, दल्ली) किमतीची सफारी दावा करते की ही कोणत्याही भूभागावर अगदी सहज प्रभुत्व दाखवू शकते परंतु, जसे की या कारला खडकाळ आणि अवघड भूभागासाठीच डिझाईन केले गेले आहे, हे म्हणणे चुकीचे ठरणार नाही की ही कार साहसी आणि वाऱ्याशी गप्पा मारण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक वरदानच ठरली आहे.

अपर-मिडल-क्लास सेगमेंटमधील फॅमिलीज लक्ष करून बनवण्यात आलेली ही कार तरुणांचीआणि इतरांचीही तितकीच लोकप्रिय ठरली आहे.

टाटा सफारी व्हेरियंट्सच्या किमती

टाटा सफारी व्हेरियंट्स किंमत (नवी दिल्लीमध्ये, शहराप्रमाणे किंमत बदलू शकते)
एक्सई ₹17.82 लाख
एक्स एम ₹19.61 लाख
एक्सएमए एटी ₹21.12 लाख
एक्सटी ₹21.38 लाख
एक्सटी प्लस ₹22.31 लाख
एक्सझेड ₹23.42 लाख
एक्सटीए प्लस ₹23.82 लाख
एक्सझेड प्लस 6 सीटर ₹24.22 लाख
एक्सझेड प्लस ₹24.39 लाख
एक्सझेड प्लस 6 सीटर एडव्हेन्चर एडिशन ₹24.46 लाख
एक्सझेड प्लस एडव्हेन्चर एडिशन ₹24.64 लाख
एक्सझेडए एटी ₹24.93 लाख
एक्सझेडए प्लस 6 सीटर एटी ₹25.73 लाख
एक्सझेड प्लस गोल्ड ₹25.85 लाख
एक्सझेड प्लस गोल्ड 6 सीटर ₹25.85 लाख
एक्सझेडए प्लस एटी ₹25.91 लाख
एक्सझेडए प्लस 6सीटर एडव्हेन्चर एडिशन एटी ₹25.98 लाख
एक्सझेडए प्लस एडव्हेन्चर एडिशन एटी ₹26.15 लाख
एक्सझेडए प्लस गोल्ड 6 सीटर एटी ₹27.36 लाख
एक्सझेडए प्लस गोल्ड एटी ₹27.36 लाख

[1]

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

थर्ड पार्टी इन्शुरन्स प्लॅन सोबत मला एड-ऑनचा फायदा मिळू शकतो का?

नाही, फक्त कॉम्प्रीहेन्सिव्ह प्लॅन असलेल्या पॉलिसी होल्डर्ससाठीच अतिरिक्त चार्जेस भरून एड-ऑन पॉलिसीज उपलब्ध आहेत.

टाटा सफारी सेकंड हँड कारसाठी मी इन्शुरन्स घेणे गरजेचे आहे का?

जर सेकंड हँड टाटा कारची आधीची कोणती पॉलिसी असेल, तर तुम्ही ती तुमच्यानावावर करून घेऊ शकता. अन्यथा, आर्थिक आणि कायदेशीर लायबिलिटीज टाळण्यासाठी तुम्ही एक वैध इन्शुरन्स प्लॅन खरेदी करणे गरजेचे आहे.