मारुती सुझुकी ईको इन्शुरन्स
6000+ Cashless
Network Garages
Zero Paperwork
Required
24*7 Claims
Support
I agree to the Terms & Conditions
सपोर्ट
closeआमचा WhatsApp नंबर कॉलसाठी वापरला जाऊ शकत नाही. हा फक्त चॅट नंबर आहे.
6000+ Cashless
Network Garages
Zero Paperwork
Required
24*7 Claims
Support
I agree to the Terms & Conditions
मारुती सिझुकी हे भारतातील ऑटोमोबाईल क्षेत्रातील लोकप्रिय नाव आहे. मारुती सुझुकीचे ईको मॉडेल हे त्यांच्या विविध फॅमिली कार्स मधील एक आहे. या कार मधील वैविध्यपूर्ण फीचर्समुळे यामध्ये तुम्ही कम्फर्ट आणि स्टाईल दोन्हीचा आनंद घेऊ शकता. यामध्ये 1.5 लिटरचे पेट्रोल इंजिन तसेच 5-स्पीड एमटी आहे. या मॉडेलचे पेट्रोल व्हर्जन 16.11 केएमपीएल फ्युएल एफिशियंसी देते आणि सीएनजी व्हेरीयंट 20.88किमी/किलो एफिशियंसी देते.
हेडलँप लेव्हलिंग, मॅन्युअल एसी, साईड-इम्पॅक्ट बीम्स आणि सीटबेल्ट रिमाइंडर्स, ही मारुती सुझुकी ईको कार इन्शुरन्सची काही लोकप्रिय फीचर्स आहेत. या फीचर्स मुळेच या कारला प्रसिद्धी मिळाली आहे आणि
ग्राहक या कारकडे आकर्षित होतात. तसेच, इतर अद्वितीय फीचर्स जसे स्लायडिंग ड्राईव्हर सीट, हीटर, रिक्लाइनिंग फ्रंट सीट्स आणि इंटीग्रेटेड हेडरेस्ट यामुळे देखील चालकाला कम्फर्ट आणि सुविधा मिळते.
कारचे सेफ्टी मेजर्स देखील आकर्षक आहेत. चालकाला स्पीड अलर्ट सिस्टम, एबीएस आणि ईबीडी, आणि ड्राईव्हर-साईड एअरबॅग यामुळे मदत मिळते. तसेच, रिअर पार्किंग सेन्सर्स आणि चाईल्ड लॉक्स मुळे ही कार फॅमिली साठी अगदी योग्य आणि त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने देखील अगदी परिपूर्ण ठरली आहे. या कारची लेन्थ 3,675एमएम आहे आणि व्हीलबेस 2,350एमएम इतका आहे.
जरी या कारची वैशिष्ट्ये या कारच्या किमतीच्या तुलनेत जास्त आकर्षक दिसत असली तरी प्रत्येकाने कोणतीही कार विकत घेतना काही मुद्दे लक्षात घेणे गरजेचे आहे. अपघातामध्ये झालेल्या नुकसानाची भरपाई टाळण्यासाठी तुम्ही मारुती सुझुकी ईको कार इन्शुरन्स घेताना विचार करण्याची गरज नाही. अपघातामध्ये झेलेले नुकसान कव्हर करणे केवळ संयुक्तिकच नाही तर मोटर वेहिकल एक्ट 1988 अंतर्गत बंधनकारक देखील आहे
आम्ही आमच्या ग्राहकांना व्हीआयपींप्रमाणे वागवतो, जाणून घ्या कसे...
