ह्युंदाई कोना इलेक्ट्रिक इन्शुरन्स

Drive Less, Pay Less. With Digit Car Insurance.

Third-party premium has changed from 1st June. Renew now

ह्युंदाई कोना इलेक्ट्रिकसाठी इन्शुरन्स खरेदी किंवा रिन्यू करा

भारतीय ऑटोमोबाईल मार्केट मध्ये 2019 मध्ये लॉंच झालेली ह्युंदाई कोना इलेक्ट्रिक ही पहिली ऑल-इलेक्ट्रिक एसयूव्ही आहे. ही दोन व्हेरियंट्स मध्ये उपलब्ध आहे आणि ही कार नाविन्यपूर्ण टेक्नोलॉजीज सह सुसज्ज आहे ज्यामुळे तुम्हाला सुपीरियर एक्सलेरेशन सह चित्तथरारक ड्रायव्हिंग अनुभव देते.

2020 मध्ये, कोना इलेक्ट्रिक कारला मिड-फेसलिफ्ट देण्यात आला आणि आता ती पुन्हा 2022 मध्ये भारतात आणली जाईल.

वैश्विक स्तरावर ह्युंदाई कोना इलेक्ट्रिक या कारमध्ये 39.2 किवॅअ बॅटरी आणी 136 एचपीचे इंजिन आहे ज्यामुळे 304किमी रेंज मिळते आणि 64किवॅअ बॅटरी आणि 204 एचपी मोटर जी 483किमी रेंज देते. याउलट, भारतामधील व्हर्जन मध्ये लोअर-स्पेक मध्ये 39.2 किवॅअ बॅटरी आणि 136 एचपी इलेक्ट्रिक इंजिन आहे.

ह्युंदाई कोना इलेक्ट्रिक मध्ये 10.25 इंचाचे इन्फोटेनमेंट सिस्टम आहे जे वॉइस कन्ट्रोल, रिमोट चार्जिंग, प्लग इन केलेली असताना कारला प्री-हीटा करण्यासाठी रिमोट क्लायमेट कन्ट्रोल साठी ब्लूलिंक कार टेकला सपोर्ट करते. यामध्ये तुम्हाला ब्लाइंड स्पॉट असिस्टंस, रिअर क्रॉस-ट्रॅफिक असिस्टंस, सेफ एक्झिट वॉर्निंग आणि ई-कॉल देखील आहे ज्यामुळे तुम्हाला अपघात झालेला असताना इमर्जन्सी सर्व्हिसेस बद्दल आपोआप सतर्क केले जाईल.

तरी, भारतामध्ये इलेक्ट्रिक कार ही संकल्पना नवीन असल्यामुळे अशी कार मेंटेन करणे महाग वाटू अहक्ते. त्यामुळे, ह्युंदाई कोना इलेक्ट्रिक कार इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करणे हा योग्य निर्णय ठरेल जेणेकरून तुम्ही रिपेअर आणि रिप्लेसमेंटचा उद्भवणारा खर्च टाळू शकता.

त्याचबरोबर, मोटर वेहिकल एक्ट 1988 अनुसार भारतामध्ये काइन्शुरन्स पॉलिसी अनिवार्य आहे.

ह्युंदाई कोना इलेक्ट्रिक कार इन्शुरन्समध्ये काय कव्हर केले जाते

डिजिटचा ह्युंदाई कोना इलेक्ट्रिक कार इन्शुरन्स का खरेदी करावा?

ह्युंदाई कोना इलेक्ट्रिक कार इन्शुरन्स प्लॅन्स

थर्ड पार्टी कॉम्प्रिहेन्सिव्ह

अपघातामुळे स्वताच्या कारचे डॅमेज/नुकसान

×

आग लागल्यास स्वताच्या कारचे डॅमेज/नुकसान

×

नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी स्वताच्या कारचे डॅमेज/ नुकसान

×

थर्ड पार्टी वाहनाचे डॅमेज

×

थर्ड पार्टी मालमत्तेचे डॅमेज

×

पर्सनल एक्सीडेंट इन्शुरन्स

×

थर्ड-पार्टीच्या व्यक्तीची जखम / मृत्यू

×

आपल्या कारची चोरी

×

डोअरस्टेप पीक-अप आणि ड्रॉप

×

आपला आयडीव्ही(IDV) कस्टमाइज करा

×

कस्टमाइज्ड अॅड-ऑनसह अतिरिक्त संरक्षण

×
Get Quote Get Quote

कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि थर्ड पार्टी इन्शुरन्समधील डीफ्रंसबद्दल अधिक जाणून घ्या

क्लेम कसा फाइल करावा?

