इंटरनॅशनल ट्रॅव्हल इन्शुरन्स पॉलिसी ऑनलाइन खरेदी करा
Instant Policy, No Medical Check-ups

भारतीयांसाठी व्हिसा ऑन अरायव्हल असलेले देश

व्हिसा अर्जात अनेक अनिश्चितता असते, असे वाटल्यामुळे अनेक भारतीय परदेशात जाण्यास टाळाटाळ करतात, हे नाकारता येणार नाही. पण बरेच देश व्हिसा-ऑन-अरायव्हल किंवा ई-व्हिसा सुविधा देतात, जेणेकरून आपण परदेशात पोहोचल्यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रे पूर्ण करू शकता. मार्च 2023 पर्यंत हेन्ली पासपोर्ट इंडेक्सनुसार 60 देशांमध्ये तिथे प्रवास करणाऱ्या भारतीयांसाठी व्हिसा-ऑन-अरायव्हल आणि व्हिसा-फ्री ऑफर करण्यात आली आहे.

आपण आपल्या प्रियजनांसह भेट देत असलेल्या देशात निर्धोक प्रवेश मिळविण्यासाठी आपल्याला फक्त काही कागदपत्रे सादर करणे आणि ठराविक शुल्क भरणे आवश्यक आहे.

2023 मध्ये भारतीयांना व्हिसा ऑन अरायव्हल ऑफर करणारे देश

भारतीय नागरिकांना व्हिसा ऑन अरायव्हल देणारे सर्व देश खाली सूचीबद्ध आहेत:

1. मालदीव

मालदीव हा बेटावर असलेला देश समुद्राच्या पाण्याखालील साहसाच्या शोधात असलेल्या प्रवाशांसाठी एकदम परिपूर्ण गंतव्य स्थान आहे. आरामदायक समुद्रकिनारे, मजेशीर वॉटर स्पोर्ट्स आणि नेत्रदीपक सूर्यास्त, अशा  या उष्णकटिबंधीय स्वर्गात आपल्या आगमनाची वाट पाहत आहोत.

2. श्रीलंका

हिंदी महासागराचा मोती म्हणून ओळखले जाणारे हे बेट राष्ट्र मित्र किंवा कुटुंबियांच्या सहवासात आनंद घेण्यासाठी चांगला पर्याय आहे. भरपूर आकर्षक समुद्रकिनारे, उत्कृष्ट भोजन आणि समृद्ध सांस्कृतिक वारश्याचा अनुभव येथे येतो.

3. थायलँड

वर्षभर सुंदर हवामान, निसर्गसौंदर्य, मंदिरे, राजवाडे आणि समुद्रकिनारे यामुळे थायलंड भारतीय पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे.

4. इंडोनेशिया

इंडोनेशिया प्रत्येकासाठी लक्षवेधक आकर्षणे आणि अॅड्रेनालाईन-रशिंग अॅक्टिविटी ऑफर करते. जकार्ता, कोमोडो, बाली आणि पेनिडा सारख्या शहरांमध्ये बरेच काही पाहण्यासारखे आहे.

5. इराण

इराणमध्ये कला, साहित्य, कविता, पाककृती आणि वास्तुकला, डोळे दिपवणारी आकर्षणे आणि सर्वांसाठी अॅड्रेनालाईन-रशिंगचे उपक्रम यांचा समृद्ध सांस्कृतिक इतिहास आहे. जकार्ता, कोमोडो, बाली आणि पेनिडा सारख्या शहरांमध्ये बरेच काही पाहण्यासारखे आहे.

इराणला भेट देण्याची सर्वोत्तम वेळ - इराणला भेट देण्यासाठी मे ते सप्टेंबर हा सर्वोत्तम काळ आहे. यावेळी दिवस कोरडे, थंड आणि मैदानी साहसासाठी परिपूर्ण असतात.

भारतीयांना इराण व्हिसा

व्हिसाचा प्रकार - व्हिसा ऑन अरायव्हल

कालावधी - 90 दिवसांपर्यंत वैध.

किंमत – रु 5,400 (€60 किंवा $64*)

6. जॉर्डन

लाल समुद्र आणि मृत समुद्राजवळ असलेला जॉर्डन हा आणखी एक देश आहे, जो भारतीयांना व्हिसा ऑन अरायव्हल प्रदान करतो. जॉर्डनची नैसर्गिक आकर्षणे हे सुनिश्चित करतात की आपण थांबता, आणि गंतव्यस्थानाच्या प्रभावी इतिहासाबद्दल जाणून घेता.

जॉर्डनला भेट देण्याची सर्वोत्तम वेळ - या देशाला भेट देण्याची सर्वोत्तम वेळ वसंत ऋतूत म्हणजे मार्च ते मे दरम्यान आहे. येथे तापमान मध्यम ते थंड राहते, ज्यामुळे या देशामध्ये सहलीच्या ठिकाणांचा आरामात शोध घेता येतो.

भारतीयांना जॉर्डन व्हिसा

व्हिसाचा प्रकार - व्हिसा ऑन अरायव्हल

कालावधी - 30 दिवसांपर्यंत  

किंमत - $97

ट्रॅव्हल इन्शुरन्स कॉस्ट – डिजिटचा जॉर्डन ट्रॅव्हल इन्शुरन्स प्लॅन एका प्रौढ व्यक्तीसाठी रु 225 पासून सुरू होतो आणि $ 50,000 डॉलर्स पर्यंत कव्हरेज मिळते.

7. म्यानमार

म्यानमार हा दक्षिण आशियाच्या पश्चिमेला वसलेला एक छोटासा देश आहे. हा देश आपल्या नैसर्गिक ठेव्यामध्ये मानव निर्मित मंदिरे आणि वैविध्यपूर्ण संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे. उबदार सूर्यप्रकाशासह वसाहतवादाच्या खुणा दाखवणारे वास्तूशिल्प या देशाचे वैशिष्ट्य असून  वर्षाच्या कोणत्याही वेळी जगाच्या कानाकोपऱ्यातून येथे पर्यटक येत असतात. 

म्यानमारला भेट देण्याची सर्वोत्तम वेळ - म्यानमारला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ ऑक्टोबर ते फेब्रुवारी दरम्यान आहे. याकाळात तापमान थंड असते आणि पावसाची शक्यता कमी असते. ज्यामुळे या देशात भेट देण्याची ही योग्य वेळ असते.

