स्कोडा कुशाक कर इन्शुरन्स

Drive Less, Pay Less. With Digit Car Insurance.

Third-party premium has changed from 1st June. Renew now

स्कोडा कुशाक कर इन्शुरन्स ऑनलाईन खरेदी किंवा रिन्यू करा

स्कोडा, चेक ऑटोमोबाईल मॅन्यूफॅक्चररने ही 5-सीटर एसयूव्ही कुशाक 28 जून, 2021 मध्ये लॉंच केली. ऑगस्ट मध्ये जवळपास 2,700 कुशाक मॉडेल्स विकले गेले, ज्यामुळे कंपनीच्या एकूण नफ्यामध्ये या कारचे 70% इतके योगदान होते.

तसेच, कुशाक विकत घेण्यासाठी 2 महिन्यांचा वेटिंग पिरिअड आहे. ऑगस्ट मध्ये ऑलरेडी त्यांनी 6,000 बुकिंग घेतले आहे. 

जे लोक हे स्कोडा मॉडेल बुक करायचा विचार करत आहेत त्यांनी आर्थिक सुरक्षेसाठी परवडेल अशा स्कोडा कुशाक कार इन्शुरन्सचा पर्याय निवडायला हवा. मोटर वेहीकल एक्ट 1988, नुसार भारतीय रस्त्यांवर धावणाऱ्या कोणत्याही वेहिकलचे थर्ड पार्टी कार इन्शुरन्स असणे अनिवार्य आहे. हा एक्ट थर्ड पार्टी डॅमेजेस मधून होणाऱ्या खर्चापासून आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी लागू केला गेला आहे.

तरी, ग्राहक कॉम्प्रीहेन्सिव्ह कार इन्शुरन्स पॉलिसीची निवड करू शकतात, ज्यामध्ये थर्ड पार्टी लायबिलिटी आणि स्वतःच्या कारचे नुकसान अशा दोन्ही गोष्टी कव्हर केल्या जातात.

भारतामधील अनेक नामवंत इन्शुरन्स प्रोव्हायडर्स कॉस्ट इफेक्टिव्ह स्कोडा कुशाक इन्शुरन्स पॉलिसीज ऑफर करतात. डिजीट अशीच एक कंपनी आहे.

स्कोडा कुशाक कार इन्शुरन्सची किंमत

रजिस्टर केल्याची तारीख प्रीमियम (केवळ स्वतःच्या नुकसानभरपाईच्या पॉलिसी साठी)
मे - 2021 8,176

**डिस्क्लेमर - प्रीमियम कॅल्क्यूलेशन स्कोडा कुशाक 1.5 टीएसआय स्टाईल एमटी 1495.0. साठी केलेले आहे. जीएसटी वगळता.

शहर: बंगलोर, वेहिकल रजिस्ट्रेशनचा महिना - मे, एनसीबी - 50%, कोणतेही एड-ऑन्स नाहीत, पॉलिसी समाप्त नाही झाली, आणि - सर्वात कमी मध्ये आयडीव्ही उपलब्ध आहे. प्रीमियम कॅल्क्यूलेशन सप्टेंबर, 2021 मध्ये केलेले आहे. वरती तुमचे वेहिकल डीटेल्स टाकून अंतिम प्रीमियम चेक करा.

डिजिट कार इन्शुरन्समध्ये काय कव्हर्ड आहे

तुम्ही डिजिट कार इन्शुरन्स का खरेदी करावा?

कार इन्शुरन्स प्लॅन जो तुमच्या सर्व गरजा पूर्ण करतो.

थर्ड पार्टी कॉम्प्रिहेन्सिव्ह

अपघातामुळे स्वतःच्या कारचे नुकसान/हानी

×

आग लागल्यास स्वत:च्या कारचे नुकसान/हानी

×

नैसर्गिक आपत्तीच्या वेळी स्वतःच्या कारचे नुकसान/हानी

×

थर्ड पार्टीच्या वाहनाचे नुकसान

×

थर्ड पार्टी मालमत्तेचे नुकसान

×

वैयक्तिक अपघात कव्हर

×

थर्ड पार्टी व्यक्तीचे जखमी होणे/मृत्यू

×

तुमच्या कारची चोरी

×

तुमचा IDV कस्टमाइझ करा

×

कस्टमाइझ्ड अ‍ॅड -ऑन्ससह अतिरिक्त

×
Get Quote Get Quote

कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि थर्ड पार्टी इन्शुरन्समधील फरकाबद्दल अधिक जाणून घ्या

कार इन्शुरन्स क्लेम कसा दाखल करायचा?

