महिंद्रा एक्सयूव्ही इन्शुरन्स

Get Instant Policy in Minutes*

Third-party premium has changed from 1st June. Renew now

महिंद्रा एक्सयूव्ही कार इन्शुरन्स पॉलिसी खरेदी किंवा रिनिव करा

महिंद्रा एक्सयूव्ही 2011 मध्ये लाँच करण्यात आली होती. या कारच्या एक्सयूव्ही 500 व्हेरियंटची टक्कर महिंद्रा स्कॉर्पिओ, टाटा सफारी, टोयोटा इनोव्हा क्रिस्टा, टाटा हॅरियर, एमजी हेक्टर प्लस आणि ह्युंदाई क्रेटाशी आहे.

महिंद्रा एक्सयूव्ही ही पाच दरवाजांची एसयूव्ही असून यात सात जण बसण्याची क्षमता आहे. ही कार ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल ट्रान्समिशनसह उपलब्ध आहे. ही गाडी 2179 सीसी पर्यंत इंजिन डिसप्लेसमेंट देते. इंधन प्रकार आणि इंजिन व्हेरियंटनुसार ही कार 13 किमी प्रति लीटर ते 15 किमी प्रति लीटर चे एआरएआय मायलेज देते. महिंद्रा एक्सयूव्ही च्या इंधन टाकीची क्षमता 70 लीटर आहे आणि 200 मिमी ग्राउंड क्लिअरन्स आहे.

कारच्या आतल्या भागात टॅकोमीटर, इलेक्ट्रॉनिक मल्टी ट्रिपमीटर, डिजिटल घडयाळ आणि उंचीला अॅडजस्ट करू शकणारी ड्रायव्हर सीट देण्यात आली आहे. या कारच्या बाह्य वैशिष्ट्यांमध्ये अॅडजस्टेबल हेडलाइट्स, व्हील कव्हर, रियर स्पॉइलर आणि रूफ रेल यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, यात दुहेरी एक्झॉस्ट आहेत.

महिंद्रा एक्सयूव्ही मध्ये अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टिम, सेंट्रल लॉकिंग, पॉवर डोअर लॉक, चाइल्ड सेफ्टी लॉक, ड्रायव्हर आणि पॅसेंजर एअरबॅग, सेंट्रल माउंटेड इंधनची टाकी आणि क्रॅश सेन्सर सारखे सुरक्षा वैशिष्ट्ये देण्यात आले आहेत.

हे नाविन्यपूर्ण सुरक्षा वैशिष्ट्ये असूनही महिंद्रा एक्सयूव्ही मध्ये ऑन-रोड लायबिलिटीचा धोका आहे. त्यामुळे जर आपण हे वाहन ड्राइव्ह करत असाल किंवा नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर महिंद्रा एक्सयूव्ही कारचा पर्याय निवडणे आवश्यक ठरते.

भारतातील अनेक कार निर्माता थर्ड पार्टी आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी देतात. डिजिटसारख्या कंपन्या आपल्या ग्राहकांना अतिरिक्त सुविधा पुरवतात ज्याचे असंख्य फायदे आहेत.

महिंद्रा एक्सयूव्ही कार इन्शुरन्स मध्ये काय कवर्ड आहे

डिजिटचा महिंद्रा एक्सयूव्ही कार इन्शुरन्स का खरेदी करावा?

महिंद्रा एक्सयूव्ही कार इन्शुरन्स प्लॅन्स

थर्ड पार्टी कॉम्प्रीहेन्सिव्ह

अपघातामुळे झालेले तुमच्या स्वतःच्या कारचे नुकसान

×

आगीमुळे झालेले तुमच्या स्वतःच्या कारचे नुकसान

×

नैसर्गिक आपत्तिमुळे झालेले तुमच्या स्वतःच्या कारचे नुकसान

×

थर्ड पार्टीच्या गाडीला झालेले नुकसान

×

थर्ड पार्टीच्या मालमत्तेला झालेले नुकसान

×

पर्सनल एक्सिडेंट कव्हर

×

थर्ड पार्टी व्यक्तिला झालेली इजा/मृत्यू

×

तुमची कार चोरीला गेल्यास

×

डोअस्टेप पिक-अप एंड ड्रॉप

×

तुमचा आयडीव्ही कस्टमाइज करा

×

कस्टमाइज्ड एड-ऑन्स सह एक्स्ट्रा प्रोटेक्शन

×
Get Quote Get Quote

कॉम्प्रीहेन्सिव्ह आणि थर्ड पार्टी इन्शुरन्स मधला फरक याबद्दल आणखीन जाणून घ्या

क्लेम कसा फाइल करावा?