भारतीयांना म्यानमार व्हिसा

व्हिसाचा प्रकार - व्हिसा ऑन अरायव्हल

कालावधी - 30 दिवसांपर्यंत 

किंमत - $ 50

8. कंबोडिया

कंबोडिया हा छोटासा देश असला तरी येथे पर्यटकांना बघण्यासारखे बरेच काही आहे. समृद्ध इतिहास आणि वारशापासून ते त्याच्या प्रभावी नैसर्गिक दृश्यांपर्यंत, हा देश जगभरातील लोकांसाठी एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे.

भेट देण्याची उत्तम वेळ - कंबोडियामध्ये नोव्हेंबर ते एप्रिल दरम्यान खूप कमी पाऊस पडतो. त्यामुळे पर्यटकांना आल्हाददायक हवामानाचा अनुभव घेता येतो, आणि विविध स्थळांना भेट देण्याचा आनंद घेता येतो.

भारतीयांना कंबोडिया व्हिसा

व्हिसाचा प्रकार - व्हिसा ऑन अरायव्हल

कालावधी - 30 दिवसांपर्यंत 

किंमत - $ 30

ट्रॅव्हल इन्शुरन्स किंमत - कंबोडिया ट्रॅव्हल इन्शुरन्स प्लॅन एका प्रौढ व्यक्तीसाठी रु 225 पासून सुरू होतो आणि $ 50,000 डॉलर्स पर्यंत कव्हरेज मिळते.

9. मादागास्कर

मादागास्कर एक उष्णकटिबंधीय स्वर्गासारखे गंतव्य स्थान आहे, जे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मनोरंजक वनस्पती आणि जीवांनी भरलेले आहे. जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे बेट असलेल्या मादागास्करमध्ये एक विस्तृत लँडस्केप आहे, जो परिपूर्ण सुट्टीचा आनंद देते.

मादागास्करला भेट देण्याची सर्वोत्तम वेळ- देशाला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ हा कोरडा, थंड हंगाम असणारा काळ म्हणजेच एप्रिल आणि ऑक्टोबर आहे. येथे तापमान मध्यम थंड राहते, आणि या काळात प्राणी (विशेषत: लेमर) अधिक सक्रिय असतात.

भारतीयांसाठी मादागास्कर व्हिसा

व्हिसाचा प्रकार - व्हिसा ऑन अरायव्हल

कालावधी - 30 दिवसांपर्यंत 

किंमत - सुमारे 115,000 ($ 37)

ट्रॅव्हल इन्शुरन्स कॉस्ट – डिजिटचा मादागास्कर ट्रॅव्हल इन्शुरन्स प्लॅन एका प्रौढ व्यक्तीसाठी रु 225 पासून सुरू होतो आणि $ 50,000 डॉलर्स पर्यंत कव्हरेज मिळते.

10. सेशेल्स

सेशेल्स हे 115 प्रवाळ आणि ग्रॅनाइट बेटांनी बनलेले प्रवाशांसाठी नंदनवन आहे. आपल्या प्रभावशाली समुद्रकिनारे आणि किनारपट्टी, रंगीबेरंगी लँडस्केप, आणि बेटांचा भव्य समूह याव्यतिरिक्त, हा देश दुर्मिळ वन्यजीव प्रजातींचे घर देखील आहे.

सेशेल्सला भेट देण्याची सर्वोत्तम वेळ: एप्रिल ते ऑक्टोबर - या महिन्यांत सेशेल्समधील थंड आणि तुलनेने कोरडे हवामान पर्यटकांसाठी आदर्श बनवते.

सेशेल्स व्हिसा भारतीयांसाठी

व्हिसाचा प्रकार - व्हिसा ऑन अरायव्हल

कालावधी - 3 महिन्यांपर्यंत वैध.

किंमत - विनामूल्य

ट्रॅव्हल इन्शुरन्स किंमत - एका प्रौढ व्यक्तीसाठी डिजिटचा सेशेल्स ट्रॅव्हल इन्शुरन्स प्लॅन रु 225 पासून सुरू होते आणि $ 50,000 डॉलर्स पर्यंत कव्हरेज मिळते.

11. इथियोपिया

इथिओपियामध्ये काहीतरी नवीन आणि अनोखे अनुभवता येते. हॉर्न ऑफ आफ्रिका मध्ये स्थित, हा खंडातील 10 वा सर्वात मोठा देश आहे, आणि तेथील उच्च-गुणवत्तेची कॉफी, अविश्वसनीय प्राचीन संस्कृती आणि नयनरम्य लँडस्केपसाठी प्रसिद्ध आहेत.

इथिओपियाला भेट देण्याची सर्वोत्तम वेळ - इथिओपियाला भेट देण्यासाठी कोरडा हंगाम सुरू झाल्यानंतर म्हणजेच सप्टेंबर ते मार्च हा सर्वोत्तम काळ आहे. येथे तापमान मध्यम असते, आणि कमी पाऊस पडतो. यामुळे ट्रेकिंग आणि वन्यजीव पाहण्यासाठी ही वेळ योग्य ठरते.

भारतीयांसाठी इथिओपिया व्हिसा

व्हिसाचा प्रकार - व्हिसा-ऑन-अरायव्हल / ई-व्हिसा

कालावधी - 30 दिवसांपर्यंत 

किंमत - $82

ट्रॅव्हल इन्शुरन्स किंमत - एका प्रौढ व्यक्तीसाठी डिजिटचा इथियोपिया ट्रॅव्हल इन्शुरन्स प्लॅन रु 225 पासून सुरू होते आणि $ 50,000 डॉलर्स पर्यंत कव्हरेज मिळते.

12. टांझानिया

जर आपण टांझानियाबद्दल ऐकले असेल, तर आपण कदाचित पूर्व आफ्रिका खंडातील प्रसिद्ध बर्फाच्छादित माउंट किलिमंजारोबद्दल ऐकले असेलच. नैसर्गिक आकर्षण, आकर्षक समुद्रकिनारे, वन्यजीव, पुरातत्त्वीय स्थळे आणि प्राचीन शहरांसाठी मोठ्या प्रमाणात ओळखला जाणारा टांझानिया हा एक असा देश आहे, ज्याला आपण अवश्य भेट दिली पाहिजे!

