ह्युंदाई ग्रँड आय10 निओस इन्शुरन्स

Drive Less, Pay Less. With Digit Car Insurance.

Third-party premium has changed from 1st June. Renew now

ह्युंदाई ग्रँड आय10 निओस कार इन्शुरन्स पॉलिसी खरेदी किंवा रिन्यू करा

ह्युंदाई ग्रँड आय10 निओस ही एक चालवायला अगदी सोपी अशी अर्बन हॅचबॅक ज्यामध्ये वर्ल्ड-क्लास फीचर्स आहेत आणि सोबतच यामध्ये आकर्षक लूक्स देखील आहेत. ही कार जुन्या ग्रँड आय10च्या ढाच्यावर आणखीन जास्त सोफेस्टीकेटेड पॅकेज मध्ये बनवली आहे. तसेच, ह्युंदाई पेट्रोल आणि डीझेल इंजिन व्हेरियंट्समध्ये उपलब्ध आहे आणी प्रत्येकामध्ये 5-स्पीड मॅन्युअल किंवा एएमटी ऑटो गिअर बॉक्स देखील आहेत.

ह्युंदाईमध्ये मोठी सिग्नेचर ग्रील, बूमरँग आकाराचे डीआरएल्स, एलईडी प्रोजेक्टर असलेले हेडलॅम्प्स आणि फॉग लॅम्प्स, 15 इंचाचे एलॉय व्हील्स, आणि स्पोर्टी लूकसाठी रूफरेल्स आहे. आता मॉडेलच्या आधारावर, तुम्ही डूअल-टोन ग्रे किंवा ब्लॅक कलरच्या इंटिरियर प्रमाणे निवड करू शकता.

कॅबिन मध्ये, 8 इंचाचे टचस्क्रीन इन्फोसिस्टम सह एक सेमी-डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर आहे जो एपल कार प्ले आणि एंड्रॉइड ऑटोला सपोर्ट करतो.

या व्यतिरिक्त, वायरलेस चार्जर, यूएसबी पोर्ट, व्हॉईस रिकग्निशन, ब्लूटूथ कनेक्टीव्हिटी, रिअर एसी व्हेंट्स, 2 पावर आउटलेट्स, रिअर पार्किंग सेन्सर्स, कॅमेरा, इंजिन स्टार्ट/स्टॉप बटण आणि इतर अनेक फीचर्स आहेत.

तुम्ही जर ही कार खरेदी केली असेल तर ह्युंदाई ग्रँड आय10 निओस कार इन्शुरन्स नक्की खरेदी करा जेणेकरून रिपेअर/रिप्लेसमेंट मुळे उद्भवणारे खर्च टाळता येतील.

तसेच, कार इन्शुरन्स पॉलिसी अनिवार्य आहे आणि कायदेशीर परिणाम आणि इतर जोखमींपासून तुम्हाला सुरक्षित ठेवते.

ह्युंदाई ग्रँड आय10 निओस कार इन्शुरन्समध्ये काय कव्हर केले जाते

डिजिटचा ह्युंदाई ग्रँड आय10 निओस कार इन्शुरन्स का खरेदी करावा?

ह्युंदाई ग्रँड आय10 निओससाठी कार इन्शुरन्स प्लॅन्स

थर्ड-पार्टी कॉम्प्रिहेन्सिव्ह

अपघातामुळे स्वत:च्या कारचे डॅमेज/ नुकसान

×

आग लागल्यास स्वत:च्या कारचे डॅमेज/नुकसान

×

नैसर्गिक आपत्ती च्या प्रसंगी स्वतःच्या कारचे डॅमेज / नुकसान

×

थर्ड पार्टी वाहनाचे डॅमेज

×

थर्ड पार्टी मालमत्तेचे डॅमेज

×

पर्सनल एक्सीडेंट इन्शुरन्स

×

थर्ड-पार्टीच्या व्यक्तीची जखम / मृत्यू

×

आपल्या गाडीची चोरी

×

डोरस्टेप पिक-अप आणि ड्रॉप

×

आपला आयडीव्ही कस्टमाइज करा

×

कस्टमाइज्ड अॅड-ऑनसह अतिरिक्त संरक्षण

×
Get Quote Get Quote

कॉम्प्रीहेन्सिव्ह आणि थर्ड पार्टी इन्शुरन्स मधला फरक याबद्दल आणखीन जाणून घ्या

क्लेम कसा फाइल करावा?

