रेनॉल्ट ट्रायबर कार इन्शुरन्स
6000+ Cashless
Network Garages
Zero Paperwork
Required
24*7 Claims
Support
I agree to the Terms & Conditions
सपोर्ट
closeआमचा WhatsApp नंबर कॉलसाठी वापरला जाऊ शकत नाही. हा फक्त चॅट नंबर आहे.
6000+ Cashless
Network Garages
Zero Paperwork
Required
24*7 Claims
Support
I agree to the Terms & Conditions
रेनॉल्ट इंडिया प्रा.लि. ही भारतातील सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल मॅन्यूफॅक्चरर्स कंपन्यांमधील एक आहे आणि 2012 मध्ये बाजारातील इतर कंपन्यांच्या तुलनेत या कंपनीने जास्त अवॉर्ड्स मिळवले आहेत. आउटस्टँडिंग हॅन्डलिंग आणि कॉम्पॅक्ट डिझाईन मुळे , रेनॉल्ट ट्रायबर 2019 मधल्या हिच्या लॉंच नंतर अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.
मोटर वेहिकल एक्ट, 1988, प्रमाणे कार मालकांनी त्यांची कार एका वैध थर्ड पार्टी कार इन्शुरन्स पॉलिसी अंतर्गत इन्शुअर करायला हवी. त्यामुळे, तुम्ही तुमच्या किंवा थर्ड पार्टीच्या भविष्यात होणाऱ्या कोणत्याही नुकसानाचा खर्च भरणे टाळण्यासाठी रेनॉल्ट ट्रायबर कार इन्शुरन्सचा पर्याय निवडला पाहिजे.
त्यामुळे, तुम्ही तुमच्या रेनॉल्ट ट्रायबरच्या इन्शुरन्सच्या खरेदी किंवा रिन्युअलसाठी डिजीटसारख्या एका विश्वासू इन्शुरन्स प्रोव्हायडरची निवड करायला हवी.
रजिस्ट्रेशनची तारीख |
प्रीमियम (केवळ स्वतःच्या नुकसानभरपाईच्या पॉलिसीसाठी) |
ऑगस्ट-2018 |
4,541 |
ऑगस्ट-2020 |
5,541 |
ऑगस्ट-2021 |
6,198 |
**चेतावनी - हे प्रीमियम रेनॉल्ट ट्रायबर आरएक्सई बीएसव्हीआय 999.0 साठी जीएसटी सह कॅल्क्यूलेट केले आहे.
शहरे - बंगलोर, वेहिकल रजिस्ट्रेशनचा महिना - ऑगस्ट, एनसीबी - 50%, कोणतेही एड-ऑन्स नाहीत, पॉलिसी एक्सपायर्ड नाही, आणि आयडीव्ही - सर्वात कमी उपलब्ध. प्रीमियम कॅल्क्यूलेशन सप्टेंबर-2021 मध्ये करण्यात आले आहे. खाली तुमच्या कारचे डीटेल्स टाकून तुम्ही अंतिम प्रीमियम चेक करू शकता.
आम्ही आमच्या ग्राहकांना व्हीआयपींप्रमाणे वागवतो, जाणून घ्या कसे...
अपघातामुळे स्वतःच्या कारचे नुकसान/हानी |
×
|
✔
|
आग लागल्यास स्वत:च्या कारचे नुकसान/हानी |
×
|
✔
|
नैसर्गिक आपत्तीच्या वेळी स्वतःच्या कारचे नुकसान/हानी |
×
|
✔
|
थर्ड पार्टीच्या वाहनाचे नुकसान |
✔
|
✔
|
थर्ड पार्टी मालमत्तेचे नुकसान |
✔
|
✔
|
वैयक्तिक अपघात कव्हर |
✔
|
✔
|
थर्ड पार्टी व्यक्तीचे जखमी होणे/मृत्यू |
✔
|
✔
|
तुमच्या कारची चोरी |
×
|
✔
|
तुमचा IDV कस्टमाइझ करा |
×
|
✔
|
कस्टमाइझ्ड अॅड -ऑन्ससह अतिरिक्त |
×
|
✔
|
कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि थर्ड पार्टी इन्शुरन्समधील फरकाबद्दल अधिक जाणून घ्या
तुम्ही आमचा कार इन्शुरन्स प्लॅन खरेदी केल्यानंतर किंवा त्याचे रिन्यूअल केल्यानंतर, तुम्ही तणावमुक्त राहता कारण अडचणीच्या वेळी केवळ 3-स्टेप्समध्ये आपण क्लेम करू शकता!