टांझानियाला भेट देण्याची सर्वोत्तम वेळ - जून ते ऑक्टोबर हा टांझानियाला भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ आहे. कोरडा ऋतू, स्वच्छ आकाशासह, आपल्याला मोठ्या स्थलांतराची साक्ष असलेले नदी ओलांडण्याची जागा पाहण्याचा अनुभव याकाळात मिळतो. 

भारतीयांसाठी टांझानिया व्हिसा

व्हिसाचा प्रकार - व्हिसा ऑन अरायव्हल

कालावधी - 30 दिवसांपर्यंत 

किंमत - $50

ट्रॅव्हल इन्शुरन्स कॉस्ट - एका प्रौढ व्यक्तीसाठी डिजिटचा टांझानिया ट्रॅव्हल इन्शुरन्स प्लॅन रु 225 पासून सुरू होतो आणि $ 50,000 डॉलर्स पर्यंत कव्हरेज मिळते.

13. झिम्बाब्वे

झिम्बाब्वेमध्ये मनमोहक संस्कृती, निसर्गरम्य लँडस्केप, प्राचीन इतिहास आणि वास्तुकला असं बरेच काही वर्षभर पर्यटकांना आकर्षित करीत असते.

झिम्बाब्वेला भेट देण्याची सर्वोत्तम वेळ - झिम्बाब्वेला भेट देण्यासाठी मे ते ऑक्टोबर हा सर्वोत्तम काळ आहे. कोरड्या तापमानामुळे लँडस्केप आणि प्राणी पाहण्याचा चांगला अनुभव मिळतो.

झिम्बाब्वेचा भारतीयांसाठी व्हिसा

व्हिसाचा प्रकार - व्हिसा ऑन अरायव्हल

कालावधी - 30 दिवसांपर्यंत 

किंमत - $ 30

ट्रॅव्हल इन्शुरन्स कॉस्ट – डिजिटचा झिम्बाब्वे ट्रॅव्हल प्लॅन एका प्रौढ व्यक्तीसाठी रु 225 पासून सुरू होते आणि $ 50,000 डॉलर्स पर्यंत कव्हरेज मिळते.

14. युगांडा

आफ्रिकेचा मोती युगांडाला भेट द्या, आणि परदेशी प्राण्यांच्या प्रजातींपासून सरोवरे, धबधबे, पर्वत तसेच सांस्कृतिक स्थळांपर्यंत वैविध्यपूर्ण नैसर्गिक लँडस्केपचा शोध घ्या.

युगांडाला भेट देण्याची सर्वोत्तम वेळ - युगांडाला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ डिसेंबर ते फेब्रुवारी आणि जून ते ऑगस्ट दरम्यान आहे. हे महिने कोरड्या तापमानाचे असतात, व मैदानी अॅक्टिविटीसाठी ही एक उत्तम वेळ आहे.

भारतीयांना युगांडा व्हिसा

व्हिसाचा प्रकार - व्हिसा-ऑन-अरायव्हल / ई-व्हिसा

कालावधी - 30 दिवसांपर्यंत 

किंमत - $ 50

15. लाओस

दक्षिण-पूर्व आशियाचे शांत हृदय म्हणून ओळखले जाणारे लाओस एक सौंदर्याने नटलेला देश आहे. ज्याचा अंतरंगात अजून बरेच दडलेले आहे. लाओस देशाला भेट दिलेले पर्यटक समृद्ध इतिहास, चालीरीती आणि लँडस्केप आणि संस्कृतीच्या वैविधतेने मोहित होतात.

लाओसला भेट देण्याची सर्वोत्तम वेळ - लाओसला भेट देण्याची सर्वोत्तम वेळ ऑक्टोबर ते एप्रिल दरम्यान कोरड्या हिवाळ्याच्या महिन्यांत आहे.

भारतीयांना लाओस व्हिसा

व्हिसाचा प्रकार - व्हिसा ऑन अरायव्हल

कालावधी - 30 दिवसांपर्यंत 

किंमत - $40

ट्रॅव्हल इन्शुरन्स कॉस्ट - एका प्रौढ व्यक्तीसाठी डिजिटचा लाओस ट्रॅव्हल इन्शुरन्स प्लॅन रु 225 पासून सुरू होतो आणि $ 50,000 डॉलर्स पर्यंत कव्हरेज मिळते.

16. सोमालिया

सोमालिया हे छोटेखानी, चहू बाजूंनी इतर देशांनी वेढलेले राष्ट्र सामरिकदृष्ट्या हॉर्न ऑफ आफ्रिका मध्ये वसलेले आहे. पर्वत, टेकड्या आणि अर्ध-वाळवंट हे लँडस्केप बनवतात. हा देश कवींचे राष्ट्र म्हणून सुद्धा ओळखला जातो. 

सोमालियाला भेट देण्याची सर्वोत्तम वेळ - सोमालियाला भेट देण्याची सर्वोत्तम वेळ हिवाळ्यात, म्हणजे ऑक्टोबरच्या मध्यापासून फेब्रुवारीपर्यंत असते.

भारतीयांना सोमालिया व्हिसा

व्हिसाचा प्रकार - व्हिसा ऑन अरायव्हल

कालावधी - 30 दिवसांपर्यंत

किंमत - 40 डॉलर

17. बोलिव्हिया

मध्य दक्षिण अमेरिकेतील बोलिव्हिया या देशात पर्यटकांसाठी अनेक आकर्षणे आहेत. देशात सहा जागतिक वारसा स्थळे आहेत. याव्यतिरिक्त, देशात अनेक नेत्रदीपक उंच प्रदेश आणि सखल प्रदेश आहेत जे ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहेत.

बोलिव्हियाला भेट देण्याची सर्वोत्तम वेळ - बोलिव्हियाला भेट देण्याची सर्वोत्तम वेळ एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान आहे. कोरडे हवामान, निळेशार आकाश असताना विविध ठिकाणे शोधण्याचा आनंद घेता येतो. 

बोलिव्हिया व्हिसा भारतीयांसाठी

व्हिसाचा प्रकार - व्हिसा ऑन अरायव्हल

कालावधी - 30 दिवसांपर्यंत

किंमत - $60*

ट्रॅव्हल इन्शुरन्स कॉस्ट - एका प्रौढ व्यक्तीसाठी डिजिटचा बोलिव्हिया ट्रॅव्हल इन्शुरन्स प्लॅन रु 225 पासून सुरू होतो आणि $ 50,000 डॉलर्स पर्यंत कव्हरेज मिळते.