अपघातामुळे स्वत:च्या कारचे डॅमेज/ नुकसान |
×
|
✔
|
आग लागल्यास स्वत:च्या कारचे डॅमेज/नुकसान |
×
|
✔
|
नैसर्गिक आपत्ती च्या प्रसंगी स्वतःच्या कारचे डॅमेज / नुकसान |
×
|
✔
|
थर्ड पार्टी वाहनाचे डॅमेज |
✔
|
✔
|
थर्ड पार्टी मालमत्तेचे डॅमेज |
✔
|
✔
|
पर्सनल एक्सीडेंट इन्शुरन्स |
✔
|
✔
|
थर्ड-पार्टीच्या व्यक्तीची जखम / मृत्यू |
✔
|
✔
|
आपल्या गाडीची चोरी |
×
|
✔
|
डोरस्टेप पिक-अप आणि ड्रॉप |
×
|
✔
|
आपला आयडीव्ही कस्टमाइज करा |
×
|
✔
|
कस्टमाइज्ड ॲड-ऑनसह अतिरिक्त संरक्षण |
×
|
✔
|
कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि थर्ड पार्टी इन्शुरन्समधील डीफ्रंसबद्दल अधिक जाणून घ्या
आपण आमची कार इन्शुरन्स प्लॅन खरेदी किंवा रिनिव केल्यानंतर, आपण तणावमुक्त राहता कारण आमच्याकडे 3-स्टेप्स, पूर्णपणे डिजिटल क्लेम्स प्रक्रिया आहे!
फक्त 1800-258-5956 वर कॉल करा. कोणताही फॉर्म भरायची गरज नाही
आपल्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर सेल्फ इन्स्पेक्शनची लिंक मिळवा. स्टेप बाय स्टेप प्रक्रियेद्वारे आपल्या स्मार्टफोनमधून आपल्या वाहनाचे डॅमेज शूट करा.
आमच्या गॅरेजच्या नेटवर्कद्वारे आपण निवडू इच्छित असलेल्या दुरुस्तीची पद्धत म्हणजेच रीमबर्समेंट किंवा कॅशलेस पद्धत निवडा.
इन्शुरन्स कंपनी बदलताना हा पहिला प्रश्न आपल्या मनात यायला हवा. आपण असा विचार करता आहात ना मग चांगले आहे!
डिजिटचे क्लेम रिपोर्ट कार्ड वाचा
अपघाताच्या वाढत्या केसेस भारतीय सरकारसाठी चिंतेचा विषय ठरला आहे. मोटर वेहिकल एक्ट 1988 अशा अपघातांना प्रभावीरित्या हाताळण्याच्या ध्येयाने काम करते आहे. यांच्या मते सर्व भारतीय कार मालकांनी त्यांची कार थर्ड पार्टी डॅमेज कव्हरेज अंतर्गत इन्शुअर केली पाहिजे. कार मालकांना इन्शुरन्स न काढलेल्या कार चालवताना पकडले असता ₹ 2,000 आणि ₹ 4,000 पर्यंत दंड भरावा लागू शकतो. तसेच, यामुळे लायसन्स रद्द होणे किंवा मालकाला अटक होण्यासारखी शिक्षा देखील होऊ शकते.
डिजीट हा अनेक वर्षांपासून एक अत्यंत लोकप्रिय इन्शुरर ब्रँड म्हणून ओळखला जातो आणि तुमचा मारुती सुझुकी ईकोसाठी एक चांगला पर्याय असू शकतो. कोणतीही पॉलिसी खरेदी करण्याआधी इन्शुररबद्दल आणि त्या पॉलिसीबद्दल माहिती करून घेणे गरजेचे आहे याबाबतीत सांगायचं झालं तर डिजीट पॉलिसीज मध्ये असंख्य फीचर्स आहेत आणि जी इन्शुरन्सच्या किमतीमध्येच तुम्हाला मिळतात. डिजीट कार इन्शुरन्स पॉलिसीच्या काही विशिष्ट फीचर्स बद्दल या सदरामध्ये चर्चा केलेली आहे.
मारुती सुझुकी ईको कार इन्शुरन्स पॉलिसी निवडतानाची ग्राहकांची द्विधामनस्थिती डिजीट जाणून आहे. त्यामुळे डिजीट त्याच्या ग्राहकांना दोन प्रकारच्या पॉलिसीज मधून निवड करण्याची संधी देतो.
थर्ड पार्टी कार इन्शुरन्स: या पॉलिसीमध्ये, डिजीट तुम्हाला कार अपघातामध्ये झालेल्या थर्ड पार्टी डॅमेज साठी नुकसानभरपाई ऑफर करतो. अपघातादरम्यान कारच्या किंवा रस्त्याच्या कोणत्याही नुकसानासाठीची भरपाई पॉलिसीहोल्डर भरून देऊ शकतो. तसेच जर या अपघातामध्ये कोणालाही इजा झाली असेल तर त्याच्या ट्रीटमेंटचा खर्च देखील पॉलिसी कव्हर करते.
कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्स: या पॉलिसी मध्ये, थर्ड पार्टी आणि पर्सनल डॅमेज दोन्ही कव्हर करण्याचा डिजीटचा प्रयत्न असतो. त्यामुळे, जर तुमच्याकडे ही पॉलिसी असेल, तर तुम्हला अपघात किंवा आग लागणे, चोरी किंवा नैसर्गिक आपत्तिमुळे तुमच्या कारला कोणतेही नुकसान झाल्यास तुम्हाला खर्चाची काळजी करायची गरज नाही.
मारुती सुझुकी ईको कारसाठी इन्शुरन्स घेताना, डिजीट तुम्हाला तुमचे फायदे द्विगुणित करण्यात मदत करतो. तुम्ही तुमची कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी खालील एड-ऑन्ससह कस्टमाइज करून घेऊ शकता.
डिजीट त्याच्या पॉलिसी होल्डर्सना रिवॉर्ड्स देऊन प्रोत्साहित करतो. तुम्ही जर मारुती सुझुकी ईको कार इन्शुरन्स पॉलिसीहोल्डर असाल तर तुम्ही नो कलमे बोनस मिळण्यासाठी पात्र ठरू शकता. जर तुम्ही वर्षभरात कोणताही क्लेम केला नाहीत तर डिजीट तुम्हाला तुमच्या प्रीमियमच्या रकमेमध्ये डिस्काउंट देतो. हे डिस्काउंट तुमच्या पॉलिसी प्रीमियमच्या 20% ते 50% पर्यंत असू शकते.
आयडीव्ही म्हणजेच तुमच्या कारची मार्केट मधील सध्याची किंमत होय. डिजीट सोबत तुम्ही तुमची आयडीव्ही कस्टमाइज करून अधिकफायदा मिळवू शकता. उदाहरणार्थ, तुमची आयडीव्ही जास्त असेल तर तुम्हाला तुमची कार चोरीला गेल्यास किंवा रिपेअर न होणाऱ्या नुकसानासाठी योग्य ती भरपाई मिळू शकते. तसेच, तुमची आयडीव्ही कमी असेल तर तुमची प्रीमियमची रक्कम कमी असेल.
मारुती सुझुकी साठी कार इन्शुरन्स खरेदी करताना बऱ्याचदा लोकांना किचकट प्रक्रियांना सामोरे जावे लागते. शा ग्राहकांसाठी डिजीट हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो कारण तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने ऑनलाइनच ही पॉलिसी खरेदी करू शकता. तुम्ही डिजीटच्या ऑफिशियल वेबसाईटवरून अगदी सहज स्टेप-बाय-स्टेप गाइड फॉलो करून ही पॉलिसी खरेदी करू शकता. तसेच, मारुती सुझुकी ईको कार इन्शुरन्सच्या रुन्युअलची प्रक्रिया देखील अशीच आहे.
एखाद्या अपघातानंतर बरेच पॉलिसीहोल्डर्स गोंधळून जातात. अशा परिस्थितीतइन्शुरन्स क्लेम करणे त्यांच्यासाठी जिकीरीचे ठरू शकते. आणि हेच लक्षात घेऊन, डिजीटने त्याच्या मारुती सुझुकी ईको कार इन्शुरन्सच्या ग्राहकांसाठी अगदी सोपी क्लेम फायलिंग प्रोसेस तयार केली आहे. 1800-258-5956 या नंबर वर तुम्ही कस्टमर केअरला कॉल केल्यावर तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर सेल्फ-इन्स्पेक्शन लिंक मिळेल. तुम्ही तिथे अपघातादरम्यान झालेल्या तुमच्या नुकसानाचे फोटो अपलोड करून रीएम्बर्समेंट किंवा कॅशलेस रिपेअर्स पैकी रिपेअर मोड निवडू शकता.