फक्त 1800-258-5956 वर कॉल करा. कोणतेही फॉर्म भरायचे नाहीत
तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर स्व-तपासणीसाठी लिंक मिळवा. मार्गदर्शित स्टेप- बाय- स्टेप प्रक्रियेद्वारे तुमच्या स्मार्टफोनवरून तुमच्या वाहनाच्या नुकसानाविषयीची माहिती भरा.
आमच्या गॅरेजच्या नेटवर्कद्वारे तुम्हाला रिएम्बर्समेंट किंवा कॅशलेसची निवड करायची असलेली दुरुस्तीची पद्धत निवडा.
तुमची इन्शुरन्स कंपनी बदलताना तुमच्या मनात हा पहिला प्रश्न यायला हवा. तुम्ही तसा विचार करत आहात ही चांगली गोष्ट आहे !
डिजिटचे क्लेम्स रिपोर्ट कार्ड वाचा.
रेनॉल्ट ट्रायबर कार इन्शुरन्सची किंमत या व्यतिरिक्त तुम्ही तुमचा इन्शुरन्स प्रोव्हायडर निवडण्याआधी इतर अनेक मुद्द्यांचा विचार करणे गरजेचे आहे. याठिकाणी, डिजीट स्वतःला रेनॉल्ट कार मालकांसाठी परिपूर्ण बसिद्ध करण्यासाठी इतर अनेक फायदे देतो.
सोपी ऑनलाईन प्रक्रिया - डिजीट तुम्हाला तुमचा ट्रायबर इन्शुरन्स खरेदी किंवा क्लेम दोन्ही करण्यासाठी एक सुटसुटीत ऑनलाइन प्रक्रिया उपलब्ध करून देतो. इथे तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने तुमचे क्लेमचे कागदपत्र अपलोड करू शकता किंवा काही मोजक्याच स्टेप्समध्ये तुमच्या स्मार्टफोन वरून योग्य पॉलिसी निवडू शकता.
कोणतेही हिडन चार्जेस नाहीत - इन्शुरन्स पॉलिसीजच्या बाबतीत डिजीट स्पष्टता आणि पारदर्शकतेला प्राधान्य देतो. इथे, तुम्ही केवळ तुम्ही निवडलेल्या पॉलिसीसाठीच पैसे भरणे अपेक्षित आहे. त्याबदल्यात, तुम्ही जितके पैसे भरले आहेत त्या प्रमाणातच तुम्हाला बेनिफिट्स आणि कव्हरेज मिळते.
इन्शुरन्स पॉलिसीचे पर्याय - डिजीट कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि थर्ड पार्टी लायबिलिटी पॉलिसी दोन्ही इतर सर्व महत्त्वाच्या डीटेल्स सह उपलब्ध करून देतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या गरजा पूर्ण करणारी पॉलिसी निवडू शकता.
एड-ऑन पॉलिसीज - डिजीट तुम्हाला असंख्य एड-ऑन पॉलिसीज निवडण्याची मुभा देतो, जसे:
रिटर्न टू इन्व्हॉइस कव्हर
कन्ज्यूमेबल कव्हरेज
पॅसेंजर कव्हर
Vast Garage Network
विस्तृत गॅरेजेसचे नेटवर्क - अपघात झाला असताना कॅशलेस रिपेअर्सची सुविधा देण्यासाठी भारतामध्ये डिजीट त्याच्या 6000+ विस्तृत गॅरेजेसच्या नेटवर्क सह कार्यरत आहे.