18. बोत्स्वाना

बोत्स्वाना हे आफ्रिकन देशांनी चहू बाजूंनी वेढलेले राष्ट्र जगातील काही सर्वोत्तम अरण्य प्रदेशांसाठी प्रसिद्ध आहे. देशाच्या अनेक प्रदेशांमध्ये प्रवास केल्यावर आपण एका विशाल नैसर्गिक आश्चर्य भूमीतून जात आहोत, असा आभास होतो.

बोत्स्वानाला भेट देण्याची सर्वोत्तम वेळ - कोरडा हंगाम मे ते ऑक्टोबर पर्यंत असतो, बोत्स्वानाला भेट देण्यासाठी हा आदर्श काळ आहे. कारण आपण लख्ख सूर्यप्रकाश आणि थंड रात्री अनुभवू शकता.

भारतीयांसाठी बोत्स्वाना व्हिसा

व्हिसाचा प्रकार - व्हिसा ऑन अरायव्हल

कालावधी - 30 दिवसांपर्यंत

किंमत – बी.डब्ल्यू.पी 300 ($30)

ट्रॅव्हल इन्शुरन्स कॉस्ट - एका प्रौढ व्यक्तीसाठी डिजिटचा बोत्स्वाना ट्रॅव्हल इन्शुरन्स प्लॅन रु 225 पासून सुरू होतो आणि $ 50,000 डॉलर्स पर्यंत कव्हरेज मिळते.

19. बुरुंडी

बुरुंडी हा मध्य आफ्रिकेतील देशांनी चहू बाजूंनी वेढलेले राष्ट्र आहे, जो त्याच्या नैऋत्य दिशेला टांगानिका सरोवराच्या सीमेवर आहे. कॉफी आणि चहाप्रमाणेच त्याचे आदरातिथ्यही पौराणिक आहे. देशातील सर्वात प्रसिद्ध वैशिष्ट्य, राखीव वनक्षेत्र आणि राष्ट्रीय उद्यानांची संख्या आहे. येथे अवश्य भेट द्या.

बुरुंडीला भेट देण्याची सर्वोत्तम वेळ - बुरुंडीला भेट देण्यासाठी जानेवारी, फेब्रुवारी आणि मे ते ऑक्टोबर हा सर्वोत्तम काळ आहे. आपण या काळात चांगले तापमान आणि कमी पावसाचा आनंद घेऊ शकता.

भारतीयांना बुरुंडी व्हिसा

व्हिसाचा प्रकार - व्हिसा ऑन अरायव्हल

कालावधी - 90 दिवसांपर्यंत

किंमत - $90

20. मोझांबिक

मोझांबिक हा दक्षिण आफ्रिकेतील एक देश आहे, ज्याला हिंदी महासागराचा लांब समुद्रकिनारा आहे. हा देश टोफो आणि ऑफशोअर मरीन पार्कसारख्या सुप्रसिद्ध बीचेसनी नटलेला आहे.

मोझांबिकला भेट देण्याची सर्वोत्तम वेळ - कोरडा हंगाम, म्हणजे जून ते सप्टेंबर हा मोझांबिकला भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो. हा पर्यटनाचा पीक सीझन आहे.

भारतीयांसाठी मोझांबिक व्हिसा

व्हिसाचा प्रकार - व्हिसा ऑन अरायव्हल

कालावधी - 30 दिवसांपर्यंत

किंमत - $ 50

ट्रॅव्हल इन्शुरन्स कॉस्ट – डिजिटचा एका प्रौढ व्यक्तीसाठी मोझांबिक ट्रॅव्हल इन्शुरन्स प्लॅन रु 225 पासून सुरू होतो आणि $ 50,000 डॉलर्स पर्यंत कव्हरेज मिळते.

21. रवांडा

हजार टेकड्यांचा देश म्हणून ओळखला जाणारा, रवांडातील चित्तथरारक लँडस्केप आणि स्थानिकांचे स्वागत एक अविस्मरणीय अनुभव देऊन जाते. हा देश उल्लेखनीय जैवविविधता आणि अविश्वसनीय वन्यजीवांनी संपन्न आहे. ज्यात ज्वालामुखी, उंच रेनफॉरेस्ट आणि विस्तृत मैदानांचा समावेश आहे.

रवांडाला भेट देण्याची सर्वोत्तम वेळ - रवांडाला भेट देण्यासाठी जून ते सप्टेंबर हा पर्वतीय गोरिलाची एक झलक पाहण्यासाठी आणि मार्च ते मे आणि नोव्हेंबर हा सर्वोत्तम काळ आहे. जो चिंपांझी पाहण्यासाठी योग्य वेळ आहे.

भारतीयांसाठी रवांडा व्हिसा

व्हिसाचा प्रकार - व्हिसा ऑन अरायव्हल

कालावधी - 30 दिवसांपर्यंत

किंमत - $50

ट्रॅव्हल इन्शुरन्स किंमत – डिजिटचा एका प्रौढ व्यक्तीसाठी मोझांबिक ट्रॅव्हल इन्शुरन्स प्लॅन रु 225 पासून सुरू होतो आणि $ 50,000 डॉलर्स पर्यंत कव्हरेज मिळते

22. मॉरिटानिया

मॉरिटानिया हा वायव्य आफ्रिकेतला एक सार्वभौम देश असून वाळवंट व महासागराचा देश आहे. अटलांटिक किनाऱ्याचा जागतिक वारसा-सूचीबद्ध कारवान शहरांसह सहारन अद्रर प्रदेश एक सुंदर दृश्य आहे. पार्क नॅशनल डू बॅन्क डी'आर्गुइन येथे किनारपट्टीवर लाखो स्थलांतरित पक्षी विहार करताना आपल्याला या देशात दिसतात. 

मॉरिटानियाला भेट देण्याची सर्वोत्तम वेळ - मॉरिटानियाला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे जुलै ते सप्टेंबर. पावसाचे संकेत मिळाल्यामुळे तापमान तुलनेने थंड असते.

मॉरिटानिया व्हिसा भारतीयांसाठी

व्हिसाचा प्रकार - व्हिसा ऑन अरायव्हल

कालावधी - 90 दिवसांपर्यंत  

किंमत - €95 ($100*)

ट्रॅव्हल इन्शुरन्स किंमत- एका प्रौढ व्यक्तीसाठी डिजिटचा मॉरिटानिया ट्रॅव्हल इन्शुरन्स प्लॅन योजना रु 225 पासून सुरू होतो आणि $ 50,000 डॉलर्स पर्यंत कव्हरेज मिळते.