आपण आमची कार इन्शुरन्स प्लॅन खरेदी किंवा रिनिव केल्यानंतर, आपण तणावमुक्त राहता कारण आमच्याकडे 3-स्टेप्स, पूर्णपणे डिजिटल क्लेम्स प्रक्रिया आहे!

स्टेप 1

फक्त 1800-258-5956 वर कॉल करा. कोणताही फॉर्म भरायची गरज नाही

स्टेप 2

आपल्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर सेल्फ इन्स्पेक्शनची लिंक मिळवा. स्टेप बाय स्टेप प्रक्रियेद्वारे आपल्या स्मार्टफोनमधून आपल्या वाहनाचे डॅमेज शूट करा.

स्टेप 3

आमच्या गॅरेजच्या नेटवर्कद्वारे आपण निवडू इच्छित असलेल्या दुरुस्तीची पद्धत म्हणजेच रीमबर्समेंट किंवा कॅशलेस पद्धत निवडा.

डिजिट इन्शुरन्स क्लेम्स किती वेगाने सेटल केले जातात? इन्शुरन्स कंपनी बदलताना हा पहिला प्रश्न आपल्या मनात यायला हवा. आपण असा विचार करता आहात ना मग चांगले आहे! वाचा डिजिटचे क्लेम रिपोर्ट कार्ड

ह्युंदाई ग्रँड आय10 निओस कार इन्शुरन्ससाठी डिजीटचीच निवड का करावी?

ह्युंदाई ग्रँड आय10 निओस कार इन्शुरन्सची किंमत, याशिवाय इतर अनेक मुद्दे आहेत जे तुम्ही लक्षात ठेवायला हवेत. उदाहरणार्थ, ऑनलाईन पॉलिसीजची तुलना करताना, इन्शुरर कोणकोणते बेनिफिट्स ऑफर करत आहेत हे तपासून घ्या.

ह्युंदाई ग्रँड आय10 निओस कार इन्शुरन्स साठी कार इन्शुरन्स घेण्यासाठी, सर्वात वाजवी दरात ऑफर केल्या जाणाऱ्या रेट्स मध्ये सर्वाधिक फायद्यांमुळे डिजीट एक उत्तम इन्शुरन्स प्रोव्हायडर ठरतो.

याबद्दल आणखीन माहितीसाठी पुढे वाचा.

1. पॉलिसीचे पर्याय तुमच्या सोयीने निवडा

तुम्हाला कशा प्रकारचे कव्हरेज हवे आहे, त्याप्रमाणे तुम्ही खालील प्रकारांपैकी निवड करू शकता.

  • थर्ड पार्टी पॉलिसी

मोटर वेहिकल एक्ट, 1988 प्रमाणे ही पॉलिसी असणे अनिवार्य आहे आणि यामुळे तुम्हाला थर्ड पार्टी लायबिलिटीपासून पूर्ण सुरक्षा मिळते. शोप्या शब्दात सांगायचे झाले तर, जेव्हा तुमच्या कारमुळे थर्ड पार्टीला (व्यक्ती, मालमत्ता, किंवा कारला) नुकसान पोहोचते, त्याची नुकसानभरपाई डिजीट करतो. तसेच, अशा परिस्थितीत सामान्यतः उद्भवणाऱ्या कायदेशीर बाबींची देखील डिजीटच सेटल करतो. 

  • कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी

डिजीट ऑफर करत असलेले हे सर्वात व्यापक असे कव्हरेज आहे. या पॉलिसी अंतर्गत, तुम्हाला थर्ड पार्टीच्या लायबिलिटीजची आणि तुमच्या स्वतःच्या कारच्या नुकसान भरपाईची, दोन्हीची काळजी करण्याची गरज नाही. त्याच बरोबर डिजीट तुम्हाला काही एड-ऑन्स तुमचा बेस प्लॅनमध्ये जोडून तो अपग्रेड करण्याची देखील संधी देतो. अतिरिक्त चार्जेस भरून तुम्ही खालील पर्यायांमधून निवड करू शकता. तुमच्या पॉलिसीचा कालावधी संपला तरी सुद्धा तुम्ही ह्युंदाई ग्रँड आय10 निओस कार इन्शुरन्स रिन्युअलची किंमत वाढवून या बेनिफिट्सचा लाभ घेऊ शकता.

  • झिरो डेप्रीसिएशन
  • क्न्झ्युमेबल
  • टायर प्रोटेक्शन
  • ब्रेकडाऊन असिस्टंस आणि इतर

नोट: थर्ड पार्टी कार इन्शुरन्स प्लॅन तुमच्या स्वतःच्या कारच्या नुकसानाला कव्हर करत नाही. तुमच्या बेस पॉलिसीमध्ये हे कव्हर जोडण्यासाठी, तुम्हाला वेगळी ओन डॅमेज कव्हर घ्यावे लागेल.

2. ऑनलाईन सर्व्हिसेस

कार इन्शुरन्स पॉलिसी निवडणे आता सहज आणि सोपे झाले आहे. पारंपारिक पध्दतीला सोडून, ह्युंदाई ग्रँड आय10 निओस कार इन्शुरन्ससाठी ऑनलाईन घेण्यासाठी आता डिजीटच्या वेबसाईटला भेट द्या. तुम्ही तुमच्या सध्याच्या डिजीट एकाउंटला साईनइन करून देखील ह्युंदाई ग्रँड आय10 निओस कार इन्शुरन्स रिन्यू करू शकता.

3. आयडीव्ही कस्टमायझेशन

डिजीट त्याच्या कस्टमरना त्यांच्या कारची इन्शुअर्ड डिक्लेअर्ड व्हॅल्यू कमी जास्त करण्याची संधी देखील देतो. पॉलिसीचे प्रीमियम आयडीव्ही ठरवते, त्यामुळे जर तुम्ही जास्त आयडीव्ही निवडलीत तर प्रीमियम देखील वाढेल. तसेच, चोरी किंवा दुरुस्त न होणाऱ्या नुकसानाच्या केसेस मध्ये जास्त आयडीव्ही जास्त मोबदल्याची देखील हमी देते.

4. उच्च क्लेम सेटलमेंट रेशिओ

डिजीटच्या अविश्वसनीय प्रसिद्धीचे कारण त्याचा उच्च क्लेम सेटलमेंट रेशिओ आहे. त्याच बरोबर, इन्शुरर ही प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी एक सेल्फ-इन्स्पेक्शन लिंक पाठवतो.

ही लिंक मिळवण्यासाठी 1800 258 5956 या नंबरवर कॉल करा.

5. देशभरात डिजीटची नेटवर्क कार गॅरेजेस

भारतामध्ये डिजीट 6000 पेक्षा जास्त गॅरेजेसशी जोडलेले आहे. त्यामुळे, तुमच्या कारसंबंधी कोणतीही समस्या या गॅरेजेसमध्ये अगदी विनासायास घेऊन जा आणि तुमच्या ग्रँड आय10 निओस इन्शुरन्सअंतर्गत कॅशलेस रिपेअर्सचा पर्याय निवडा.

6. प्रीमियमवरती डिस्काउन्ट्स

संपूर्ण वर्षभर जर तुम्ही एकदाही क्लेम नाही केला तर डिजीट तुम्हाला प्रीमियमवरती 20%चे नो क्लेम बोनस डिस्काउंट देतो.