पिक-अप आणि ड्रॉप सुविधा - तसेच, जर कोणताही अपघात झाला तर रिपेअर्स साठी, डिजीटचे गॅरेजेस डोअरस्टेप पिक-अप आणि ड्रॉपची सुविधा देखील देतात.
इन्स्टंट क्लेम सेटलमेंट - डिजीट तुम्हाला असाधारण अशी क्लेम सेटलमेंट सर्व्हिस देतो. याच्या स्मार्टफोन एनेबल्ड सेल्फ इन्स्पेक्शन सुविधेमुळे, तुम्ही चुटकीसरशी तुमचे क्लेम्स सेटल करून घेऊ शकता.
सर्वोत्तम कस्टमर सर्व्हिस - डिजीटची 24x7 सर्वोत्तम कस्टमर सर्व्हिस तुम्हाला रेनॉल्ट ट्रायबर कार इन्शुरन्ससाठी दिवस-रात्र असिस्टंस पुरवतो.
डिजीट सोबत तुम्ही जास्त डीडक्टेबल्स घेऊन आणि छोटे क्लेम्स न करून तुमचे प्रीमियम कमी करू शकता. तरी, प्रीमियम कमी करण्यासाठी या आकर्षक बेनिफिट्सला गमवू नये असे ही आम्ही सुचवतो.
त्यामुळे, तुमच्या रेनॉल्ट ट्रायबर कार इन्शुरन्सबद्दल आणखीन माहिती मिळवण्यासाठी डिजीटसारख्या जबाबदार इन्शुररला संपर्क करा.
रेनॉल्ट ट्रायबर कार इन्शुरन्स खरेदी करणे महत्त्वाचे का आहे?
भविष्यात नुकसानभरपाई देणे आणि दंड भरणे याऐवजी रेनॉल्ट ट्रायबर इन्शुरन्स खरेदी करणे जास्त श्रेयस्कर ठरते. एक चांगली कार इन्शुरन्स पॉलिसी तुम्हाला असंख्य फायदे देते, जसे की:
पेनल्टी/दंड यापासून सुरक्षा - मोटर वेहिकल एक्ट, 1988, नुसार तुम्ही तुमची कार इन्शुअर करणे बंधनकारक आहे. अन्यथा, तुम्हाला पहिल्यांदा नियम तोडल्याबद्दल ₹2,000 आणि नंतर पुन्हा नियम तोडल्याबद्दल ₹4,000 इतका दंड भरावा लागू शकतो. परिणामी भविष्यात तुमचा लायसन्स रद्द होऊ शकतो आणि तुम्हाला तीन महिन्यांसाठी अटक देखील होऊ शकते.
स्वतःच्या नुकसानापासून सुरक्षा - अपघात, चोरी, पूर, किंव आंग लागणे या कारणांमुळे तुमच्या कारचे जर मोठे नुकसान झाले तर एक कॉम्प्रीहेन्सिव्ह इन्शुरन्स पॉलिसी तुमच्या झालेल्या नुकसानासाठी कव्हर प्रदान करते.
पर्सनल एक्सिडेंट कव्हर - आयआरडीएआय (इन्शुरन्स रेग्यूलेटरी एंड डेव्हलपमेंट अथॉरिटी) प्रमाणे तुमच्या कार इन्शुरन्स पॉलिसीसोबत पर्सनल एक्सिडेंट कव्हर असणे बंधनकारक आहे. एखाद्या अपघातामध्ये जर कार मालकाच्या मृत्यू झाला किंवा अपंगत्व आले तर पर्सनल एक्सिडेंट कव्हर मुळे तुम्हाला कव्हरेज मिळते.
थर्ड पार्टीच्या नुकसानभरपाई पासून सुरक्षा - जर कधी अपघात झाला तर तुमच्या रेनॉल्ट ट्रायबरमुळे थर्ड पार्टीच्या झालेल्या नुकसानाची भरपाई देखील तुम्हालाच द्यावी लागते. अशा परिस्थितीत, थर्ड पार्टी लायबिलिटी इन्शुरन्स मोठ-मोठ्या क्लेम्स पासून कव्हरेज देते. त्याचबरोबर, तुमचा रेनॉल्ट ट्रायबर कार इन्शुरन्स इतर संबंधित कायदेशीर बाबींची देखील काळजी घेतो.
