भारतीय पासपोर्ट धारकांसाठी ई-व्हिजा देश
व्यवसाय, आनंद घेण्यासाठी, शिक्षण इत्यादींसाठी दररोज हजारो लोक देशाची सीमा ओलांडत प्रवास करतात. एखाद्या विशिष्ट देशात प्रवेश करण्यापूर्वी, तुमच्याकडे आवश्यक कागदपत्रांपैकी एक म्हणजे तुमचा व्हिजा. व्हिजा मिळवणे ही एक लांब आणि थकवणारी प्रक्रिया असू शकते. पण ई-व्हिजा सुरू झाल्यामुळे, आता तुम्ही तो जलद आणि सहजतेने मिळवू शकता!
ई-व्हिजा म्हणजे काय?
इलेक्ट्रॉनिक व्हिजा किंवा ई-व्हिजा हा डिजिटली स्वीकारलेला व्हिजा दस्तऐवज आहे, जो प्रवाशांना आगमनानंतर देशाच्या सीमा नियंत्रण कक्षात कागदपत्र सादर केल्यानंतर त्यांच्या गंतव्य देशात प्रवेश करण्यास अनुमती देतो. ई-व्हिजासाठी प्रवासी ऑनलाइन अर्ज भरू शकतात, आवश्यक कागदपत्रे अपलोड करू शकतात, आणि गंतव्य देशाच्या अधिकृत सरकारी वेबसाइटद्वारे व्हिजा शुल्क देखील भरू शकतात.
हेन्ली आणि पार्टनर्सच्या मार्च 2023 पर्येंतच्या पासपोर्ट निर्देशांकानुसार, भारतीय पासपोर्ट धारक पुढील देशांच्या यादीत ई-व्हिजासाठी अर्ज करू शकतात. सध्या, प्रवासाच्या स्वातंत्र्याच्या बाबतीत 'भारतीय पासपोर्ट' 84 व्या क्रमांकावर आहे.
मार्च 2023 पर्यंत भारतीय पासपोर्ट धारकांसाठी ई-व्हिजा देणार्या देशांची यादी पुढीलप्रमाणे आहे.
भारतीय पासपोर्ट धारकांसाठी ई-व्हिजा सुविधा देणाऱ्या देशांची यादी
1. अंगोला |
|
2. अँटिग्वा आणि बारबुडा |
15. मोल्दोव्हा |
16. मोरोक्को |
|
4. अझरबैजान |
|
5. बहरीन |
18. साओ टोमे आणि प्रिंसिपे |
6.बेनिन |
|
7. कोलंबिया |
20. सुरीनाम |
8. जिबूती |
21. तैवान |
9. जॉर्जिया |
22. ताजिकिस्तान |
10. केनिया |
|
24. उझबेकिस्तान |
|
12. किर्गिझस्तान |
|
13. लेसोथो |
26. झांबिया |
2023 मध्ये भारतीय नागरिकांसाठी व्हिजा-ऑन-अरायव्हल देशांची यादी
अनेक देश हे त्यांच्या देशात प्रवेश करणाऱ्या भारतीय पासपोर्टधारकांना व्हिजा-ऑन-अरायव्हल आणि ई-व्हिजा सुविधा देतात. सहसा, आगमनावर व्हिजा देण्यासाठी, इमिग्रेशन अधिकारी प्रवाशाचा पासपोर्ट, त्यांचे बायोमेट्रिक्स तपासतात, निर्धारित शुल्क घेतात, आणि त्यानंतर प्रवाशाने देशात प्रवेश केल्यानंतर व्हिजा परमिट जारी केला जातो. ऑन-अरायव्हल व्हिजा देशात प्रवेश करण्याच्या प्रमुख ठिकाणी जारी केला जातो.
खालील यादीमध्ये, 2023 मध्ये भारतीय नागरिकांना व्हिसा-ऑन-अरायव्हल प्रदान करणारे देश नमूद केले आहेत:
27. बोलिव्हिया |
44.मोझांबिक |
28. बोत्सवाना |
45. म्यानमार |
29. बुरुंडी |
46. पलाऊ बेटे |
30. कंबोडिया |
47. रवांडा |
31. केप वर्दे बेटे |
48. सामोआ |
32. कोमोरो बेटे |
|
33. इथिओपिया |
50. सिएरा लिओन |
34. गॅबॉन |
51. सोमालिया |
35. गिनी-बिसाऊ |
|
53.सेंट लुसिया |
|
37. इराण |
54. टांझानिया |
39. लाओस |
56. तिमोर-लेस्टे |
40. मादागास्कर |
57. टोगो |
58. तुवालू |
|
42. मार्शल बेटे |
59. युगांडा |
43. मॉरिटानिया |
60. झिम्बाब्वे |
2023 मध्ये भारतीय नागरिकांसाठी व्हिजा-फ्री देशांची यादी
व्हिजा-फ्री देश हे असे देश आहेत, ज्यांनी व्हिजाच्या आवश्यकतेशिवाय प्रवाशांना प्रवेश देण्यास परस्पर सहमती दर्शविली आहे. व्हिजा अर्जाचा त्रास न होता ओळखीचा पुरावा देणे आवश्यक आहे.