तुम्ही किती वर्ष क्लेम केला नाही यावर ही टक्केवारी अवलंबून असते.

7. कार पिक-अप आणि ड्रॉप सुविधा

तुमची कार जर चालवत नेण्याच्या परिस्थितीत नसेल तर काळजी करू नका. त्याऐवजी, गैरसोय टाळण्यासाठी डोअरस्टेप पिक-अप आणि ड्रॉप सुविधा निवडा.

नोट: ही सुविधा फक्त ह्युंदाई ग्रँड आय10 निओसच्या कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्स पॉलिसीसाठीच उपलब्ध आहे.

8. अद्वितीय कस्टमर केअर सर्व्हिस

डिजीटची कस्टमर केअर टीम जलद आणि विश्वस्त अशी 24x7 सेवा देतात. त्यामुळे, तुमच्या इन्शुरन्ससंबंधी कोणतेही प्रश्न कधी ही आणि कुठेही सोडवा.

या व्यतिरिक्त, जर तुम्ही व्हॉलंटरी डीडक्टिबलल्सचा पर्याय निवडता तरडिजीट तुम्हाला ह्युंदाई ग्रँड आय10 निओस कार इन्शुरन्स पॉलिसीचे प्रीमियम कमी करण्याचा देखील पर्याय देतो. तरी, तुम्ही कोणताही विचारपूर्वक निर्णय घेण्याआधी या पर्यायाचे फायदे आणि तोटे समजून घेणे आवश्यक आहे.

ह्युंदाई ग्रँड आय10 निओससाठी कार इन्शुरन्स घेणे गरजेचे का आहे?

कार इन्शुरन्स म्हणजे आणीबाणीच्या काळात स्वतःला आर्थिकदृष्ट्या सुरक्षित ठेवणे. याचा अर्थ तुम्ही तुमची जोखीम इन्शुररवर सोपवता. कार साठी इन्शुरन्स पॉलिसी घेणे महत्त्वाचे आहे कारण त्यामुळे:

  • तुम्हाला अयोग्य आर्थिक ओझ्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी: कारची चोरी, अपघात किंवा दुर्दैवी घटना जसे नैसर्गिक आपत्ति आणि दंगल, यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते. अपघातानंतर रिपेअरिंगचा खर्च इतका जास्त असू शकतो की तो कदाचित तुम्हाला परवडणारा नसेल. आणि जेव्हा कार नवीनच बाजारात आलेली असत तेव्हा जुन्या कार्सच्या तुलनेत तिचा रिपेअरिंगचा खर्च कधीही जास्तच असतो.

तुम्ही तुमच्या इन्शुररला याबाबतीत मदत करण्याची विनंती करू शकता. ते तुमच्यासाठी कॅशलेस रिपेअर्सची सोय करतील किंवा तुम्ही भरलेल्या बिल्सचे रीएम्बर्समेंट करतील. तसेच, जर तुम्ही कार चोरीला गेली, तर संपूर्ण इन्व्हॉइसची रक्कम तुम्हाला इन्शुरन्स कंपनीतर्फे रीएम्बर्स केली जाईल.

ओन डॅमेज कार इन्शुरन्स बद्दल आणखीन जाणून घ्या.