23. गॅबॉन

गॅबॉनच्या खोल रेनफॉरेस्ट आणि विस्तीर्ण गवताळ प्रदेशात निसर्गप्रेमींना भुरळ घालणारे विविध प्रकारचे प्राणी आहेत. अप्रतिम पांढऱ्या वाळूचे समुद्रकिनारे, वाहत्या नद्या आणि इथरिय लँडस्केप्स आफ्रिकेच्या या अनोळखी भागाला ईडनसारखा प्रवासाचा अनुभव देतात.

गॅबॉनला भेट देण्याची सर्वोत्तम वेळ - मे ते सप्टेंबर हा कोरडा हंगाम गॅबॉनला भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ आहे.

भारतीयांसाठी गॅबॉन व्हिसा

व्हिसाचा प्रकार - व्हिसा ऑन अरायव्हल

कालावधी - 90 दिवसांपर्यंत

किंमत- सी.एफ.ए 45,000 ($75*)

ट्रॅव्हल इन्शुरन्स किंमत - एका प्रौढ व्यक्तीसाठी डिजिटचा गॅबॉन ट्रॅव्हल इन्शुरन्स प्लॅन रु 225 पासून सुरू होतो आणि $ 50,000 डॉलर्स पर्यंत कव्हरेज मिळते.

24. सामोआ

सामोआ हा दक्षिण पॅसिफिकच्या मध्यभागी असलेला बेटांचा एक छोटासा देश आहे. हा नऊ बेटांचा समूह आहे, त्यापैकी चार सध्या वसलेले आहेत, आणि न्यूझीलंड ते हवाई दरम्यानच्या अर्ध्या अंतरावर स्थित आहेत. येथील दयाळू लोक आणि आश्चर्यकारक दृश्यांमुळे सामोआ निःसंशयपणे पृथ्वीवरील एक नंदनवन आहे.

सामोआला भेट देण्याची सर्वोत्तम वेळ - समोआला भेट देण्यासाठी जून ते सप्टेंबर हा सर्वोत्तम काळ आहे. उष्णकटिबंधीय बेट वर्षभर पर्यटकांचे स्वागत करते. परंतु कोरड्या हंगामात बेटांना एक्सप्लोर करण्यासाठी येथे चांगले हवामान आहे.

भारतीयांसाठी सामोआ व्हिसा

व्हिसाचा प्रकार - व्हिसा-ऑन-अरायव्हल / व्हिजिटर परमिट

कालावधी - 90 दिवसांपर्यंत

ट्रॅव्हल इन्शुरन्स किंमत - एका प्रौढ व्यक्तीसाठी डिजिटचा समोआ ट्रॅव्हल इन्शुरन्स प्लॅन रु 225 पासून सुरू होतो आणि $ 50,000 डॉलर्स पर्यंत कव्हरेज मिळते.

25. सिएरा लिओन

पश्चिम आफ्रिकेतील सिएरा लिओन हा एक आश्चर्यकारक स्वर्ग मानला जातो, जिथे पर्यटक मैदानी साहसी खेळांमध्ये भाग घेतात, आणि आश्चर्यकारक वातावरण व येथे दिसणाऱ्या प्राण्यांचे कौतुक करतात. ट्रान्साटलांटिक गुलामांच्या व्यापाराच्या इतिहासातही याला विशेष महत्त्व आहे.

सिएरा लिओनला भेट देण्याची सर्वोत्तम वेळ - नोव्हेंबर ते एप्रिल पर्यंत चालणारा कोरडा हंगाम हा सिएरा लिओनला भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ आहे. कारण रस्ते वाहतुकीयोग्य असतात, आणि समुद्र किनाऱ्यावर सहली साठी व वन्यजीवांना पाहण्यासाठी हवामान चांगले असते. 

भारतीयांना सिएरा लिओन व्हिसा

व्हिसाचा प्रकार - व्हिसा ऑन अरायव्हल

कालावधी - 30 दिवसांपर्यंत

किंमत - $80

ट्रॅव्हल इन्शुरन्स किंमत - एका प्रौढ व्यक्तीसाठी डिजिटचा सिएरा लिओन ट्रॅव्हल इन्शुरन्स प्लॅन रु 225 पासून सुरू होतो आणि $ 50,000 डॉलर्स पर्यंत कव्हरेज मिळते.

26. टोगो

गिनीच्या आखातावर वसलेला पश्चिम आफ्रिकेतील टोगो हा देश डोंगरमाथ्यावरील समुदाय आणि पामरेषा असलेल्या समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. अनोळखी मार्गांचा आनंद घेणाऱ्या व्यक्तींसाठी ही एक अद्भुत संधी आहे.

टोगोला भेट देण्याची सर्वोत्तम वेळ - टोगोला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे नोव्हेंबर ते एप्रिल. हे महिने कोरड्या हिवाळ्याचा हंगाम असतात, जिथे कमी पावसासह तापमान थंड असते.

भारतीयांसाठी टोगो व्हिसा

व्हिसाचा प्रकार - व्हिसा ऑन अरायव्हल

कालावधी – 90 दिवसांपर्यंत

किंमत- $25*

ट्रॅव्हल इन्शुरन्स किंमत- एका प्रौढ व्यक्तीसाठी डिजिटचा सिएरा लिओन ट्रॅव्हल इन्शुरन्स प्लॅन रु 225 पासून सुरू होतो आणि $ 50,000 डॉलर्स पर्यंत कव्हरेज मिळते.

27. तिमोर-लेस्ते

पूर्व तिमोर किंवा तिमोर-लेस्ते हा आग्नेय आशियातील एक देश आहे, जो तिमोर बेटाचा अर्धा भाग व्यापतो. सागरी जीवसृष्टीने नटलेले प्रवाळभिंती देशाला वेढतात. एक आश्चर्यकारक आणि नवीन पर्यटन स्थळ, तिमोर-लेस्ते एक विशिष्ट सांस्कृतिक अनुभव प्रदान करते.

तिमोर-लेस्तेला भेट देण्याची सर्वोत्तम वेळ - सर्वात कोरडा महिना, अर्थात मे ते ऑक्टोबर हा तिमोर-लेस्तेला भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ आहे. कारण या महिन्यांत पावसाचे दिवस कमी आणि आर्द्रता कमी असते.

