इंटरनॅशनल ट्रॅव्हल इन्शुरन्स पॉलिसी ऑनलाइन खरेदी करा
Instant Policy, No Medical Check-ups

भारतीयांसाठी मॉरिशस व्हिसा

भारतीय नागरिकांसाठी मॉरिशस व्हिसाबद्दल सर्व माहिती

तुम्ही मॉरिशसला एक सुंदर कौटुंबिक ट्रीप आखत आहात? मग एका सुखद अनुभवासाठी सज्ज व्हा!

मॉरिशस हे एक लहान राष्ट्र आहे, जे दिल्लीपेक्षा अंदाजे दीडपट मोठे आहे. असे असले तरी, हे भारतीय पर्यटकांमध्ये सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे. 

तुम्हाला तुमचा हनिमून या स्वर्गीय ठिकाणी घालवायचा असेल किंवा फक्त मित्रांसोबत आनंद घ्यायचा असेल, तुम्ही मॉरिशसपेक्षा चांगले डेस्टीनेशन निवडू शकत नाही. मात्र, तुमच्या बॅग पॅक करण्यापूर्वी, थोडासा भारतीयांसाठी मॉरिशस व्हिसाबद्दल विचार करा. या कागदपत्रांची व्यवस्था केल्याने प्रवासातील तुमचा त्रास प्रकर्षाने कमी झाला पाहिजे.

भारतीयांना मॉरिशसला भेट देण्यासाठी व्हिसाची गरज आहे का?

होय, मॉरिशसला जाणाऱ्या भारतीय पासपोर्ट धारकांना देशात प्रवेश करण्यासाठी व्हिसाची आवश्यकता असेल.

भारतीयांसाठी मॉरिशसमध्ये व्हिसा ऑन अरायव्हल/ई-व्हिसा उपलब्ध आहे का?

होय, भारतातून मॉरिशसला प्रवास करू इच्छिणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी व्हिसा ऑन अरायव्हलची तरतूद उपलब्ध करून देण्यात आली आहे. खरं तर, भारतीयांसाठी मॉरिशस टूरिस्ट व्हिसा शोधत असताना, तुमच्याकडे एकच पर्याय असतो, तो म्हणजे व्हिसा ऑन अरायव्हल. भारतीय प्रवास सुरू होण्यापूर्वी व्हिसा घेऊ शकत नाहीत.

तुम्ही मॉरिशस एअरपोर्टवर पोहोचू शकता आणि तिथल्या इमिग्रेशन डेस्कवरून तुमच्या व्हिसाचे कागदपत्र घेऊ शकता.

भारतीय नागरिकांसाठी मॉरिशस व्हिसा शुल्क

प्रवाशांसाठी चांगली बातमी अशी आहे की भारतीयांसाठी मॉरिशस व्हिसा पूर्णपणे विनामूल्य आहे. याचा अर्थ असा की जरी तुम्हाला अधिकृतपणे देशात प्रवेश करण्यापूर्वी तुमची व्हिसाची कागदपत्रांची आवश्यकता असली, तरीही तुम्हाला व्हिसासाठी शुल्क भरण्याची गरज नाही.

 

भारतीय नागरिकांसाठी व्हिसा फ्री देशांबद्दल अधिक जाणून घ्या.

मॉरिशस व्हिसाकरिता भारतीय नागरिकांसाठी आवश्यक कागदपत्रे

मात्र, फक्त आवश्यकता समजून घेणे पुरेसे नाही. तुम्ही काही कागदपत्रे तयार ठेवावीत, जी मॉरिशसमधील भारतीय पासपोर्ट धारकांसाठी विनाविलंब व्हिसा ऑन अरायव्हल सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक आहेत. खालील यादीवर एक नजर टाका: 

  • सर्व आवश्यक तपशील आणि माहितीसह भरलेले व्हिसा फॉर्म

  • दोन अलीकडील पासपोर्ट साइज फोटो

  • पासपोर्ट जो मॉरिशसच्या भेटीच्या तारखेपासून आणखी किमान 6 महिन्यांसाठी वैध आहे.

  • जर तुम्ही मॉरिशसमधून दुसर्‍या गंतव्यस्थानावर जात असाल, तर तुम्ही त्या राष्ट्रासाठी वैध व्हिसा दाखवावा. अन्यथा, तुम्हाला कन्फर्म केलेले रिटर्न फ्लाइट तिकीट दाखवावे लागेल.

  • सर्व निवास तपशील, ज्यात रूम बुकिंग पावत्या आणि इतर तपशील समाविष्ट असावेत

  • जर एखादा मॉरिशियन नागरिक तुमचा राहण्याचा खर्च उचलत असेल, तर तुम्हाला प्रायोजकाकडून ते सूचित करणारे पत्र दाखवावे लागेल. पुढे, या प्रायोजकत्व पत्रामध्ये नागरिकाचा पत्ता आणि नातेसंबंध देखील नमूद करणे आवश्यक आहे.

  • देशात राहून विविध खर्च भागवण्यासाठी पुरेशा निधीचा पुरावा 

  • बँक स्टेटमेंट देखील आवश्यक असू शकते

आगमनावर मॉरिशस व्हिसासाठी अर्ज कसा करावा?