आपण आमची कार इन्शुरन्स प्लॅन खरेदी किंवा रिनिव केल्यानंतर, आपण तणावमुक्त राहता कारण आमच्याकडे 3-स्टेप्स, पूर्णपणे डिजिटल क्लेम्स प्रक्रिया आहे!

स्टेप 1

फक्त 1800-258-5956 या नंबर वर कॉल करा. कोताही फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही.

स्टेप 2

सेल्फ इन्स्पेक्शन साठी तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवर लिंक मिळवा. तुमच्या मोबाईलवऋण एका गाईडेड स्टेप बाय स्टेप प्रोसेद ने तुमच्या गाडीचे झालेले नुकसान एका व्हिडीओ द्वारे शूट करा.

स्टेप 3

आमच्या गॅरेज नेटवर्क मधून रीएम्बर्समेंट किंवा कॅशलेस यापैकी रिपेअर साठी तुम्हाला जो पर्याय निवडायचा आहे तो निवडा.

डिजिट इन्शुरन्स क्लेम्स किती वेगाने सेटल केले जातात? इन्शुरन्स कंपनी बदलताना हा पहिला प्रश्न आपल्या मनात यायला हवा. आपण असा विचार करता आहात ना मग चांगले आहे! डिजिटचे क्लेम रिपोर्ट कार्ड वाचा

महिंद्रा एक्सयूव्ही कार इन्शुरन्ससाठी डिजिट का निवडावे?

महिंद्रा एक्सयूव्ही कॉस्ट व्यतिरिक्त इतरही अनेक घटक आहेत, ज्यावर पॉलिसीची विश्वासार्हता अवलंबून असते. डिजिट आपल्या ग्राहकांना काय ऑफर देते ते पाहूया.

1. वैयक्तिक अपघात कव्हर

या कव्हरेजअंतर्गत वाहन मालकाचा मृत्यू झाल्यास किंवा रस्ते अपघातामुळे कायमचे अपंगत्व आल्यास डिजिट पीडित कुटुंबाला आर्थिक मदत करते. भारतीय इन्शुरन्स नियामक आणि विकास प्राधिकरणाने (आयआरडीएआय) दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक कार मालकाने वैयक्तिक अपघात इन्शुरन्स निवडणे मॅनडेटरी आहे.

2. पॉलिसी पर्यायांची संख्या

डिजिटमध्ये आपण खालील महिंद्रा एक्सयूव्ही कार इन्शुरन्स पर्यायांपैकी निवडू शकता –

  • थर्ड पार्टी पॉलिसी – मोटार व्हेइकल अॅक्ट 1988 नुसार प्रत्येक वाहन मालकाने थर्ड पार्टी पॉलिसीची निवड करणे आवश्यक आहे. महिंद्रा एक्सयूव्ही साठी डिजिटचा कार इन्शुरन्स असलेल्या व्यक्तींना त्यांच्या कारमुळे कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीचे, मालमत्तेचे किंवा वाहनाचे डॅमेज झाल्यास सुरक्षित ठेवले जाते.
  • कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी - या पॉलिसी अंतर्गत अपघातानंतर थर्ड पार्टी आणि वैयक्तिक डॅमेज या दोन्ही गोष्टींचा समावेश होतो. शिवाय, कॉम्प्रिहेन्सिव्ह एक्सयूव्ही सह, आपण नाममात्र शुल्कात अॅड-ऑन कव्हरचा फायदा घेऊ शकता.

3. अनेक अॅड-ऑन्स

आपल्या प्लॅनमुळे डिजिटचे कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसीहोल्डर परवडणाऱ्या किमतीत अनेक अतिरिक्त सुविधा जोडू शकतात. त्यातील काही अॅड-ऑन्स आहेत –

  • कंझ्युमेबल कव्हर
  • रोडसाइड असिसटन्स
  • रिटर्न-टू-इनव्हॉइस कव्हर
  • इंजिन आणि गिअरबॉक्स प्रोटेक्शन
  • टायर प्रोटेक्शन
  • झीरो डेप्रीसीएशन कव्हर

4. आयडीव्ही(IDV) मध्ये बदल करू शकणे

आपल्या वाहनाचे सध्याचे मार्केट मूल्य त्याच्या इनशूअर्ड डीक्लेअर्ड व्हॅल्यूवर (आयडीव्ही) अवलंबून असते. डिजिटच्या कॉम्प्रिहेन्सिव्ह महिंद्रा एक्सयूव्ही कार पॉलिसीहोल्डर्सना आयडीव्ही वाढवण्याचा किंवा कमी करण्याचा फायदा होतो. कमी आयडीव्ही म्हणजे पॉलिसीचे प्रीमियम कमी करणे, तर जास्त आयडीव्ही चोरी किंवा आगीच्या बाबतीत जास्त कंपेनसेशनची अमाऊंट सुनिश्चित करते.