नो-क्लेम बोनस बेनिफिट्स - तसेच, क्लेम न केलेल्या प्रत्येक वर्षासाठी, इन्शुरन्स प्रोव्हायडर तुम्हाला डिस्काउंट देतो ज्यामुळे रेनॉल्ट ट्रायबर कार इन्शुरन्सच्या रिन्युअलच्या वेळेस तुम्ही तुमचे प्रीमियम कमी करून घेऊ शकता.
हे आकर्षक बेनिफिट्स लक्षात घेता, आत्ता रेनॉल्ट ट्रायबर इन्शुरन्स खरेदी कऋण भविष्यातील उद्भवणारी नुकसानभरपाई आणि दंड भरण्यापेक्षा जास्त श्रेयस्कर ठरते.
परिणामी, कार इन्शुरन्स खरेदी किंवा रिन्यू करण्यासाठी डिजीट एक सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.
ऑटोकार इंडिया अवॉर्ड्स मध्ये रेनॉल्ट ट्रायबरला तिच्या प्रीमियम फीचर्समुळे फॅमिली कार ऑफ द इयरचा अवॉर्ड मिळवण्यात यश आले आहे. या कार मॉडेल बद्दल काही खास वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:
रेनॉल्ट ट्रायबर मध्ये 1.0l, 3- सिलेंडर असलेले पेट्रोल इंजिन आहे जे 96 एनएमचा टॉर्क सह 72 पीएस इतकी पॉवर जनरेट करते.
काही मॉडेल्स 5-स्पीड इझी-आर एएमटी चे फीचर मिरवतात ज्यामुळे एका आरामदायक आणि सुखद ड्राईव्हचे आश्वासन मिळते.
रेनॉल्ट ट्रायबरला स्टायलिश फ्लेक्स व्हील्स आहेत, स्प्लिट ईगल बीक टेल लॅम्प्स आणि 182 मिमीचा हाय ग्राउंड क्लिअरन्स् देखील आहे.
फ्युएल एफिशियंसीच्या बाबतीत, ही कार तुम्हाला 18.29-19 किमी प्रति लिटर इतके मायलेज देते.
रेनॉल्ट ट्रायबर मध्ये तुम्हाला चार मुख्य व्हेरियंट्स मधून निवडण्याचा फायदा मिळतो - आरएक्सएल, आरएक्सई, आरएक्सझेड आणि आरएक्सटी.
उत्तम हॅन्डलिंग आणि हिच्या सेफ्टी फीचर्स मुळे ही कार जरी लोकप्रिय असली तरी तुम्ही तुमच्या कारचे नुकसान करणारे अनपेक्षित प्रसंग विचारात घ्यायला हवे. याठिकाणी, अशा परिस्थितीमध्ये इन्शुरन्स पॉलिसी कव्हर प्रदान करून या प्रसंगांमधून उद्भवणारा आर्थिक ताण कमी करू शकते.
परिणामी, एका जबाबदार इन्शुरन्स प्रोव्हायडर कडून इन्शुरन्स पॉलिसी खरेदी किंवा रिन्यू करणे सर्वोपरी ठरते.
व्हेरियंट्स | व्हेरियंट्स एक्स-शोरूम किंमत (शहराप्रमाणे किंमत बदलू शकते) |
आरएक्सई |
₹5.50 लाख |
आरएक्सएल | ₹6.13 लाख |
आरएक्सएल इझी-आर एएमटी | ₹6.63 लाख |
आरएक्सटी | ₹6.68 लाख |
आरएक्सटी इझी-आर एएमटी | ₹7.18 लाख |
आरएक्सझेड | ₹7.28 लाख |
आरएक्सझेड डुअल टोन | ₹7.45 लाख |
आरएक्सझेड इझी-आर एएमटी | ₹7.78 लाख |
आरएक्सझेड इझी-आर एएमटी डुअल टोन | ₹7.95 लाख |