  • तुम्हाला थर्ड पार्टी लायबिलिटी पासून सुरक्षा देते: तुम्ही कारचालवत असताना तुमच्यामुळे थर्डपार्टीला अपघात होणे हे तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकते. जेव्हा तुम्ही अशा शारीरिक किंवा मालमत्तेच्या नुकसानभरपाईसाठी जवाबदार मानले जाता आणि ही रक्कम तुम्हाला परवडणारी नसेल, तेव्हा इन्शुरर तुमचा मदतगार ठरतो.
  • तुम्हाला कायदेशीररीत्या कार चालवण्यास परवानगी देतो: कार इन्शुरन्स पॉलिसी हे एक कायदेशीर डॉक्यूमेंट आहे जें तुम्हाला रस्त्यावर कार चालवण्याची परवानगी देते. वाहतुकीच्या नियमांप्रमाणे भारतामध्ये ही एक प्रकारची मान्यता आहे.
  • बेसिक कार कव्हर आणखीन विस्तृत बनवण्याची संधी देतो: भारतामध्ये कार इन्शुरन्स दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे, एक म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हर आणि दुसरा म्हणजे थर्ड पार्टी लायबिलिटी पॉलिसी. तुम्ही जर पहिला प्रकार घेतला असेल तर तुम्ही कार इन्शुरन्स एड-ऑन्स खरेदी करू शकता. ब्रेकडाऊन असिस्टंस, इंजिन आणि गिअर बॉक्स प्रोटेक्शन, टायर प्रोटेक्टिव्ह कव्हर, आणि झिरो डेप्रीसिएशन कव्हर या एड--ऑन्सची काही उदाहरणे आहेत.

ह्युंदाई ग्रँड आय10 निओस बद्दल आणखीन जाणून घ्या

तुम्ही रोज वरपत असणारी कार कॉम्पॅक्ट आणि सोयीची असणे कधीही सुखद असते. सर्व सेग्मेंट्समध्ये कार्स बनवणाऱ्या ह्युंदाई ने छोट्या आणि मोठ्या सर्व प्रकारच्या कार्स बनवल्या. ह्युंदाई ग्रँड आय10 भारतीय रस्त्यांवर धावण्यासाठी आणि ट्रॅफिकसाठी अगदी योग्य असेच एक मॉडेल आहे.

हे मॉडेल सध्या ह्युंदाई ग्रँड आय10 निओस या नावाने उपलब्ध आहे. कारचे इंजिन 1186 ते 1197 क्षमतेचे आहे. यामध्ये 5-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रांसमिशन गिअर बॉक्स आहे. ही फॅमिली कार पेट्रोल आणि डीझेल अशा दोन्ही फ्युएल टाईप्स मध्ये उपलब्ध आहे. 

छोटी असली तरी, ह्युंदाई ग्रँड आय10 निओसची किंमत रु. 5 लाखांपासून ते रु. 8 लाखांपर्यंत आहे. माईलेजचा विचार केला तर ही कार तुम्हाला एका लिटर मध्ये 20.5 किमी ते 26.2 किमी इतके उत्तम मायलेज देते.

चला तर ह्युंदाई ग्रँड आय10 निओस बद्दलच्या या माहिती शिवाय आणखीनही काही मुद्दे जाणून घेऊया.

ह्युंदाई ग्रँड आय10 निओस तुम्ही का खरेदी करावी?

ह्युंदाई ग्रँड आय10 निओस हे मॅन्युफॅक्चरर्सने अपडेट केलेले थर्ड जनरेशन मॉडेल आहे. त्यामुळे, तुम्ही जर छोट्या कार्स मध्ये एखादा अतुल्य पर्याय शोधात असाल तर यापेक्षा चांगला दुसरा पर्याय तुम्हाला मिळणार नाही. जरी कारचे स्पोर्टी लूक्स असले तरी याचे फीचर्स नक्कीच आकर्षक आहेत.

बहुतांश ग्राहक या कारला तिच्या लूक्स साठी म्हणजेच, कॅस्केडिंग ग्रील, एलईडी फ्रंट लाईट्स, आणि पुढील बाजूला असलेले फॉग लाईट्स यासाठी पसंत करतील. कारला एक स्पोर्टी लूक देण्यासाठी यामध्ये डायमंड-कट एलॉयज आणि हॅलोजन टेल लाईट्स दिलेले आहेत. ह्युंदाई ग्रँड आय10 निओस तुम्हाला आठ वेगवेगळ्या मेटल कलर्स जसे डूअल-टोन पेंट स्कीम ई. मध्ये उपलब्ध होईल.

