शेंजेन व्हिसा ट्रॅव्हल इन्शुरन्स ऑनलाइन खरेदी करा

Instant Policy, No Medical Check-ups

तुमच्यापैकी अनेकांसाठी परदेश प्रवास करणे ही निश्चितपणे बकेट लिस्टमधील एक मोठी इच्छा असेल. इंटरनॅशनल ट्रॅव्हल करण्यासारखं दुसरं सुख नाही, असं म्हणतात. अनेकांच्या आवडत्या डेस्टिनेशनपैकी, एक स्टॉप हा शेंगन यादीतील देश हा असतोच असतो 

ही ट्रिप जितकी महाग वाटेल तितका डिजिटचा इंटरनॅशनल ट्रॅव्हल इन्शुरन्स तुमच्या आर्थिक चिंता कमी करण्यात मदत करू शकेल. तुमच्‍या शेंगन व्हिसावर प्रक्रिया करण्‍यासाठी तुम्ही आमच्‍या ट्रॅव्हल इन्शुरन्सचा सहज लाभ घेऊ शकता.

शेंगन व्हिसासाठी ट्रॅव्हल इन्शुरन्स ही एक पॉलिसी आहे जी झोनमधील सर्व 26 देशांना कव्हर करते. शेंगन व्हिसासाठी अर्ज करताना ट्रॅव्हल इन्शुरन्स मॅनडेटरी आहे. झोनमधील प्रत्येक देशासाठी एकापेक्षा जास्त व्हिसा घेण्याऐवजी सर्व 27 शेंगन देशांमध्ये केवळ एका व्हिसासह विना अडथळा प्रवास करता येतो.

 

शेंगन व्हिसासाठी ट्रॅव्हल इन्शुरन्स मॅनडेटरी आहे का?

होय, शेंगन व्हिसासाठी ट्रॅव्हल इन्शुरन्स असणे मॅनडेटरी आहे. याचे कारण असे की, शेंगन व्हिसा रीक्वायरमेंट्सचा एक भाग म्हणून, प्रत्येक पर्यटकाला €30,000 पर्यंतचे वैद्यकीय कव्हर असणे आवश्यक आहे. या 26 देशांसाठी व्हिसाची रीक्वायरमेंट व्यावहारिकदृष्ट्या सारखीच आहे, म्हणून जर तुमचा ट्रॅव्हल इन्शुरन्स असेल तर शेंगन व्हिसाची प्रोसेस सुरळीतपणे पार पडेल. 

 

शेंगन व्हिसासाठी ट्रॅव्हल इन्शुरन्सची रीक्वायरमेंट्स काय आहेत?

प्रत्येक शेंगन देशाच्या ट्रॅव्हल इन्शुरन्ससाठी विशिष्ट अटी असू शकतात. तुम्ही प्रवास करण्यापूर्वी संबंधित देशाच्या एम्बसीच्या रीक्वायरमेंट्स तपासा. तुमच्या ट्रॅव्हल इन्शुरन्सने हायलाइट केलेल्या काही कमीतकमी अटी:

  • कमीतकमी €30,000 चे वैद्यकीय कव्हरेज.

  • लागू केलेल्या पॉलिसी अंतर्गत शेंगन झोनचे संपूर्ण कव्हरेज.

  • पॉलिसीमध्ये इतर कोणतेही अनपेक्षित एक्सपेन्सेस समाविष्ट करणे आवश्यक आहे जसे की वैद्यकीय कारणांसाठी परत येणे, आपत्कालीन रुग्णालयात उपचार किंवा तेथे मृत्यू इ. 

  • पॉलिसीची वैधता राहण्याचा कालावधी कव्हर करते.

झालं तर मग! कोणत्याही किंवा सर्व शेंगन देशांमध्ये प्रवास करणे हे एक वरदान आहे आणि ते अनुभवण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू. तुम्ही विश्रांतीसाठी किंवा कामासाठी, सोलो ट्रिपसाठी किंवा कौटुंबिक सुट्टीसाठी प्रवास करत असल्यास, तुमचा प्रवास सुरळीत आणि त्रासमुक्त करणे हे डिजिट ट्रॅव्हल इन्शुरन्सचे काम आहे.