5. ऑनलाइन पॉलिसी रिनिवल

डिजिटची अधिकृत वेबसाइट आपल्याला ऑनलाइन महिंद्रा एक्सयूव्ही इन्शुरन्स रिनिवलची सुविधा प्रदान करते. ऑनलाइन पोर्टलला भेट द्या आणि विद्यमान दस्तऐवजांसह इन्शुरन्स रिनिवल प्रक्रिया सुरू ठेवा.

6. तीन-स्टेप क्लेम फाइलिंग प्रोसेस

डिजिटसह आपल्याला थकवणारी आणि वेळखाऊ क्लेम फाइलिंग प्रोसेसला काट देण्याचा फायदा मिळेल. यासाठी खालील स्टेप्सचे अनुसरण करा-

स्टेप 1: सेल्फ-इन्स्पेक्शन लिंक प्राप्त करण्यासाठी आपल्या रजिस्टर्ड संपर्क क्रमांकावरून 1800 258 5956 डायल करा.

स्टेप 2: आपल्या डॅमेज्ड कारचे फोटो अपलोड करा.

स्टेप 3: दुरुस्तीची पद्धत निवडा - "कॅशलेस" किंवा "रीएमबर्समेंट".

7. नेटवर्क गॅरेजची विस्तृत रेंज

डिजिटने आपल्या ग्राहकांच्या मदतीसाठी भारतभरातील असंख्य गॅरेजशी करार केला आहे. त्यामुळे जर आपण रस्त्याच्या मधोमध वाहनाशी संबंधित कोणत्याही समस्येत अडकला असाल तर जवळच आपल्याला दरवेळेस नेटवर्क गॅरेज सापडेल. कॅशलेस दुरुस्ती आणि सेवेचा फायदा घेण्यासाठी या गॅरेज किंवा वर्कशॉपला भेट द्या. डिजिट आपल्यावतीने शुल्क भरेल.

त्यामुळे महिंद्रा एक्सयूव्ही साठी इन्शुरन्स निवडताना या बाबी लक्षात घ्यायला हव्यात. आपण सर्व मुद्द्यांचा विचार करून आपल्या एक्सयूव्ही इन्शुरन्ससाठी डिजिटवर अवलंबून राहू शकता.

आपल्या महिंद्रा एक्सयूव्हीसाठी इन्शुरन्स खरेदी करणे का महत्वाचे आहे?

कार इन्शुरन्स खरेदी करणे आवश्यक आहे कारण जेव्हा आपले वाहन डॅमेज होते तेव्हा इन्शुरन्स आपल्याला होणाऱ्या एक्सपेनसेसला कव्हर करेल. थोडक्यात, एखाद्या अपघातानंतर जेव्हा आपण अडचणीत असाल तेव्हा तो आपला तारणहार असेल.

आर्थिक लायबिलिटी: आपली इन्शुरन्स पॉलिसी आपल्याला टक्कर किंवा नैसर्गिक आपत्तीनंतर उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या नुकसानीसाठी रीएमबर्स करेल. असे नुकसान ओन डॅमेज इन्शुरन्स अंतर्गत अकाऊंट केले जाइल आणि वाहन चोरीला गेल्यास ते आपल्याला पेमेंट देखील करतील.

थर्ड-पार्टी लायबिलिटी: कधीकधी टक्करीमुळे कोणत्याही थर्ड पार्टीला शारीरिक इजा किंवा मालमत्तेचे डॅमेज होऊ शकते. डॅमेजची व्याप्ती मोठी असू शकते आणि जे आपल्या खिशाला परवडणारे नसते. आपली थर्ड पार्टी कार पॉलिसी एमएसीटी ने ठरविल्याप्रमाणे आपल्यावतीने झालेल्या नुकसानीसाठी पे करेल. थर्ड पार्टी लायबिलिटी हे एक मॅनडेटरी कव्हर आहे आणि ते एकतर स्टँडअलोन पॉलिसी म्हणून किंवा कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्ससह घेतली जाऊ शकते.