आपण आमची कार इन्शुरन्स योजना खरेदी किंवा रिनिवल केल्यानंतर, आपण तणावमुक्त राहता कारण आमच्याकडे 3-स्टेप्स, पूर्णपणे डिजिटल क्लेम्स प्रोसेस आहे!

स्टेप 1

फक्त 1800-258-5956 वर कॉल करा. फॉर्म भरायची गरज नाही.

स्टेप 2

आपल्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर सेल्फ इन्स्पेक्शनची लिंक मिळवा. स्टेप बाय स्टेप प्रक्रियेद्वारे आपल्या स्मार्टफोनमधून आपल्या वाहनाचे डॅमेज शूट करा.

स्टेप 3

आमच्या गॅरेजच्या नेटवर्कद्वारे आपण निवडू इच्छित असलेल्या दुरुस्तीची पद्धत म्हणजेच रीएमबर्समेंट किंवा कॅशलेस निवडा.

डिजिट इन्शुरन्स क्लेम्स किती वेगाने सेटल केले जातात? इन्शुरन्स कंपनी बदलताना हा पहिला प्रश्न आपल्या मनात यायला हवा. आपण असा विचार करताय हे चांगले आहे! डिजिटचे क्लेम रिपोर्ट कार्ड वाचा

डिजीट ह्युंदाई कोना इलेक्ट्रिक कार इन्शुरन्ससाठी आदर्श प्रोव्हायडर असण्याची कोणकोणती कारणे आहेत?

एक आश्वासक इन्शुरन्स कंपनी शोधणे ही जिकीरीचे काम आहे. त्यामुळे, सर्व उपलब्ध पर्यायांचा विचार करताना तुम्ही ह्युंदाई कोना इलेक्ट्रिक कार इन्शुरन्सची किंमत आणि वेगवेगळ्या इन्शुरन्स प्रोव्हायडर द्वारा देण्यात येणारे फायदे याची तुलना नक्की करून बघा.

यासंदर्भात, तुम्ही डिजीटची निवड करू शकता जे तुम्हाला पारंपारिक पॉलिसी ऑप्शन्स सह इतर अनेक आकर्षक ऑफर्स देखील देतात.

त्याबद्दल जाणून घेण्यासाठी पुढे वाचा.

1. इन्शुरन्स पॉलिसीचे प्रकार

डिजीट त्याच्या ग्राहकांच्या विविध गरजात्याचे इन्शुरन्स पूर्ण करण्यासाठी प्लॅन डिझाईन करतो. तुम्ही तुमच्या सोयीने खालील पर्यायांमधून निवड करू शकता.

  • थर्ड पार्टी पॉलिसी

ही एक अनिवार्य पॉलिसी आहे जी तुम्हाला तुमची कोना इलेक्ट्रिक कार भारतामध्ये कायदेशीररीत्या ड्राईव्ह करण्यासाठी मदत करते. या पॉलिसीमध्ये तुमच्या कारमुळे थर्ड पार्टीच्या कार, मालमत्ता किंवा व्यक्तीचे झालेले नुकसान कव्हर केले जाते. यापलीकडे जर काही गरज पडली तर डिजीट त्यासंबंधी कायदेशीर बाबींची देखील काळजी घेईल.

  • कॉम्प्रीहेन्सिव्ह पॉलिसी

ही सर्वात महाग पॉलिसी आहे जी थर्ड पार्टीच्या झालेल्या नुकसानाचे तसेच तुमच्या स्वतःच्या नुकसानाचा खर्च देखील कव्हर करते. त्यामुळे झालेल्या नुकसानाचे कारण अपघात, नैसर्गिक आपत्ति, आग लागणे किंवा इतर दुर्घटना, यापैकी कोणतेही असले तरी डिजीट त्यासाठीचा खर्च भरून देतो किंवा झालेले नुकसान भरून काढण्यासाठी कॅशलेस रिपेअरचा पर्याय देखील देतो.

नोट: थर्ड पार्टी पॉलिसी होल्डर्ना जर त्यांची पॉलिसी अपग्रेड करायची असेल तर ते वेगळे ओन डॅमेज प्रोटेक्शन घेऊ शकतात.

2. ऑनलाईन सर्व्हिसेस

आता तुम्ही डिजीटच्या ऑफिशियल वेबसाईट वरून ह्युंदाई कोना इलेक्ट्रिक इन्शुरन्स ऑनलाईन खरेदी करू शकता. तसेच, रिन्युअल प्रक्रिया सोपी करण्यासाठी आता ह्युंदाई कोना इलेक्ट्रिक इन्शुरन्स रिन्युअल देखील ऑनलाईन करू शकता. तुमचे अकाऊंट्स लॉग-इन करा आणि पॉलिसी कालावधी संपण्याआधी इन्सटंट तुमची पॉलिसी रिन्यू करा.