भारतीयांसाठी तिमोर-लेस्ते व्हिसा

व्हिसाचा प्रकार - व्हिसा ऑन अरायव्हल

कालावधी - 30 दिवसांपर्यंत  

किंमत- $30

28. तुवालु

तुवालू हे पॅसिफिक च्या किनाऱ्यावरील एक स्वतंत्र बेट राष्ट्र आहे. हे सर्वात लहान व सर्वात दुर्गम ठिकाणांपैकी एक आहे, जे विश्रांती घेण्यासाठी, दैनंदिन धावपळीपासून दूर जाण्यासाठी तसेच सागरी वातावरण, निसर्ग व संस्कृतीमध्ये रमण्यासाठी एक परिपूर्ण गंतव्य स्थान आहे.

तुवालूला भेट देण्याची उत्तम वेळ – तुवालूला भेट देण्याचा उत्तम काळ म्हणजे जून ते ऑक्टोबर. तुवालूमध्ये सुखद उष्णकटिबंधीय हवामान आहे, समुद्र आणि बेटं एक्सप्लोर करण्यासाठी हे आदर्श ठिकाण आहे.

भारतीयांसाठी तुवालू व्हिसा

व्हिसाचा प्रकार - व्हिसा ऑन अरायव्हल

कालावधी – 30 दिवसांपर्यंत

किंमत – ए.यू.डी 100 ($67*)

ट्रॅव्हल इन्शुरन्स किंमत – एका प्रौढ व्यक्तीसाठी डिजिटचा सिएरा लिओन ट्रॅव्हल इन्शुरन्स प्लॅन रु 225 पासून सुरू होतो आणि $ 50,000 डॉलर्स पर्यंत कव्हरेज मिळते.

29. सेंट लूसिया

सेंट लुसिया हे कॅरिबियन समुद्रातील एक बेट राज्य आहे. हे बेट साहस आणि प्रेरणा देणारे आहे. सेंट लुसिया आपल्या सुखद लाटा, उबदार समुद्रकिनारे आणि आतिथ्यशील लोकांसह त्यांच्या किनारपट्टीवर पाऊल ठेवणाऱ्या कोणालाही आकर्षित करते.

सेंट लुसियाला भेट देण्याची सर्वोत्तम वेळ - सेंट लुसियाला भेट देण्याची सर्वोत्तम वेळ डिसेंबर ते एप्रिल आहे. वसंत ऋतूच्या उत्तरार्धात, उन्हाळ्याच्या सुरुवातीचे महिने पर्यटकांसाठी परिपूर्ण परिस्थिती निर्माण करतात.

भारतीयांना सेंट लुसिया व्हिसा

व्हिसाचा प्रकार - व्हिसा ऑन अरायव्हल

कालावधी – 42 दिवस

किंमत – ई.सी $125 ($46*)

ट्रॅव्हल इन्शुरन्स किंमत- एका प्रौढ व्यक्तीसाठी डिजिटचा सिएरा लिओन ट्रॅव्हल इन्शुरन्स प्लॅन रु 225 पासून सुरू होतो आणि $ 50,000 डॉलर्स पर्यंत कव्हरेज मिळते.

30. मार्शल द्वीप समूह

प्रशांत महासागराच्या मध्यभागी मार्शल बेटांचे प्रजासत्ताक आहे. हे जगातील सर्वात कमी वर्दळीचे ठिकाणांपैकी एक आहे, ज्याला अजून खूप एक्स्पलोर झालेले नाही. हे बेट प्राचीन, शांत समुद्रकिनारे आणि स्फटिक स्वच्छ पाण्यासह निसर्गाला आपल्या पर्यंत पोहोचवते.

मार्शल बेटांना भेट देण्याची सर्वोत्तम वेळ - मार्शल बेटांना भेट देण्यासाठी जानेवारी ते एप्रिल हा सर्वोत्तम काळ आहे. या उष्णकटिबंधीय प्रदेशातील कोरडा हंगाम या महिन्यांत परिपूर्ण हवामानाची स्थिती निर्माण करतो.

भारतीयांसाठी मार्शल आयलँड व्हिसा

व्हिसाचा प्रकार - व्हिसा ऑन अरायव्हल

कालावधी – 30 दिवसांपर्यंत

किंमत - $100

ट्रॅव्हल इन्शुरन्स किंमत- एका प्रौढ व्यक्तीसाठी डिजिटचा सिएरा लिओन ट्रॅव्हल इन्शुरन्स प्लॅन रु 225 पासून सुरू होतो आणि $50,000 डॉलर्स पर्यंत कव्हरेज मिळते.

31. गिनी-बिसाऊ

सेनेगल आणि गिनीच्या मध्ये वसलेला हा पूर्वी पोर्तुगीजांचे राज्य असलेला प्रदेश त्याची सांस्कृतिक समृद्धी, जैवविविधता आणि वन्यजीवांसाठी ओळखला जातो. खाऱ्या पाण्यातील हिप्पो आणि पवित्र वीधींसह विचित्र आकर्षणे असलेल्या 80 बेटांचा समूह असलेला बिजागोस बेटं गिनी-बिसाऊचा मुकुटरत्न आहे.

गिनी-बिसाऊला भेट देण्याची सर्वोत्तम वेळ - उबदार, दमट परंतु कोरड्या हवामानामुळे गिनी-बिसाऊला भेट देण्यासाठी नोव्हेंबर ते एप्रिल हे सर्वोत्तम महिने आहेत.

भारतीयांसाठी गिनी-बिसाऊ व्हिसा

व्हिसाचा प्रकार - व्हिसा ऑन अरायव्हल

कालावधी – 30 दिवसांपर्यंत

किंमत – जी.एन.एफ 900,000 ($100)

ट्रॅव्हल इन्शुरन्स किंमत- एका प्रौढ व्यक्तीसाठी डिजिटचा सिएरा लिओन ट्रॅव्हल इन्शुरन्स प्लॅन रु 225 पासून सुरू होतो आणि $50,000 डॉलर्स पर्यंत कव्हरेज मिळते.

32. केप व्हर्दे बेटं

पोर्तुगीज संशोधकांनी 1460 मध्ये काबो व्हर्दे किंवा केप व्हर्दे या द्वीपसमूहाचा शोध लावला. येथे जरी पाच शतकांचा पोर्तुगीज वसाहतवादाचा खोल प्रभाव असला, तरी आफ्रिकन परंपरा आणि क्रिओल अस्मिता त्यांच्या साहित्यिक व संगीत कृतींमध्ये ठामपणे मांडली जाते.

