Third-party premium has changed from 1st June. Renew now
मारुती सुझुकी डिझायर कार इन्शुरन्स खरेदी करा किंवा रिनिव करा
मारुती हे भारतीय वाहन उद्योगासाठी घराघरातील नाव मानले जाते. गेल्या काही वर्षांत, त्याने आपल्या परवडणाऱ्या उत्पादनांसह एक निष्ठावान लक्ष्य प्रेक्षक यशस्वीरित्या तयार केला आहे. मारुती सुझुकी डिझायरचा मेंटेनन्स कमी असतो पण तरीही आरामदायक वैशिष्ट्ये आणि सातत्यपूर्ण मायलेजसाठी ती प्रसिद्ध आहे. पाच प्रौढांसाठी बसण्याची जागा असलेले परवडणारे वाहन आणि इको-फ्रेंडली BS6 इंजिन च्या शोधात असलेल्या मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी हे अत्यंत योग्य आहे.
मारुती सुझुकी डिझायर मॉडेल 19.05 kmpl चे सिटी मायलेज देते, जे त्याचे सर्वोत्तम वैशिष्ट्य असू शकते. मॅन्युअल ट्रान्समिशन आणि 378 लिटरची बूट स्पेस असलेली ही कार ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकते. या मॉडेलचे 1197 cc पेट्रोल इंजिन 6000 RPM वर 88.50 BHP पॉवर आणि 4400 RPM वर 113 Nm टॉर्क निर्माण करते. याशिवाय मॉडेलमध्ये अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले कनेक्टिव्हिटीसह 7 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टम देण्यात आली आहे.
मारुती सुझुकी डिझायरकडे ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या इतर वैशिष्ट्यांमध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग, रियर पार्किंग सेन्सर आणि आयसोफिक्स चाइल्ड सीट अँकर यासारख्या सुरक्षा उपायांचा समावेश आहे. शिवाय, या मॉडेलचे AMT व्हेरिएंट इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल आणि हिल होल्ड सपोर्टसह येतात. रिअर व्ह्यू कॅमेरा आणि रियर डिफॉगर हे वैशिष्ट्ये उच्च व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहेत. त्याशिवाय अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम आणि ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल ही या मॉडेलची इतर आकर्षक वैशिष्ट्ये असू शकतात.
मारुती सुझुकी डिझायर कार अनेक वैशिष्ट्ये आणि फायद्यांसह येऊ शकते, परंतु अनपेक्षित रस्ते अपघातांमध्ये प्राणघातक डॅमेज होण्यापासून ती सुटलेली नाही. त्यामुळे मारुती सुझुकी डिझायर कार इन्शुरन्ससह या कारचे भवितव्य सुरक्षित करणे आवश्यक आहे. मारुती सुझुकी डिझायरचे मालक या इन्शुरन्सद्वारे या फायद्याचा अधिक उपयोग करू शकतात आणि कायद्याचे पालन करणारे नागरिक बनू शकतात.
मारुती डिझायर कार इन्शुरन्समध्ये काय कवर्ड आहे
डिजिटचा मारुती डिझायर कार इन्शुरन्स का खरेदी करावा?
मारुती सुझुकी डिझायरसाठी कार इन्शुरन्स प्लॅन्स
थर्ड पार्टी | कॉम्प्रिहेन्सिव्ह |
अपघातामुळे स्वत:च्या गाडीचे नुकसान/डॅमेज |
|
आग लागल्यास स्वत:च्या गाडीचे नुकसान डॅमेज |
|
नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास स्वत:च्या गाडीचे नुकसान/ डॅमेज |
|
थर्ड पार्टी वाहनाचे डॅमेज |
|
थर्ड पार्टी मालमत्तेचे डॅमेज |
|
वैयक्तिक अपघात कव्हर |
|
तृतीय-पक्ष व्यक्तीच्या जखमा/मृत्यू |
|
आपल्या कारची चोरी |
|
डोअरस्टेप पिक-अप आणि ड्रॉप |
|
आपला आयडीव्ही कस्टमाइज करा |
|
कस्टमाइज्ड अॅड-ऑनसह अतिरिक्त संरक्षण |
|
Get Quote | Get Quote |
कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि थर्ड पार्टी इन्शुरन्स मधील फरकाबद्दल अधिक जाणून घ्या
कलेम कसा करावा?
