भारतामधून स्पेन व्हिसा
भारतामधून स्पेन टूरिस्ट व्हिसा याबद्दल सर्व काही
प्रवास आणि पर्यटन करताना आपल्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय आठवणी तयार होतात. तुमच्या आयुष्यातील एक सुखद अनुभव असो किंवा एक महत्वाची शिकवण- त्याला तुम्ही काही ही म्हणा, नवीन ठिकाणांशी ओळख करताना तुम्ही निसर्गाच्या आणखीन जवळ जाता आणि कदाचित स्वतःच्याही. सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर प्रवासाला निघाल्यावर आपण आपल्या कम्फर्ट झोन मधून बाहेर येऊन या विशाल विश्वाची नवीन क्षितिजे गाठता. स्पेनचा विचार करताना तुमच्या मनात बीच, सांग्रिया आणि खाद्यपदार्थ या गोष्टीच पहिले येतील. बऱ्याच जणांसाठी हा एक अल्टिमेट कलिनरी एक्स्पिरीअन्स असतो तर काही जणांसाठी तिथले बीच, कला, इतिहास आणि तिथल्या पार्टीज यामुळे मंत्रमुग्ध होतात.
तुम्ही तुमच्या स्पेन ट्रीपच्या विचाराने मंत्रमुग्ध होण्याआधीच एक नोटपॅड घेऊन बसा आणि तुमचा प्लॅन करायला घ्या, सुरुवात करूया मॅजिकल एन्ट्री तिकीट- तुमचा व्हिसा आणि तुम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी- एक ट्रॅव्हल इन्शुरन्स.
स्पेनला जाण्यासाठी भारतीयांना व्हिसा लागतो का?
होय, सर्व भारतीयांकडे स्पेन साठी शेंगेन व्हिसा असणे आवश्यक आहे. याचसाठी टुरिस्ट व्हिसा 90 दिवसांच्या मुक्कामासाठी वैध आहे आणि साधारणपणे एक ते दोन महीने आधी लागू करायला हवा कारण या प्रक्रियेसाठी वेळ लागू शकतो आणि आयत्यावेळेसची धावपळ तुम्हाला नक्कीच नको असेल.
स्पेन मध्ये भारतीय नागरिकांसाठी व्हिसा ऑन अराइव्हल असतो का?
नाही, दुर्दैवाने भारतीय पासपोर्ट धारक स्पेन मध्ये व्हिसा ऑन अराइव्हल साठी पात्र नसतात.
भारतीय नागरिकांसाठी स्पेन व्हिसा रीक्वायरमेंट्स
दिल्लीमधल्या स्पेन एम्बसी किंवा तुमच्या जवळच्या व्हिसा आउटसोर्सिंग सेंटर किंवा एजंट कडे व्हिसाचा अर्ज डायरेक्ट सबमिट करण्याआधी तुमच्याकडे खालील दस्तऐवज असणे आवश्यक आहे.
कमीत कमी 2 कोऱ्या कागदांसह स्पेन मध्ये पोहोचल्यावर पुढचे तीन महीने तुमचा पासपोर्ट वैध असायला हवा.
मागच्या 6 महिन्याच्या आत काढलेले 4.5सेमी X 3.5 सेमी चे 2 फोटो. फोटो मध्ये बॅकग्राउंड पांढऱ्या रंगाचे असावे.
एक कव्हरिंग लेटर ज्यामध्ये देशाला भेट देण्याचा स्पष्ट हेतू आणि तारीख लिहिलेली असेल.
स्पेन साठी एक ट्रॅव्हल इन्शुरन्स. (स्पेन साठी एका व्यक्तीसाठी 7 दिवसांचा डिजिटल ट्रॅव्हल इन्शुरन्स ₹225 पासून सुरु)
प्रवासाचा प्लॅन आणि रिटर्न तिकिटाचे कन्फर्मेशन.
तुमच्या सॅलरी स्लीप बरोबरच मागच्या 3 महिन्यांचे बँक स्टेटमेंट.
भारतीय नागरिकांसाठी स्पेन व्हिसा फीस
वय | INR मध्ये फी |
---|---|
12 वर्षांपेक्षा जास्त वयाचे व्यक्ती | ₹6883 |
६ वर्ष ते 12 वर्ष वयोगटातील मुले | ₹3441 |
भारतामधून स्पेन टुरिस्ट व्हिसा साठी अर्ज कसा करायचा?