केप व्हर्दे बेटांना भेट देण्याची सर्वोत्तम वेळ - वर्षभर मध्यम तापमानासह, नोव्हेंबर ते जून हा महिना केप व्हर्देला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ आहे.

भारतीयांसाठी केप व्हर्डे बेटांचा व्हिसा

व्हिसाचा प्रकार - व्हिसा-ऑन-अराइव्हल/ ई-व्हिसा

कालावधी- 60 दिवस / 30 दिवस

किंमत- €22.67 ($25*)

ट्रॅव्हल इन्शुरन्स किंमत - एका प्रौढ व्यक्तीसाठी डिजिटचा सिएरा लिओन ट्रॅव्हल इन्शुरन्स प्लॅन रु 225 पासून सुरू होतो आणि $50,000 डॉलर्स पर्यंत कव्हरेज मिळते.

33. कोमोरो बेटं

मोझांबिक आणि मादागास्कर च्या दरम्यान वसलेल्या कोमोरो बेटांवर संस्कृती, मनमोहक देखावे, प्राचीन समुद्रकिनारे आणि वन्यजीवांचे आकर्षक मिश्रण आहे.

कोमोरो बेटांना भेट देण्याची सर्वोत्तम वेळ - कोमोरो बेटांना भेट देण्यासाठी एप्रिल ते नोव्हेंबर हा सर्वोत्तम काळ आहे. वर्षभर उष्णकटिबंधीय हवामानाचा अनुभव घेता येत असला तरी हे महिने कोरडे व थंड तापमान घेऊन येतात.

भारतीयांसाठी कोमोरो बेटांचा व्हिसा

व्हिसाचा प्रकार - व्हिसा ऑन अरायव्हल

कालावधी - 45 दिवसांपर्यंत

किंमत – के.एम.एफ 15,000 ($32*)

ट्रॅव्हल इन्शुरन्स कॉस्ट - एका प्रौढ व्यक्तीसाठी डिजिटचा कोमोरो बेटाचा ट्रॅव्हल इन्शुरन्स प्लॅन रु 225 पासून सुरू होतो आणि $50,000 डॉलर्स पर्यंत कव्हरेज मिळते.

34. पलाऊ बेटं

500 बेटांचा द्वीपसमूह असलेला पलाऊ हा पश्चिम पॅसिफिक महासागरातील मायक्रोनेशिया प्रदेशाचा एक भाग आहे. पर्यटनाच्या दृष्टीने देशात स्कूबा डायव्हिंग आणि स्नॉर्केलिंगच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.

पलाऊला भेट देण्याची सर्वोत्तम वेळ - पलाऊला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ जून ते ऑगस्ट दरम्यान आहे. वर्षाच्या या काळात तापमान मध्यम असते, व देशाचा शोध घेणे सुखद असते.

भारतीयांसाठी पलाऊ व्हिसा

व्हिसाचा प्रकार - व्हिसा ऑन अरायव्हल

कालावधी – 30 दिवस

किंमत - $50

ट्रॅव्हल इन्शुरन्स किंमत - एका प्रौढ व्यक्तीसाठी डिजिटचा पलाऊ बेट ट्रॅव्हल इन्शुरन्स प्लॅन रु 225 पासून सुरू होतो आणि $50,000 डॉलर्स पर्यंत कव्हरेज मिळते.

2023 मध्ये भारतीय नागरिकांसाठी व्हिसा-मुक्त देशांची यादी

व्हिसामुक्त प्रवास म्हणजे व्हिसा न घेता एखाद्या देशात जाण्याचा फायदा. खाली, आम्ही अशा देशांची यादी दिली केली आहे, जिथे भारतीय व्हिसा मुक्त प्रवास करू शकतात:

35. अल्बानिया

48. मॉरिशस

36. बार्बाडोस

49. माइक्रोनेशिया

37. भूटान

50. मोंटसेराट

38. ब्रिटिश वर्जिन बेटं

51. नेपाळ

39. कुक बेटं

52. नियू

40. डोमिनिका

53. ओमान

41. एल साल्वाडोर

54. कतार

42. फिजी

55. सेनेगल

43. ग्रेनाडा

56. सेंट किट्स एंड नेविस

44. हैती

57. सेंट विन्सेंट और ग्रेनेडाइन

45. जमैका

58. त्रिनिदाद आणि टोबॅगो

46. कझाकस्तान

59. ट्युनिशिया

47. मकाओ (एस.ए.आर चीन)

60. वानुआतू

2023 मध्ये भारतीय नागरिकांना ई-व्हिसा / प्रवेश परमिट देणाऱ्या देशांची यादी

ई-व्हिसा हा एखाद्या देशाच्या दूतावासाद्वारे जारी केलेल्या नियमित कागदावर आधारित व्हिसाचा पर्याय आहे. इमिग्रेशन अधिकाऱ्याकडून ते ऑनलाइन जारी केले जाते, ज्यामध्ये भेट देणाऱ्यांना देशात प्रवेश करण्याची परवानगी दिली जाते.

व्हिसाच्या जागी प्रवेश परमिट जारी केले जाते, ज्यामुळे परदेशी लोकांना विशिष्ट कालावधीसाठी कायदेशीररित्या देशात राहण्याची परवानगी दिली जाते.

भारतीय नागरिकांना ई-व्हिसा आणि प्रवेश परमिट देणाऱ्या देशांची यादी आम्ही खाली दिली आहे.

61. अंगोला

74. मलेशिया

62. अँटिग्वा आणि बारबुडा

75. मोल्दोवा

63. ऑस्ट्रेलिया

76. मोरोक्को

64. अजरबैजान

77. रशिया

65. बहरीन

78. साओ टोम आणि प्रिन्सिप

66. बेनिन

79. सिंगापूर

67. कोलंबिया

80. सुरीनाम

68. जिबूती

81. तैवान

69. जॉर्जिया

82. ताजिकिस्तान

70. केन्या

83. तुर्की

71. कुवैत

84. उज्बेकिस्तान

72. किर्गिस्तान

85. वियतनाम

73. लेसोथो

86. झाम्बिया

 

टीप: व्हिसाची आवश्यकता प्रत्येक देशासाठी बदलत असते. कृपया कोणतेही ट्रॅव्हल बुकिंग करण्यापूर्वी विशिष्ट देशाच्या अधिकृत वेबसाइटवर सर्व पासपोर्ट आणि व्हिसा आवश्यकता तपासा.