तुम्ही आमचा कार इन्शुरन्स प्लॅन खरेदी केल्यानंतर किंवा त्याचे रिन्यूअल केल्यानंतर, तुम्ही तणावमुक्त राहता कारण अडचणीच्या वेळी केवळ 3-स्टेप्समध्ये आपण क्लेम करू शकता!

स्टेप 1

फक्त 1800-258-5956 वर कॉल करा. कोणतेही फॉर्म भरायचे नाहीत

स्टेप 2

तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर स्व-तपासणीसाठी लिंक मिळवा. मार्गदर्शित स्टेप- बाय- स्टेप प्रक्रियेद्वारे तुमच्या स्मार्टफोनवरून तुमच्या वाहनाच्या नुकसानाविषयीची माहिती भरा.

स्टेप 3

आमच्या गॅरेजच्या नेटवर्कद्वारे तुम्हाला रिएम्बर्समेंट किंवा कॅशलेसची निवड करायची असलेली दुरुस्तीची पद्धत निवडा.

डिजिट इन्शुरन्स क्लेम किती वेगाने निकाली काढले जातात? तुमची इन्शुरन्स कंपनी बदलताना तुमच्या मनात हा पहिला प्रश्न यायला हवा. तुम्ही तसा विचार करत आहात ही चांगली गोष्ट आहे ! डिजिटचे क्लेम्स रिपोर्ट कार्ड वाचा.

डिजीटचे स्कोडा कुशाक कार इन्शुरन्स निवडण्याची कोणकोणती कारणे आहेत?

  1. सर्वाधिक क्लेम सेटलमेंट रेशिओ देतो - कोणत्याही कार इन्शुरन्स पॉलिसी मध्ये डिजीट सर्वाधिक सेटलमेंट रेशिओ देतो. त्याचबरोबर, डिजीट रेज केलेले सर्वाधिक क्लेम्स सेटल करण्यासाठी प्रयत्नशील असतो. आपल्या कस्टमर्सना तणावमुक्त अनुभव देण्यासाठी, डिजीट अगदी चुटकीसरशी क्लेम सेटलमेंट करतो.
  2. डिजीटलाईज्ड प्रोसेसिंग सिस्टम देतो - तुम्ही क्लेम रेज करून अगदी थोड्याच काळात सेटलमेंटची रक्कम मिळवू शकता. तुमच्या सोयीसाठी डिजीट 100% डिजीटलाईज्ड सिस्टम ऑफर करतो. तुम्ही स्मार्ट-फोन एनेबल्ड सेल्फ-इन्स्पेक्शन प्रक्रियेद्वार क्लेम रेज करू शकता. तसेच, ही प्रक्रिया आणखीन सुरळीतपणे पार पडण्यासाठी तुमच्या झालेल्या नुकसानाचे फोटो देखील पाठवू शकता. 
  3. तुमचे आयडीव्ही अमाउंट कस्टमाइज करा - डिजीट कडून कार इन्शुरन्स खरेदी केल्यानंतर, पॉलिसी मधून डेप्रीसिएशन रेट वजा केला जातो आणि त्याची इन्शुअर्ड डिक्लेअर्ड व्हॅल्यू मिळवतो. आता जर तुम्ही तुमच्या स्कोडा कुशाक इन्शुरन्सची किंमत किंचित वाढवण्यासाठी तयार असाल तर, तुम्ही तुमची आयडीव्ही अमाउंट पर्सनलाईज करू शकता. तसेच, चोरीच्या किंवा दुरुस्त न होऊ शकणाऱ्या नुकसानाच्या बाबतीत, तुम्ही इन्शुरर कडून जास्तीची भरपाई मागू शकता.
  4. एड-ऑन्सच्या विस्तृत रेंज मधून निवड करा - डिजीट त्याच्या कस्टमर्सना त्यांच्या 100% समाधानासाठी आउट-एंड-आउट कव्हरेज प्रदान करतो. डिजीट तुम्हाला स्कोडा कुशाक इन्शुरन्स रिन्युअल प्राईजमध्ये किंचित वाढ करून 7 अतिरिक्त बेनिफिट्स प्रदान करतो. त्यातील काही बेनिफिट्स खालीलप्रमाणे आहेत:
    • रिटर्न टू इन्व्हॉइस
    • कन्ज्यूमेबल कव्हर
    • इंजिन आणि गिअर बॉक्स सिक्युरिटी
    • झिरो डेप्रीसिएशन कव्हर
    • रोडसाईड असिस्टंस आणि इतर
  5. नेटवर्क गॅरेजेसची विस्तृत रेंज - तुम्ही आसाम मध्ये आहात किंवा पंजाब मध्ये, तुम्हाला डिजीट नेटवर्क कार गॅरेज नक्कीच मिळेल. या इन्शुररचे देशभरामध्ये 5800 गॅरेजेसशी कोलॅबरेशन आहे. तुम्ही यापैकी कोणत्याही नेटवर्क गॅरेजेसमधून कॅशलेस रिपेअर्स हा पर्याय निवडू शकता. 
  6. डोअरस्टेप पिकअप आणि ड्रॉप सुविधेचा पर्याय निवडू शकता - जर अशी परिस्थिती आली की तुमची स्कोडा कुशाक चालूच शकत नाही, अशा वेळेस तुम्ही तुमच्या स्कोडा कुशाक कार इन्शुरन्स पॉलिसी अंतर्गत असलेल्या डोअरस्टेप पिकअप असिस्टंस या सुविधेची निवड करू शकता. डिजीटच्या नेटवर्क गॅरेजेसमधील प्रतिनिधी तुमच्या लोकेशनवरती येऊन योग्य ती मदत करतील. 
  7. 24x7 कस्टमर केअर सपोर्ट - डिजीटचे कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह तुम्हाला तुमच्या स्कोडा कुशाक इन्शुरन्सच्या खरेदी किंवा रिन्युअल संबंधी सर्व शंकांचे निरसन करण्यासाठी सदैव तत्पर असतात. त्यामुळे रविवार असो किंवा कोणताही राष्ट्रीयसुट्टीचा दिवस, तुम्हाला डिजीट कडून 24x7 सहकार्य मिळेल.