ग्रे कलरच्या इंटिरियरमुळे कार आणखीनच आकर्षक वाटते परंतु 8 इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले बाजी पटकावतो. ह्युंदाईने कारमध्ये वायरलेस चार्जिंग पॉइंट्स देखील दिले आहेत व्हॉइस रिकग्नीशन सह ब्लूटूथ कनेक्टीव्हिटी देखील दिलेली आहे.

पुढच्या सीट्स उंचीप्रमाणे वर खाली करता येतात आणि मागच्या सीट्स पायांना चांगला आधार देतात. कारचे इंजिन रीफाइन केलेले आहे आणि बीएस-व्हीआय कम्पलायंट आहे. फक्त लूक्सच नाही तर ह्युंदाई ग्रँड आय10 निओसमध्ये ऑटोमॅटिक क्लायमेट कन्ट्रोल, रिव्हर्स कॅमेरा, स्मार्ट स्टार्ट/स्टॉप पुश बटण, आणि सुरक्षेसाठी एअरबॅग्स, यासारखे लक्षवेधी फीचर्स देखील आहेत. एकंदर तुम्ही ही कार खरेदी करण्याचा नक्कीच विचार करू शकता.

पहा: ह्युंदाई कार इन्शुरन्स बद्दल आणखीन जाणून घ्या

ह्युंदाई ग्रँड आय10 निओसचे व्हेरियंट्स

व्हेरियंटचे नाव व्हेरियंटची किंमत (नवी दिल्ली मध्ये, इतर शहरांमध्ये किंमत वेगळी असू शकते)
इरा ₹ 5.28 लाख
मॅग्ना ₹ 5.99 लाख
स्पोर्ट्झ ₹ 6.66 लाख
एएमटी मॅग्ना ₹ 6.67 लाख
स्पोर्ट्झ डूअल टोन 6.96 लाख
मॅग्ना सीएनजी ₹ 6.99 लाख
मॅग्ना सीआरडीआय ₹ 7.20 लाख
एएमटी स्पोर्ट्झ ₹ 7.27 लाख
मॅग्ना सीआरडीआय कॉर्प एडिशन ₹ 7.30 लाख
एस्टा ₹ 7.42 लाख
स्पोर्ट्झ सीएनजी ₹ 7.53 लाख
स्पोर्ट्झ सीआरडीआय ₹ 7.74 लाख
टर्बो स्पोर्ट्झ ₹ 7.87 लाख
एएमटी एस्टा ₹ 7.91 लाख
टर्बो स्पोर्ट्झ डूअल टोन ₹ 7.92 लाख
एएमटी स्पोर्ट्झ सीआरडीआय ₹ 8.35 लाख
एस्टा सीआरडीआय ₹ 8.50 लाख

[1]

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

झिरो-डेप्रीसिएशन एड-ऑन कव्हरचे कोणकोणते फायदे आहेत?

झिरो-डेप्रीसिएशन एड-ऑन कव्हर अंतर्गत इन्शुरर डेप्रीसिएशनची अमाउंट वजा नाही करत नाहीत. त्यामुळे, तुम्ही तुमच्या ह्युंदाई ग्रँड आय10 निओस कार इन्शुरन्सचा क्लेम फाईल केल्यावर तुम्हाला जास्त आर्थिक सुरक्षा मिळते.

टायर प्रोटेक्शन एड-ऑन कव्हर अंतर्गत काय कव्हर केले जात नाही?

टायर प्रोटेक्शन एड-ऑन कव्हर खालील मुद्दे कव्हर करत नाही:

पंक्चर आणि टायर रिपेअरचा खर्च

खालील कारणांमुळे झालेले नुकसान-

  1. रेसिंग आणि रॅलीज मध्ये बेशिस्तपणे कार चालवणे
  2. मॅन्युफॅक्चर करतानाच्या त्रुटी
  • अनधिकृत रिपेअर सेंटर मधून सेवा घेतल्यास
  • नीट देखरेख न केल्यामुळे आणि ट्रान्स्पोर्टेशन दरम्यान