मी माझ्या शेंगन व्हिसासाठी ट्रॅव्हल इन्शुरन्स का खरेदी करावा?

2022 मध्ये, पॅरिस, इटली, स्कॅन्डिनेव्हिया आणि ब्रसेल्समध्ये 200 हून अधिक फ्लाइट्स रद्द करण्यात आल्या.  (1)

चोरीचे प्रमाण जास्त असलेल्या देशांमध्ये फ्रान्सचा क्रमांक लागतो. बेल्जियम आणि स्वीडन दुसऱ्या क्रमांकावर आहेत. (2)

एकट्या युरोपमध्ये, 7.3 मिलियन बॅगेजेस हरवल्याची, चुकीची हाताळणी किंवा विलंब झाल्याची नोंद झाली आहे. (3)

कोविड आऊटब्रेकनंतर देश पुन्हा सुरू झाल्यावर, कामगारांच्या कमतरतेमुळे फ्लाइट्स रद्द करणे आणि फ्लाइट्स उशीर होण्याचे प्रमाण वाढले आहे. (4)

शेंगन व्हिसासाठी अर्ज करताना, तुमच्यासोबत ट्रॅव्हल इन्शुरन्स असणे मॅनडेटरी आहे.

शेंगन व्हिसासाठी अर्ज करताना तुमच्या ट्रॅव्हल इन्शुरन्स प्लॅनसाठी किमान €30,000 वैद्यकीय कव्हरेजची रीक्वायरमेंट आहे.

डिजिटच्या इंटरनॅशनल ट्रॅव्हल इन्शुरन्समधील वैशिष्ट्यांबद्दल

झिरो डीडक्टीबल - तुम्ही क्लेम करता तेव्हा तुम्ही अजिबात पे करत नाही - हे सर्व आमच्यावर आहे.

अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट्स कव्हर्ड - आमच्या कव्हरेजमध्ये स्कूबा डायव्हिंग, बंजी जंपिंग आणि स्कायडायव्हिंग सारख्या अ‍ॅक्टिव्हिटीजचा समावेश आहे (अवधी एक दिवसाचा असेल तर)

फ्लाइट विलंबासाठी तात्काळ आर्थिक नुकसानभरपाई - आम्ही तुमचा आणखी वेळ वाया घालवत नाही. म्हणूनच, जेव्हा तुमच्या फ्लाइटला ६ तासांपेक्षा जास्त उशीर होतो, तेव्हा आम्ही तुम्हाला ₹५००-१००० ची त्वरित भरपाई देतो.

स्मार्टफोन-सक्षम प्रोसेसेस - कोणतेही दस्तऐवज नाहीत, कोणतीही धावपळ नाही. तुम्ही क्लेम करता तेव्हा फक्त तुमची दस्तऐवज अपलोड करा.

मिस्ड-कॉल सुविधा - आम्हाला +91-7303470000 वर मिस्ड कॉल करा आणि आम्ही तुम्हाला 10 मिनिटांत परत कॉल करू. यापुढे आंतरराष्ट्रीय कॉलिंग चार्जेस नाही!

जगभरातील समर्थन - संपूर्ण जगभरात तुम्हाला अखंडपणे समर्थन देण्यासाठी आम्ही जगातील सर्वात मोठ्या हेल्थ आणि ट्रॅव्हल इन्शुरन्स नेटवर्क Allianz सह भागीदारी केली आहे. अटी व शर्ती लागू*

तुमच्या गरजा पूर्ण करणारे शेंगन ट्रॅव्हल इन्शुरन्स प्लॅन्स

बेसिक ऑपशन कंफर्ट ऑपशन

मेडिकल कव्हर

×

इमरजेंसी अ‍ॅक्सीडेन्टल ट्रीटमेंट आणि एव्हक्युएशन

अपघात सर्वात अनपेक्षित वेळीच होतात. दुर्दैवाने, आम्ही तुम्हाला तेथे वाचवू शकत नाही, परंतु आम्ही तुम्हाला सर्वोत्तम उपचार मिळवण्यास नक्कीच मदत करू शकतो. आम्‍ही तुम्‍हाला तत्‍काळ वैद्यकीय उपचारांसाठी कव्‍हर करतो ज्‍याचा परिणाम म्हणजे तुम्ही हॉस्पिटलाईझ होता.

