भारतीयांसाठी नेपाळ व्हिसा
भारतीय नागरिकांसाठी नेपाळ व्हिसा या बाबत सर्व माहिती
अनेक कारणांमुळे भारतीय बऱ्याचदा नेपाळला त्यांचे पर्यटन स्थळ म्हणून निवडतात. हा परदेश समजला जात असला तरी भारताच्या सर्वात जवळच्या शेजारी असलेला एक देश आहे. तसेच नेपाळमधील पर्यटन फार महाग नसल्यामुळे नेपाळ भारतीय पर्यटकांचे एक आवडते ठिकाण बनले आहे.
बरेच भारतीय नेपाळची पर्यटन स्थळ म्हणून निवड करत असल्याने, पर्यटनाचे नियोजन करण्यापूर्वी त्यासंबंधी व्हिसा रीक्वायरमेंट्स व्यवस्थित समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शिवाय, भारतीयांसाठीचे नेपाळ इमिग्रेशन नियम याबद्दल देखील पूर्ण माहिती करून घेणे आवश्यक आहे कारण इतर देशांमधील नियमांपेक्षा हे नियम वेगळे आहेत.
नेपाळला भेट देण्यासाठी भारतीयांना व्हिसा आवश्यक आहे का?
नाही, भारतीय पासपोर्ट धारकांना नेपाळला जाण्यासाठी व्हिसा आवश्यक नाही. इतर अनेक देशांमधील नागरिकांना नेपाळमध्ये प्रवेश करताना व्हिसा आवश्यक आहे, याची नोंद घेणे महत्त्वाचे आहे. हा अपवाद केवळ भारतीय नागरिकांसाठी आहे.
तरी, भारतीयांना भारत सरकार, भारत निवडणूक आयोग यांनी जरी केलेले सर्व योग्य ओळखपत्र बाळगणे आवश्यक आहे.
भारतीयांसाठी नेपाळमध्ये व्हिसा ऑन अरायव्हल / ई-व्हिसा उपलब्ध आहेत का?
नाही, नेपाळ प्रवासासाठी भारतीय प्रवाशांना व्हिसा आवश्यक नसल्यामुळे व्हिसा ऑन अरायव्हल / ई-व्हिसा ची देखील आवश्यकता नाही.
काठमांडूमधील इमिग्रेशन सेंटर किंवा इतर कोणत्याही ठिकाणाहून नेपाळ देशात प्रवेश मिळवण्यासाठी भारतीय त्यांचा पासपोर्ट किंवा या आर्टिकलमध्ये पुढे नमूद केलेले इतर योग्य ती कागदपत्रे बरोबर घेऊन प्रवास करू शकतात.
नेपाळला भेट देण्यासाठी भारतीय प्रवाश्यांना पासपोर्टची आवश्यकता आहे का?
होय, नेपाळला प्रवास करणाऱ्या भारतीयांना त्यांचा वैध पासपोर्ट बाळगणे आवश्यक आहे. तरी, ज्या पर्यटकांकडे नेपाळ देशात प्रवेश करताना नेपाळ ते भारत पासपोर्ट नाही आहे ते त्याऐवजी इतर कागदपत्रे दाखवून देशात प्रवेश घेऊ शकतात. हे दस्तऐवज आर्टिकलमध्ये पुढे नमूद केलेले आहेत.
भारतीय नागरिकांसाठी नेपाळमध्ये प्रवेश करण्यासाठीचे दस्तऐवज
भारतीय नागरिकांसाठी नेपाळ व्हिसा रीक्वायरमेंट्स आवश्यक नसल्या तरी देशात प्रवेश मिळवण्यासाठी खाली नमूद केलेले दस्तऐवज भारतीयांसोबत असणे आवश्यक आहे.
केंद्र/राज्य/केंद्रशासित प्रदेश प्राधिकरणाद्वारे जारी केलेला कोणताही फोटो-आयडेंटिटी प्रूफ.
भारतीय निवडणूक आयोगाद्वारे जारी केलेले वोटर आयडी
काठमांडू येथील भारतीय दुतावासाने जारी केलेले इमर्जनसी सर्टिफिकेट
नेपाळमध्ये प्रवेश मिळवण्यासाठीच्या खाली दिलेल्या रीक्वायरमेंट्स देखील भारतीय नागरिकांनी लक्षात घ्याव्यात.
65 वर्षांपेक्षा जास्त किंवा 15 वर्षांपेक्षा कमी वय असलेले नागरिक फोटो-आयडेंटिटी प्रूफ जसे पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, रेशन कार्ड ई. वापरून नेपाळमध्ये प्रवेश करू शकतात.
15 ते 18 वयोगटातील भारतीय नागरिक त्यांच्या शैक्षणिक संस्थेच्या प्राचार्यांनी जारी केलेले ओळख प्रमाणपत्र वापरून नेपाळमध्ये प्रवेश करू शकतात.