मारुती सुझुकी कार इन्शुरन्स खरेदी करणाऱ्या ग्राहकांना बऱ्याचदा ही काळजी असते की प्रवासादरम्यान गरज पडल्यास त्यांना पॉलिसीचा लाभ घेता येईल का. डिजीटच्या भारतभर पसरलेल्या विस्तृत गॅरेजे नेटवर्कमुळे ग्राहकांची ही काळजी देखील दूर होते. त्यामुळे प्रवासादरम्यान देखील ग्राहक कोणत्याही नेटवर्क गॅरेजेमध्ये कॅशलेस रिपेअर्सचा पर्याय निवडू शकतात.
एक सक्षम कस्टमर सपोर्ट डिजीटसाठी अभिमानाची बाब ठरली आहे. मारुती सुझुकी कार इन्शुरन्स असलेले ग्राहक डिजीटच्या समर्पक कस्टमर सपोर्टचा लाभ नक्कीच घेऊ शकतात. कस्टमर केअर एक्झीक्यूटिव्ह्स त्यांच्या कस्टमरना मदत करण्यासाठी दिवसभर उपलब्ध असतात आणि ते राष्ट्रीय सुट्टीच्या दिवशी देखील सेवा देतात. त्यामुळे तुमच्या इन्शुरन्स पॉलिसी संबंधी असलेल्या तक्रारी आणि प्रश्न डिजीट कडून क्वचितच दुर्लक्षित राहतील.
अशा आहे की तुमच्याकडे जर ही कार असेल तर आता तुम्हाला मारुती सुझुकी ईको कार इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करण्याचे महत्त्व लक्षात आले असेल. तुमच्या कारसाठी तुम्हाला जर एक सोयीस्कर पॉलिसी हवी असेल तर डिजीट हा एक उत्तम पर्याय असू शकतो. क्लेम फायलिंग आणि रिन्युअलच्या सोप्या प्रक्रियेमुळे मोटर वेहिकल एक्ट चे नियम पाळून थर्ड पार्टी डॅमेजेसमुळे उद्भवणाऱ्या खर्चापासून सुरक्षा देखील मिळते.
तुम्ही जर स्पेस, परफॉरमन्स आणि स्टाईल हे सर्व काही असलेली कार शोधत असाल तर ही नंबर वन फॅमिली कार आहे. कार इन्शुरन्स घेण्याचे फायदे खालील प्रमाणे आहेत:
फायनान्शियल लायबिलिटीज: तुमच्या ईकोवर अनपेक्षित नैसर्गिक आपत्तीमुळे, एखादा अपघात किंवा चोरी यासारखी संकटे ओढवू शकतात.अशा परिस्थितीमध्ये कार इन्शुरन्स तुमचा खरा मदतगार बनून तुम्हाला या सगळ्या अनपेक्षित नुकसानांपासून सुरक्षित ठेवतो.
लीगली कम्प्लायंट: कार इन्शुरन्स नसताना कार चालवणे हे बेकायदेशीर आहे. तुम्ही जर कार इन्शुरन्स सादर नाही करू शकलात तर तुम्ही संकटात येऊ शकता. सध्या इन्शुरन्स नसताना कार चालवण्याबद्दलचा दंड Rs. 2000 आणि तीन महिन्यांसाठी अटक होऊ शकते!
थर्ड पार्टी लायबिलिटी: अपघातासारख्या अनपेक्षित घटनेदरम्यान, एक कार इन्शुरन्स पॉलिसी आर्थिक नुकसान भरून काढण्यास मदत करते. अशा केसेस मध्ये काही वेळा. झालेले नुकसान खूप मोठे असते आणि रिपेअर न होऊ शकणारे असते किंवा सध्या एखाद्यची हे नुकसान भरून काढण्याची परिस्थिती नसते, अशाच प्रसानागांना कार इन्शुरन्स तुमच्या मदतीला उभे राहते. यामुळे जास्तीत जास्त आर्थिक नुकसान भरपाई मिळवली जाऊ शकते आणि हे एका संरक्षकासारखे काम करते.
कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हर: कव्हरचा हा प्रकार नेहमीच सर्वोत्तम ठरतो कारण हा थर्ड पार्टीचे तसेच तुमचे आणि तुमच्या ईकोचे देखील संरक्षण करतो. कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्स तुम्हाला संपूर्ण मनःशांतीची हमी देते कारण झालेल्या नुकसानाची जवाबदारी घेऊन तुम्हाला उत्तम कव्हरेज प्रदान करते. तुम्ही विविध कार इन्शुरन्स एड-ऑन्स मधून निवड करू शकता. ब्रेकडाऊन असिस्टंस, इंजिन आणि गिअरबॉक्स प्रोटेक्शन, टायर प्रोटेक्टिव्ह कव्हर, आणि झिरो डेप्रीसिएशन कव्हर ही त्यापैकी काही उदाहरणे आहेत.
फॅमिली कार म्हणून अगदी परिपूर्ण अशी ही कार. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत केलेल्या प्रवासाइतका आनंद इतर कोणत्याही प्रवासातून मिळणार नाही. लॉंच झाल्यापासून मारुती सुझुकी ईकोने लाखो ग्राहकांची मने जिंकली कारण हिची रचना असंख्य फंक्शनल नीड्स पुरविण्यासाठी केली गेली आहे. तुम्ही तुमच्या मित्रांसोबत, कुटुंबासोबत किंवा बिझिनेसच्या निमित्ताने बाहेर जात असाल तर ईको नक्कीच तिच्या डिझाईन्स आणि परफॉरमन्समुळे तुमचे मन जिंकून घेईल.
ईको मध्ये तुम्हाला तुमच्या ड्रायव्हिंग एक्पीरियंस मध्ये कम्फर्ट आणि स्टाईल दोन्हीचा संगम मिळतो.ईको ही एक फॅमिली कार आहे आणि तरुण आणि वृद्ध दोन्ही वयाच्या ग्राहकांसाठी एकसमान उपयुक्त ठरली हे.
हेडलॅम्प लेव्हलिंग, साईड इम्पॅक्ट बीम्स, सीट बेल्ट रिमाइंडर (ड्राईव्हर आणि शेजारील प्रवासी) आणि स्पीड अलर्ट सिस्टम; तुम्ही निश्चितच सुरक्षित रहाल, आणि तुमच्या सोयीसाठी, ईको मध्ये हीटर, स्लायडिंग ड्राईव्हर सीट, रिक्लायनिंग फ्रंट सीट्स आणि पुढच्या सीट्स साठी इंटीग्रेटेड हेड रेस्ट्स देखील दिलेले आहेत.
या कार मध्ये शक्तिशाली असे बाहेरचे आणि स्टायलिश असे आतील इंटीरिअर, मोल्डेड रूफ लायनिंग, रिअर कॅबिन लॅम्प, इंटीरिअरशी मिळतं जुळतं सीट ईकोला एक स्टायलिश लूक देते. आणि सोन्याहून पिवळं म्हणतात तसं या कारचं अफाट असं माईलेज देणारं इंजिन.
ईकोच्या सर्व प्रकारच्या कार्स मध्ये 1.2 लिटर पेट्रोल इंजिन आहे ज्यामुळे 6,000 आरपीएम वर 73 बीएचपी चे पावर आउटपुट आणि 101एनएमचे टॉर्क देखील देते. ईको पाच आणि साथ सीटर अशा पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. सात सीटर ही केवळ बेसिक प्रकारामध्ये उपलब्ध आहे आणि पाच सीटर चार प्रकारांमध्ये - बेसिक पाच सित्र, पाच सीटर एसी आणि हीटर सह, पाच सीटर हीटर आणि सीएनजी सह, पाच सीटर एसी, हीटर आणि सीएनजी सह, उपलब्ध आहे.
पहा: मारुती कार इन्शुरन्स बद्दल आणखीन जाणून घ्या
व्हेरियंटचे नाव |
व्हेरियंटची अंदाजे किंमत |
ईको 5 सीटर एसटीडी |
₹ 4.30 लाख |
ईको 7 सीटर एसटीडी |
₹ 4.59 लाख |
ईको 5 सीटर एसी |
₹ 5.60 लाख |
ईको सीएनजी 5 सीटर एसी |
₹ 5.68 लाख |