×

इमरजेंसी अ‍ॅक्सीडेन्टल ट्रीटमेंट आणि एव्हक्युएशन

एखाद्या अज्ञात देशात प्रवासादरम्यान तुम्ही आजारी पडल्यास, घाबरू नका! आम्ही तुमच्या उपचाराचा खर्च करू. आम्ही हॉस्पिटलच्या खोलीचे भाडे, ऑपरेशन थिएटरचे शुल्क इ. यासारखे एक्सपेन्सेस कव्हर करू.

×

वैयक्तिक अपघात

आम्ही आशा करतो की ह्या कव्हरची कधीही आवश्यकता नसावी. परंतु प्रवासादरम्यान कोणत्याही अपघातात, मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास, हा फायदा सपोर्टसाठी आहे.

×

डेली कॅश अलाउन्स (प्रति दिवस/जास्तीत जास्त 5 दिवस)

ट्रिपला असताना, तुम्ही तुमची कॅश मॅनेज करता. आणि इमरजेंसीसाठी तुम्ही काहीही अतिरिक्त खर्च करू नये अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे, जेव्हा तुम्ही रुग्णालयात दाखल असता, तेव्हा तुमचा दैनंदिन एक्सपेन्सेस व्यवस्थापित करण्यासाठी तुम्हाला दररोज एक निश्चित दैनिक रोख भत्ता मिळतो.

×

अपघाती मृत्यू आणि अपंगत्व

या कव्हरमध्ये इमरजेंसी अपघाती उपचार कव्हरसारखे सर्वकाही असले तरी, त्यात संरक्षणाचा एक अतिरिक्त स्तर आहे. यात बोर्डिंग, डी-बोर्डिंग किंवा फ्लाइटच्या आत असताना मृत्यू आणि अपंगत्व देखील समाविष्ट आहे (टचवुड!).

×

इमरजेंसी डेंटल ट्रीटमेंट

जर तुम्हाला तीव्र वेदना होत असतील किंवा ट्रिपमध्ये तुमच्या दातांना अपघाती दुखापत झाली असेल, परिणामी इमरजेंसी डेंटल ट्रीटमेंट उपचार प्रदान केले असतील, तर आम्ही तुम्हाला उपचारांमुळे झालेल्या खर्चासाठी कव्हर करू.

×

स्मूथ ट्रांझिट कव्हर्स

×

ट्रिप रद्द करणे

दुर्दैवाने, तुमची ट्रिप रद्द झाल्यास, आम्ही तुमच्या सहलीचे प्री-बुक केलेले, रिफंड न करता येणारे एक्सपेन्सेस कव्हर करतो.

×

सामान्य वाहक विलंब

तुमच्या फ्लाइटला ठराविक वेळेपेक्षा जास्त उशीर झाल्यास, तुम्हाला बेनिफिट अमाऊंट मिळेल, कोणतेही प्रश्न विचारले जाणार नाहीत!

×

चेक-इन बॅगेजला विलंब

कन्व्हेयर बेल्टवर थांबणे त्रासदायक आहे, हे आम्हाला माहित आहे! त्यामुळे, तुमचे चेक-इन बॅगेजला 6 तासांपेक्षा जास्त उशीर झाल्यास, तुम्हाला बेनिफिट अमाऊंट मिळेल, कोणतेही प्रश्न विचारले जाणार नाहीत!

×

चेक-इन बॅगेजचे एकूण नुकसान

ट्रिपमध्ये घडणारी भयंकर गोष्ट म्हणजे तुमचे सामान हरवणे. परंतु असे काही घडल्यास, संपूर्ण बॅगेज कायमस्वरूपी हरवल्याबद्दल तुम्हाला बेनिफिट अमाऊंट मिळेल. तीनपैकी दोन पिशव्या हरवल्यास, तुम्हाला प्रमाणानुसार फायदा होईल, म्हणजे बेनिफिट अमाऊंटचा 2/3 भाग मिळेल.