आंतरराष्ट्रीय सहलींसाठी ट्रॅव्हल इन्शुरन्स खरेदी करण्याचे महत्त्व

आपल्या प्रवासाचे ठिकाण निवडल्यानंतर, आपल्या गरजा भागविणारी चांगली ट्रॅव्हल इन्शुरन्स पॉलिसी निवडण्यासाठी आपण थोडा वेळ काढला पाहिजे. इन्शुरन्स घेणे महत्वाचे का आहे, याची काही वैध कारणे खाली सूचीबद्ध आहेत:

  • अपरिचित प्रदेशात सुरक्षा देते - आंतरराष्ट्रीय प्रवासामुळे अपरिचित भूभाग, भाषा आणि संस्कृतीशी संबंध येतो, ज्यामुळे प्रवास कठीण होतो. आपल्या प्रवासात आपल्याला कोणत्याही खेदजनक परिस्थितीचा सामना करावा लागल्यास, आपला ट्रॅव्हल इन्शुरन्स आपल्याला आवश्यक समर्थन देऊन आर्थिक मदत प्रदान करू शकतो.

  • पर्सनल लायबिलिटी कव्हर - परदेश प्रवासादरम्यान तुम्ही नकळत एखाद्या व्यक्तीला किंवा मालमत्तेला हानी पोहोचवल्यास तुम्ही आर्थिकदृष्ट्या जबाबदार असाल. उदाहरणार्थ, जर आपण दुचाकी भाड्याने घेतली आहे, आणि एखादा अपघात झाला, ज्यामुळे वाहनाचे गंभीर नुकसान झाले असेल, तर आपल्याला स्वतःच्या खिशातून दुरुस्तीसाठी पैसे द्यावे लागतील. अशावेळी पर्सनल लायबिलिटी कव्हरसह, आपला विमाधारक आपल्यावतीने जबाबदारी उचलेल.

  • काही देशांसाठी अनिवार्य - काही देशांनी तिथे जाण्यासाठी  ट्रॅव्हल इन्शुरन्स असणे बंधनकारक केले आहे. त्या देशात जाण्यासाठी किंवा व्हिसा मिळविण्यासाठी आपल्याला ट्रॅव्हल इन्शुरन्स कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.

  • सहलीदरम्यान वैद्यकीय कव्हरेज देते - परदेशात प्रवास करताना वैद्यकीय उपचार घेणे महागात पडू शकते. जेव्हा आपण दुसऱ्या देशात असता तेव्हा भारतातील आपली हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी कुचकामी ठरेल. अशावेळी आपण रुग्णालयात दाखल असल्यास किंवा परदेशात वैद्यकीय उपचारांची आवश्यकता असल्यास, आपण एक व्यापक ट्रॅव्हल इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करू शकता जी आपल्या वैद्यकीय बिलांना कव्हर करते.

भारतीयांसाठी व्हिसा-ऑन-अरायव्हल असलेल्या देशांबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न(एफ.ए.क्यू)

देश व्हिसा-ऑन-अरायव्हल का देतात?

पर्यटनाच्या सोयीसाठी आणि अर्ज प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी प्रवेशाच्या विशिष्ट पोर्ट्समध्ये व्हिसा-ऑन-अरायव्हलचा लाभ घेतला जातो.

व्हिसा-ऑन-अरायव्हल मला त्या देशात प्रवेशाची हमी देतो का?

इतर व्हिसा अर्जांप्रमाणेच व्हिसा ऑन अरायव्हलही नाकारला जाऊ शकतो. हे टाळण्यासाठी तुम्ही ज्या देशात प्रवास करता, त्या देशात भारतीय पासपोर्ट धारकांसाठी ही सुविधा आहे, याची खात्री करा. तसेच आपल्याकडे सर्व योग्य कागदपत्रे असणे आवश्यक आहे, आणि आपला व्हिसा जलद गतीने मिळविण्यासाठी प्रक्रियेबद्दल आधीच जागरूक असणे आवश्यक आहे.

माझ्या व्हिसा-ऑन-अरायव्हलसाठी मला पैसे द्यावे लागतील का?

व्हिसा ऑन अरायव्हलच्या अटी प्रत्येक देशात भिन्न असतात. काही देश आपल्याला शुल्क न भरता व्हिसा देतात, तर काही व्हिसा-ऑन-अरायव्हलसाठी पूर्वनिर्धारित रक्कम आकारू शकतात. देशात प्रवास करण्यापूर्वी आपण आवश्यकता तपासणे गरजेचे आहे.

माझा व्हिसा संपला तर काय होईल?

व्हिसाची मुदत संपण्यापूर्वी काम पूर्ण न केल्यास काही देश प्रवाशांना वाढीव व्हिसासाठी अर्ज करण्याची परवानगी देतात. पण असे करण्यासाठी आपल्याला अतिरिक्त निधीची आवश्यकता असू शकते.

व्हिसा-ऑन-अरायव्हलसाठी अर्ज करताना कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

व्हिसा-ऑन-अरायव्हलसाठी अर्ज करताना आपल्याकडे काही महत्त्वाची कागदपत्रे असणे आवश्यक आहे,  ते म्हणजे पासपोर्ट फोटोकॉपी, व्हिसा अर्ज फॉर्म, हॉटेल आरक्षण, बायोमेट्रिक छायाचित्रे, पुरेसा निधी सिद्ध करण्यासाठी बँक स्टेटमेंट आणि परकीय चलनात भरलेले व्हिसा शुल्क. याशिवाय व्हिसा ऑन अरायव्हल घेण्यापूर्वी अधिक जाणून घेण्यासाठी आपण त्या देशाची अधिकृत वेबसाईट ही तपासली पाहिजे.

2023 मध्ये भारतीय पासपोर्ट रँक किती आहे?

हेन्ली पासपोर्ट इंडेक्सनुसार 2023 मध्ये भारतीय पासपोर्ट जगात 84 व्या क्रमांकावर आहे. सर्वाधिक व्हिसा-मुक्त स्कोअर असणारा देशाचा पासपोर्ट हा शक्तिशाली पासपोर्ट मानला जातो. भारताला 60 देशात व्हिसा लागत नाही.