त्यामुळे, जर तुमच्या स्कोडा कुशाक कर इन्शुरन्ससाठी तुम्ही डिजीटचा विचार करत असाल, तर तुम्हाला वर नमूद केलेले सर्व बेनिफिट्सचा आनंद घेता येईल आणि ते ही तुमच्या खिशाला परवडतील अशा किमतीत.

तरी सुद्धा, आम्ही सुचवू की तुम्ही वेगवेगळे इन्शुरन्स प्रोव्हायडर्स निवडा आणि कोण कुठले आणि किती फीचर्स आणि बेनिफिट्स देतात याची तुलना करून बघा. आणि मग तुमच्या गरजा पूर्ण करण्याबरोबरच तुमच्या खिशाला देखील परवडेल, असा इन्शुरर निवडा.

स्कोडा कुशाक कार इन्शुरन्स घेणे का महत्त्वाचे आहे?

तुमची स्कोडा कुशाक इन्शुअर करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. यामुळे तुमच्या कारच्या पार्टसचे आणि बॉडी डॅमेजस, चोरी, नैसर्गिक आपत्ति आणि इतर तत्सम दुर्घटनांमुळे उद्भवणाऱ्या खर्चासाठी कव्हर मिळते. तसेच, अशा अपघातांच्या रिपेअरिंगसाठी खर्च करण्यापेक्षा कार इन्शुरन्सचे प्रीमियम भरणे कधी ही श्रेयस्कर ठरेल. 