×

कनेक्शन हुकले

फ्लाइट मीस झाली? काळजी करू नका! फ्लाइटला उशीर झाल्यामुळे तुम्ही प्री-बुक केलेले फ्लाइट चुकले तर आम्ही तुमच्या तिकीट/प्रवास कार्यक्रमात दर्शविलेल्या पुढील डेस्टिनेशनपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक अ‍ॅकमडेशन आणि प्रवासासाठी पैसे भरू

×

फ्लेक्सिबल ट्रिप

×

पासपोर्ट हरवणे

अज्ञात स्थळी घडणारी सर्वात वाईट गोष्ट म्हणजे तुमचा पासपोर्ट किंवा व्हिसा हरवणे. तुम्ही तुमच्या देशाबाहेर असताना अशाप्रकारे घडल्यास, हरवलेले, चोरीला गेले किंवा डॅमेज झाले तर आम्ही खर्चाची भरपाई करतो.

×

इमरजेंसी कॅश

जर एखाद्या वाईट दिवशी, तुमचे सर्व पैसे चोरीला गेले, आणि तुम्हाला आपत्कालीन रोख रकमेची आवश्यकता आहे, तर हे कव्हर तुमला मदत करेल.

×

इमरजेंसी ट्रिप एक्सटेंशन

व्हेकेशन्स कधीच संपू नयेत असे सगळ्यांना वाटते. पण कुणाला हॉस्पिटलमध्येही राहायचे नाहीये! तुमच्या प्रवासादरम्यान इमरजेंसीच्या कारणामुळे, तुम्हाला तुमचा मुक्काम वाढवावा लागला, तर आम्ही हॉटेलच्या एक्स्टेन्शन्स आणि परतीच्या फ्लाइटच्या रीशेड्युलिंगची परतफेड करू. इमरजेंसी ही तुमच्या प्रवासाच्या क्षेत्रातील नैसर्गिक आपत्ती असू शकते किंवा आपत्कालीन रुग्णालयात दाखल होणे असू शकते.

×

ट्रीप रद्द

इमरजंसीच्या परिस्थितीत, जर तुम्हाला तुमच्या ट्वरीपरून लवकर घरी रिटर्न यावे लागले, तर ते खरोखरच दुःखदायक असेल. आम्ही ते दुरुस्त करू शकत नाही. परंतु, आम्ही पर्यायी प्रवास व्यवस्थेचे शुल्क आणि निवास, नियोजित कार्यक्रम आणि ट्रीपचा खर्च यासारखे नॉन-रिफंडेबल प्रवास कॉस्ट कव्हर करू.

×

वैयक्तिक लायबिलिटी आणि बेल बाँड

एका दुर्दैवी घटनेमुळे, तुम्ही प्रवास करत असताना तुमच्यावर कोणतेही कायदेशीर आरोप असल्यास, आम्ही त्याचे पैसे देऊ.

×
Get Quote Get Quote

वर सुचवलेला कव्हरेज पर्याय केवळ सूचक आहे आणि तो मार्केटचा अभ्यास आणि अनुभवावर आधारित आहे. तुमच्या रीक्वायरमेंटप्रमाणे तुम्ही कोणत्याही अतिरिक्त कव्हरेजची निवड करू शकता. तुम्हाला इतर कोणत्याही कव्हरेजची निवड करायची असल्यास किंवा अजून डिटेल्स जाणून घ्यायचे असल्यास कृपया आम्हाला 1800-258-5956 वर कॉल करा.

पॉलिसी डिटेल वाचण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.

आमचा पारदर्शकतेवर विश्वास आहे, म्हणूनच आम्ही कव्हर करत नसलेल्या काही परिस्थितींबद्दल तुम्ही जागरूक राहावे अशी आमची इच्छा आहे. तुमचा ट्रॅव्हल इन्शुरन्स काय कव्हर करत नाही हे समजून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे जेवढे तो काय कव्हर करतो हे जाणून घेणे आहे खालील काही अपवाद आहेत जे आमचा ट्रॅव्हल इन्शुरन्स कव्हर करणार नाहीत:
 

  • रोग किंवा आजार ज्यांचे आधीच निदान झाले आहे (पूर्व अस्तित्वात असलेले रोग), किंवा जर तुमच्या डॉक्टरांनी आधीच प्रवास न करण्याची शिफारस केली असेल.