भारतीय नागरिक व्हिजा-मुक्त प्रवास करू शकतात, अशा देशांची यादी येथे आहे:
61. अल्बेनिया |
|
62. बार्बाडोस |
75. मायक्रोनेशिया |
76. मोन्सेरात |
|
64. ब्रिटिश व्हर्जिन बेटे |
|
65. कुक बेटे |
78. नियू |
66. डॉमिनिका |
|
67. अल साल्वाडोर |
|
68. फिजी |
81. सेनेगल |
69. ग्रेनेडा |
82. सेंट किट्स आणि नेव्हिस |
70. हैती |
83. सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्स |
71. जमैका |
84. त्रिनिदाद आणि टोबॅगो |
72. कझाकस्तान |
85. ट्युनिशिया |
73. मकाओ (एसएआर चीन) |
86. वानुआतू |
भारतीय नागरिकांसाठी ई-व्हिजासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत?
तुमचा भारतीय पासपोर्ट त्या विशिष्ट देशात ई-व्हिजासाठी पात्र असेल, तरच तुम्ही ई-व्हिजासाठी अर्ज करू शकता. काही देशांमध्ये अतिरिक्त पात्रता निकष देखील आहेत, त्याबाबत संबंधित वेबसाइटवर माहिती मिळेल.
ई-व्हिजा प्रणालीने प्रवाशांसाठी देशाच्या सीमेवर लागणारी प्रक्रिया वेगवान केली आहे. कारण ई-व्हिजा आधीच मंजूर झाला असतो. सीमेवर केवळ तुमच्याकडे आवश्यक कागदपत्रे आहेत, हे तपासण्यासाठी आणि तुमच्या पासपोर्टवर शिक्का मारण्यासाठी तुम्हाला फक्त इमिग्रेशन ऑफिसरची गरज असते.
काही मानक दस्तऐवज, जे तुम्हाला प्रदान करावे लागतील ते खाली नमूद केले आहेत:
• डिजिटल छायाचित्र
• परदेशात आल्याच्या तारखेपासून किमान सहा महिन्यांचा वैध पासपोर्ट.
• वैयक्तिक आणि प्रवास माहिती जसे की, प्रवास व्यवस्थेचा पुरावा, निवास, परतीचे तिकीट इ.
• ई-व्हिजा अर्जाचा फॉर्म
• ऑनलाइन पेमेंटची पावती
देशानुसार अतिरिक्त माहिती किंवा दस्तऐवजांची आवश्यकता असू शकते, त्यामुळे ई-व्हिजासाठी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत सरकारी वेबसाइट्स पूर्णपणे तपासणे आवश्यक आहे.
तुम्ही आंतरराष्ट्रीय सहलींसाठी ट्रॅव्हल इन्शुरन्स का खरेदी करावा?
ट्रॅव्हल इन्शुरन्स केवळ अपरिचित देशांमध्येच आर्थिक सुरक्षा प्रदान करत नाही, तर ते विविध कव्हरेज देखील प्रदान करते. बहुतेक प्रवासी चोरी किंवा सामान किंवा प्रवास दस्तऐवज हरवण्यासारख्या अनपेक्षित परिस्थितीत स्वतःचे आर्थिक संरक्षण करण्यासाठी ट्रॅव्हल इन्शुरन्स खरेदी करतात. तुम्हाला परदेशात उपचारांची आवश्यकता असल्यास ट्रॅव्हल इन्शुरन्स सर्वसमावेशक वैद्यकीय कव्हरेज देखील प्रदान करतो.
ट्रॅव्हल इन्शुरन्स पॉलिसीचे अनेक फायदे आहेत. त्यापैकी काही आहेत:
• वैद्यकीय इमर्जन्सीसाठी कव्हरेज - तुमच्या प्रवासादरम्यान, तुम्हाला आपत्कालीन वैद्यकीय सहाय्याची आवश्यकता असू शकते - एकतर अपघाती किंवा आजाराशी संबंधित. ट्रॅव्हल इन्शुरन्स पॉलिसी अशा प्रकरणांमध्ये तुमची हॉस्पिटलची बिले आणि उपचाराचा खर्च कव्हर करेल.
• ट्रिप रद्द करणे किंवा फ्लाइट विलंब - फ्लाइट विलंब, कनेक्शन चुकणे किंवा संपूर्ण ट्रिप रद्द करणे, यामुळे होणाऱ्या नुकसानाचा सुद्धा समावेश ट्रॅव्हल इन्शुरन्स पॉलिसी अंतर्गत समाविष्ट आहे.
• विलंब/बॅगेजचे नुकसान - तुम्ही तुमची सुट्टी सुरू होण्याची प्रतीक्षा करू शकत नाही, परंतु तुमचे चेक-इन केलेले सामान उशीरा आले तर? या परिस्थितीत, तुमची ट्रॅव्हल इन्शुरन्स पॉलिसी तुमच्या सामानाच्या विलंब किंवा तोट्यासाठी आर्थिक भरपाई देऊ शकते.