आपण आमचा कार इन्शुरन्स प्लॅन खरेदी केल्यानंतर किंवा रिनिव केल्यानंतर, आपण तणावमुक्त राहता कारण आमच्याकडे 3-स्टेप्स, पूर्णपणे डिजिटल क्लेम्स प्रोसेस आहे!
स्टेप 1
फक्त 1800-258-5956 वर कॉल करा. कुठलेही फॉर्म्स भरायचे नाहीत
स्टेप 2
आपल्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर स्व-तपासणीची लिंक मिळवा. गाइडेड स्टेप बाय स्टेप प्रोसेसद्वारे आपल्या स्मार्टफोनवरून आपल्या वाहनाचे डॅमेज शूट करा.
स्टेप 3
आमच्या गॅरेजच्या नेटवर्कद्वारे आपण ज्या दुरुस्तीची पद्धत निवडू इच्छिता ते निवडा म्हणजे रीएमबर्समेंट किंवा कॅशलेस.
मारुती सुझुकी डिझायर कार इन्शुरन्स डिजिटवरून का खरेदी करावा?
कारमध्ये गुंतवणूक केल्यानंतर मालकांनी त्याच्या देखभालीसाठी खर्च करावा. रस्ते अपघातांच्या वाढत्या घटनांमुळे वाहनांच्या अपघाती डॅमेजबाबत चिंता वाढली आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन भारत सरकारने भारतातील कार मालकांसाठी कार इन्शुरन्स खरेदी करणे मॅनडेटरी केले आहे.
मोटार वाहन कायदा 1988 नुसार कार मालकाने कारविरुद्ध इन्शुरन्स सादर न केल्यास तात्काळ दंड आकारला जाईल. पहिल्यांदा ₹ 2,000 आणि पुनरावृत्ती झाल्यास ₹ 4,000 मोजावे लागतील. शिवाय भविष्यात त्यांना तुरुंगवास किंवा वाहनचालकांचा परवाना रद्द करण्यासारख्या कठोर शिक्षेला सामोरे जावे लागू शकते.
जर तुम्ही मारुती सुझुकी डिझायर कार इन्शुरन्स खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला अनेक बाबींचा विचार करावा लागेल. यामध्ये मारुती सुझुकी डिझायर कार इन्शुरन्स कॉस्टसह पॉलिसीचे सर्व वैशिष्ट्ये आणि फायद्यांचा समावेश आहे. अत्यंत फायदेशीर कार इन्शुरन्स पॉलिसी प्रदान करण्यासाठी डिजिट हे एक विश्वसनीय नाव आहे. डिजिटवरून पॉलिसी खरेदी करायची की नाही असा विचार करत असाल तर त्याच्या कार इन्शुरन्स पॉलिसीची काही स्टँडर्ड वैशिष्ट्ये जाणून घेऊया.
1. पॉलिसी पर्याय
डिजिटमुळे मारुती सुझुकी डिझायर कार इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करताना एकापेक्षा जास्त पॉलिसीचे पर्याय निवडता येतात. योग्य पॉलिसी निवडण्यासाठी आपल्याला त्यांचे फायदे समजून घेणे आवश्यक आहे.
- थर्ड पार्टी डेमेज पॉलिसी
मोटार वाहन कायद्यानुसार अपघातात थर्ड पार्टीचे डॅमेज भरून काढण्यासाठी इन्शुरन्स पॉलिसी बाळगणे मॅनडेटरी आहे. डिजिटची ही पॉलिसी अपघातात आपल्या वाहनाचे डॅमेज झालेल्या कोणत्याही थर्ड पार्टी कारची भरपाई करते. तसेच अपघातात नुकसान झालेल्या रस्त्यांवरच्या मालमत्तेसाठीही हे काम करते. याव्यतिरिक्त, पॉलिसी आपल्या कारने धडक दिलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या उपचारखर्चाचा खर्च देते.
- कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी
या प्रकारच्या इन्शुरन्स पॉलिसीमध्ये वर वर्णन केल्याप्रमाणे डिजिट मूलभूत पॉलिसीमध्ये अधिक भर घालते. थर्ड पार्टी कव्हरेज व्यतिरिक्त, ही पॉलिसी अपघातानंतर आपल्या वैयक्तिक डॅमेजची भरपाई करते. आपल्या मारुती सुझुकी डिझायर कारच्या कॅशलेस दुरुस्तीच्या मदतीने आपण डिजिट नेटवर्क गॅरेजमध्ये या सुविधेचा वापर करू शकता.
2. अॅड-ऑन फायदे
जर आपण कॉम्प्रिहेन्सिव्ह मारुती सुझुकी डिझायर कार इन्शुरन्स पॉलिसी निवडली असेल तर डिजिट आपल्याला अतिरिक्त शुल्क घेऊन काही अॅड-ऑन फायद्यांसह प्लॅन कस्टमाइज करण्यास अनुमती देते. हे खाली वर्णन केल्याप्रमाणे आहे.
- कंझ्युमेबल कव्हर
- शून्य डेप्रीसीएशन कव्हर
- रिटर्न टू इंव्हॉईस कव्हर
- रोडसाइड असिस्टन्स
- इंजिन आणि गिअरबॉक्स प्रोटेक्शन
3. क्लेम फाइलिंग प्रोसेस
मारुती सुझुकी डिझायर कार इन्शुरन्सच्या पॉलिसीहोल्डर्सना क्लेम फाइलिंग प्रोसेस लांबलचक आणि गुंतागुंतीची वाटू शकते. डिजिटने तीन सोप्या स्टेप्सद्वारे ते कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.
स्टेप 1: डिजिट आपल्याला फॉर्म भरण्यास किंवा सबमिट करण्यास सांगत नाही. आपण फक्त डिजिटच्या हेल्पलाइनवर (1800-258-5956) कॉल करू शकता आणि सूचनांचे अनुसरण करू शकता.
स्टेप 2: त्यानंतर, आपल्या नोंदणीकृत नंबरवर प्राप्त झालेल्या स्व-तपासणी लिंकवर जा. अपघाती डॅमेज सिद्ध करणाऱ्रे सर्व फोटो जोडा.
स्टेप 3: शेवटी, आपल्या कारसाठी सोयीस्कर दुरुस्ती मोड निवडा, जे नेटवर्क गॅरेजमधून थेट रीएमबर्समेंट किंवा कॅशलेस दुरुस्ती असू शकते.
4. पॉलिसी खरेदीच्या ऑनलाइन पद्धती
मारुती सुझुकी डिझायर कारचा इन्शुरन्स खरेदी करण्याच्या पद्धतीबद्दल अनेकदा लोक घाबरतात. डिजिटला खरी चिंता समजते आणि म्हणूनच पॉलिसी खरेदीचा पूर्णपणे ऑनलाइन आणि वापरकर्ता-अनुकूल मार्ग विकसित केला आहे. आपण फक्त डिजिटच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता आणि या संदर्भात स्टेप बाय स्टेप मार्गदर्शकचा संदर्भ घेऊ शकता. शिवाय मारुती सुझुकी डिझायर कार इन्शुरन्स रिनिवलसाठीही हे सोपे स्टेप्स वापरता येतील.
5. नो क्लेम बोनस
मारुती सुझुकी डिझायर कार इन्शुरन्स खरेदी करताना तुम्हाला इतर अनेक फायदे मिळतील. उदाहरणार्थ, जर आपण कमीतकमी एका वर्षासाठी आपल्या इन्शुरन्सचा क्लेम केला नाही तर आपण डिजिटच्या नो-क्लेम बोनस ऑफरसाठी पात्र असाल. यासह डिजिट तुम्हाला तुमच्या पॉलिसी प्रीमियमवर 20% ते 50% डिसकाऊंट देईल.
6. आयडीव्ही(IDV) कस्टमाइज़ेशन
डिजिटवरून मारुती सुझुकी डिझायरसाठी कार इन्शुरन्स खरेदी करण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्याचे अष्टपैलू फायदे. आयडीव्ही, बहुतेक लोकांना समजते, बाजारात आपल्या वाहनाचे सध्याचे मूल्य दर्शविते. डिजिट आपल्याला आपले फायदे जास्तीत जास्त करण्यासाठी आपला आयडीव्ही कस्टमाइज करू देतात. चोरी झाल्यास किंवा आपल्या कारचे कधीही भरून न निघणारे गंभीर डॅमेज झाल्यास आपण उच्च मूल्य तयार करण्यासाठी उच्च आयडीव्ही सेट करू शकता. दुसरीकडे, आपण कमी प्रीमियमसाठी ते कमी ठेवू शकता.