  • 5 दिवसांपर्यंतचा दैनंदिन रोख भत्ता केवळ परदेशात त्यांच्या हॉलिडेला रुग्णालयात दाखल झालेल्यांसाठी वैध आहे

  • अपघातामुळे मृत्यू आला किंवा अपंगत्व आले तर 365 दिवसांनंतर कव्हर केले जाणार नाही.

  • फक्त एक दिवसीय अ‍ॅडवेंचर स्पोर्ट्स कव्हर केले जातात. यामध्ये आठवड्याभराचे ट्रेक, हाईक्स किंवा व्यावसायिक स्तरावरील साहसी खेळांचा समावेश नाही जे एका दिवसापेक्षा जास्त काळ चालतात. 

  • तुमच्‍या एअरलाइनने तुम्‍हाला फ्लाइट डीले होणार असल्याची माहिती किमान 6 तास अगोदर दिल्‍यास आमच्याकडून फ्लाइट डीले कव्हर केले जात नाहीत.

  • जर कस्टम्समुळे विलंब होत असेल तर सामान चेक इन करण्यात विलंब कव्हर केला जात नाही.

  • कोणतेही सुटलेले कनेक्शन जेथे येणार्‍या फ्लाइटचे नियोजित आगमन आणि कनेक्टिंग फ्लाइटचे नियोजित निर्गमन यांच्यातील वेळेचे अंतर आवश्यक वेळेपेक्षा कमी होते.

  • अ‍ॅक्ट्स ऑफ वॉर कव्हर केले जात नाहीत.

  • 24 तासांच्या आत संबंधित पोलिसांना सूचना न दिल्यास चोरीच्या गुन्ह्यांना कव्हर केले जाणार नाही.

  • बाळंतपणामुळे किंवा संबंधित बाबींमुळे ट्रीप एक्स्टेन्शन कव्हर केले जाऊ शकत नाहीत.

  • आधीच अस्तित्त्वात असलेल्या आजारांमुळे किंवा आरोग्याच्या स्थितीमुळे ट्रीप रद्द केल्या जाऊ शकत नाहीत.

  • व्हिसाच्या रिजेक्शनमुळे ट्रिप रद्द झाली तर हे कव्हर केले जात नाही.

आमच्यासोबत, VIP क्लेम्सचा अ‍ॅक्सेस मिळवा

शेंगनसाठी आमचा इंटरनॅशनल ट्रॅव्हल इन्शुरन्स खरेदी केल्यानंतर, तुम्ही तणावमुक्त राहता कारण आमच्याकडे 3-स्टेप, पूर्णपणे डिजिटल क्लेम्स प्रोसेस आहे!

स्टेप 1

आम्हाला 1800-258-5956 (भारतात असल्यास) वर कॉल करा किंवा +91-7303470000 वर मिस्ड कॉल करा आणि आम्ही 10 मिनिटांनी परत कॉल करू.

स्टेप 2

पाठवलेल्या लिंकवर आवश्यक दस्तऐवज आणि तुमचे बँक खाते तपशील अपलोड करा.

स्टेप 3

बाकीच्या गोष्टींची काळजी आम्ही घेऊ!

केंब्रिज इंग्लिश डिक्शनरीनुसार, शेंगन या शब्दाची व्याख्या "युरोपियन युनियनमधील अनेक देशांमधील करार अशी केली जाते. ज्यामुळे लोक आणि वस्तूंना पासपोर्ट किंवा इतर नियंत्रणांशिवाय प्रत्येक देशाच्या सीमा ओलांडून मुक्तपणे जाण्याची परवानगी मिळते."

शेंगन क्षेत्रामध्ये 26 देशांचा समावेश आहे ज्यात बहुतेक मेनलँड युरोप कव्हर आहे. लक्झम्बर्गमधील एका लहान शहराच्या नावावरून हे नाव देण्यात आले जेथे 1985 मध्ये शेंगन ऍग्रिमेंट ट्रीटीवर साइन झाली.