• वॉलेट हरवण्यापासून संरक्षण - तुमचे पाकीट हरवणे किंवा चोरी होणे, ही तुमच्या परदेशातील प्रवासादरम्यान उद्भवणाऱ्या सर्वात गंभीर समस्यांपैकी एक आहे. अशा परिस्थितीत अडकून पडू नये, म्हणून तुमची ट्रॅव्हल इन्शुरन्स पॉलिसी अशा आर्थिक आणीबाणीत कॅश प्रदान करते.
• विस्तारित किंवा सोडलेल्या सहलीसाठी कव्हर - संप, दंगली, नैसर्गिक आपत्ती आणि इतर धोकादायक घटनांच्या प्रसंगी, तुमच्या सहलीचा कालावधी बाधित होऊ शकतो. या स्ट्राइकसारख्या परिस्थिती तुम्ही तुमचा मुक्काम सोडू शकता किंवा वाढवू शकता. खर्चाची काळजी करू नका कारण तुमचा ट्रॅव्हल इन्शुरन्स रद्द किंवा विस्तारित सहलीचा कव्हर करतो.
• बाउन्स बुकिंग - तुम्ही तुमची सर्व निवास व्यवस्था आणि कार्यक्रमाची बुकिंग केली आहे. पण तिथे पोहोचल्यावर तुह्माला कळाले की, हॉटेल ओव्हरबुक झाले असून तुमचे बुकिंग बाउन्स झाले आहे. अशा निराशाजनक परिस्थितीत, बाऊन्स बुकिंग कव्हरसह ट्रॅव्हल इन्शुरन्स तुह्माला वाचवू शकतो!
त्यामुळे, तुम्हाला तुमचा प्रवास अधिक सुरक्षित बनवायचा असेल, आणि आर्थिक संरक्षणाची खात्री करायची असेल, तर अगदी सुरुवातीलाच आंतरराष्ट्रीय ट्रॅव्हल इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करणे उत्तम! यासंबंधी बाजारात अनेक योजना उपलब्ध आहेत. पण हा विमा घेण्यापूर्वी तुम्ही परवडणाऱ्या किमतीत सर्वोत्तम फायदे मिळवण्यासाठी प्र ट्रॅव्हल इन्शुरन्स पॉलिसी तुलना केली पाहिजे.
भारतीय पासपोर्ट धारकांसाठी ई-व्हिजा देशांबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न
भारतीय ई-व्हिजासाठी अर्ज करू शकतात का?
होय, भारतीय पासपोर्ट धारक ई-व्हिजासाठी अनेक देशांत अर्ज करू शकतात. ऑस्ट्रेलिया, कोलंबिया, जॉर्जिया, कुवेत, मोरोक्को, मलेशिया, रशिया, सिंगापूर इत्यादी देश भारतीयांना ई-व्हिजा सुविधा देतात.
भारतीयांसाठी ई-व्हिजा सुविधेसाठी अर्ज कसा करावा?
तुमची ई-व्हिजा अर्ज प्रक्रिया सुरू करण्यासाठी फक्त अधिकृत सरकारी वेबसाइटला भेट द्या. तुम्ही आवश्यक कागदपत्रे सबमिट करणे आवश्यक आहे. अर्ज भरणे आवश्यक आहे, आणि व्हिजा शुल्क ऑनलाइन भरणे आवश्यक आहे. चरण-दर-चरण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, तुम्हाला तुमच्या अर्जाची आणि तुमच्या दस्तऐवजाची पुष्टी करून ई-व्हिजा मंजूर झाल्यावर, तो तुम्ही दिलेल्या ई-मेलवर प्राप्त होईल.
किती देश भारतीयांसाठी ई-व्हिजा देतात?
मार्च 2023 च्या हेन्ली पासपोर्ट निर्देशांकानुसार, 26 देश आहेत जे भारतीय पासपोर्ट धारकांसाठी ई-व्हिजा देतात.
भारतीयांसाठी ई-व्हिजाची वैधता काय आहे?
ई-व्हिजाची वैधता देशानुसार भिन्न असते. तुम्ही 15-30 दिवस एखाद्या देशात राहू शकता, आणि तुमच्या भेटीचा कालावधी वाढवू शकता.
ऑन-अरायव्हल व्हिजा देणारे देश भारतीयांसाठी ई-व्हिजा देखील देतात का?
होय, अनेक देश भारतीय पासपोर्ट धारकांसाठी व्हिजा-ऑन-अरायव्हल तसेच ई-व्हिजा सुविधा प्रदान करतात. उदाहरणार्थ, मलेशिया, इथिओपिया, युगांडा, केप वर्दे, थायलंड इ. भारतीयांसाठी व्हिजा-ऑन-अरायव्हल आणि ई-व्हिजा दोन्ही पर्याय देतात. तुमच्या गंतव्य देशासाठी व्हिजा पर्यायांबद्दल अधिक समजून घेण्यासाठी तुम्ही अधिकृत सरकारी वेबसाइटवर जाऊ शकता.