  1. फायनान्शियल लायबिलिटी पासून सुरक्षा - जसे की तुम्हाला माहित आहे की कुशाक ही कार बजारात नवीनच आहे त्यामुळे त्याचा रिपेअरिंगचा खर्च आणि स्पेअर पार्टस महाग आहेत. त्यामुळे, जर तुम्ही कॉम्प्रीहेन्सिव्ह कार इन्शुरन्स पॉलिसी निवडलीत, तर तुम्हाला फ्री डॅमेज रिपेअरिंग किंवा रीएम्बर्समेंटचा पर्याय निवडता येऊ शकतो.
  2. थर्ड पार्टी लायबिलिटी पासून आर्थिक सुरक्षा - प्रत्येक भारतीय कार मालकासाठी थर्ड पार्टी इन्शुरन्स पॉलिसी असणे अनिवार्य आहे.ही पॉलिसी एका सुरक्षा कवचासारखी काम करते आणि थर्ड पार्टी वेहिकल, व्यक्ती किंवा मालमत्ता यापैकी कोणालाही झालेल्या नुकसानासाठी आर्थिक सुरक्षा देखील देते.
  3. कॉम्प्रीहेन्सिव्ह कव्हर सोबत अतिरिक्त बेनिफिट्स - जे ग्राहक कॉम्प्रीहेन्सिव्ह स्कोडा कुशाक कार इन्शुरन्सचा पर्याय निवडतात त्यांना थर्ड पार्टी लायबिलिटी कव्हरेज आणि स्वतःच्या कारच्या डॅमेजसाठीचे कव्हरेज, या दोन्हीचा फायदा मिळतो. याचबरोबर, एक कॉम्प्रीहेन्सिव्ह कार पॉलिसी चोरी, आग लागणे, नैसर्गिक आपत्ति, मानव-निर्मित आपत्ति आणि इतर कारणांमुळे उद्भवणाऱ्या खर्चासाठी देखील कव्हर देते.
  4. लीगल पेनल्टी पासून सुरक्षा - मोटर वेहिकल एक्ट 2019 नुसार, जर एखादा भारतीय कार मालक त्याची कार इन्शुरन्स नसताना चालवत असेल तर त्याला भरघोस पेनल्टीज भराव्या लागू शकतात किंवा त्याचा ड्रायव्हिंग लायसन्स रद्द केला जाऊ शकतो. पहिल्यांदा नियम तोडणाऱ्यांना ₹2000 पर्यंत दंड भरावा लागू शकतो किंवा 3 महिन्यांसाठी अटक होऊ शकते. दुसऱ्यांदा नियम तोडल्यास ₹4000 पर्यंत दंड भरावा लागू शकतो किंवा 3 महिन्यांसाठी अटक होऊ शकते.
  5. नो क्लेम बोनस बेनिफिट - तुम्ही जर तुमच्या स्कोडा कुशाक इन्शुरन्सचा आज पर्यंत कोणताही क्लेम केला नसेल तर रिन्युअलच्या वेळेस तुम्हाला तुमच्या प्रीमियम्स वरती डिस्काउन्ट्स मिळू शकतात. डिजीट तुम्हाला पर्याप्त क्लेम-फ्री नियामांसोबतच 50% पर्यंतचे डिस्काउंट ऑफर करते.

लोकप्रिय इन्शुरन्स प्रोव्हायडर्स जसे डिजीट सुखद अनुभवासाठी सुटसुटीत आणि सोप्या प्रक्रिया फॉलो करतात. याचबरोबर जर तुम्ही कुशाक इन्शुरन्स डिजीट कडून रिन्यू करत असाल, तर चोरी, मानव-निर्मित आपत्ति किंवा नैसर्गिक आपत्ति, आग लागणे आणि इतर कोणत्याही अनपेक्षित घटनेमुळे होणाऱ्या नुकसानासाठीच्या भरपाईची काळजीच करू नका.

स्कोडा कुशाक बद्दल आणखीन माहिती

स्कोडा कुशाक लक्झरी, फंक्शनळ फीचर्स आणि स्लीक डिझाईन या सगळ्याचे एक उत्तम कॉम्बिनेशन आहे. एसयूव्ही हा एक ग्लोबल स्टँडर्डचा ब्रँड आहे कायमच रॉयल डिझाईन्स सादर करतो. सध्या कुशाक 3 ट्रिम्स मध्ये उपलब्ध आहे - एक्टीव्ह, एम्बीशन आणि स्टाईल.