शेंगन क्षेत्राच्या निर्मितीमुळे अंतर्गत सीमा पुसून लोकांच्या मुक्त हालचालींना परवानगी मिळाली. यामुळे सीमा नियंत्रण तपासणी आणि कंटाळवाण्या औपचारिकतांशिवाय शेंगन झोनमधील देशांमध्ये प्रवास करणे सोपे झाले आहे.

मुख्य भूप्रदेशातील युरोपमधील देशांपैकी बहुतेक, परंतु सर्वच नव्हे तर शेंगन क्षेत्र कव्हर करते. अंडोरा, व्हॅटिकन सिटी आणि मोनॅको ही राज्ये शेंगन क्षेत्रामध्ये डी फेक्टो मानली जातात कारण ते सीमा नियंत्रणे अंमलात आणत नाहीत.

शेंगन व्हिसा शेंगन झोनमधील सर्व 26 देशांमध्ये आरामशीर प्रवास करण्यास मदत करतो. भारतीय पासपोर्ट धारकांना झोनमधील देशांमध्ये प्रवेश करण्यासाठी शेंगन व्हिसा घेणे आवश्यक आहे. भारतीय पासपोर्ट धारकांसाठी शेंगन व्हिसासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:

  • व्हिसा अ‍ॅप्लीकेशन फॉर्म भरा: व्हिसा अ‍ॅप्लीकेशन फॉर्मसाठी शेंगन दूतावासाची वेबसाइट ब्राउझ करा. फॉर्म डाउनलोड करा आणि सबमिट करण्यापूर्वी डिटेल्स पूर्ण भरा.

  • शेंगन व्हिसाचा प्रकार निवडा: तुम्हाला आवश्यक असलेला शेंगन व्हिसाचा प्रकार निवडा. हे प्रवासाचा उद्देश आणि कालावधी यावर अवलंबून आहे. विशिष्ट व्हिसावर वेगवेगळे निर्बंध लागू होतात, त्यामुळे प्रवासापूर्वी योग्य तो पर्याय निवडा.

  • आवश्यक दस्तऐवजसह तुमच्या शेंगन व्हिसासाठी अप्लाय करा: तुमच्या व्हिसासाठी कुठे आणि केव्हा अप्लाय करायचं ते शोधा. भारतीय शेंगन व्हिसासाठी अर्ज करू शकतात ज्यामुळे त्यांना ९० दिवसांपर्यंत तेथे राहता येते आणि ते सहा महिन्यांसाठी वैध असते. रीक्वायर्ड दस्तऐवज गोळा करा आणि तुमच्या व्हिसा अ‍ॅप्लीकेशनसाठी देशातील तुमच्या दूतावास/वाणिज्य दूतावासात अपॉईंटमेंट घ्या.

  • मुलाखत पूर्ण करा आणि व्हिसाची फीज भरा: व्हिसा फी करंट एक्सचेंज रेट्सप्रमाणे चेंज होते(युरोमध्ये: प्रौढ- 80, आणि 6-12 वर्षे वयोगटातील मूल- 60). तुम्ही व्हिसा फी माफ करण्याचा क्रायटेरिया देखील तपासू शकता.

  • तुमच्या व्हिसाची प्रतीक्षा करा: तुमच्या व्हिसाच्या प्रक्रियेस अंदाजे १५ दिवस लागतील.

शेंगन व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या भारतीयांसाठी आवश्यक दस्तऐवज