कायदेशीर अनुपालन: मोटार व्हेइकल अॅक्टनुसार आपण इन्शुअर्ड न केलेले वाहन ड्राइव्ह करू शकत नाही. असे करताना पकडल्यास वाहतूक पोलीस आपले वाहन जप्त करू शकतात आणि आपल्याला रु.2,000/- दंड आणि/किंवा 3 महिन्यांचा तुरुंगवास ठोठावू शकतात. इन्शुरन्स शिवाय वाहन चालवल्यास होणाऱ्या दंडाबद्दल अधिक जाणून घ्या.

कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हरअंतर्गत अॅड-ऑन तरतूद: वाहने महाग आहेत आणि इन्शुरन्स पॉलिसीची व्याप्ती वाढविण्यासाठी आपण विविध कार अॅड-ऑन कव्हर्स खरेदी करू शकता. यामध्ये झिरो डेप्रिसिएशन कव्हर, इंजिन आणि गिअरबॉक्स प्रोटेक्शन कव्हर, कंझ्युमेबल कव्हर, रोडसाइड असिस्टन्स कव्हर आणि बरेच काही असू शकते.

महिंद्रा एक्सयूव्ही बद्दल अधिक जाणून घ्या

"आपले आयुष्य गोष्टींनी भरलेले असावे" असे आकर्षक ब्रीदवाक्य असलेली महिंद्रा एक्सयूव्ही 500, 2011 पासून भारतीय मार्केट मध्ये एक यशस्वी एसयूव्ही आहे. महिंद्रा एक्सयूव्ही च्या यशामुळे टाटा आणि जीप सारख्या इतर नामांकित कार उत्पादकांचे या स्पर्धेत सहभागी होण्याकडे लक्ष वेधले गेले आहे. लँड क्रूझरपासून प्रेरित असलेले डिझाइन नक्कीच प्रीमियम स्टँड प्रदान करते. 

ही कार पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही इंजिनमध्ये उपलब्ध असून तिचे 2179 सीसी चे सामान्य डिसप्लेसमेंट आहे. डिझेल इंजिनमध्ये सहा स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देण्यात आला आहे, तर पेट्रोल इंजिनमध्ये ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह सिंगल व्हेरिएंट देण्यात आला आहे. महिंद्रा 13.6-15.1 किमी प्रति लीटर मायलेज देते. जी-एटी, डब्ल्यू 3, डब्ल्यू 5, डब्ल्यू 7 मॅन्युअल/ एटी, डब्ल्यू 9 मॅन्युअल / एटी, डब्ल्यू 11 मॅन्युअल / एटी असे 9 व्हेरिएंट उपलब्ध आहेत.

महिंद्रा कार इन्शुरन्स बद्दल अधिक जाणून घ्या.

महिंद्रा एक्सयूव्ही का खरेदी करावी?

एम-हॉक इंजिन असलेली ही कार 18 इंचाच्या डायमंड कट अलॉय व्हील्ससह चित्ताप्रमाणे धावण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे.

क्वीलटेड चामड्याच्या सीट, डॅशबोर्ड आणि दरवाजांवर चामड्याचे स्पर्श केल्यावर माउशिर लागणारा थर आणि पियानो ब्लॅक सेंटर कंसोल कारच्या आतील भागाला ट्रेंडी आणि प्रीमियम बनवतो.

एक्सयूव्ही 500 कारच्या आतील भाग गेम-चेंजर आहे. ही सेगमेंटमधील सर्वात उंच कार आहे आणि खरं तर, ही एकमेव आहे जी सीटची तिसरी रांग आणि सेगमेंटमधील सर्वात मोठी बूट स्पेस म्हणजेच 702 लीटर उपलब्ध करते. फ्लॅट फ्लोअरबोर्ड असलेली ही एक रुंद कार आहे आणि मधल्या रांगेतील कार सीट्स रिकलाइन होणाऱ्या आहेत ज्यामुळे ही कार प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत सर्वात आरामदायक आहे. ईबीडी सह एबीएस आणि सहा एअरबॅग सुरक्षिततेची खात्री देतात.