कुशाक 2 प्रकारच्या इंजिनसह उपलब्ध आहे - 1.0 लिटर टीएसआय आणि 1.5 लिटर टीएसआय. बेस मॉडेल एक्टीव्ह 1.0 लिटर टीएसआय मॅन्युअल कॉन्फीगरेशन सह उपलब्ध आहे. त्याचबरोबर अतिशय ऐसपैस असे स्टाईल मॉडेल 1.5 लिटर टीएसआय इंजिनमध्ये दोन्ही मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक कॉन्फीगरेशन सह उपलब्ध आहे.

स्कोडाच्या सुविधा अतुल्य आहेत. ही कार वायरलेस फ्रंट चार्जिंग, स्कोडा प्ले एप सह 10 इंचाचे इन्फोटेनमेंट सिस्टम आणि बऱ्याच इतर सुविधांनी सुसज्ज आहे.

कुशाक मध्ये उत्तम प्रतीच्या मटेरीअल पासून बनवलेले प्लश अपहोलस्टेरी आणि लक्झूरियस फॅसिलिटी सह सुसज्ज असे स्पॅशियल कॅबिन देखील आहे. तसेच यामध्ये सर्वात आधुनिक असे व्हीलबेस सेग्मेंट्स देखील आहेत ज्यामुळे ही अधिक ऐसपैस बनते. 

स्कोडा कुशाक, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलीटी कन्ट्रोल (ईएससी), इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रीब्यूशन (ईबीडी), एन्टी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (एबीएस), मल्टी कोलीजन ब्रेकिंग, व्हीडीएस आणि एक्सडीएस+ (30 किमी प्रति तास), ब्रेक डिस्क वायपिंग (बीएसडब्ल्यू) आणि इतर अनेक उच्चतम अशा फीचर्समुळे सुरक्षेच्या दृष्टीने अगदी परिपूर्ण ठरते.

तरी अशी टणक आणि कणखर बॉडी असताना देखील कुशाकचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे, कोणत्याही आर्थिक नुकसान, मग ते तुमच्या स्वतःच्या कारचे असो किंवा थर्ड पार्टी लायबिलिटी असो, यापासून सुरक्षा मिळण्यासाठी स्कोडा कार इन्शुरन्स अगदी स्मार्ट पर्याय आहे.

स्कोडा कुशाक - व्हेरीयंट्स आणि एक्स-शोरूम किमती

व्हेरियंट्स एक्स-शोरूम किंमत (शहराप्रमाणे बदलू शकतात)
कुशाक 1.0 टीएसआय एक्टीव्ह ₹10.49 लाख
कुशाक 1.0 टीएसआय एम्बीशन ₹12.79 लाख
कुशाक 1.0 टीएसआय एम्बीशन एटी ₹14.19 लाख
कुशाक 1.0 टीएसआय स्टाईल ₹14.59 लाख
कुशाक 1.0 टीएसआय स्टाईल एटी ₹15.79 लाख
कुशाक 1.5 टीएसआय स्टाईल ₹16.19 लाख
कुशाक 1.5 टीएसआय स्टाईल डीएसजी ₹17.59 लाख

भारतामध्ये स्कोडा कुशाक कार इन्शुरन्स बद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न

केवळ स्वतःच्या नुकसानासाठीची स्कोडा कुशाक इन्शुरन्स पॉलिसी घेता येऊ शकते का?

होय. जर तुमच्याकडे सध्या थर्ड पार्टी इन्शुरन्स पॉलिसी आहे, तर तुम्ही स्वतःच्या नुकसानासाठीच्या पॉलिसीचा पर्याय निवडू शकता, जेणेकरून तुमच्या स्वतःच्या कारला देखील तुम्ही नुकसानापासून सुरक्षित करू शकता.

कार चोरीला गेल्यास, डिजीटचे कुशाक इन्शुरन्स कारची संपूर्ण किंमत भरून देते का?

तुमच्या इन्शुरन्स कव्हर सोबतच, तुम्ही जर डिजीटची रिटर्न टू इन्व्हॉइस कव्हर या एड-ऑन पॉलिसीचा पर्याय निवडला असेल, तर तुमची कार चोरीला गेल्यास किंवा कारचे रिपेअर न होण्यासारखे नुकसान झाल्यास तुम्हाला कारची संपूर्ण किंमत भरून दिली जाईल, तसेच रोड टॅक्स आणि रजिस्ट्रेशनचा खर्च देखील मिळेल.