एक आमंत्रण निवासासाठी एक किंवा अधिक सहाय्यक दस्तऐवजांसह होस्टकडून आमंत्रण.
व्हिसा अ‍ॅप्लीकेशन फॉर्म व्हिसा अ‍ॅप्लीकेशन फॉर्म प्रवास करणाऱ्या सर्व अर्जदारांनी रीतसर भरलेला आणि साइन केलेला असावा.
फोटोग्राफ्स आणि पासपोर्ट 2 पासपोर्ट साईजचे अलीकडचे फोटोग्राफ्स. फोटोग्राफची वैशिष्ट्ये लक्षात ठेवा. 10 वर्षांपेक्षा जुना नसलेला आणि किमान तीन महिन्यांची वैधता असलेला पासपोर्ट.
फ्लाइट तिकिटे आणि प्रवासाचा मार्ग एका देशातून दुसऱ्या देशात जाण्यासाठी लागणारी फ्लाइटची तिकिटे तसेच संपूर्ण प्रवासाचा कार्यक्रम, म्हणजेच प्रूफ ऑफ अकॉमडेशन फॉर हॉटेल्स जिथे तुम्ही राहण्याचा प्लॅन करत आहात.
ट्रॅव्हल इन्शुरन्स तुम्हाला €30,000 पर्यंतचे वैद्यकीय कव्हरेज देणारा प्रवास किंवा हेल्थ इन्शुरन्स मॅनडेटरी आहे.
फायनान्शिअल मीन्सचे प्रूफ तुम्हाला पास्ट तीन महिन्यांच्या बँक स्टेटमेंटप्रमाणे फायनान्शिअल मीन्सचा प्रूफ लागतो. तुमच्याकडे स्पॉन्सर असल्यास, आर्थिकदृष्ट्या स्पॉन्सरिंग लेटर तयार करा.
कर्मचारी/विद्यार्थी/सेल्फ-एम्प्लॉईड असल्याचा पुरावा. नोकरदार लोकांनी एम्प्लॉयमेंट कॉन्ट्रॅक्ट, रजेची परवानगी आणि आयकर रिटर्न सादर करावेत. b. सेल्फ-एम्प्लॉईड लोकांना त्यांच्या बिझनेस लायसेन्सची प्रत, कंपनीचे मागील सहा महिन्यांचे बँक स्टेटमेंट आणि आयकर रिटर्न सादर करणे आवश्यक आहे.

शेंगन देशांना ट्रॅव्हल इन्शुरन्सबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न

माझी ट्रिप रद्द झाल्यास मला कव्हर मिळेल का?

आम्ही प्री-बुक केलेले, नॉन-रिफंडेबल एक्सपेन्स आणि इमरजेंमुळे ट्रीप रद्द कव्हर करतो. आधीपासून असलेल्या आजारांमुळे किंवा हेल्थ कंडिशनमुळे ट्रिपला न येणे किंवा व्हिसा नाकारल्यामुळे ट्रिप रद्द करणे हे कव्हर केले जात नाही.

शेंगन ट्रॅव्हल इन्शुरन्सची किंमत कोणते घटक ठरवतात?

शेंगन ट्रॅव्हल इन्शुरन्ससाठी भरावयाचा प्रीमियम तुमचे वय, ट्रिपचा कालावधी, हेल्थ रिस्क इत्यादींवर अवलंबून असते. प्रवास त्रासमुक्त करण्यासाठी अ‍ॅड-ऑन कव्हर्सचा लाभ पेएबल प्रीमियमवर देखील परिणाम करू शकतो.

शेंगन व्हिसाचे विविध प्रकार कोणते आहेत?

  • मर्यादित प्रादेशिक वैधता व्हिसा
  • तुमच्या प्रवासाच्या उद्देशानुसार तुम्ही अर्ज करू शकता:
  • युनिफॉर्म शेंगन व्हिसा- टाइप A किंवा टाइप C. टाइप C अंतर्गत तुमच्याकडे सिंगल-एंट्री व्हिसा, डबल-एंट्री व्हिसा आणि मल्टिपल-एंट्री व्हिसा आहे.
  • नॅशनल शेंगन व्हिसा

शेंगन ट्रॅव्हल इन्शुरन्सचे काय फायदे आहेत?

ट्रॅव्हल इन्शुरन्स हा परदेशी सीमेवर मदतीचा एक विश्वासार्ह स्रोत आहे. हे वैद्यकीय सहाय्य प्रदान करते आणि फ्लाइट रद्द करण्याची कॉस्ट, फ्लाइटला होणारा विलंब, सामान/पासपोर्ट गमावणे इत्यादी यासारखे अनेक फायदे कव्हर करते.