3. पेपरलेस प्रक्रिया

जर तुम्ही या 3 सोप्या स्टेप्स मधून क्लेम फाईल करू शकत असाल तर पारंपारिक पद्धतीने क्लेम फाईल करण्याच्या प्रक्रियेमध्ये वेळ का वाया घालवायचा?

डिजीट तुमच्या सोयीसाठी ही सोपी क्लेम करण्याची प्रक्रिया घेऊन आला आहे.

स्टेप 1: तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल वरून 1800 258 5956 या नंबरवर कॉल करा आणि सेल्फ-इन्स्पेक्शन लिंक मिळवा.

स्टेप 2: पुरावा म्हणून या लिंकवर तुमच्या नुकसान झालेल्या कारचे फोटो अपलोड करा.

स्टेप 3: रिपेअर मोड ‘रीएम्बर्समेंट’ किंवा ‘कॅशलेस’ पर्यायांमधून तुमच्या गरजेप्रमाणे निवड करा.

4. एड-ऑन कव्हर्स सह अतिरिक्त सुरक्षा

तुम्हाला गरजेचे वाटेल तेव्हा खालीलपैकी एड-ऑन्स तुम्ही तुमच्या कोना इलेक्ट्रिक इन्शुरन्स पॉलिसी मध्ये जोडून तुमची पॉलिसी वाढवू शकता.

  • झिरो डेप्रीसिएशन
  • रिटर्न टू इन्व्हॉइस
  • पॅसेन्जर कव्हर
  • कन्झ्युमेब्ल्स
  • टायर प्रोटेक्शन
  • इंजिन आणि गिअरबॉक्स प्रोटेक्शन
  • ब्रेकडाऊन असिस्टंस

नोट: तुमच्या ह्युंदाई कोना इलेक्ट्रिक कार इन्शुरन्सची रिन्युअलची किंमत वाढवून तुम्ही तुमच्या पॉलिसीची कालावधी संपल्यावर देखील हे प्रोटेक्शन सुरु ठेवू शकता.

5. आयडीव्ही कमी-जास्त करण्याचा पर्याय

डिजीट त्याच्या ग्राहकांना त्यांच्या गरजेप्रमाणे त्यांच्या कारची इन्शुअर्ड डिक्लेअर्ड व्हॅल्यू कमी जास्त करण्याची मुभा देते. जास्त आयडी व्ही आणि जास्त प्रीमियम चांगले कॉम्पेन्सेशन देते परंतु आकर्षक कॉम्पेन्सेशनची हमी नाही देऊ शकत.

6. डोअरस्टेप पिक-अप आणि ड्रॉपची सुविधा

जर तुमच्या कारचे जास्त नुकसान झाले असेल आणि टी चालवत नेण्याच्या परिस्थितीत नसेल तर तुम्ही या सुविधेचा लाभ घेऊ शकता. आमचे प्रतिनिधी तुमच्या लोकेशनवर येऊन तुमची कार घेऊन जातील आणि रेपेअर झाल्यावर तुमच्या पत्त्यावर आणून देतील.

7. प्रीमियमवरती डिस्काउन्ट्स

वर्षभर जर तुम्ही कोणताही क्लेम फाईल नाही केला, तर तुम्हाला तुमच्या पुढच्या प्रीमियम

वरती 20%चा नो क्लेम बोनस डिस्काउंट मिळेल.

8. देशभरात असलेले डिजीटचे नेटवर कार गॅरेजेस

आता तुम्ही तुमच्या कारसंबंधी कोणतीही समस्येसाठी अगदी सहज तुमच्या जवळच्या नेटवर्क गॅरेज मध्ये जाऊ शकता. तसेच, जर तुम्हाला तत्काळ पेमेंट करायचे नसेल तर तुम्ही कॅशलेस पर्याय निवडू शकता. तसेच, डिजीट मध्ये, तुम्हाला तुमचे ह्युंदाई कोना इलेक्ट्रिक कार इन्शुरन्सचे प्रीमियम कमी करण्याची आणखीन एक संधी मिळते. तुम्हाला केवळ व्हॉलंटरी डीडक्टिबल्स निवडायचे आहेत. तरी, हा पर्याय निवडण्याआधी, विचारपूर्वक निर्णय घेण्यासाठी डिजीटच्या 24x7 कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्हची मदत नक्की घ्या.