बाय रोड प्रवेश करताना कोणते दस्तऐवज आवश्यक आहेत?
स्वतःच्या वाहनाने नेपाळमध्ये प्रवेश करत असताना भारतीय नागरिकांनी त्यांच्या नागरिकत्वाचे पुराव्यासोबतच खालील दिलेले सर्व दस्तऐवज नेपाळ सीमेवर सादर करणे आवश्यक आहेत
वाहनाचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट
ड्रायव्हिंग लायसन्स
एक यातायात अनुमती किंवा वेहिकल परमिट
एक भानसार किंवा कस्टम परमिट
नेपाळला जाताना ट्रॅव्हल इन्शुरन्स घेणे महत्त्वाचे आहे का?
भारतासाठीच्या नेपाळ इमिग्रेशन नियमानुसार भारतीयांना देशात प्रवेश मिळवण्यासाठी ट्रॅव्हल इन्शुरन्स पॉलिसी असणे आवश्यक नाही. परंतु, ट्रेकिंगसाठी देशात येणाऱ्या प्रवाशांसाठी ट्रॅव्हल इन्शुरन्स पॉलिसी घेणे अनिवार्य आहे.
या पॉलिसीमध्ये सामान्यतः कोणतीही दुखापत झाली मग जरी ती एखादा साहसी खेळ खेळताना झाली असली तरी मेडिकल खर्चापासून हॉस्पिटलायझेशनपर्यंतचे सर्व चार्जेस कव्हर केले जातात. या प्लॅन्स अंतर्गत पासपोर्ट्स हरवल्याच्या अर्जासोबत सामानाच्या नुकसानाचे रीएमबर्समेंट केले जाते. कोणत्याही वेळी, अगदी नॅशनल हॉलिडेला देखील कार्यरत असलेल्या ग्राहक सेवेसह उपलब्ध असलेले हे प्लॅन्स अगदी किफायतशीर आहेत. हे प्लॅन्स एका प्रौढ व्यक्तीसाठी $50,000 विम्याच्या रकमेसाठी 175 रुपये प्रति दिवस प्रीमिअम पासून सुरु होतात.
ट्रॅव्हल इन्शुरन्स पॉलिसी घेतल्यामुळे न केवळ नेपाळला प्रवास करताना अचानक उद्भवणाऱ्या खर्चांचा सामना करण्यासाठी आर्थिक मदत मिळते तर आणीबाणीच्या काळात देखील त्वरित मदत मिळू शकते. या पॉलिसी फ्लाइट डीले आणि प्रवासादरम्यान येणाऱ्या इतर तत्सम समस्यांपर्यंत विस्तारित आहेत. विशेषतः एका अनोळखी परदेशात असणाऱ्या पर्यटकांसाठी या पॉलिसी उपयुक्त ठरू शकतात.
भारतीय नागरिकांसाठी नेपाळ व्हिसा संबंधी वारंवार विचारले जाणारे प्रश्न
व्हिसाशिवाय भारतीय नेपाळमध्ये किती काळासाठी राहू शकतात?
भारतीय देशाला भेट देणारा म्हणून नेपाळमध्ये अनिश्चित काळासाठी राहू शकतात. जरी भारतीयांसाठी नेपाळ व्हिसा आवश्यक नसला तरी तुम्ही 6 महीने सलग नेपाळमध्ये वास्तव्य केल्यानंतर काठमांडू दुतावासामध्ये तुम्हाला स्वतःची नोंदणी करून घ्यावी लागेल.
ट्रॅव्हल इन्शुरन्स पॉलिसीचे प्रीमिअम निवडताना वय हा निकष महत्वाचा आहे का?
ट्रॅव्हल इन्शुरन्स पॉलिसीमध्ये मेडिकल कव्हरेजबाबत देखील तरतूद आहे. परिणामस्वरूप ट्रॅव्हल इन्शुरन्स पॉलिसीचे प्रीमिअम निवडताना वय हा एक महत्वाचा निकष ठरतो. तरी, सामान्यतः अशा इन्शुरन्स पॉलिसींसाठी मान्यता मिळवण्यापूर्वी कोणत्याही प्रकारच्या शारीरिक तपासणीची आवश्यकता नसते.
नेपाळमध्ये प्रवेश करताना मी माझे आधार कार्ड सरकारने जारी केलेले वैध आयडी प्रूफ म्हणून वापरू शकतो का?
आधार कार्ड सरकारने जारी केलेले आयडी प्रूफ असले तरी भारतीयांसाठी नेपाळमध्ये प्रवेश करण्यासाठीचे ते वैध दस्तऐवज मानले जाणार नाही. त्याऐवजी, आर्टिकल मध्ये नमूद केलेले कोणतेही दस्तऐवज भारतीय त्यांच्यासोबत ठेवू शकतात.