व्यावहारिकता लक्षात घेऊन बाह्य भागाची रचना सौंदर्यपूर्ण पद्धतीने करण्यात आली आहे. समोरच्या बाजूला सुबक क्रोम स्टड असलेली मोठी वन-पीस ग्रिल गर्दीत लक्ष वेधून घेते. प्रोजेक्टर हेडलॅम्प, एलईडी डीआरएल, स्टायलिश फॉग लॅम्प, ड्युअल एक्झॉस्ट, युनिक डोअर हँडल, यात सर्व काही आहे.

या कारची किंमत ₹12.28 ते 18.6 लाख आहे. आणि वर नमूद केलेली वैशिष्ट्ये आपल्याला आपल्या पैश्याचा पूर्ण मोबदला देतात. ही कार सर्व वयोगटासाठी योग्य आहे. दररोज शहरात गाडी चालवा किंवा आठवड्याच्या शेवटी लाँग ड्राइव्हवर घेऊन जा, एक्सयूव्ही आपल्याला निराश करणार नाही. आरामाशी तडजोड न करता साहसी आणि दमदार प्रवास करू इच्छिणाऱ्या सर्व वयोगटांसाठी ही कार उपयुक्त आहे.

एक्सयूव्ही500 व्हेरिएंट्सची प्राइज लिस्ट

व्हेरियंटचे नाव नवी दिल्लीतील व्हेरियंटची अंदाजे प्राइज
एक्सयूव्ही 500 डब्ल्यू 5 ₹ 14.23 लाख
एक्सयूव्ही 500 डब्ल्यू 7 ₹ 15.56 लाख
एक्सयूव्ही 500 डब्ल्यू 7 ₹ 16.76 लाख
एक्सयूव्ही 500 डब्ल्यू 9 ₹ 17.3 लाख
एक्सयूव्ही 500 डब्ल्यू 9 एटी ₹ 18.51 लाख
एक्सयूव्ही 500 डब्ल्यू 11 (ओ) ₹ 18.84 लाख
एक्सयूव्ही 500 डब्ल्यू 11 (ओ) एटी ₹ 20.07 लाख

एक्सयूव्ही700 व्हेरिएंट्सची प्राइज लिस्ट

व्हेरियंटचे नाव नवी दिल्लीतील व्हेरियंटची अंदाजे प्राइज
एमएक्स ₹ 12.49 लाख
एमएक्स डिझेल ₹ 12.49 लाख
एएक्स 3 ₹ 14.48 लाख
एएक्स 3 डीजल ₹ 14.99 लाख
एएक्स 5 ₹ 15.49 लाख
एएक्स 3 7 एसटीआर डिझेल ₹ 15.69 लाख
एएक्स 3 एटी ₹ 15.99 लाख
एएक्स 5 डिझेल ₹ 16.08 लाख
एएक्स 5 7 एसटीआर ₹ 16.09 लाख
एएक्स 5 7 एसटीआर डिझेल ₹ 16.69 लाख
एएक्स 5 एटी ₹ 17.09 लाख
एएक्स 5 डिझेल एटी ₹ 17.69 लाख
एएक्स 7 ₹ 17.99 लाख
एएक्स 5 7 एसटीआर डिझेल एटी ₹ 18.29 लाख
एएक्स 7 डिझेल ₹ 18.59 लाख
एएक्स 7 एटी ₹ 19.59 लाख
एएक्स 7 डिझेल एटी ₹ 20.19 लाख
एएक्स 7 डीजल लक्झरी पॅक ₹ 20.29 लाख
एएक्स 7 लक्झरी पॅक ₹ 21.29 लाख
एएक्स 7 एडब्ल्यूडी डिझेल एटी ₹ 21.49 लाख
एएक्स 7 एटी डीजल लक्झरी पॅक ₹ 21.88 लाख
एएक्स 7 एटी डीजल लक्झरी पॅक एडबल्यूडी ₹ 22.99 लाख

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

मी डिजिटच्या ग्राहक सपोर्ट टीमशी कधी संपर्क करू शकतो?

डिजिटची ग्राहक सपोर्ट टीम राष्ट्रीय सुट्टीच्या दिवशीही 24 तास काम करते. त्यामुळे आपण हव्या त्या वेळी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकता

मी डिजिटवरून माझ्या कारसाठी ओन डॅमेज प्रोटेक्शन पॉलिसी निवडू शकतो का?

डिजिटच्या कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसीसोबत ओन डॅमेज प्रोटेक्शन येते. हे स्टँडअलोन पॉलिसी म्हणून खरेदी केले जाऊ शकत नाही.