ह्युंदाई कोना बद्दल आणखीन जाणून घ्या

पेट्रोलच्या वाढत्या किमती बघता ईव्ही (इलेक्ट्रिक वेहिकल) हे भारतचे भविष्य असले तर त्यात काही नवल नाही. पर्यावरणाचे संरक्षण ही आता कोण्या एका व्यक्तीची जवाबदारी नसून ती आता सगळ्यांचीच नैतिक जवाबदारी झाली आहे. इतर स्पर्धकांना टफ कॉम्पिटिशन देऊन ह्युंदाईने हा जागरूक पुढाकार घेऊन मोठे धाडस दाखवले आहे. त्यांनी एसयूव्हीच्या कॉम्पॅक्ट सेगमेंट मध्ये ह्युंदाई कोना इलेक्ट्रिक, ही एक डायनॅमिक कार बाजारात आणली आहे.

ही एक झिरो एमिशन एसयूव्ही आहे जी सगळ्याच बाबतीत इलेक्ट्रिक आहे. एक संपूर्ण प्रीमियम सेगमेंट कार असलेल्या ह्युंदाई कोना इलेक्ट्रिकची किंमत रु. 23.95 पासून सुरु होते. चालवायला अगीद आरामदायक, ऑटोमॅटिक आहे जी तुम्हाला लक्झरी फील देते. पूर्ण चार्ज असताना ही कार तुम्हाला प्रभावशाली असे 452 किमीचे मायलेज देते.

तुम्ही ह्युंदाई कोना का खरेदी करावी?

ह्युंदाई कोना हा तुमच्यासाठी एक सर्वोत्तम पर्याय ठरेल. पूर्णपणे इलेक्ट्रिक आणि ऑटोमॅटिक असलेल्या या कारमध्ये 5 व्यक्ती आरामशीर बसू शकतात. हिच्या स्पोर्टी लूक मुळे ही गर्दीतही अगदी सहज ओळखू येते. बाहेरचे हेडलॅम्प्स एलईडी बेस्ड आहेत जे अगदी लक्षवेधी ठरतात. 7 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम इंस्टॉल केलेली आहे जी एंड्रॉइड आणि आयओएस ला कम्पॅटेबल आहे.

लक्झरीची नवीन ओळख म्हणून तुम्हला मिळते इलेक्ट्रिक सनरूफ सोबतच, फ्रंट हीटेड आणि व्हेन्टीलेटेड सीट्स, फोनसाठी वायरलेस चार्जिंग, आणि पुश स्टार्ट-स्टॉप बटण देखील आहे. यामध्ये तुम्ही इको+, इको, कम्फर्ट आणि स्पोर्ट हे चार ड्रायव्हिंग मोड मधून निवड करू शकता.

मॅन्यूफॅक्चरर्स तुम्हाला 2 चार्जर आणि चार्जिंग आउटलेट्स डीलरशिप कडे उपलब्ध करून देतात. ह्युंदाई कोण इलेक्ट्रिक ही बाहेरून कारला आणखीनच लक्षवेधी बनवणाऱ्या 5 आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे.

पहा: ह्युंदाई कार इन्शुरन्स बद्दल आणखीन जाणून घ्या

ह्युंदाई कोनाचे व्हेरियंट्स

व्हेरियंटचे नाव व्हेरियंटची किंमत (नवी दिल्ली मध्ये, शहराप्रमाणे किंमत बदलू शकते.)
प्रीमियम ₹ 23.79 लाख
प्रीमियम डूअलl टोन ₹ 23.97 लाख

[1]

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

मी माझ्या ह्युंदाई कोना इलेक्ट्रिक कारसाठी टायर प्रोटेक्शन एड-ऑन कव्हर निवडू शकतो का?

तुम्ही जर कॉम्प्रीहेन्सिव्ह ह्युंदाई कोना इलेक्ट्रिक कार इन्शुरन्स पॉलिसी घेतली असेल तर तुम्ही टायर प्रोटेक्शन एड-ऑन कव्हर घेऊ शकता.

टायर प्रोटेक्शन एड-ऑन कव्हर किती वर्षांसाठी वैध आहे?

टायर प्रोटेक्शन एड-ऑन कव्हर 4 वर्षांसाठी वैध असते.

टायर प्रोटेक्शन एड-ऑन कव्हर अंतर्गत काय काय कव्हर केले जाते?

टायर प्रोटेक्शन एड-ऑन कव्हर मध्ये कव्हर केले जाते-

  • रिप्लेसमेंटचा खर्च
  • डिसमाउंटिंग, इंस्टॉलिंग आणि रीबॅलेन्सिंगची लेबर कॉस्ट
  • अपघाती नुकसान
  • ट्यूब आणि टायरचे झालेल्या नुकसानाचा खर्च ज्यामध्ये टायर फुगणे, फुटणे आणि चरे पडणे याच्या दुरुस्तीचा देखील खर्च समाविष्ट आहे.