मॉरिशसला भेट देण्यासाठी भारतीयांना वेळ घेणारी व कंटाळवाणी व्हिसा अर्ज प्रक्रिया सहन करण्याची आवश्यकता नाही. खरं तर, कोणत्याही पूर्व-नोंदणी प्रक्रियेचे अनुसरण नाही. तुम्ही प्रवासात सर्व आवश्यक कागदपत्रे नेऊन एअरपोर्ट इमिग्रेशन विभागाकडून व्हिसा ऑन अरायव्हल घ्यावा.

मॉरिशसमधील भारतीय दूतावास

मॉरिशस हा तुलनेने सुरक्षित देश आहे, जो अंतर्गत कलह, दहशतवाद किंवा इतर कोणत्याही धोक्यांपासून मुक्त आहे. तरीही, देशातील भारतीय दूतावासाचा पत्ता आणि संपर्क तपशील लक्षात घेणे हे एक शहाणपणाचे पाऊल आहे. 

  • पत्ता - भारतीय उच्चायुक्तालय, 6 वा मजला, L.l.C. इमारत, प्रेस. जॉन केनेडी स्ट्रीट, पी.ओ. बॉक्स 162, पोर्ट लुईस, मॉरिशस.
  • संपर्क क्रमांक - +(230) 208 3775/76, 208 0031, 211 1400
  • कामाची वेळ - सोमवार ते शुक्रवार सकाळी 9.30 ते संध्याकाळी 5 दरम्यान

कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत, तुम्ही दूतावासातील प्रतिनिधीच्या संपर्कात असल्याची खात्री करा.

तुम्ही तुमच्या मॉरिशस प्रवासादरम्यान आणीबाणीच्या आर्थिक जोखीम कमी करण्याचा विचार करत असल्यास, इन्शुरन्स पॉलिसी निवडणे हा तुमचा सर्वोत्तम पर्याय आहे.

तुम्ही मॉरिशससाठी ट्रॅव्हल इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करावी का?

तुम्ही जिथे जाल तिथे ट्रॅव्हल इन्शुरन्स ही एक गरज आहे. मॉरिशस प्रवासासाठी अनिवार्य नसले तरी, असे कव्हर खरेदी केल्याने तुमची आर्थिक जोखीम एकदम कमी होऊ शकते.

तुम्हाला मॉरिशस ट्रॅव्हल इन्शुरन्सची आवश्यकता नाही असे वाटत असल्यास , पुन्हा विचार करा!

आंतरराष्‍ट्रीय स्थळांमध्‍ये वैद्यकीय मदतीची किंमत भारताच्‍या तुलनेत अधिक महाग आहे. त्यामुळे, आजार आणि दुखापतींमुळे तुमच्या खिशावर मोठा ताण येऊ शकतो, विशेषत: तुम्ही मॉरिशसमध्ये असताना. अशा अनियोजित खर्चांना कमी करण्यासाठी ट्रॅव्हल इन्शुरन्स योजना हा सर्वात सोपा मार्ग आहे.

अशा पॉलिसी केवळ वैद्यकीय आणीबाणीच्या प्रसंगी आर्थिक सहाय्य प्रदान करत नाहीत तर प्रवासादरम्यान हरवलेल्या/चोरी झालेल्या बॅगेज आणि पासपोर्टचे संरक्षण देखील देतात. तसेच, डिजिटसारखे नामांकित प्रदाते, त्यांच्या ट्रॅव्हल इन्शुरन्स योजनेअंतर्गत ट्रिप रद्दीकरण कव्हर ऑफर करतात. यामुळे तुम्हाला शेवटच्या क्षणी नियोजित सुट्टी पुढे ढकलण्याची गरज पडल्यास आर्थिक भार कमी होतो.

भारतीय नागरिकांसाठी मॉरिशस व्हिसाबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न

मी मॉरिशसमधील माझा मुक्काम ६० दिवसांपेक्षा जास्त वाढवू शकतो का?

व्हिसा ऑन अरायव्हल असलेल्या प्रवाशांना मॉरिशसमध्ये जास्तीत जास्त 60 दिवस मुक्काम करण्यास परवानगी आहे. मात्र, जर तुम्हाला जास्त काळ राहायचे असेल तर तुम्ही मुदतवाढीसाठी अर्ज करू शकता. अशा परिस्थितीत, तुम्हाला वेगळ्या व्हिसाची आवश्यकता असेल.

माझा पासपोर्ट तीन महिन्यांत संपणार आहे. मी मॉरिशस व्हिसासाठी पात्र आहे का?

नाही व्हिजिटरकडे त्यांच्या मॉरिशस भेटीच्या तारखेपासून किमान सहा महिन्यांसाठी वैध असलेला पासपोर्ट असणे आवश्यक आहे. हे नसल्यास, संभाव्य प्रवाशांनी प्रथम त्यांच्या प्रवासापूर्वी पासपोर्ट नूतनीकरणासाठी अर्ज करावा.

मी मॉरिशसला व्हिसा ऑन अरायव्हलसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतो का?

नाही मॉरिशसला येण्यासाठी प्रवाशांना व्हिसासाठी नोंदणी करण्याची गरज नाही. त्यांना फक्त देशाच्या एअरपोर्टवर आवश्यक कागदपत्रे देऊन संबंधित प्राधिकरणाकडून त्यांचा व्हिसा घेणे आवश्यक आहे.