7. असंख्य नेटवर्क गॅरेज
डिजिटमध्ये अनेक नेटवर्क गॅरेज आहेत, जे ते निवडण्याचे आणखी एक महत्वाचे कारण असू शकते. पॉलिसीहोल्डर्सना प्रवासादरम्यान त्यांच्या पॉलिसी कव्हरेजचा वापर करण्याबद्दल बऱ्याचदा चिंता असते. डिजिट मारुती सुझुकी डिझायर कार इन्शुरन्स पॉलिसीसह, आपण देशभरात कॅशलेस दुरुस्तीचा फायदा घेण्यासाठी त्याच्या कोणत्याही नेटवर्क गॅरेजचा वापर करू शकाल.
8. प्रभावशाली ग्राहक सेवा
डिजिटने एक सक्षम ग्राहक सेवा टीम विकसित केली आहे. ग्राहक सेवा विभागातील हे अधिकारी ग्राहकांचे कॉल आणि संदेशांना सामोरे जाण्याची आणि त्यांच्या समस्या सोडविण्यात मदत करण्याची जबाबदारी पार पाडतात. आपण त्यांच्या ग्राहक सेवा हेल्पलाइनवर कॉल करून कधीही आणि अगदी राष्ट्रीय सुट्टीच्या काळातही त्यांच्याशी संपर्क साधू शकता.
जर तुमच्याकडे ही कार असेल तर तुमच्याकडे मारुती सुझुकी डिझायर कार इन्शुरन्स पॉलिसी असणे आवश्यक आहे. हे आपल्याला रस्ते अपघातानंतर सर्व तृतीय पक्ष आणि वैयक्तिक डॅमेज एक्सपेनसेस व्यवस्थापित करण्यात मदत करेल. शिवाय, अशा पॉलिसीसह आपण मोटार वाहन अधिनियम 1988 चे पालन करू शकता.
आपल्या मारुती सुझुकी डिझायरसाठी इन्शुरन्स खरेदी करणे का महत्वाचे आहे?
लोकसंख्या, रहदारी आणि वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता, कारचा इन्शुरन्स असणे केवळ मॅनडेटरी नाही तर आपल्या कारच्या अत्यंत संरक्षणासाठी देखील अर्थपूर्ण आहे.
- आर्थिक लायबिलिटीझ: जेव्हा आपली कार चोरीला जाते, दंगली आणि संप, आग, नैसर्गिक आपत्ती किंवा कोणत्याही तृतीय पक्षाद्वारे डॅमेज होते तेव्हा आपल्याला आर्थिक लायबिलिटी येऊ शकतात. कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्स अंतर्गत ओन डॅमेज कव्हरआपल्याला अशा नुकसानीची आणि डॅमेजची भरपाई करते.
- कायदेशीररित्या अनुपालन: भारतात इन्शुरन्स पॉलिसीशिवाय वाहन चालविणे बेकायदेशीर आहे. इन्शुरन्स पॉलिसी असणे भारतीय रस्त्यांवर वाहन चालविण्यासाठी आपली कायदेशीर परवानगी म्हणून कार्य करते.
- तृतीय-पक्ष लायबिलिटी: जेव्हा आपण चुकून एखाद्या व्यक्तीला इजा पोहोचवतो किंवा मालमत्ता किंवा वाहनाचे डॅमेज करता तेव्हा येणारी कोणतीही लायबिलिटी.
- कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हर अंतर्गत अॅड-ऑन तरतूद: आपल्या कारसाठी व्यापक संरक्षण, कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्स खरेदी करणे शहाणपणाचे ठरेल. हे आपले आणि आपल्या कारचे स्वतःच्या नुकसानीपासून संरक्षण करेल. याव्यतिरिक्त, आपण ब्रेकडाउन असिस्टन्स, इंजिन आणि गिअरबॉक्स प्रोटेक्शन, टायर प्रोटेक्टिव्ह कव्हर आणि झिरो-डेप कव्हर इत्यादी सारख्या कार इन्शुरन्स अॅड-ऑन ची निवड करून ते कस्टमाइज करू शकता.