स्पेन टुरिस्ट व्हिसा साठी अर्ज करण्याची प्रक्रिया अजिबात गुंतागुंतीची नाही, परंतु थोडा वेळ लागतो. तुम्हाला फक्त एवढेच करायचे आहे:
स्पेन टुरिस्ट व्हिसा प्रोसेसिंग टाइम
स्पेन एम्बसी कडून कन्फर्म करण्यात आलेल्या अवधीनुसार व्हिसा प्रोसेसिंग साठी 15 दिवसांचा वेळ लागतो.
स्पेनला जाण्यासाठी मी ट्रॅव्हल इन्शुरन्स विकत घ्यायला हवा का?
होय, स्पेनला जाण्यासाठी ट्रॅव्हल इन्शुरन्स असणे बंधनकारक आहे.
फ्रांस हा देश युरोपमधील सर्वात मोठा देश आहे तर स्पेन दुसऱ्या क्रमांकावर आहे. या देशात खूप काही एक्स्प्लोर करण्यासारखे आहे जसे बीचेस, त्यांची संस्कृती, खाद्यसंस्कृती आणि अर्थातच त्यांची कला आणि इतिहास. जेव्हा कोणी परदेशात प्रवास करत असतो तेव्हा त्यामागे बरेच नियोजन असते - अगदी प्रवासाचे प्लॅनिंग, ट्रॅव्हल इसेंशियल्स यापासून ते आर्थिक नियोजनापर्यंत.
ट्रॅव्हल इन्शुरन्स याची खात्री देते की तुम्हाला कोणतेही सरप्राईज मिळू नयेत, विशेषतः आर्थिकदृष्ट्या! त्याशिवाय, आपण सर्वच जण कितीही वेळा प्रवास केला असला तरी आपल्या घरापासून लंब असलेल्या एखाद्या ठिकाणी असताना आपल्याला नक्कीच थोडे असुरक्षित वाटते.
आणि अशाच वेळी ट्रॅव्हल इन्शुरन्स तुमच्या पाठीशी उभे असेल, कायमच! स्पेन साठीचा इंटरनॅशनल ट्रॅव्हल इन्शुरन्स तुम्हाला खालील काही फायदे ऑफर करतो:
भारतीय नागरिकांसाठी स्पेन टुरिस्ट व्हिसा याबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न
भारतीय पासपोर्ट धारक स्पेन मध्ये व्हिसा ऑन अराइव्हल साठी पात्र आहेत का?
नाही, भारतीय पासपोर्ट धारकांना स्टँडर्ड व्हिसा साठी अर्ज द्यावा लागतो कारण अजून तरी इतर कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही.
स्पेन साठी ट्रॅव्हल इन्शुरन्स मँडेटरी आहे का?
ट्रीप प्लॅन करण्याआधीच ट्रॅव्हल इन्शुरन्स पॉलिसी विकत घेतलेली असावी कारण त्याच्या डिटेल्स अर्ज प्रक्रिया करताना द्याव्या लागतात.
मला माझे प्रवासाचे नियोजन आणि प्लॅन केलेले स्टॉप्स देखील दाखवावे लागतात का?
जरी अशी विचारणा खूपच क्वचित केली जाते, तुम्ही या डिटेल्सची एक प्रत तुमच्या बरोबर ठेवणे सोयीचे ठरेल.
एक अल्पवयीन स्पेन साठी व्हिसा घेऊ शकतो का?
होय, जर त्याच्या पालकांनी किंवा कायदेशीर पालकांनी त्यांच्या संमतीचे पत्र लिहून दिले असेल तर. आवश्यक परवानगीशिवाय त्यांना पात्र मानले जाणार नाही.
बँक स्टेटमेंटची कॉपी देखील आवश्यक आहे का?
होय, या सर्व प्रोसेस मध्ये तुम्हाला तुमच्या आर्थिक स्थिरतेचा आणि आरोग्याचा पुरावा सबमिट करावा लागतो. अशा परीस्थित, बँक स्टेटमेंट आवश्यक आहे.