मारुती सुझुकी डिझायर बद्दल अधिक जाणून घ्या
मारुती सुझुकी डिझायर ही अप्रतिम वैशिष्ट्ये असलेली सेडान कार आहे. कुटुंबांसाठी उपयुक्त मारुती सुझुकी डिझायर परवडणारी आणि तणावमुक्त ड्रायव्हिंगसाठी बनवलेली आहे. मारुती सुझुकी डिझायरने गेल्या 10 वर्षांपासून बाजारात चांगली कामगिरी करत नुकतेच स्वत:ला अपडेट केले आहे.
2018 मध्ये एनडीटीव्ही कारअँडबाइक अवॉर्ड्समध्ये सबकॉम्पॅक्ट सेडान ऑफ द इयर चा पुरस्कार मिळाला होता. नावाप्रमाणेच सर्व प्रवाशांना जलद प्रवास आणि ड्रायव्हरला पूर्ण आराम देणारी ही गाडी आहे. मारुती सुझुकी डिझायरची रिसेल व्हॅल्यू उत्तम आहे. ही कार सरासरी 28.40 किमी प्रति लिटर देते आणि 1248 cc चे इंजिन आहे.
मी मारुती सुझुकी डिझायर का खरेदी करावे?
मारुती सुझुकी डिझायर ही एक फॅमिली कार आहे जी BS 6 कम्प्लायंट इंजिनवर चालते, जी पर्यावरणपूरक आहे. L, V, Z, आणि Z+ या चार व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध असलेली ही फ्यूल इकॉनॉमिक कार आहे. मारुती सुझुकी डिझायर केवळ आपल्या दैनंदिन प्रवासासाठीच योग्य नाही तर आरामदायक स्टोरेज आणि मोठ्या केबिन स्पेसमुळे लांबच्या प्रवासात एक आरामदायक पर्याय देखील बनवते. याची किंमत रु.5.82 लाख ते रु.9.57 लाखांदरम्यान आहे.
या कारच्या नव्या आवृत्तीमध्ये 5 स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देण्यात आले आहे. यात ड्युअल फ्रंट एअरबॅग, को-ड्रायव्हर सीट बेल्ट रिमाइंडर, स्पीड अलर्ट, ईबीडीसह एबीएस आणि रिव्हर्स पार्किंग सेन्सर सारखे वाढीव सुरक्षा वैशिष्ट्ये देण्यात आले आहेत. याशिवाय कारमध्ये फ्रंट फॉग लॅम्प, ऑटोमॅटिक एलईडी प्रोजेक्टर, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा आणि 7 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम देण्यात आली आहे.
चेक: मारुती कार इन्शुरन्सबद्दल अधिक माहिती जाणून घ्या
मारुती सुझुकी डिझायर कारचे व्हेरिएंट्स आणि प्राइज
व्हेरिएंट्सचे नाव | वेरिएंट्सची अंदाजे प्राइज |
---|---|
डिझायर LXI | ₹ 6.51 लाख |
डिझायर VXI | ₹ 7.44 लाख |
डिझायर VXI AT | ₹ 7.99 लाख |
डिझायर ZXI | ₹ 8.12 लाख |
डिझायर ZXI AT | ₹ 8.67 लाख |
डिझायर ZXI प्लस | ₹ 8.84 लाख |
डिझायर ZXI प्लस AT | ₹ 9.39 लाख |
[1]
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
डिजिट मारुती सुझुकी डिझायर कार इन्शुरन्सची माझी थर्ड पार्टी पॉलिसी वैयक्तिक अपघातांना कव्हर करेल का?
डिजिट अंतर्गत थर्ड पार्टी पॉलिसी पॉलिसीहोल्डरला वैयक्तिक अपघात कव्हरेज प्रदान करेल.
मी माझ्या विद्यमान डिजिट इन्शुरन्स पॉलिसी अंतर्गत नवीन वाहनाची नोंदणी करू शकतो का?
होय, डिजिट पॉलिसीहोल्डर्सना विद्यमान इन्शुरन्स पॉलिसी अंतर्गत नवीन वाहनाची नोंदणी करण्यास अनुमती देते.